शेअर मार्केट म्हणजे काय? (share market information in Marathi )
आपल्याला सगळयांना सर्वान एक भेडसावणारा प्रश्न हा असतो की आपण आपल्या कमावलेल्या पैशांची गुंतवणुक कशी करायची? तसेच ती कोठे करायची?कारण आपला प्रत्येकाचा कष्टाचा पैसा असतो तो आपण सा कुठेही नाही लावु शकत.त्यामुळे आपला पैसा सुरक्षित राहील अणि त्यात वाढही होत राहावी असे काही मार्ग आपण नेहमी शोधत असतो.अशाच काही मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे शेअर मार्केट होय
1)शेअर मार्केट म्हणजे काय?
मित्रांनो शेअर मार्केट म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो.की नेमकं शेअर मार्केट म्हणजे असते तरी काय? मित्रांनो शेअर मार्केटचा अर्थ समजुन घेण्यासाठी आधी त्याच्या शब्दांची आपण फोड करुया अणि मग त्याचा अर्थ लावुया.मित्रांनो शेअर म्हणजे वाटा तसेच हिस्सा किंवा भागीदारी.अणि मार्केट म्हणजे बाजार म्हणजे दोघांचा मिळुन असा अर्थ होतो की भागीदारीचा बाजार,वाटेदारीचा तसेच हिस्सेदारीचा बाजार.म्हणजेच असा एक बाजार जेथे विविध क्षेत्रातील विविध कंपन्या आपल्या कंपनीच्या मिळकतीतील काही भाग गुंतवणुकदारांना ठाराविक रक्कमेत देतात अणि त्यातुन आपल्या व्यवसायाचा ,कंपनीचा अधिक विकास करु पाहत असतात.
2) शेअर मार्केटमध्ये नेमकी कोण कोण असते?
मित्रांनो शेअर मार्केट म्हणजे काय?हे तर आपल्याला कळले चला तर आता जाणुन घेऊयात की शेअर मार्केटमध्ये नेमकी कोण कोण असते?मित्रांनो शेअर मार्केटमध्ये वैयक्तिक पातळी वरुन गुंतवणुकीचे व्यवहार करणारे वैयक्तिक गुंतवणुकदार त्याचबरोबर म्युच्अल फंड, हेज फंड,विमा कंपनी मोठमोठे उद्योगसमुह इत्यादींचा सुदधा यात समावेश होत असतो.
३) शेअर मार्केट हे कोणाकोणासाठी असते?
खरे पाहायला गेले तर शेअर बाजार हे सर्वांसाठीच खुले असते.पण काही लोकांचा असा गैरसमज होऊन बसला आहे की शेअर बाजार हा एक नुसता सटटा असतो अणि तो ही फक्त पैशावाल्या लोकांनीच तो खेळायचा असतो.त्यामुळे गरीब अणि सर्वसामान्य लोक यापासुन नेहमी दुर राहणेच पसंद करतात. परंतु मंडळी शेअर मार्केट हे त्यांच्यासाठी खासकरुन असते जे आपल्या उत्पन्नातील काही रक्कम गुंतवणुक म्हणून मोजू शकतात.अणि त्यासाठी थोडा धोका पत्कारायलाही ते तयार असतात.शेअर बाजारात शेअर्सची गुंतवणुक करताना त्याचा कालावधी आपण काही मिनिटे तास महिना वर्ष असा आपल्याला पाहिजे तसा आपल्या पदधतीने ठरवता येत असतो.म्हणजे येथे गुंतवणुक करताना आपल्यावर कोणतेही बंधन लादले जात नाही की इतके दिवसांसाठीच आपल्याला शेअर गुंतवावे लागतील.ही एक आपल्याला इथे मिळणारी चांगली सवलत असते.आपल्या मर्जीनुसार आपण आपले शेअर गुंतवु शकतो.
शेअर्सचे प्रकार :
तसे पाहायला गेले तर मित्रांनो शेअर्सचे खुप वेगवेगळे प्रकार आपणास पाहावयास मिळतात.पण मी तुम्हाला ह्याचे तीन प्रकारात वर्गीकरण करुन सांगतो.
- सर्वसामान्य प्रकारचे शेअर
- बोनसनुसार शेअर
- विशिष्ट प्राधान्यता प्राप्त असलेले शेअर
सर्वसामान्य प्रकारचे शेअर:
ह्या प्रकारचे शेअर कोणीही सर्वसामान्य तसेच गरीब व्यक्तीही खरेदी करु शकत असतो.
म्हणुनच याला सर्वसामान्य पदधतीचे शेअर असे देखील म्हणता येईल.कारण हे शेअर सर्वसामान्य व्यक्तींनाही खरेदीसाठी उपलब्ध करुन दिले जात असतात.
बोनसनुसार शेअर:
समजा आपली एखादी कंपनी आहे अणि तिला चांगला नफा प्राप्त झालेला आहे.अणि आपल्या कंपनीला त्यातला काही भाग आपल्या शेअर होल्डरला द्यायचा आहे.पण शेअर होल्डरला ते शेअर देताना आपली कंपनी त्यांच्याकडून कोणतेही मुल्य आकारात नाही.मग असा शेअर असतो बोनस शेअर.कारण हा शेअर कंपनीच्या शेअर होल्डरला बोनस स्वरुपात दिला जात असतो.
विशिष्ट प्राधान्यता प्राप्त असलेले शेअर:prefered share
विशिष्ट प्राधान्यता प्राप्त शेअर हे काही विशिष्ट प्राधान्यता प्राप्त लोकांनाच दिले जात असतात.म्हणुनच याला विशिष्ट प्राधान्यता प्राप्त शेअर असे म्हटले जात असते.म्हणजेच मार्केटमध्ये ह्या प्रकारचे शेअर हे काही विशिष्ट लोकांनाच मिळवुन दिले जात असतात सगळयांना नाही.ही एक खुप मोठी मर्यादा आपल्याला ह्या प्रकारच्या शेअरची आपल्याला येथे पाहायला मिळत असते.
शेअर मार्केट महत्वाचे का आहे?
शेअर मार्केट विविध कंपन्यांना आपले पैसे जमविण्यासाठी एक व्यासपीठ प्राप्त करुन देत असते.हे कपन्यांना आपल्या शेअर्सचा सार्वजनिक पदधतीने व्यापार करण्याची परवानगी देत असते.
हे सार्वजनिक बाजारपेठेत शेअर मार्केट हे कंपन्यांना आपल्या वाटयाचे शेअर विकुन विस्तारासाठी अतिरीक्त जमाखर्च जमविण्यास मदत करत असते.
Share Market Information In Marathi
भारतीय शेअर बाजारच्या महत्वाच्या इंडेक्स- ह्या इंडेक्स मध्ये मोठ्या कंपनीचे आणि ह्या तरलते बाबत मोठ्या असलेल्या कंपनीचे स्टॉक असतात, ह्या इंडेक्स एक मानक म्हणून काम करतात. म्युचल फंड किंवा एकदा समभाग कसा आहे किती परतावा देवू शकतो ,हे ह्या इंडेक्स वरुन अंदाज करू शकतो
Share Market Information In Marathi – मुख्य निर्देशांक -index | भारतातील विविध सेक्टर नुसार इंडेक्स | विविध मुद्द्यांवर आधारित इंडेक्स |
NIFTY 50 | NIFTY Auto Index | NIFTY Aditya Birla group |
NIFTY NEXT 50 | NIFTYBank Index | NIFTY Commodities Index |
NIFTY 100 | NIFTY Financial Services Index | NIFTY CPSE Index |
NIFTY 200 | NIFTY Financial Services | NIFTY Energy Index |
NIFTY 500 | NIFTY FMCG Index | NIFTY India Consumption Index |
NIFTY500 MULTICAP | NIFTY Healthcare Index | NIFTY Infrastructure Index |
NIFTY MIDCAP150 | NIFTY IT Index | NIFTY Mahindra Group |
NIFTY MIDCAP 50 | NIFTY Media Index | NIFTY Midcap Liquid 15 Index |
NIFTY MIDCAP 100 | NIFTY Metal Index | NIFTY MNC Index |
NIFTY SMALLCAP 250 | NIFTY Pharma Index | NIFTY PSE Index |
NIFTY SMALLCAP 50 | NIFTY Private Bank Index | NIFTY Services Sector Index |
NIFTY SMALLCAP 100 | NIFTY PSU Bank Index | NIFTY Shariah 25 Index |
NIFTY LARGEMIDCAP 250 | NIFTY Realty Index | NIFTY Tata group |
NIFTY MIDSMALLCAP 400 | NIFTY Consumer Durables Index | NIFTY Tata group 25% Cap |
NIFTY Oil and Gas Index | NIFTY100 Liquid 15 Index | |
NIFTY50 Shariah Index | ||
NIFTY500 Shariah Index | ||
NIFTY SME EMERGE | ||
NIFTY100 ESG | ||
NIFTY100 Enhanced ESG | ||
NIFTY100 ESG Sector Leaders Index |