थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय ? Third party Insurance Marathi mahiti

 

थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय – Third party Insurance Marathi mahiti

नोकरी  व्यवसायाकरता किंवा कुठे सहलीला जाणे असो किंवा गावी जाणे असो आज स्वत:च्या वाहनाणे फिरणे हे तितकस कठीण नाही. बर्‍या पैकी असलेले पगार , मासिक कमाई  आणि बँक कडून मिळणारे सहज सोपे लोन यामुळे कार घेण सोप झाले आहे परंतु आपण काळजीने व पूर्ण सुरक्षित पणे आणि नियमांच पालन करून  कार चालवत असलो तरी  आपल्या मनात कार चा अपघात होईल याची थोडी का असेना भीती सतत असते.

होणारी घटना तर आपण टाळू शकत नाही ,पण आपण त्या घटनेला सामोरे जाण्यासाठी अगोदरच काही प्लॅनिंग नक्कीच केले पाहिजे. जेणेकरून होणार्‍या घटनेचा तुमच्या जीवनावर आर्थिक किंवा मानसिक आघात बसणार नाही , अश्या दुर्दवी घटनेतून होणार नुकसान कमीत कमी असेल.

अश्या वेळी स्वतची कार , वाहन असेल तर वाहन विमा म्हणजेच म्हणजे कार इन्शुरन्स असणे हे नक्कीच  फायदेशीर ठरते.

कार इन्शुरन्स हे एका कॉन्ट्रॅक्ट सारखे असते.आपल्याला वाहन विमा बाबत च्या काही मूलभूत गोष्टी  नक्की माहीत असाव्यात .

फर्स्ट,सेकंड आणि थर्ड पार्टीबद्दल माहिती

उदाहरण म्हणजे,  तुम्हाला कार इन्शुरन्स मधील फर्स्ट,सेकंड आणि थर्ड पार्टीबद्दल माहिती आहे का ? बहुतेक या बाबत आपण जास्त माहिती घेत नाही . परंतु आपल्याला ही माहिती असायला हवी

  • समजा मी कार घेतली आणि कार इन्शुरन्स देखील घेतला.तर मी फर्स्ट पार्टी झालो.
  • ज्या कंपनीकडून मी इन्शुरन्स विकत घेतला ती सेकंड पार्टी झाली.आणि
  • समजा चुकून माझ्याकडून अपघात झाला तर ज्याचा अपघात झाला त्याला थर्ड पार्टी म्हणतात.
See also  सॅलरी अकाऊंट म्हणजे काय? Salary account meaning in Marathi

मोटर वेहीकल 1988 नियमानुसार प्रत्येक गाडी चालवणाऱ्या व्यक्तीने थर्ड पार्टी इन्शुरन्स घेणे गरजेचे आहे.तुमची जर गाडी आहे आणि तुम्ही थर्ड पार्टी इन्शुरन्स घेतला नसेल तर तुम्ही गुन्हेगार समजले जाता.थर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हर मध्ये आपल्या गाडीकडून झालेले समोरच्या व्यक्तीच्या गाडीच्या नुकसानाचा खर्च इन्शुरन्स कंपनी भागवते.

थर्ड पार्टी इन्शुरन्स – कव्हर केल्या जातात ? Third party Insurance mahiti Marathi

थर्ड पार्टी इन्शुरन्स मध्ये खालील गोष्टी कव्हर केल्या जातात :

  • ह्या इन्शुरन्स मध्ये समोरच्या व्यक्तीचे गाडीचे झालेले नुकसान कव्हर केले जाते.
  • अपघातामध्ये समोरच्याला झालेली शारीरिक दुखापतीचा वैदकीय खर्च किंवा मृत्यू ह्या इन्शुरन्स मध्ये कव्हर केला जातो.
  • समजा ह्या दुर्दवाने वाहन चालकाचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले,तर त्याचे 50 लाखपर्यंत या इन्शुरन्स चा लाभ होतो.ह्याला PA कव्हर म्हणतात.
  • PA कव्हर ची किंमत तुमच्या प्रीमियम मध्ये वेगळी घेतली जाते.पहिली PA ची किंमत 100 होती,तेव्हा 1 लाखापर्यंत कव्हरेज मिळायचं.IRD एजन्सी ने नंतर यामध्ये बद्दल केला.आता कार इन्शुरन्स मध्ये PA चे प्रीमियम मध्ये 300 रुपये घेतले जातात आणि आता 50 लाखपर्यंत कव्हरेज मिकते
  • तुमची जर बाईक असेल तर तुमचा थर्ड पार्टी कव्हर खूपच कमी असतो..1000 CC च्या गाडी च्या इन्शुरन्स मध्ये देखील थर्ड पार्टी प्रीमियम कमी असते.1500 Cc पर्यंत थोडे जास्त प्रीमियम किंमत असते आणि 1500 cc च्या पुढे थर्ड पार्टी प्रीमियम ची किंमत डबल होते.म्हणजेच जशी जशी तुमच्या गाडीच्या इंजिन ची क्षमता वाढते तसे तसे तुमच्या गाडीची साईझ वाढते आणि मोठी साईझ असणारी गाडी जास्त डॅमेज करू शकते.म्हणून जास्त Cc च्या गाडीमध्ये थर्ड पार्टी प्रीमियम जास्त असतो.
  • आपल्या कार इन्शुरन्स मध्ये फक्त आपलाच personal accident कव्हर केला जातो.तुम्हाला जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा PA कव्हर करायचा असेल,तर तुम्ही तो करू शकता.
  • माझ्या मते तुम्ही कमीत कमी घरातील दोघांचा PA कव्हर केला पाहिजे.म्हणजे अपघातात तुमच्या कुटुंबातील सदस्याला काही झाले,तर त्याचा खर्च ह्या कव्हरेज मध्ये कव्हर होईल.
See also  Loan व Debt मध्ये काय फरक आहे? Difference in loan and debt

थर्ड पार्टी इन्शुरन्स च्या अटी आणि नियमवली – Third party Rules and regulations

  • समजा तुमचा अपघात झाला आणि फक्त तुमच्या किंवा समोरच्या गाडीचे नुकसान झाले,तर यामध्ये इन्शुरन्स कंपनी विशिष्ट रक्कम तुम्हाला देते.
  • समजा अपघातात कोणाचातरी मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले,तर तेव्हा इन्शुरन्स कंपनी कोर्टच्या आदेशानुसार कितीही रक्कम देऊ शकते.ही रक्कम मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कामाईवरून,त्याच्या वयावरून ठरवली जाते.

 इन्शुरन्स कंपनी  कोणत्या  नुकसानाचा खर्च देत नाही -Exclusions ?

  • समजा तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असाल आणि तुमचा अपघात झाला तर अशा परिस्थितीत इन्शुरन्स कंपनी तुमचा झालेला खर्च भागवत नाही.
  • विना वाहन परवाना वाहन चालवत असल्यास.
  • युद्धं किंवा त्या परिस्थिति.
  • वाहन धारका व्यतिरिक्त अन्य कुणी वाहन चालवत असल्यास.

 


SIP KNOWLEDGE

Leave a Comment