लार्ज कॅप,मिडकॅप अणि स्माॅल कॅप शेअर्स म्हणजे काय? LARGE CAP,MID CAP AND SMALL CAP SHARE IN MARATH

लार्ज कॅप,मिडकॅप अणि स्माॅल कॅप शेअर्स म्हणजे काय? large cap,mid cap and small cap share in Marathi

लार्ज कॅप मिडकॅप स्माॅल कॅप हे स्टाॅक मार्केट मधील काही अत्यंत महत्वाचे टर्म्स आहेत.

२०१७ मध्ये सेबीने एक परिपत्रक जारी केले होते ज्यात असे सांगितले होते की ज्या कंपनींचे मुल्यांकन बाजार भांडवल मार्केट मध्ये सर्वाधिक असेल त्या नुसार कंपनीच्या शेअर्सला लार्ज कॅप,मिड कॅप,स्माॅल कॅप अशा तीन भागांमध्ये ८०,१५ अणि ५ ह्या तीन पदधतीने विभाजित करण्यात येईल.

म्हणजे कंपनींचे त्यांच्या मार्केट कॅप नुसार तीन भागात वर्गीकरण करण्यात आले होते.

लार्ज कॅप कंपनी म्हणजे काय?

यात सुरूवातीला ज्या कंपन्यांचे बाजारमूल्य सर्वाधिक आहे अशा १ ते १०० मध्ये ज्या कंपन्या येतात त्यांना लार्ज कॅप असे म्हटले जाते.

मिड कॅप कंपनी म्हणजे काय?

१०० पासुन २५० पर्यंत ज्या कंपन्या येतात ज्यांचे बाजारमूल्य मध्यम स्वरूपाचे असते त्यांना मिड कॅप असे म्हटले जाते.

स्माॅल कॅप कंपनी म्हणजे काय?

अणि २५० नंतरच्या सर्वात कमी बाजारमूल्य प्राप्त होत असलेल्या कंपन्यांना स्माॅल कॅप असे म्हटले जाते.

लार्ज कॅप,मिड कॅप अणि स्माॅल कॅप या तिघांमध्ये काय फरक आहे?

लार्ज कॅप मध्ये गुंतवणूक केल्याने आपला पैसा स्थिर अणि सुरक्षित राहत असतो म्हणून खुप जण लार्ज कॅप मध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करीत असतात.

LARGE CAP,MID CAP AND SMALL CAP SHARE IN MARATH
LARGE CAP,MID CAP AND SMALL CAP SHARE IN MARATH

लार्ज कॅप मध्ये चांगला परतावा मिळण्याची शक्यता मध्यम प्रमाणात असते.पण रिस्क खुप कमी असते.

मिड कॅप मध्ये गुंतवणूक केल्याने आपला पैसा सुरक्षित राहण्यासोबत त्यात वाढ देखील चांगली होत असते.
म्हणून खुप म्युच्युअल फंड गुंतवणूकदार मिड कॅप मध्ये गुंतवणूक करीत असतात.

See also  रिपेमेंट अणि प्रिपेमेंट म्हणजे काय? Repayment and prepayment meaning in marathi

मिड कॅप मध्ये आपणास जास्तीत जास्त परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते पण यात रिस्क देखील लार्ज कॅप पेक्षा अधिक असते.

लार्ज कॅप शेअर्स मध्ये तरलता म्हणजे लिक्विडीटी अधिक जास्त प्रमाणात असते यात आपणास शेअर्सची खरेदी विक्री करता येत असते.त्यामुळे लार्ज कॅप मध्ये शेअर्स खरेदी देखील करता येतात अणि त्यांची विक्री देखील करता येते.

स्माॅल कॅप मध्ये लोअर सर्किट मार्जिन लागत असल्याने यात शेअर्सची आपणास खरेदी विक्री करता येत नाही म्हणजे यात लिक्विडीटी कमी असते.