एस एससी बोर्डाच्या दहावीच्या शाळा एप्रिल महिन्यातच सुरू होणार
दहावीच्या विद्यार्थ्यांची शाळा कधीपासून सुरू केली जाणार आहे याबाबद माहीती देणारी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.
एस एस सी बोर्डातील दहावीच्या वर्गाचे वर्ग नववीची वार्षिक परीक्षा झाल्यानंतर लगेच दोन दिवसांमध्ये एप्रिल महिन्यात सुरू केले जातील अशी घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
ह्या विद्यार्थ्यांना मे महिन्यात म्हणजे तीस दिवसांसाठी सुटटी दिली जाणार आहे.अणि जुनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा शाळेस आरंभ केला जाणार आहे.
याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना असे सांगितले गेले आहे की सीबीएसई अणि आयसी एस ई बोर्डाची सुरूवात ही मार्च अणि एप्रिलच्या दरम्यान केली जात असते ह्याच बेसेसवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई शहरामध्ये अनेक शाळांमध्ये नववीची परीक्षा घेऊन लगेच दहावीचे वर्ग घेण्यास सुरुवात देखील केली असल्याचे सांगितले जात आहे.लवकरच पुणे जिल्ह्यातील दहावीचे वर्ग सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
खुप विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की असे का केले जात आहे दहावीचे वर्ग जुनमध्ये का सुरू केले जात नाही
तर यामागे शिक्षण विभागाचा असा हेतु आहे की लवकर शाळा घेऊन डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यायचा जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करायला जास्त वेळ प्राप्त होईल.
थोडक्यात विद्यार्थी वर्गाला दहावीचा अभ्यास करण्यासाठी जास्त वेळ मिळावा ह्या हेतूने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.