त्रषी सिंह बनला इंडियन आयडॉल १३ मधील विजेता – Indian idol 13 winner in Marathi

त्रषी सिंह बनला इंडियन आयडॉल १३ मधील विजेता Indian idol 13 winner in Marathi

त्रषी सिंह याने इंडियन आयडॉल १३ मधील विजेतेपद पटकावले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की काल २ एप्रिल २०२३ रोजी इंडियन आयडॉल ग्रॅण्ड फिनाले याचा १३ वा पर्व सुरळीतपणे पार पडला.हया नुकत्याच पार पडलेल्या १३व्या पर्वामध्ये त्रषी सिंह याने प्रथम विजेतेपद पटकावले आहे.

असे सांगितले जाते की ह्या स्पर्धेत अनेक टाॅप स्पर्धकांनी सहभाग घेतला होता पण त्या सर्वांना पिछाडीवर टाकून विजेतेपद पटकावण्यात त्रषी सिंह याने यश प्राप्त केले आहे.

कोणकोणत्या टाॅप स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता?

२ एप्रिल २०२३ रोजी इंडियन आयडॉल ग्रॅण्ड फिनाले याचा जो तेरावा पर्व पार पडला त्यात चिराग कोतवाल,शिवम सिंह,सोनाक्षी कर,देवस्मिता अणि विदिप्ता चक्रवर्ती इत्यादी टाॅप स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

विजेता त्रषी सिंह याला काय पारितोषिक मिळाले?

इंडियन आयडॉल ग्रॅण्ड फिनाले तेरा मधील विजेता त्रषी सिंह याला बक्षिस म्हणून २५ लाख रूपये इतकी रोख रक्कम देण्यात आली आहे सोबतच त्याला एक मारूती सिजुकी कार देखील भेट म्हणून देण्यात आली आहे.

एवढेच नव्हे तर विजेता त्रषी सिंह याने सोनी म्युझिक सोबत रेकाॅर्डिग करण्यासाठी एक करार देखील केला असल्याचे सांगितले जात आहे.

दीर्घ कालावधी पासुन सुरु असलेल्या ह्या शोला अखेरीस आपला योग्य अणि विजेता प्राप्त झाला आहे.हया शोचे जज म्हणून प्रख्यात गायक हिमेश रेशमिया नेहा कक्कर हे काम पाहत होते.

आपले स्वप्न साकार झाले असे म्हणत आपल्या ह्या यशाबद्दल त्रषी सिंह याने इंडियन आयडॉल टीमचे तसेच इंडियन आयडॉल मधील असलेल्या सर्व प्रमुख जजचे देखील मनापासून आभार मानले आहेत.

त्रषी सिंह यांच्या यशाबद्दल त्यांचे सोशल मिडिया तसेच विविध माध्यमांद्वारे अभिनंदन करून कौतुक केले जाते आहे.

See also  २०२६ पर्यंत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सौर उत्पादक देश बनणार

इंडियन आयडॉल काय आहे?

इंडियन आयडॉल हा एक टिव्हीवर दाखवला जात असलेला सिंगिंग रिअॅलिटी शो आहे.

ज्याच्यामुळे आपल्या भारत देशातील बाॅलिवुड इंडस्ट्रीजला आजपर्यंत अनेक नवनवीन उत्तम गायक प्राप्त झाले आहेत.

त्रषी सिंह कोण आहे?

त्रषी सिंह हा अयोध्या येथील मुळचा राहणारा आहे ज्याने इंडियन आयडॉल मधील सिंगिंग रिअॅलिटी शो मध्ये सहभाग घेतला होता.

असे सांगितले जाते आहे की टाॅप फायनल मध्ये एकुण सहा स्पर्धक सहभागी होते पण त्यात लाईव्ह वोटिंग दरम्यान प्रेक्षकांचा कौल त्रषीला मिळाला अणि त्रषी याने अखेरीस ह्या स्पर्धेत बाजी मारली आहे.

त्रषी सिंह हा त्याच्या आईवडिलांचा दत्तक घेतलेला मुलगा आहे ज्याने हे यश प्राप्त करून आपल्या आईवडिलांचे नाव मोठे केले आहे.

त्रषी हा सध्या देहरादून मधील हिमगीरी नावाच्या विद्यापीठात शिक्षण घेत आहे

त्रषीचे आईवडिलांनी त्रषीच्या यशाबाबद आनंद व्यक्त करताना पोराने आमच्या जीवनाचे सोने केले असे म्हटले आहे