न्युट्रीशिअन अणि डायटेशिअन मधील फरक -Difference between nutrition and dietitian in Marathi

न्युट्रीशिअन अणि डायटेशिअन मधील फरक -Difference between nutrition and dietitian in Marathi

मित्रांनो आपल्या हेल्थ फिटनेसची डाएटची काळजी घेत असताना दोन शब्द हे आपणास नेहमी ऐकायला मिळत असतात.ते दोन शब्द आहे न्युट्रीशिअन अणि डाएटेशिअन.

जेव्हा आपण हे दोन शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला हे समजून जाते की हे दोघे शब्द आरोग्य आहार अणि फिटनेसशी संबंधित आहे.

पण याव्यरीक्त इतर कुठलीही सखोल माहीती आपणास याविषयी नसते.काही जणांना असेही वाटते की हे दोघा शब्दांचा अर्थ एकच होतो.पण तसे काहीही नाहीये.

हे दोघेही दोन वेगवेगळे शब्द आहे ज्याचा अर्थ एकमेकांपेक्षा भिन्न असतो.

याचकरीता आज आपण न्युट्रीशिअन अणि डाएटेशिअन या दोघांमधील फरक जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्या मनात याविषयी कुठलीही शंका राहणार नाही.

● न्युट्रीशन आपण पोषणतज्ञाला म्हणत असतो.अणि डायटेशिअन आपण आहारतज्ञांना म्हणत असतो.

● न्युट्रीशन अणि डाएटेशिअन ही दोघेही वेगवेगळी पदे आहेत.या दोघांच्याही आपापल्या वेगवेगळया जबाबदारया भुमिका कार्ये असतात.दोघांची शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असते.

● न्युट्रीशिअन हा एक असा व्यक्ती असतो ज्याने पोषणतत्वातील एखादा डिप्लोमा कोर्स,डिग्री प्राप्त केलेली असते.जो पोषण तत्वांचा तज्ञ असतो.याला पोषण तत्वांविषयी सखोल ज्ञान असते.

कुठल्या पोषकतत्वासाठी आपणास कुठला अणि कसा आहार घेणे आवश्यक आहे?कुठल्या आहारात किती पोषकतत्वे आहेत?शरीराचे वजन कसे वाढवायचे कशा पदधतीने कमी करायचे?फिटनेस कशी मेटेंन करून ठेवायची?

शरीराला पोषकतत्वे मिळण्यासाठी काय खावे काय नही खावे हे पोषणतज्ञ आपणास सांगत असतात तसेच याविषयी मार्गदर्शन करीत असतात,सल्ला देण्याचे काम करीत असतात.

● डायटेशिअन हा एक असा व्यक्ती असतो ज्याने आहार शास्त्राचा सखोल अभ्यास केलेला असतो.याला पोषणतत्व अणि आहार या दोघांचेही नाँलेज असते.त्याच्याकडे आहार तज्ञ असल्याचा सर्टिफाईड कोर्स,डिप्लोमा,डिग्री देखील असते.

कुठल्या व्यक्तीने कसा अणि कोणता आहार घ्यावा आहारादवारे कुठलाही आजार कसा बरा करायचा याविषयी तज्ञ डायटेशिअन आपला सल्ला देत असतात.

See also  राष्ट्रीय VO दिवस काय आहे? । इतिहास, तारिख, तथ्ये । National VO Day 2023 In Marathi

● न्युट्रीशिअनला कुठल्याही हाँस्पिटलमध्ये नोकरी करता येत नसते.तो फक्त आरोग्य विभागात काम करू शकतो.

पण डाएटेशिअन हा कुठल्याही हाँस्पिटलमध्ये नर्स तसेच डाएटेशिअन म्हणुन काम करू शकते.

● डाएटेशिशन आपणास हे सांगतात की कुठल्या आजाराला बरा करण्यासाठी कसा अणि कोणता आहार आपण घ्यायचा?पण आपले वजन वाढले आहे की कमी झाले आहे नेमके किती हवे हे जाणुन घेण्यासाठी आपणास न्युट्रीशिअनच्या सल्ल्याची आवश्यकता भासु शकत असते.

● डाएटेशिअन हा न्युट्रीशिअनचा भुमिका एकवेळ पार पाडु शकतो पण न्युट्रीशिअन एका डायटेशिअनची भुमिका अजिबात पार पाडु शकत नसतो.

● डाएटीशिअनकडे आपल्या कामाचे एक लायसन असते.न्युट्रीशिअनकडे कुठलेही लायसन नसते.पण हा देखील एक प्रोफेशनलच असतो.

● या दोघांकडे आपल्या कामाची पदवी तसेच पदव्युतर डिग्री डिप्लोमा कोर्स असावा लागतो.

● आपल्या कामाचे लायसन प्राप्त करण्यासाठी डाएटेशिअनला लायसन्स परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण व्हावे लागते.यानंतर त्यांना प्रोफेशनली वर्क करण्यासाठी परवानगी प्राप्त होत असते.

न्युट्रीशिअन बनणे योग्य की डाएटेशिअन बनणे अधिक योग्य आहे?

ज्यांना हेल्थ फिटनेसशी संबंधित ह्या क्षेत्रात करिअर करायचे आहे.जर आपणास ह्या क्षेत्राशी संबंधित एखादा डिप्लोमा कोर्स करायचा असेल तर आपण डाएटेशिअनमध्ये डिप्लोमा करायला हवा.

कारण यात आपण फक्त कुठल्या आहारात किती पोषकतत्वे आहेत हे रूग्णाला सांगत नसतो तर यासोबत त्या रूग्णांच्या कुठल्याही आजाराचे आहारादवारे निदान देखील आपण यशस्वीरीत्या करू शकतो.

अणि डाएटिशिअनचे वेतन कमाई न्युट्रीशिअनपेक्षा अधिक असते.