सोलो ट्रिप करण्याचे फायदे – Solo trip benefits in Marathi

सोलो ट्रिप करण्याचे फायदे – Solo trip benefits in Marathi

● सध्या फँमिली ट्रीपसोबत सोलोट्रीपला देखील खुप महत्व प्राप्त होत आहे.कारण सोलो ट्रिपला गेल्याने आपल्याला जीवनात नवनवीन अनुभव प्राप्त होत असतात.

● आपल्याला सोलो ट्रिपने याची जाणीव होते की आपण एकटे देखील जीवन जगु शकतो अणि आनंदी राहु शकतो.आनंदी राहण्यासाठी आपणास कुठल्याही व्यक्तीची आवश्यकता नाहीये.

● सोलो ट्रिपमध्ये आपल्याला आपल्या आवडीच्या सर्व गोष्टी करता येतात.फँमिली वगैरेचे कुठलेही बंधन न बाळगता स्वतंत्रपणे मनासारखे जगता वागता येते.प्रवासात पाहीजे ते खाता येते.प्रवासाची खरी मजा अनुभवता येते.

● सोलो ट्रिपमध्ये आपण एकदम निवांत असतो.सोलो ट्रिपमध्ये आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेऊ शकतो.

● सोलो ट्रिप मध्ये आपण काही दिवसांसाठी एकटे बाहेर जात असतो अणि ट्रीप करून जेव्हा आपण खुप दिवसांनी आपल्या प्रियजणांना कुटुंबाला भेटतो तेव्हा आपल्या नात्यात प्रेम आपुलकी वाढते.

● आपल्या रोजच्या कंटाळवाण्या जीवनामधुन रोजच्या घरगुती वादविवादातुन,टेंशनमधून,ताणतणावामधुन,भांडण तंटा वादविवादातुन आपणास ब्रेक मिळतो अणि सोलो ट्रिप करून परत आल्यावर एक नवीन उत्साहाची निर्मिती आपल्या मनात शरीरात होत असते.

● सोलो ट्रिपला गेल्यावर आपण प्रवासात नवनवीन निसर्गरम्य ठिकाणांना भेट देतो निसर्गाच्या सहवासात एकटयाने वेळ व्यतीत करतो,नवनवीन लोकांना भेटतो,नवनवीन व्यक्तींशी आपली ओळख होते मैत्री होते.इतर लोक कसे हलाखीत,अडीअडचणीत,दुखात सुदधा आनंदाने जिददीने जगु राहीले हे आपणास बघायला मिळते.ज्याने आपणास प्रेरणा प्राप्त होते.

● इतर देशातील लोकांच्या संस्कृतीची आपणास ओळख होते.प्रवासात आपल्याला असे नवीन चांगले वाईट अनुभव प्राप्त होतात जे याआधी आपणास कधीच प्राप्त झाले नव्हते.

● जेव्हा आपण सोलोट्रिपला एकटे जातो तेव्हा आपण रोजच्या कम्फरटेबल लाईफमधुन बाहेर पडत असतो.आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडल्याने आपणास नवीन वातावरणात जाता येते नवनवीन गोष्टी शिकायला करायला मिळतात अनुभवायला मिळतात.नवनवीन गोष्टी माहीत होत असतात.

● सोलो ट्रिपमध्ये आपण नवीन अनोळखी लोकांना ठिकाणांना भेट देतो त्यांना जाणुन घेण्याचा प्रयत्न करतो.नवनवीन अनुभव प्राप्त करतो ज्याने आपल्या विचारात,दृष्टीकोनात बदल घडुन येतो.

See also  भारतातील सर्वात श्रीमंत मंदीरे - Richest Temples In India

● सोलोट्रिप करून आपण स्वताला अधिक जवळुन जाणुन घेऊ शकतो स्वताच्या आवडी निवडी ओळखुन स्वताच्या जीवनाला एक नवीन दिशा वळण देऊ शकतो.

● प्रवासात आलेल्या नवनवीन अनुभवांमुळे भेटलेल्या अनोळखी प्रेरणादायी लोकांमुळे आपण विचाराने ज्ञानाने अधिक समृदध होतो.

● सोलो ट्रिप केल्याने आपणास अनेक चांगले तसेच वाईट अनुभव प्राप्त होत असतात.आपणास जीवनात आलेल्या नवनवीन अडीअडचणींना संकटांना कसे तोंड द्यायचे त्यांचा सामना कसा करायचे कुठल्याही अडचणींवर मात कशी करायची हे शिकायला मिळते.

● सोलो ट्रिपला जेव्हा आपण एकटे बाहेर पडतो तेव्हा आपणास कळते की जग तसेच हा निसर्ग किती सुंदर आहे किती पाहण्यासारखी अनुभवण्यासारखी निसर्गरम्य स्थळ ह्या जगात ह्या पृथ्वीवर आहेत.

● सोलोट्रिपमध्ये आपण एकटेच असतो कोणी आपल्याला आधार द्यायला मदत करायला जवळ नसते याने आपणास जीवनात आलेल्या अडचणींशी,संकटांशी,एकटे कसे लढायचे त्यावर एकटयाने मात कशी करायची?हे शिकायला मिळते.आपल्यातील खरे सामर्थ्य आपणास अशावेळी कळते.आपणास स्वताचा शोध घेता येतो.

● जेव्हा आपण मित्रांच्या गृप सोबत फँमिली ट्ँव्हल करतो तेव्हा अवतीभोवती खुप कलकल असते आवाज गोंधळ असतो आपणास एकटयाला वेळ व्यतित करता येत नाही पण जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपणास एकदम शांततेने प्रवास करता येत असतो.स्वतासोबत भरपुर वेळ घालविता येतो.

● सोलो ट्रिपचा अजुन एक फायदा आहे तो म्हणजे याने आपले पैसे देखील वाचतात.कारण जेव्हा आपण गृपसोबत असतो सगळयांसोबत आपणास जेवणाची राहण्याची प्रवासाच्या खर्चाची काँण्ट्री करावी लागते पण एकटे असल्यावर आपण आपल्या बजेटनुसार कमी खर्चात प्रवास करू शकतो.आपल्या बजेटला मानवेल अशा ठिकाणी सोलो ट्रिपला जाऊ शकतो.