युएन एफ पीएचा फुलफाॅम काय होतो – UNFPA full form in Marathi

युएन एफ पीएचा फुलफाॅम काय होतो UNFPA full form in Marathi

यु एन एफ पीएचा फुलफाॅम United Nations population fund असा होत असतो.याचा मराठीत अर्थ संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी असा होतो.

यूएन एफ पीएचा अर्थ काय होतो? UNFPA meaning in Marathi

युएन एफ पीए म्हणजे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी होय.

ही एक संस्था आहे जी प्रजनन हक्क,ऐच्छिक कुटुंब नियोजन,प्रजनन आरोग्य सेवा,माता आरोग्य सेवा आणि लैंगिक शिक्षण यासाठी काम करते.

युएन एफ पीए (United Nations population fund)ही संस्था संयुक्त राष्ट्राच्या आमसभेची उपकंपनी म्हणुन देखील ओळखली जाते.

यु एन एफ पीएला युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली आणि इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिलकडून आपले धोरण ठरवण्यासाठी मार्गदर्शन देखील प्राप्त होत असते.

युएन एफ पीए ही संस्था इतर संस्था ज्या विकासाचे अणि मानवी कार्य करत असतात त्यांच्यासोबत मिळुन कार्य करत असते.

आतापर्यंत युएन एफ पीए दीडशे पेक्षा अधिक देशांमध्ये लोकांसाठी आज आपले कार्य करत आहे.यूएन एफपीओ ही संस्था महिलांच्या लहान मुलांच्या वृदध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेते त्यांच्या आरोग्याचे जतन देखील करत असते.

युएन एफ पीए कोणकोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत मिळुन काम करते?

युएन एफ पीए ही संस्था खाली नाव दिलेल्या संस्थांसोबत कार्य करते-

  • डबलयु एच ओ(world health organisation) जागतिक आरोग्य संस्था
  • युनिसेफ (united nation children fund) संयुक्त राष्ट्र बाल निधी
  • युएन डीपी (United Nations development programme) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम
  • यूएन ए आय डीएस(united nation programme on hiv and aids)एचआयव्ही आणि एड्सवरील संयुक्त राष्ट्रांचा कार्यक्रम
See also  हैप्पी ब्रदर्स डे 2023 शुभकामनाएं | Happy Brother Day Wishes In Hindi

इत्यादी जागतिक संस्था संघटनांसोबत मिळुन काम करते.

युएन एफ पीएची स्थापणा कधी करण्यात आली होती?

युएन एफ पीए ह्या संस्थेची स्थापना १९६९ मध्ये करण्यात आली होती.

यूएन एफ पीएचे मुख्यालय कोठे आहे?

युएन एफ पीएचे मुख्यालय हे अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आहे.

युएन एफ पीएचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे?

युएन एफ पीए ह्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट हे लोकसंख्या आणि विकास पुनरुत्पादक आरोग्य आणि लैंगिक समानतेच्या मुद्द्यांवर काम करणे हे आहे.

युएन एफ पीएची कार्ये –

यु एन एफ पीए हया संस्थेचे कार्य करण्याची पद्धत मानवी हक्कांच्या दृष्टिकोनावर आधारित असलेले काम करणे ही आहे.

सर्व व्यक्ती आणि गट समुदायांना मानवी हक्कांची जाणीव करून देण्याचे काम देखील ही संस्था करते.याचसोबत ही संस्था लिंग-आधारित हिंसा समाप्त करण्यासाठी देखील कार्य करते.

ही संस्था जन्मदराला नियंत्रित ठेवण्याचे अणि मातांच्या मृत्यू दरात घट घडवून आणण्याचे देखील काम करते.याचसोबत आरोग्य यंत्रणा मजबुत करणे आरोग्य कर्मचारींना आरोग्य विषयक कार्याचे प्रशिक्षण देण्याचे काम देखील ही संस्था करते.

याचसोबत जगातील सर्व देशांमधील लोकसंख्येच्या बाबतचा अहवाल तयार करून तो सादर करण्याचे काम देखील ही संस्था करते

IMAGE SOURCE