आरोग्य म्हणजे काय ? What is good Health Marathi meaning

ऊत्तम आरोग्य म्हणजे नेमकं काय ? What is good Health  Marathi meaning

आरोग्य म्हणजे हे एक सुखी ,स्वास्थ्य जीवनाचा सकारात्मक पैलु. जिथं आपलं मन व शरीर एकमेकांशी सुसंवाद साधून  आपल्या शरीराच योग्य , सुचारु  पद्धधतीने संतुलन साधत आपल्याला निरोगी ठेवत.

सोप्या भाषेत किंवा शब्दांत सांगायच तर जेव्हा आपल्या शरीराचे सर्वच अवयव अगदी समान्य पणे काम करतात ,दैनंदिन हालचाली सहजरित्या होतात अशी शारिरीक व मानसिक अवस्था म्हणजे आरोग्य.

  • अस म्हटलं जातं की मनुष्य हा तेव्हा च निरोगी असतो जेव्हा त्याच मन व शरीर दोन्ही सुदृढ असतील. निरोगी , सुदृढ आरोग्य – Health माणसाला दीर्घायुषी बनवत. 
  • तसेच जागतिक आरोग्य संघटना च्या दृष्टीने उत्तम आरोग्य म्हणजे  फक्त व्याधी , आजार मुक्त शरीरच न्हवे तर शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक व सामाजिक दृष्टया सुखकारक किंवा कल्याणकारी मानवी अवस्था म्हणजे  आरोग्य.
  • समजा एकादी व्यक्ती च शरीर व्याधी मुक्त आहे , त्याला कोणताही आजार नाही परंतु तो सतत कोणत्या न कोणत्या तणावाखाली असतो, कसलं तरी टेन्शन घेऊन वावरत असतो. एकादा कायमस्वरूपी रागीट ,आढळआपट करतो असतो, लालची किंवा लोभी असतात तर अश्याव्यक्ती ला निरोगी म्हणता येणार नाही.

आपल्या जर अध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य जपायचं असेल तर  आपल्या शारीरिक आरोग्य सोबतच आपण मानसिक आणि भावनिक आरोग्यावर तितकाच बर दिला पाहिजे तरच आपण  एक मानव म्हणून समाजाचा उत्कर्ष करू शकू.

थोड्यात आपण

आरोग्याच्या वेगवेगळ्या पैलूं बाबत बघुयात

आरोग्याचे चार प्रकार

  • मानसिक स्वास्थ्य

  • मानसिक स्वास्थ्य-

मानसिक स्वास्थ्य म्हणजे अशी स्थिती जिथं ताण , तणाव, चिंता , नकारात्मक विचारसरणी ला आपल्याला मनात स्थान नसेल .

  • भावनिक आरोग्य-

भावनिक आरोग्य म्हणजे अशी संतुलीत स्थिती जिथं  राग लोभ ,अहंकार  व तिरस्कार ला आपल्याला जीवनात स्थान नसेल.

  • अध्यात्मिक आरोग्य –

अध्यात्मिक आरोग्य म्हणजे एकात्मता आणि सुसंवाद ने राहणं म्हणजे च अध्यात्मिक आरोग्य. आपल्या स्वतःच्या धर्म आणि परंपरागत चालीतीरी वर विश्वास असणे व दुसऱ्यांच्या धर्म व परंपरा चा आदर करणे म्हणजे अध्यात्मिक  आरोग्य व स्वास्थ.

  • शारीरिक आरोग्य

जेव्हा आपल शरीर कोणत्याही  प्रकारच्या व्याधी  पासून व शारीरिक इजे  व अनियमितते पासून मुक्त असतो  अश्या स्थितीस उत्तम शारीरिक आरोग्य म्हणून ओळखल् जात.

See also  फळे आणि भाजीपल्यात किती कॅलरी असतात ? Calories in Fruits and Vegetables in Marathi

 

 

आरोग्य म्हणजे काय

 

आहारातील हिरव्या पालेभाज्यांच महत्व