मेजर पिसेस टु द लाईफ पझल – Book Review Major Pieces To The Life Puzzle

पुस्तक परिचय – मेजर पिसेस टु द लाईफ पझल – Book Review – Major Pieces To The Life Puzzle In Marathi

 

आपण या लेखामध्ये जिम रॉन लिखित major pieces to the life puzzle या पुस्तकाची समरी पाहणार आहोत.या पुस्तकामध्ये जिम रॉन यांनी जीवनात यशस्वी होण्याच्या 5 टिप्स सांगितल्या आहे.ज्या टिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपण नक्की आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो.

जिम रॉन ह्यांचा जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या घरात झाला होता.त्यांनी कॉलेज मध्येच सोडले आणि वयाच्या 25 व्या वर्षी ते खुप दुःखी होते, ते घरात हातभार लावत न्हवते.अशा वेळी त्यांची भेट एका व्यक्तीशी झाली .या पुस्तकाचे लेखक जिम रॉन आपल्या यशाचे क्रेडिट त्या व्यक्तीला देतात.

जिम रॉन यांनी  5 major pieces to the life puzzle – जीवनात सफल होण्यासाठी 5 नियम सांगितले आहे

,ते 5 नियम खालीलप्रमाणे :

तत्वज्ञान –

Book Review Major Pieces To The Life Puzzle
Book Review Major Pieces To The Life Puzzle

तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या जीवनात तत्वज्ञान किंवा मूल्ये असणे फार गरजेचे आहे. समजा तुम्हाला सारखे अपयश येत असेल किंवा तुम्ही डिप्रेशन मध्ये असाल तेव्हा तुम्हाला स्वतःची चूक दिसणार नाही.तुम्हाला तुमची ही स्थिती परिस्थिती मुळे किंवा अन्य कारणामुळे झाली असे वाटणार.तुमचे जीवन ही तुमचीच जबाबदारी असली पाहीजेल.तुम्ही व्यसनी झालात यात कुणाचीच चूक नाही,चूक आहे तर फक्त तुमची.यशस्वी लोकांनी आपल्या जीवनात ठराविक मूल्ये ठेवलेली असतात आणि ते त्या मूल्याना फोल्लो करत असतात.याउलट अयशस्वी लोकांच्या जीवनात कोणतेही मूल्ये किंवा नियम नसतात आणि ते फक्त दिवस ढकलत जगत असतात.

See also  प्लँगँरिझम म्हणजे काय?- Meaning Of Plagiarism In Marathi

वृत्ती –

यशस्वी होण्यासाठी लेखकांच्या मते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली वृत्ती.आपण आपल्या भूतकाळातील वाईट गोष्टी विसरून आणि चांगल्या गोष्टी आठवून वर्तमानात जगले पाहिजे.आपण आपले ध्येय गाठण्यासाठी वर्तमानात प्रयत्न केले पाहिजेत आणि भूतकाळात आपल्याला काय बनायचे आहे त्याचा विचार वर्तमानात केला पाहिजे.प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असते.त्यामुळे आपण एकमेकांची मदत करून पुढे गेले पाहिजे.

सतत काम करणे-

आपण आपल्याला शक्य तितके काम केले पाहिजे आणि आपल्या क्षमतेनुसार आपण किती काम करू शकतो याचा विचार करून तेवढे काम करण्याचा प्रयत्न केला पाहीजेल.

निकाल –

 आपण काही महिन्या पुढचा किंवा काही वर्षांनंतरचा अंदाज लावून काम केले पाहिजे.आपण स्वतःशी विचारले पाहिजे की मागच्या सहा महिन्यात आपण किती ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले ? ,गेल्या सहा महिन्यात आपण किती पुस्तके वाचली ? ,गेल्या सहा महिण्यात आपण कोणत्या नवीन स्किल शिकल्या ? या प्रशांच्या उत्तराचा ग्राफ जर खाली खाली जात असेल तर समजून जा की तुम्ही यशस्वी व्हायच्या मार्गावर नाही आहात.परत यशस्वी व्हायच्या मार्गावर येण्यासाठी तूम्ही तुमच्या कामामध्ये ,वृत्तीमध्ये आणि तत्वज्ञानामध्ये बदल करा,तुम्हाला काही महिन्यातच फरक जाणवेल.

जीवन जगण्याची पद्धत –

तुमची जीवन जगण्याची पद्धत तुमच्या वृत्तीवर,तत्वज्ञानावर आणि कामावर आधारित असते.तुम्हाला जर तुमची जीवन जगण्याची पद्धत बदलायची असेल तर तुम्हाला तुमच्या वृत्तीमध्ये,कामामध्ये, आणि तत्वज्ञानामध्ये बदल करायला हवा.

यशस्वी व्यक्तीला आणि अयशस्वी व्यक्तीला दिवसात 24 तासच असतात.पण यशस्वी व्यक्ती त्या 24 तासाचा उपयोग चांगल्या गोष्टी करण्यामध्ये करतो,तर अयशस्वी व्यक्ती 24 तासाचा उपयोग टाइमपास करण्यामध्ये घालवतो.आपल्याला दररोज 24 तासाचे गिफ्ट मिळते;पंरतु त्याचा वापर आपण कसा करायचा हे सर्वस्वी आपल्यावर निर्धारित आहे.तुम्ही जर दिवसात तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करणारे काम करत असाल तर तुम्हाला दिवसाच्या शेवटी चांगले फील होते .याउलट तुम्ही जर दिवसात वाईट गोष्टी करत असाल तर तुम्हाला दिवसाच्या शेवटी रिग्रेट फील होते.तुम्ही सोशल मीडियाचा वापर करा पण लिमिट मध्ये करा.कारण दिवसभर फेसबुक,इन्स्टाग्राम सारख्या अँप चा वापर करून तुम्ही यशस्वी होणार नाही आहात.

See also  गंधकाचे महत्व,गंधकाचे कार्ये -पिकाच्या वाढीसाठी आवश्यक घटक - Sulfur major plant nutrient Marathi information

 

पुस्तक परीक्षण – इगो इज एनेमी-अहंकार आपला शत्रू