पुस्तक परीक्षण – इगो इज एनेमी-अहंकार आपला शत्रू – Book Review of Ego Is The Enemy In Marathi

पुस्तक परिचय –  इगो इज एनेमि – Book Review of Ego Is The Enemy In Marathi

जगात  तीन प्रकारचे लोक असतात.

 

  • पहिले म्हणजे यशाचा पाठलाग करणारे,
  • दुसरे म्हणजे यश मिळालेले आणि
  • तिसरे म्हणजे अयशस्वी झालेले.

 

आपण मरेपर्यंत सतत ह्या तीन प्रकारामधून जास्त असतो.आज आपण यशस्वी आहे तर उद्या आपण कोणत्यातरी गोष्टीत अयशस्वी होतो.आज आपण यशाचा पाठलाग करत आहोत तर,उद्या आपण यशस्वी झालेले असतो.

या तीन प्रकरामध्ये आपल्या बरोबर असणारी गोष्ट म्हणजे आपला अहंकार.अहंकार हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि अहंकार माणसाला खाली देखील नेऊ शकतो.त्यामुळे केलेल्या गोष्टीचा आपल्याला अहंकार नसेल तेवढे चांगले.

आतापर्यंत जेवढेही महान व्यक्ती झाली आहेत त्यांच्या मध्ये एकतर अहंकार नसतो किंवा त्यांचा त्यावर पूर्ण नियत्त्रण असतो.

काही लोक अहंकार आणि आत्मविश्वास याला एकच गोष्ट समजतात ;पण अहंकार आणि आत्मविश्वास दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.

ज्या विश्वासामध्ये विनम्रता असते त्याला आत्मविश्वास म्हणतात.आणि ज्यात विनम्रता असते त्याला आपण अहंकार म्हणू शकतो.जर आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपण आपल्या अंगातील अहंकार नाहीसा केला पाहिजे किंवा आपल्याला अहंकारावर्ती कन्ट्रोल करायला जमले पाहीजे.

 

Book Review of Ego Is The Enemy In Marathi
Ego is the Enemy: The Fight to Master Our Greatest Opponent (The Way, the Enemy and the Key) -अमेझोन वर अधिक माहिती

अहंकार वर नियंत्रण

करण्यासाठी तुम्हाला Ryan Holiday लिखित हे Ego Is The Enemy पुस्तक

मदत करेल.आपण या लेखामध्ये आपण Ego Is The Enemy या पुस्तकाचा Review पाहणार आहोत.

  • जगामध्ये बऱ्यापैकी अशी मंडळी आहेत,जे की काम करतात कमी पण बोलतात जास्त.म्हणजे त्यांनी मिळवलेले असते त्यांना ते वाढवून सांगतात.यालाच आपण अहंकार म्हणू शकतो.बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतून आपण समोरच्याला प्रभावित केले पाहिजे.
  • कधी कधी आपल्याला वाटते लोक आपल्या बद्दल जास्त विचार करतात,हा देखील आपला अहंकार असतो.एकदा एका शाळेतील मुलाच्या पॅन्ट वर कँटीन मध्ये ज्यूस सांडला होता.हा प्रसंग कँटीन मध्ये असणाऱ्या मंडळींनी पाहिला.तो मुलगा दुसऱ्या दिवशी शाळेत आला नाही,त्याला वाटले शाळेतील मुले त्याच्यासोबत काल घडलेल्या घटनेचा विचार करत असतील;पण खरतर दुसऱ्या दिवशी सगळे लोक ती घटना विसरलेली होती.त्यामुळे आपल्याला हे वाटणे लोक आपल्याबाबतीच विचार करत असतील हा देखील आपला अहंकार झाला.
  • यशाचा पाठलाग करत असताना आपल्या अहंकाराला कन्ट्रोल कसे करावे? -जेव्हा आपण यशाचा किंवा ध्येयाचा पाठलाग करत असतो तेव्हा आपण दोन मार्गाने आपल्या अहंकारावर ताबा मिळवू शकतो शकतो.
  • पहिला म्हणजे सदैव शिकत राहण्याची वृत्ती,यशस्वी लोक आपल्या वयापासून लहान व्यक्तीपासून देखील काही ना काही शिकत असतात.तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही प्रत्येक घटनेतून,प्रत्येक चुकीतून आणि प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकले पाहिजे.
  • अहंकार वर ताबा मिळवण्याच्या करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे जास्त न बोलता आपल्या कामावर फोकस करणे आणि समोरच्याला आपल्या Result मधून प्रतिउत्तर देणे.
  • यशस्वी झाल्यानंतर आपल्या अहंकारावर कन्ट्रोल कसे करावे ?- जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा देखील आपण अहंकारी होऊ शकतो.कारण एका ठिकाणापर्यंत पोहचणे सोपे आहे पण त्या ठिकाणावर टिकून राहणे फार अवघड आहे.
  • जसे जसे आपण यश मिळवत जातो तसे आपला अहंकार देखील वाढत जातो.आपल्याला यशस्वी झाल्यानंतर देखील ही अहंकाराला कन्ट्रोल करता आले पाहिजे.आशा वेळी आपण ज्या कामामुळे इथपर्यंत पोहोचले, ज्या कामाने आपल्याला यशस्वी बनवले,त्या कामावर आपण फोकस केला पाहिजे.
See also  इम्पेरिकल डेटा म्हणजे काय? - Empirical data meaning in Marathi

Ego Is The Enemy ह्या पुस्तकाच्या लेखकाच्या मत

यशस्वी लोक साधे सोपे जीवन जगणे पसंद करतात.कारण त्यांना श्रीमंतीच्या जाळ्यात न अडकता आपल्या कामावरती फोकस करायचा असतो.

अयशस्वी झाल्यानंतर आपल्या अहंकारावर कन्ट्रोल कसे करावे ?- एका व्यक्तीला मारामारी ,ड्रग च्या गुन्ह्यात जेल मध्ये टाकले होते.त्या व्यक्तीला देखील माहीत होते की जेल मधून सहजासहजी सुटणे अवघड आहे,तरी तो जेल मध्ये धार्मिक आणि वेगवेगळी पुस्तके वाचू लागला.तो व्यक्ती म्हणजे Malcom X .जे की जेल मधून सुटल्यानंतर मानव अधिकारासाठी लढले होते.

रॉबर्ट ग्रीनी यांच्या मते आपण जेव्हा आपला वेळ चांगल्या कामामध्ये किंवा फायद्याच्या कामामध्ये घालवतो तेव्हा आपण जिवंत असतो आणि जेव्हा आपण आपला वेळ वाईट गोष्टींसाठी घालवतो किंवा नशिबाच्या भरोस्यावर बसतो तेव्हा आपण मृत असतो.

नक्की वाचावे असे पुस्तक

पुस्तक परीक्षण – ईकिगाई – Book Review of Ikigai in

 

1 thought on “पुस्तक परीक्षण – इगो इज एनेमी-अहंकार आपला शत्रू – Book Review of Ego Is The Enemy In Marathi”

Comments are closed.