बचत करावी का गुंतवणुक,योग्य काय ? Saving or Investment in Marathi

Saving or Investment in Marathi

बचत करावी का गुंतवणुक

आज आपल्याला प्रत्येक जणाला आपल्या कमवलेल्या कष्टाच्या पैशांची बचत करावी? का त्याची कुठेतरी योग्य ठिकाणी गुंतवणुक करावी हा प्रश्न नेहमीच पडत असतो.आणि ह्याच दविधा मनस्थितीत आपल्याला काहीच कळत नसते की आपण बचत करणे गरजेचे आहे का पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणुक.

त्यामुळे आपण बचत करावी का गुंतवणुक हा विचार करण्यात दोघांपैकी एकही करत नसतो.किंवा सर्व बचत करत असतो आणि अजिबात पैशांची गुंतवणुक करत नसतो.किंवा सर्व पैसे दिर्घकाळासाठी गूंतवुन आपले वर्तमान धोक्यात आणत असतो.

असे आपल्यापैकी कोणाही सोबत घडु नये याचसाठी आपण आजच्या लेखात

  • आपण बचत करावी का पैशांची गुंतवणुक करावी?
  • आणि बचत करावी तर किती करावी?
  • गुंतवणुक करायला हवी तर कधी आणि किती करायला हवी?

 ह्या सर्व प्रश्नांची सविस्तरपणे उत्तरे जाणुन घेणार आहोत.

बचत करावी का गुंतवणुक यातला मूलभूत फरक आपण समजून घेतला पाहिजे

बचत काय (What is saving )? तर आपला पगार हातात आल्यानंतर आपण आपलं जे जे मासिक खर्च देणं लागत ते देतो ,जसे किराणा ,लाईट बिल ते  गॅस सिलिंडर , काही विमा वगरे सर्व  रक्कम दिल्या नंतर जी रक्कम आपण आवर्जून बाहेर ठेवतो , उरवतो तो झाली बचत

उद्देश हा असतो की काही अचानक खर्च ची काही गरज पडली तर हाताशी काही पैसे असावे

See also  50 World's largest companies - कोणती कंपनी कोणत्या देशाची - company belongs to which country

आणि गुंतवणूक काय (what is investment )?-तर आपण आपले पैसे अश्या ठिकाणी ठेवतो , असे मार्ग निवडतो ज्यात आपले  पैसे आर्थिक उत्पादनांमध्ये (equity, FD, mutual funds )गुंतवतो जेणेकरून त्या द्वारे पैसे वाढत जातील आपल्या करता भविष्या करता संपत्ती निर्माण होईल.

आपण आपल्या पैशांची जास्तीत जास्त बचत करायला हवी का त्यांची गुंतवणुक करायला हवी? Saving or Investment in Marathi

आपण पैशांची बचत करण्याकडे पहिले लक्ष द्यायला हवे की पैशांची गूंतवणुक करण्याकडे हा आपल्याला सर्वसामान्य माणसापैकी प्रत्येकालाच पडणारा सगळयात मोठा प्रश्न आहे.

आणि मग अशाच दविधा मनस्थितीत असताना काही जण फक्त पैशांची बचत करतात आणि गूंतवणुक करण्याकडे अजिबात लक्ष देत नाही.तर काही जण आपला कमवलेला सर्व पैसा दिर्घकाळासाठी गूंतवून मोकळे होत असतात.आणि मग आपला वर्तमानाचा खर्च धकवण्यासाठी पैसे नसल्यामुे बँकेकडून कर्ज काढत असतात.इतरांकडुन उधार पैसे घेत असतात.

पण आपण वापरत असलेले हे दोघेही पर्याय खुप चुकीचे आहेत जे करणे अजिबात योग्य नाही.आपण आपल्या अडीअडचणीसाठी पैशांची बचत ही नेहमी करायलाच हवी.आणि आपल्या पैशांची योग्य त्या ठिकाणी गुंतवणुक देखील करायला हवी.

आपण आपल्या पैशांची जास्तीत जास्त बचत करायला हवी का आपले सर्व पैसे दिर्घकाळासाठी कुठेतरी गुंतवायला हवे याचे उत्तर जाणुन घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया.

समजा आपल्या घरात अचानक काही इमरजन्सी आली म्हणजेच आपल्या घरात कोणी आजारी पडले,कोणाला काही दुखापत झाली तर आपल्याला सगळयात पहिले  तो आजार बरा करण्यासाठी रोख पैसे लागत असतात जे आपल्याला फक्त बचत केल्यामुळे अडीअडचणीत वापरता येत असतात.कारण

  • बचत केलेले पैसे आपण कधीही बँकेतुन,सेविंग मधुन काढुन आपल्या अडीअडचणीसाठी वापरू शकतो.आणि आपली अडचण लगेच दुर करू शकतो
  • .पण जे पैसे आपण दिर्घकाळासाठी गूंतवत असतो ते आपल्याला कमीत कमी पाच ते दहा वर्ष(ठरलेल्या कालावधीच्या अगोदर)अजिबात तिथून काढता येत नसतात.कारण तिथुन पैसे काढण्याचा एक फिक्स कालावधी ठरलेला असतो त्यानंतरच आपल्याला तिथून पैसे काढता येत असतात.
  • मग अशावेळी आपल्याला अचानक पैशांची गरज पडल्यावर आपण ऐनवेळी आपले घर,कार वस्तु ह्या देखील विकु शकत नसतो.कारण ह्या व्यवहारांना देखील वेळ लागत असतो.
  • आणि असे करणे देखील योग्य नसते.तसेच हे मुर्ख पणाचेच लक्षण म्हणता येईल.मग अशावेळी पल्याकडे एकच पर्याय उरलेला असतो तो म्हणजे बचत(सेविंग फंड).
  • कारण अडीअडचणीत आपल्याला आपल्या सर्व संपत्तीची आवश्यकता पडत नसते तर आपण अडीअडचणीसाठी जपुन ठेवलेल्या पैशांची म्हणजेच सेव्हींग फंडची गरज पडत असते.म्हणुन आपण सगळयात आधी कमावलेल्या पैशांमधील दर महिन्याला कमीत कमी ५ ते १० हजारांची बचत ही करायलाच हवी.
  • आणि हेच पैसे आपण अडीअडचणीसाठी जपुन ठेवायला हवे.हेच पैसे आपण वेगवेगळया सेविंग फंडमध्ये जमा करू शकतो.किंवा एफ डी,आर डी,पोस्टल सेविंग अकाऊंटमध्ये (fixed deposits or post office saving scheme )देखील ठेवू शकतो
  • मग उरलेले पैसे घरखर्चासाठी आपण खर्च करायला हवे आणि मग जसजशी आपली कमाई अजुन वाढत जाईल आणि घरातील खर्च देखील आटोक्यात येत जाईल आणि तो गरजेपुरताच होणे सुरू होईल.तसतसे आपण अजुन पैसे आपले बाजुला काढायला सुरूवात करावी .
  • आणि मग तेच पैसे आपण दिर्घकाळासाठी शेअर मार्केट,म्युच्अल फंड,रिअल इस्टेट (share market, Mutual funds  or Real estate )किंवा एखादा बिझनेस यासारख्या ठिकाणी लाँग टर्मसाठी गुंतवायला हवे.जे आपल्याला भविष्यात हाय रिटर्न सोबत प्राप्त होत असतात.
See also  10 क्रिप्टोकरन्सी मराठी माहिती  Top 10 Cryptocurrencies In India To Buy 2022

म्हणजेच आधी बचत मग त्यानंतर गुंतवणुकीचा विचार आपण प्रत्येकाने करायला हवा.

आपण किती पैशांची बचत करायला हवी आणि किती पैशांची दीर्घकाळासाठी गुंतवणुक करायला हवी?आणि किती पैसे खर्च करायला हवेत? Saving or Investment in Marathi

आपण किती पैशांची बचत करायला हवी?किती पैशांची दीर्घकाळासाठी गुंतवणुक करावी?आणि किती पैसे आपण महिन्याला खर्च करावे हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला ५० ३० २० चा नियम जाणुन घ्यावा लागेल

  • ज्यात आपण १०० पैकी ३० टक्के रक्कमेची कमविल्यानंतर आधी बचत करायला हवी आणि तेच पैसे अडीअडचणीसाठी सेव्हिंग फंडमध्ये टाकायला हवे आणि
  • त्यानंतर २० ट्क्के रक्कमेची दिर्घकाळासाठी गुंतवणुक करायला हवी.जिथुन आपल्याला ते १० ते २० वर्ष काढता येत नसतात.आणि मग उरलेले ५० टक्के रक्कम ही आपण आपल्या महिना भराच्या खर्चासाठी वापरायला हवी.

असे जर आपण केले तर आपल्याला कधीही वर्तमानात तसेच भविष्यातही अडीअडचणीत असताना कोणाकडुन पैसे उधार घेण्याची,कोणतेही कर्ज (loan)काढण्याची,आपली संपत्ती कोणाकडे गहाण ठेवण्याची गरज पडणार नाही.आणि पैशांची चणचण देखील आपल्याला कधीच भासणार नाही.कारण आधी बचत आणि गुंतवणुक मग खर्च ह्या नियमाचे पालन केल्याने आपले वर्तमान आणि भविष्य दोघे सुरक्षित होत असतात.

लेखक : Post Author


SIP KNOWLEDGE

1 thought on “बचत करावी का गुंतवणुक,योग्य काय ? Saving or Investment in Marathi”

Comments are closed.