10 क्रिप्टोकरन्सी मराठी माहिती  Top 10 Cryptocurrencies In India To Buy 2022

10 क्रिप्टोकरन्सी मराठी माहिती –  Top 10 Cryptocurrencies In India To Buy 2022

 क्रिप्टो करंसी विषयी आपण आत्तापर्यत रोज ऐकत आलो आहोत.आपण भारतामध्ये जसा चलनासाठी रुपया वापरत असतो आणि अमेरिकेत चलन म्हणुन डाँलर्सचा वापर केला जातो.

एकदम त्याचप्रमाणे क्रिप्टोकरंसी सुदधा एक चलन आहे ज्याचा वापर आज आर्थिक देवाण घेवाणीच्या व्यवहारासाठी केला जात आहे.

फक्त रुपया डाँलर्स आणि क्रिप्टोकरंसी यात एकच छोटासा फरक असतो तो म्हणजे आपण रूपया आणि डाँलर्सचा वापर आर्थिक देवाणघेवानीसाठी डिजीटल पदधतीनेच तसेच फिजीकल पदधतीने सुदधा करू शकतो.

 याउलट क्रिप्टोकरंसी ही एक अशी डिजीटल करंसी असते.ज्या मध्ये आपण आपल्या पैशांना बघुही शकत नसतो आणि स्पर्श देखील करू शकत नसतो.पण त्यांचा वापर डिजीटल ट्रान्झँक्शनसाठी आँनलाईन खरेदी विक्रीसाठी आपल्याला करता येत असतो.

आजच्या लेखात आपण 2022 साठी टाँप क्रिप्टोकरंसी किती आहेत आणि त्या कोणकोणत्या आहेत हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

 

2022 साठी टाँप क्रिप्टोकरंसी किती आहेत आहेत आणि कोणकोणत्या आहेत?

 2022 मध्ये जर आपल्याला क्रिप्टोकरंसीमध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करायची असेल तर आपल्याकडे टाँप अकरा क्रिप्टोकरंसीची यादी आहे

ज्यात आपण आपली गुंतवणुक 2022 मध्ये करू शकतो.

चला तर मग जाणुन घेऊया ह्या टाँप दहा क्रिप्टोकरंसी विषयी अधिक सविस्तरपणे.

 

10 क्रिप्टोकरन्सी मराठी माहिती
10 क्रिप्टोकरन्सी मराठी माहिती

 

2022 मधील टाँप 10 क्रिप्टोकरंसी पुढीलप्रमाणे आहेत:

1) बिटकाँईन :

2) डोजेकाँईन :

3) ट्राँन :

4) बँट :

5) काँसमाँस :

6) स्टेलर :

7) शिबा इनु :

8) सोलाना :

9) पोल्काडाँट :

10) इथेरिअम :

 

बिटकाँईन :

 • बिटकाँईन हे मार्केटमधील एक सर्वात जास्त मौल्यवान करंसी म्हणुन ओळखले जाते.कारण आज मार्केटमध्ये सर्वात अधिक कँप कशाला आहे तर ते क्रिप्टोकरंसीलाच आहे.
 • अलीकडेच क्रिप्टोकरंसीने 67000 $ चा आकडा गाठल्यानंतर मार्च ते एप्रिल महिन्यात अचानक टेस्ला कंपनीचा मालक ईलाँन मस्कने एक वादग्रस्त टवीट केले की टेस्ला कंपनी इथूनपुढे बिटकाँईन विकत घेणार नाही.
 • ज्यामुळे मार्केटमध्ये काही वेळ खुप खळबळ माजली होती याचे परिणाम स्वरूप बिटकाँईनची किंमत घसरू लागली होती.पण यानंतर असे समोर आले होते इलाँन मस्कने सगळयांना एप्रिल फुल केले होते.
 • मित्रांनो आज आपल्याकडे जर पुरेसे भांडवल उपलब्ध असेल तर ही एक अत्यंत योग्य वेळ आहे बिटकाँईन खरेदी करण्याची.कारण बिटकाँईनची किंमतीत आता जवळजवळ 30 ते 35 टक्के इतकी घट झाली आहे.
 • क्रिप्टोकरंसी विकत घेण्याचा सगळयात महत्वाचा फायदा म्हणजे येथे आपल्याला एक काँईन विकत घेऊन करून खरेदी करावी लागत नाही आपण इथे पार्शिअली खरेदी देखील करू शकतो.किंवा यातील काही हिस्सा देखील आपल्याला खरेदी करता येत असतो.
 • सध्या बिटकाँईनचा बाजारातील दर हा 417000 ₹ आहे.बिटकाँईनचा वर्षभरातील सर्वाधिक दर हे 5300000 ₹होते.आणि सगळयात कमी दर हे 2160000 ₹ इतके होते.
See also  इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कोणती महत्वाची कागदपत्रे लागतात?- What documents are needed for income tax?

2) डोजेकाँईन :

 • डोजेकाँईन ही मार्केटमधील सगळयात स्वस्त दरात उपलब्ध होणारी क्रिप्टोकरंसी म्हणुन ओळखली जाते.
 • मार्केट डाऊन झाल्याने डोजेकाँईनची प्राईज लो झाली असली तरी मार्केट कँपचा विचार करता ही मार्केटमधील चौथ्या क्रमांकावर असलेली एक मोठी क्रिप्टोकरंसी म्हणुन ओळखली जाते.
 • पण सध्या मार्केट डाऊन गेल्यामुळे हिच्या किंमतीत घट झालेली आपणास दिसुन येते.पण 2022 साठी क्रिप्टोकरंसी एक चांगले आँप्शन ठरू शकते.
 • कारण ह्या क्रिप्टोकरंसीचा मार्केट व्हाँल्युम देखील फार अधिक प्रमाणात असलेला दिसुन येत आहे.
 • सध्या डोजे काँईनचा बाजार दर15 ₹ इतका आहे.वर्षातील सगळयात अधिक दर 55 ₹ होते.आणि सगळयात कमी दर हे 3 ₹ इतके होते.

 

3) ट्राँन :

 • ट्राँन हे ब्लाँक चेन टेक्नाँलाँजीवर आधारलेली विकेंद्रित कार्यप्रणाली असलेली क्रिप्टोकरंसी आहे.म्हणुन ह्या क्रिप्टोकरंसीत मागील वर्षात खुप अधिक प्रमाणात वाढ देखील झालेली आपणास दिसुन येते.
 • मार्केट डाऊन झाल्यानंतर इतर क्रिप्टोकरंसीवर जेवढा इफेक्ट झाला तेवढा इफेक्ट ट्राँनवर झालेला आपणास अजिबात दिसुन येत नाही.
 • आणि महत्वाची बाब म्हणजे याची रिझनेबल प्राईज आणि मार्केट फ्युचर बघुन खुप जणांनी ट्राँनची खरेदी आत्तापर्यत केली आहे.
 • ट्राँनचा मार्केट रेट सध्या80 ₹ इतका आहे.आणि पुर्ण वर्षातील हायेस्ट रेट 12.94 होता.आणि सगळयात लो रेट 2.25 होता.

 

4) बँट :

 • बँटचा फुलफाँर्म बेसिक अटेंशन टोकन असा होतो.हे माँजिला आणि फायरफाँक्सचे को फाऊंडर यांनी ब्लाँकचेन टेक्नाँलांँजीवर आधारीत डिजीटल अँडव्हरटाईजेसच्या सुरक्षेसाठी आणि त्याच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी मुख्यत्वे तयार केले होते.
 • हे इथेरिअमच्या जागी तयार करण्यात आलेले ब्रेव्ह वेब ब्राऊझरचे बेसिक टोकन आहे.
 • बँटचा मार्केट रेट हा 100₹ इतका आहे.गेल्या वर्षातील याचा हायेस्ट रेट हा 125 ₹ होता.आणि सगळयात लो रेट हा 40₹इतका होता.

5) काँसमाँस :

 • काँसमाँस विषयी आपण जास्त फारसे ऐकलेले नाहीये पण ही सुदधा एक क्रिप्टोकरंसी आहे.जी विकत घ्यायला आपल्याला परवडते आणि यात उच्च वाढीची क्षमता देखील असते.
 • सध्या काँसमासचा मार्केट रेट 2000 ₹ इतका आहे तर गेल्या वर्षभरात याचा हायेस्ट रेट हा 4000 ₹इतका होता आणि लो रेटविषयी सांगावयास गेले तर याचा सगळयात लो रेट हा 430 ₹ होता.
See also  फक्त दहा रुपये किंमत असलेल्या उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सला इलाॅन मस्कच्या नावामुळे मिळाला एक दिवसात २० टक्के इतका परतावा -Urja global share price

6) स्टेलर :

 • स्टेलर हे एक ओपन सोर्स नेटवर्क आहे ज्याचा वापर आपण चलन म्हणुन करतो तसेच याने आपण पेमेंट देखील करू शकतो.म्हणजे याने आपल्याला डिजीटली मनी ट्रान्झँक्शन करून बिझनेस करता येत असतो.
 • स्टेलर नेटवर्क देखील ब्लाँकचेनवर आधारलेले आहे.पण हे साँफ्टवेअर विकेंद्रीत असते आणि फ्री नेटवर्कवर चालत असते.आणि यात रोज लाखो करोडो व्यवहार हाताळले जात असतात.
 • स्टेलरचा मार्केट रेट 20 ₹इतका आहे.गेल्या वर्षभरातील याचा हायेस्ट रेट 66₹होता आणि सगळयात लो रेट हा 9₹ इतका कमी होता.

7) शिबा ईनु :

 •  शिबा ईनू ही देखील भारतातील एक प्रचलित क्रिप्टोकरंसी आहे.जिला डोजे किलर म्हणुन देखील ओळखले जाते.कारण ही क्रिप्टोकरंसी मार्केटमध्ये इंटर केल्यानंतर काही काळ डोजे काँईनवर लगाम बसला होता.
 • मागील काही काळात खुप जास्त रिटर्न यातुन लोकांना प्राप्त झाले होते.यामुळे हे क्रिप्टोकरंसी फार चर्चेत आले होते.
 • अणि असे देखील म्हटले जाते की 2025 पर्यत शिबा ईनुचा रेट 2₹ मध्ये जाऊ शकतो त्यामुळे यात थोडीफार गुंतवणुक करायला कोणतीही हरकत नाही.

8) सोलाना :

 • सोलाना हे एक डिसेंट्रलाईज इंटरनेट,कंप्युटर प्लँटफाँर्म आहे.जे व्यवहारासाठी पैसे देताना एस ओ एल टोकन घेते.
 • सोलोनाचा सगळयात मोठा फायदा हा आहे की हे आपले डिसेंट्रलाईझेशन न सोडता प्रत्येक सेकंदाला 50हजार पेक्षा अधिक व्यवहारांना समर्थन देण्याचा दावा आपणास करत असते.
 • म्हणुन इतक्या विपुल प्रमाणात व्यवहार करण्याच्या सोलोनाच्या क्षमतेमुळे हे आपल्याला एक चांगले रिटर्न देईल असा विश्वास करायला कोणतीही हरकत नाही.

9) पोल्काडाँट :

 • पोल्काडाँट हा एक डेटा बेस आर्केटेक्चरचा टाईप आहे जो मल्टीचेन प्रोटोकाँलवर आधारलेला आहे.जो कुठल्याही डेटा प्राँपर्टीच्या टाईपचे इतर चेनसोबतचे ट्रान्सफर सुलभ करण्याचे काम करतो
 • यात भविष्यात अधिक वाढ होण्याची दिसणारी शक्यता पाहता खरेदी करण्यासाठी आपण ह्या क्रिप्टोकरंसीचा वापर करू शकतो.
 • पोल्काडाँटचा मार्केट रेट सध्या 2000 ₹ इतका आहे आणि गेल्या वर्षभरात याचा हायेस्ट रेट 4300 पेक्षा अधिक होता.आणि सगळयात लो रेट हा 990 ₹ होता.
See also  जुने कागदोपत्री शेअर सर्टिफिकेट डिमॅट अकाऊंट ला हस्तांतर कसे करावे (Share Dematerialization Process in Marathi) ? How to transfer physical share certificate

10) इथेरिअम :

 • मार्केट कँपिटलचा विचार करता इथेरिअम हे बिटकाँईन नंतर येणारे दितीय क्रमांकाचे क्रिप्टोकरंसी आहे.
 • मार्केट एक्सपर्टचे असे सांगणे आहे की इथेरिअम आपल्याला बिटकाँईनपेक्षा जास्त रिटर्न प्राप्त करून देण्याची क्षमता तसेच पात्रता राखते.
 • इथरचा सध्याचा मार्केट रेट हा 330000 ₹ इतका आहे.आणि सगळयात हायेस्ट रेट 390000 इतका होता.आणि सगळयात लो रेट हा 72000 ₹ इतका कमी असलेला आपणास दिसुन येतो.

 

 

1 thought on “10 क्रिप्टोकरन्सी मराठी माहिती  Top 10 Cryptocurrencies In India To Buy 2022”

Comments are closed.