ज्ञानपीठ पुरस्कार – Jnanpith Award in Marathi – Gyanpeeth Award List in Marathi
भारतामध्ये साहित्त क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या साहित्यिकांना अनेक विविध प्रकारचे पुरस्कार दिले जात असतात.त्यातीलच एक अत्यंत महत्वाचा पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार आहे.
ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील एकदम सर्वोच्च पुरस्कार आहे.जो विविध भाषेतुन साहित्य निर्मिती करत असलेल्या तसेच त्यात लेखन करत असलेल्या खुप मोजक्याच साहित्यिकांना देण्यात आलेला आहे.ज्यात मराठी भाषेचा देखील समावेश होतो.
1965 साली पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते.तेव्हापासुन ते आत्तापर्यत एकुण 53 ज्ञानपीठ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे.ज्यात एकुण भारतातील 22 शासकीय राज भाषांचा समावेश असलेला आपणास दिसुन येते.
आणि सगळयात महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे ह्या सर्व बावीस भाषांमध्ये चार वेळा मराठी भाषेला ज्ञानपीठ ह्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
आजच्या लेखात आपण ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे काय आणि तो आत्तापर्यत मराठी भाषेत साहित्य निर्माण करत असलेल्या कोणकोणत्या साहित्यिकांना प्राप्त झाला आहे.हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे काय ?आणि त्याचे महत्व काय आहे?
ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य क्षेत्रात उच्चतम कामगिरी केलेल्या साहित्यिकांना दिला जाणारा एक विशेष पुरस्कार आहे.जो आत्तापर्यत खुप निवडकच साहित्यकांना प्रदान करण्यात आला आहे.
जे साहित्यिक भारतीय भाषेत सर्वोत्तम लेखन करतात आणि आपल्या लेखनशैलीत नवनवीन प्रयोग करून साहित्य क्षेत्राला अधिक समृदध करण्याचे मौल्यवान कार्य करतात अशा दिग्दज साहित्यिकांनाच हा पुर्सकार दिला जात असतो.
1961 सालापासुन हा पुरस्कार देण्यास आरंभ झाला होता.साहु जैन आणि रमा जैन यांनी भारतीय भाषेत वैशिष्टयपुर्ण लेखन करत असलेल्या साहित्यकांचा विशेष गौरव करण्यासाठी ह्या पुरस्काराची सुरूवात केली होती.
29 डिसेंबर 1965 मध्ये पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते.ज्याचे प्रथम मानकरी मल्याळम कवी गोविंद शंकर कुरूप हे होते.त्यांच्या ओडोक्कूल ह्या काव्यसंग्रहाला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता.
ज्ञानपीठ पुरस्कारा चे 2021 व 2022 विजते
- नीलमणि फूकन -56 वां पुरस्कार –आसामी
- दामोदर मौऊजो – 57 वां पुरस्कार –कोकणी
ज्ञानपीठ पुरस्कारासाठी साहित्यकांची निवड कशी केली जाते?
भारतातील बावीस शासकीय राज भाषांपैकी कुठल्याही एका भाषेत साहित्य निर्माण करत असलेल्या साहित्यकाला हा विशेष पुरस्कार प्रदान केला जातो.
जे पुस्तक प्रकाशित कमीत कमी पाच वर्षे झाली आहेत अशाच ग्रंथ तसेच पुस्तकांचा ह्या पुरस्कारासाठी विचार केला जात असतो.
आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे ज्या भाषेला हा पुरस्कार एकदा दिला जातो त्याच्या पुढच्या तीन वर्षासाठी त्या भाषेचा पुरस्कारासाठी अजिबात विचार केला जात नाही.
प्रथम एक लाख त्यानंतर दीड लाख,पाच लाख,सात लाख, तसेच अकरा लाख इतकी रक्कम ही पुरस्कार प्राप्त विजेत्याला बक्षीस म्हणुन दिली जाते.
आणि एकाचवेळेला दोन साहित्यकांना जेव्हा ह्या पुरस्काराने गौरविण्यात येते तेव्हा त्यांच्या मानधनात देखील दोन हिस्से केले जातात.
ज्ञानपीठ पुरस्कारासाठी जी निवड समिती आयोजित केली जाते त्यात सातपेक्षा अधिक आणि अकरापेक्षा कमी लोकांचा समावेश असु नये.असे याबाबद एक धोरण तयार करण्यात आले आहे.
जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कारासाठी नाव निवडले जाते तेव्हा प्रत्येक भाषेतील तीन सभासद असलेली समिती आयोजित केली जाते.ही समिती आपल्या भाषेत साहित्यक्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या कोणत्याही एका दिग्दज साहित्यिकाची शिफारस ज्ञानपीठ व्यवस्थापनाकडे करत असते.
आणि मग शेवटी मध्यवर्ती निवड समितीमध्ये प्रत्येक भाषेतुन शिफारस केलेल्या विविध साहित्यिकांपैकी कोणत्याही एका भाषेतील साहित्यकाच्या साहित्यकृतीची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड केली जात असते.
भारतरत्न पुरस्कारार्थी 1954 ते आजपर्यंत
ज्ञानपीठ पुरस्काराचे स्वरूप काय असते?
ज्ञानपीठ पुरस्कारात पुरस्कार प्राप्त साहित्यिकाला एक पुरस्कारपत्रक आणि ठाराविक रक्कमेचा धनादेश प्रदान केला जातो
ज्यात एक लाखापासुन अकरा लाखापर्यतची रक्कम बक्षीस म्हणुन धनादेशाच्या स्वरूपात दिली जाते.
मराठी भाषेत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त केलेल्या साहित्यिकांची नावे –
साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार हा आतापर्यत मराठीत भाषेत फक्त चार साहित्यिकांना झालेला आहे.
ह्या चार साहित्यिकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
1) वि.स.खांडेकर :
2) वि.वा शिरवाडकर :
3) विं.दा करंदीकर :
4) भालचंद्र नेमाडे :
1) वि.स.खांडेकर :
1974 मध्ये पहिल्यांदाच मराठी कादंबरीची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती ज्यात वि.स खांडेकर यांच्या ययाती ह्या कादंबरीला ह्या पुरस्कारासाठी निवडण्यात आले होते.
वि.स खांडेकरांची लालित्यपुर्ण लेखन शैली आणि भावार्थ या दोघांचे मिश्रण असणारी ही कादंबरी मराठी साहित्य क्षेत्रासाठी जणु एक आर्शिवादच ठरली.
ययाती ह्या कादंबरीतुन वि.स खांडेकर यांनी आयुष्य जगण्याचे तथ्य आणि जीवणाचे शेवटचे सत्य याचे फार सुंदर आणि मार्मिकपणे अर्थ विश्लेषण केले आहे.
2) वि.वा शिरवाडकर :
वि.वा शिरवाडकर यांना यांचे टोपणनाव कवी कुसुमाग्रज असे आहे.
वि.वा शिरवाडकरांनी लिहिलेल्या नटसम्राट ह्या नाटकाला 1987 मध्ये मराठीतील दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करण्याचा मान मिळाला होता.
कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या कवितांना मराठी भाषेचा अनमोल दागिणा,रत्न तसेच अलंकार म्हटले जाते.
म्हणुन कुसुमाग्रजांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिन म्हणुन आपण नेहमी साजरा करत असतो.
आपल्या नटसम्राट या नाटकातुन वि.वा शिरवाडकरांनी दोन पिढींचा संघर्ष तसेच वृदधांच्या समस्येचे वास्तववादी चित्रण केले आहे.
म्हणुन आजही हे नाटक खुप प्रसिदध आहे आणि ह्या नाटकावर चित्रपट देखील काढण्यात आले आहेत विविध भाषेत याचा अनुवाद देखील करण्यात आला आहे.
3) विं दा करंदीकर :
विं.दा करंदीकर यांनी निर्माण केलेल्या विविध साहित्यकृतींमध्ये अष्टदर्शने ह्या त्यांच्या कविता संग्रहाला 2003 साली मराठीतील तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता.
विंदांचे काव्य हे रंजक आणि वैचारिक आहे म्हणजे त्यात मनोरंजनासोबत वास्तवाचे दर्शन देखील आपणास घडुन येते.
अष्टदर्शने ह्या आपल्या काव्यसंग्रहात विंदा करंदीकर यांनी सात यूरोपियन्स आणि एक इंडियन फिलाँसाँफर यांच्या लेखणावर आधारलेले पुस्तक लिहिले आहे ज्याचे पुर्ण स्वरूप ओव्यांप्रमाणे आहे.
4) भालचंद्र नेमाडे :
मराठीतील चौथा ज्ञानपीठ पुरस्कार हा डाँ भालचंद्र नेमाडे यांना देण्यात आला होता.
डाँ भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदु जगण्याची समृदध अडगळ ह्या पुस्तकाला 2014 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
भालचंद्र नेमाडे हे एक साहित्यिक कवी,समीक्षक म्हणुन ओळखले जातात.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त इतर भाषेतील साहित्यिकांची नावे आणि आणि त्यांचे साहित्य – Gyanpeeth Award List in Marathi
- जी शंकर कुरूप (मल्याळम) –ओटक्कुल
- तारा शंकर बंधोपाध्याय (बँगाँली) –गणदेवता
- के वी पुत्तपा (कन्नड)- ज्श्री रामायण दर्शनम
- उमा शंकर जोशी (गुजराती) –निशिता
- सुमित्रानंदन पंत (हिंदी) –चिदंबरा
- फिराक गोरखपुरी (उर्दु)- गुल ए नगमा
- विश्वनाथ सत्यनारायण(तेलगु) –रामायण कल्पवरिक्षमु
- विष्णु डे (बंगाँली)- स्मृती शत्तो भविष्यम
- रामधारी सिंह दिनकर (हिंदी) –उर्वशी
- दत्तात्रय बेंद्रे (कन्नड)- नकुंतती
- गोपिनाथ महांती(उडिया) –माटीमटाल
- पीव्ही अकिलानंदम (तामिळ) –चित्रपवई
- आशापुर्णा देवी(बंँगाँली)- प्रथम प्रती श्रुती
- के शिवराम कारंत (कन्नड) –मुक्कजिया कनसगालु
- विरेंद्र कुमार भटाचार्य(अस्मिया)- मृत्यंजय
- एस के पोटटेकाट(मल्याळम)- ओरू देसादिंते कथा
- अमृता प्रितम(पंजाबी)-कागज ते कँनवा़स
- महादेवी वर्मा(हिंदी)-यामा
- मस्ती व्यंकटेश अयंगार (कन्नड )
- तकाजी शिवशंकरा पिल्ले(मल्याळम)
- पन्नालाल पटेल(गुजराती)
- अमिताव घोष (इंग्लिश)
- कृष्णा सोबती(हिंदी)
- अकितम अच्युतन नंबदरी (मल्याळम)
- शंख घोष(बँगाँली)
- रघुवीर चौधरी(गुजरात)
- केदारनाथ सिंह (हिंदी)
- रावरी भारदव्वाज (तेलगु)
- प्रतिभा राँय( ओडिया)
- चंद्रशेखर कंबार(कन्नड)
- सच्चिदानंद राऊत राँय(ओडिया)
- सी नारायण रेडडी(तेलगु)
- करतुलेन हैदर(उर्दु)
- वि के गोकक(कन्नड)
- सुभाष मुखोपाध्याय(बँगाँली)
- नरेश मेहता(हिंदी)
- सीताकांत महापात्र(ओडिया)
- यु आर अनंत मुर्ती(कन्नड)
- एम टी वासुदेव नायर(मल्याळम)
- महाश्वेता देवी(बँगाँली)
- अली सरदार जाफरी (उर्दू)
- गिरीश कर्नाड(कन्नड)
- निरमल वर्मा(हिंदी)
- गुरूदयाल सिंह(पंजाबी)
- इंदिरा गोस्वामी(अस्मिया)
- राजेंद्र केशवलाल शाह(गुजराती)
- दंडपाणी जयकांत(तामिळ)
- रेहमान राही(काश्मीर)
- कुवर नारायण (हिंदी)
- रविंद्र केळकर(कोकणी)
- सत्यवत शास्त्री(संस्कृत)