दहा प्रेरणादायी स्त्रियांविषयी माहीती- 10 Inspiring Women Information In Marathi

भारतीय महान स्त्रियांविषयी माहीती- 10 Inspiring Women Information In Marathi

भारत हा एक असा अदभुत देश आहे जिथे शोधण्यासारखे आणि बघण्यासारखे बरेच काही आहे.

भारतामध्ये येथील न विसरता येणारे असे अविश्वसनीय landscape,रमणीय आणि खमंग असे खाद्यपदार्थ
अनेक प्रेरणादायी व्यक्तीमत्वांसोबत विविधतेने नटलेली येथील रंगीबेरंगी संस्कृती आपणास पाहायला मिळते.

यामध्ये अशा अनेक कर्तृत्ववान आणि नावाजलेल्या स्त्रियांचा देखील समावेश आहे ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेक मोठी अविस्मरणीय,उल्लेखनीय आणि इतरांना प्रेरणा मिळेल अशी धाडसाची कामे केली.

आजच्या लेखात आपण अशाच काही कर्तृत्ववान धाडसी आणि प्रेरणादायी स्त्रियांविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ज्यांचे नाव आजही भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान आणि धाडसी प्रेरणादायी स्त्रियांच्या यादीत अग्रेसर क्रमांकाला आहे.

चला तर मग क्षणाचाही विलंब न करता जाणुन घेऊया भारतातील काही धाडसी,कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी स्त्रियांविषयी अधिक सविस्तरपणे.

भारतातील 10 प्रेरणादायी स्त्रियांची नावे काय आहे?-10 inspiring women information in Marathi

एक स्त्री ही तिच्या जीवणात अनेक भुमिका पार पाडत असते.कधी आई आणि बहिण म्हणुन आपल्यावर माया करते तर कधी कोणाची तरी पत्नी आणि मैत्रीन बनुन आपल्याला आयुष्यभर साथ देत असते आपल्या सुखदुखात आपल्यासोबत खंबीरपणे उभी राहत असते.

पण ह्या सर्व भुमिका पार पाडत असताना तिचे शौर्य तिचे धाडस तिचे कर्तृत्व देखील ती अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन जगासमोर सिदध करत असते.म्हणुन तिचा पराक्रम आपल्या सर्वासाठी नेहमी आदर्श ठरत असतो.

See also  संविधान म्हणजे काय - भारतीय संविधानाविषयी संपूर्ण माहिती : What Is a Constitution

आज आपण अशाच काही 10 कर्तृत्ववान स्त्रियांविषयी थोडक्यात आढावा घेणार आहे.

भारतातील पाच प्रेरणादायी स्त्रियांची नावे पुढीलप्रमाणे आहे-

1.झाशीची राणी लक्ष्मीबाई :

2. सावित्रीबाई फुले :

3. मदर टेरेसा :

4.भारताची गानकोकिळा लता मंगेशकर :

5. कल्पणा चावला :

6. पीटी उषा :

7. हिरकणी :

8. सिंधुताई सपकाळ :

9. आनंदीबाई जोशी :

10. किरण बेदी :

1.. सावित्रीबाई फुले :

सावित्रीबाई फुले यांना आपण पहिल्या महिला स्त्रीशिक्षिका म्हणून ओळखतो.

जेव्हा पुरूषप्रधान समाजामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध केला जात होतो.स्त्रियांना फक्त चुल आणि मुल इतकेच सीमीत ठेवले जात होते.सावित्रीबाई फुले

तेव्हा समाजाच्या सर्व विरोधाला तोंड देत स्त्री शिक्षणाची जबाबदारी स्वताच्या खांद्यावर घेत सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली केली.पाटी पेन्सल त्यांच्या हातात देऊन त्यांना साक्षर केले.अक्षरांची ओळख करून दिली.

2. हिरकणी :

एक आई आपल्या मुलासाठी जगातील कुठलीही अशक्य गोष्ट देखील साध्य करू शकते हे सांगणारे उत्तम उदाहरण म्हणजे हिरकणी.

चार हजार चारशे चाळीस फुट अशा इतक्या भव्य आणि उंच रायगड किल्ल्यावरून दरवाजे बंद झाले म्हणुन आपल्या तहानलेल्या लेकरापर्यत लवकरात लवकर पोहचण्यासाठी कडेकपारीने खाली उतरणारी शुर महिला म्हणजे हिरकणी.

3. सिंधूताई सपकाळ :

सिंधुताई सपकाळ यांना अनाथांची माय म्हणुन ओळखले जाते.आईवडिलांच्या प्रेमापासुन वंचित सिंधुताई-सपकाळअसलेल्या लाखो असंख्य अनाथ मुलामुलींना आईची माया देण्याचे प्रेरणादायी काम सिंधुताई सपकाळ यांनी केले होते.

4. आनंदीबाई जोशी :

आनंदीबाई गोपाळ जोशी यांनी आपल्या प्रबळ ईच्छाशक्ती आणि दृढ संकल्पाच्या बळावर ज्या काळात स्त्रियांना प्राथमिक शिक्षण देखील प्राप्त होणे कठिन होते.

त्या काळात आनंदीबाई गोपाळ जोशी यांनी परदेशात जाऊन आपले वैदयकीय शिक्षण पुर्ण केले.आणि भारतातील पहिली महिला डाँक्टर होण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला.

5. झाशीची राणी लक्ष्मीबाई :

झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म हा 1828 मध्ये झाला होता.पतीचे निधन झाल्यानंतर राणी लक्ष्मीबाई ह्या झाशीच्या राणी बनल्या.

See also  Hacking आणि Ethical Hacking म्हणजे काय? Ethical Hacking Marathi information

भारतातील पहिल्या स्वातंत्र्ययुद्धातील आघाडीच्या योद्ध्यांमध्ये देखील राणी लक्ष्मीबाई यांचे नाव घेतले जाते.

जेव्हा इंग्रज अधिकारी झाशी आपल्या ताब्यात घेण्यासाठी चालून आले तेव्हाआपले लेकरू कडेवर घेत मै मेरी झाशी नही दुंगी असे म्हणत त्यांच्याशी अखेरपर्यत लढा देणारी कर्तृत्ववान आणि पराक्रमी स्त्री म्हणजे राणी लक्ष्मीबाई.

6. मदर टेरेसा :

मदर टेरेसा यांचा जन्म 26 आँगस्ट 1910 रोजी झाला होता.मदर तेरेसा यांचे खरे नाव अग्नेस गोजा बोयाजुजी असे होते.

मदर टेरेसा ह्या एक थोर समाजसेविका होत्या ज्यांनी आपले संपुर्ण आयुष्य गरजू आणि गरीब लोकांची मदत करण्यासाठी बहाल केले.जगावे तर इतरांसाठी हीच अमुल्य शिकवण जगाला दिली.

7. भारताची गानकोकिळा लता मंगेशकर :

लता मंगेशकर

लता मंगेशकर यांना आपण भारताची गानगोकिळा म्हणुन ओळखतो.ज्यांनी विविध भाषेमध्ये गायन करून लाखो करोडो लोकांच्या हदयावर राज्य केले.

8. किरण बेदी :

किरण बेदी ह्या फक्त भारतीय पोलीस सेवेत सहभागी होणार्या पहिल्या महिला IPS नव्हत्या तर त्यांनी IPS बनल्यानंतर अनेक महिलांच्या सुरक्षेसाठी विविध सुधारणा देखील घडवून आणल्या.अनेक IPS होऊ इच्छितांसाठी त्या आज एक inspirational women आहेत.

9. कल्पणा चावला –

कल्पना चावला ह्या मुळच्या भारतीय वंशाच्या होत्या ज्या अमेरिकन astronut आणि mechanical engineer देखील होत्या.

ज्यांना अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला म्हणुन ओळखले जाते.

मिशन स्पेशलिस्ट आणि प्राथमिक रोबोटिक आर्म ऑपरेटर म्हणून त्यांनी 1997 मध्ये स्पेस शटल कोलंबियावर प्रथम उड्डाण केले.

10. पी-टी उषा :

पी-टी उषा आपण भारताची सुवर्णकन्या म्हणुन ओळखतो.पीटी उषा यांनी धावण्याच्या शर्यतेत महिला धावपटटुंमध्ये विक्रमी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले होते.पी-टी उषा