गँस सिलेंडर लीक झाल्यास काय काळजी घ्यावी ? – LPG Gas cylinder leakage-Precautions & Safety Tips

गँस सिलेंडर लीक झाल्यास काय करावे ? –  LPG Gas cylinder leakage-Precautions & Safety Tips

आज पाहावयास गेले तर भारतातील बहुतांश घरात स्वयंपाक तयार करायला एलपीजी गँस सिलेंडर वापरले जाते.खुप वेळा आपल्या कानावर ऐकु येत असते की अमुक घरात गँस लीक झाला तसेच गँस लिकेज झाल्यामुळे सिलेंडरचा भयंकर स्फोट घडुन आला.

आणि स्फोटात इतके जण गंभीर जखमी झाले.जेव्हा आपल्याला असे ऐकु येत असते तेव्हा आपण फार घाबरून जात असतो.

आणि घरातील लहान मुलांना तर गँस चालु करण्यास सक्तीची मनाई करत असतो.आणि घरातील प्रमुख स्त्री तसेच पुरूष वगळता आपण सर्वच जण गँस चालु करायला घाबरत असतो.कारण आपल्या मनात असे काही ऐकु आल्यामुळे भय निर्माण झालेले असते.

पण अशा परिस्थितीत आपण घाबरून न जाता जर धैर्याने काम घेतले तर एक खुप मोठा अपघात टळु शकतो.

म्हणुन आजच्या लेखात आपण आपल्या घरातील गँस सिलेंडर लीक झाल्यास काय करायला हवे?कोणतीही जीवीतहानी होऊ नये म्हणुन आपण कोणती काळजी घ्यायला हवी हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

गँस सिलेंडर लीक होण्यामागचे कारण काय असु शकते?

 गँस सिलेंडर लीक होण्यामागे अनेक कारणे असु शकतात ज्यात रबर टयुब तसेच गँसचे रेग्युलेटर नीट व्यवस्थितपणे फिट न बसवणे,गँस अँप्लायसेंसचा वापर चूकीच्या पदधतीने करणे ही कारणे गँस सिलेंडर लीक होण्यामागे असु शकतात.

See also  कपालभाती करण्याचे 10 फायदे कोणते - 10 Health benefits of Kapalabhati

किंवा कधी कधी आपण व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे गँसवर तयार होणारा पदार्थ हा ओतु जाऊन बर्नरमध्ये जात असतो ज्याने गँस लीक होण्याची संभावना निर्माण होत असते.

आपल्या घरातील गँस सिलेंडर लीक झाल्यास आपण काय करायला हवे?

आत्तापर्यत खुप ठिकाणी,खुप वेळा असे झाले आहे नीट काळजी न घेतल्यामुळे सिलेंडरचा स्फोट घडुन आला आणि त्यात काही जणांना आपले प्राण गमवावे लागले.

याला कारण गँस सिलेंडर लीक होत असताना आपण योग्य ती काळजी घेतलेली नसते.ज्याचे परिणाम स्वरूप कित्येक जणांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागत असते.

अशी दुर्घटना आपल्या कोणासोबत घडु नये म्हणून आपण गँस सिलेंडर लीक झाल्यावर कोणते उपाय करायला हवे?आणि कोणती काळजी घ्यायला हवी हे जाणुन घेऊयात.

गँस सिलेंडरचे कनेक्शन जेव्हा आपण घेत असतो.तेव्हा गँस कनेक्शन चालु करण्यासाठी गँस एजन्सीच्या वतीने जे व्यक्ती येत असतात ते आपल्याला काही महत्वाच्या बाबींविषयी म्हणजेच गँस सिलेंडर हाताळताना घ्यायच्या दक्षतेविषयी समजावुन सांगत असतात.

आणि ह्याविषयी फक्त घरातील स्वयंपाक करत असलेल्या व्यक्तीनेच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीने जाणुन घेणे फार महत्वाचे असते.

याने इमरजंसीमध्ये घरात अशी काही परिस्थिती कधीही निर्माण झाली तर घरातील प्रत्येकाला यातुन आपली सुखरूप सुटका कशी करावी हे माहीत असायला हवे.

घरातील गँस सिलेंडर लीक होत असल्यास आपण पुढील काळजी घ्यायला हवी – LPG Gas cylinder leakage-Precautions & Safety Tips

1)सर्वप्रथम घरात गँस सिलेंडर लीक झाल्यास घरात सर्वत्र गँस सिलेंडरचा वास येण्यास सुरूवात होत असते.अशा वेळी आपण घाबरून जाऊ नये आणि डोके शांत ठेवायला हवे.

2) आणि गँस सिलेंडरचा वास आपल्याला येऊ नये म्हणुन तोंडावर रुमाल नाहीतर एखादा कपडा धरून ठेवावा.कारण जर सिलेंडरचा वास आपल्या नाकावाटे शरीरात गेला तर आपल्याला आरोग्याच्या इतर समस्या देखील उदभवू शकतात.

See also  जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? हया दिवसाचे महत्त्व काय आहे - World Health Day

3) आणि मग सगळयात आधी घरातील सर्व दरवाजे उघडायला हवे.जेणेकरून सिलेंडरचा वास घरातच दरवळत न राहता दरवाजे तसेच खिडक्यांवाटे बाहेर जाईल.

4) आणि घरात गँस सिलेंडर लीक होत असताना आपण चुकुनही घरातील किंवा स्वयंपाक घरातील लाईटस तसेच फँन, टयुब नळी अशी इलेक्ट्रिकल संसाधने चालु करू नये.कारण याने मोठा स्फोट घडण्याची दाट शक्यता असते.म्हणुन आपण घरात गँस लीक होत असल्यास घरातील सर्व इलेक्टिक स्वीच आधी बंद करायला हवेत.

5) मग त्वरीत गँसचे रेग्युलर चेक करावे आणि आपल्याकडुन ते चुकुन आँन राहुन गेले असेल तर ते त्वरीत आँफ करावे.आणि समजा आपण रेग्युलर बंद केल्यानंतर सुदधा गँस लीक होणे बंद होत नसेल रेग्युलर काढुन तेथे सेफ्टी कँप बसवावा.

6) गँस सिलेंडरचे नाँब व्यवस्थित लावले आहे का नाही ते सुदधा चेक करावे.

7) आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे गँसचा वास कमी व्हावा यासाठी घरातील फँन अजिबात चालु करायचा प्रयत्न करू नये.आणि समजा घरातील टयुबनळी,लाईटस वगैरे काही चालु राहुन गेले असेल तर ते देखील बंद करावे.

8) आणि मग त्वरीत आपण ज्या गँस इंजसीमधून गँस कनेक्शन घेतले आहे त्यांना घडलेल्या यासर्व प्रकाराबाबत सुचित करावे.आणि मदत मागावी.

9) घरात लहान मुले देखील अशा वेळी असतील तर त्यांना घरातील गँस सिलेंडरपासुन तसेच इलेक्ट्रीक स्वीचपासुन दुर राहण्यास सांगावे.

10) आणि गँसमुळे आपल्या डोळयांना जळजळ होत असेल तर लगेच डोळयांवर थंड पाण्याचा शिडकाव करावा.

वरील सर्व दक्षता आपण घरात गँस सिलेंडर लीक होत असल्यास घेणे अनिवार्य आहे.

गँस सिलेंडर लीक झाल्यामुळे सिलेंडरला आग लागल्यास आपण काय करायला हवे?

 वर आपण हे जाणुन घेतले की घरातील गँस सिलेंडर लीक होत असल्यास आपण कोणती काळजी घ्यायला हवी तसेच कोणते उपाय करायला हवेत?जेणे घरातील कुठल्याही वस्तुचे नुकसान होणार नाही तसेच इतर कुठलीही जीवीतहानी होऊन घरातील सदस्यांच्या जीवाला धोका पोहचणार नाही.

See also  Advocate आणि lawyer या दोघांमध्ये काय फरक आहे? Difference Between Lawyer and Advocate

पण आपल्यासमोर दुसरा प्रश्न हा निर्माण होतो की गँस सिलेंडर लीक झाले आणि त्यातच सिलेंडरला आग लागली आणि सिलेंडरने पेट धरायला सुरूवात केली तर अशा परिस्थितीत आपण काय करायला हवे.

  • गँस सिलेंडर लीक झाल्यामुळे सिलेंडरला आग लागल्यास आपण त्वरीत एखादी चादर किंवा टाँवेल घेऊन तो पाण्यात भिजवायला हवा आणि तो भिजवलेला टाँवेल तसेच चादर सिलेंडरवर टाकायला हवी.याने सिलेंडरला लागलेली आग विझण्यास आपल्याला मदत होईल.
  • आणि एवढ करूनही आग आटोक्यात येत नसेल आणि परिस्थिती पुर्ण नियंत्रणाबाहेर गेली असेल तर अशा वेळी आपण त्वरीत अग्नीशमन दलाशी संपर्क साधावा आणि त्यांना मदतीसाठी बोलवायला हवे.

अशा प्रकारे वरील दिल्या प्रमाणे जर आपण सगळयांनी काळजी घेतली योग्य उपाययोजना केली तर नक्कीच आपण एक मोठी दुर्घटना होण्यास टाळु शकतो सोबत आपल्या आणि आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या जीवाचे रक्षण देखील करू शकतो.

गँस सिलेंडर लिकेजविषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न -FAQ

1) घरातील गँस सिलेंडर लीक होऊ नये म्हणुन आपण काय करायला हवे?

सर्वात आधी ग्राहक मार्गदर्शन पत्र वरील सूचना वाचाव्यात तसेच घरातील गँस सिलेंडर लीक होऊ नये म्हणुन

आपण दरवर्षी सपलायरकडुन गँस सिलेंडरचे टयुब चेक करून घ्यायला हवे.आणि टयुब देखील नियमित बदलत राहायला हवे.आणि गँसचे रेग्युलेटर व्यवस्थित फीट बसवले आहे की नाही ते देखील चेक करत राहावे.

आणि गँस सिलेंडर पेट धरत असलेल्या प्नज्व

लनशील वस्तुंपासुन नियमित दुर ठेवायला हवे.कारण याने देखील गँस सिलेंडर पेट धरू शकतो.

2) एखाद्या व्यक्तीच्या घरात गँस सिलेंडर लीक होत असेल तर आपण त्याला कशा पदधतीने मदत करावी?

 एखाद्या व्यक्तीच्या घरात गँस सिलेंडर लीक होत असेल तर आपण सगळयात आधी त्याला मोकळया हवेत घेऊन जावे.याने त्याला श्वास घेण्यास जी अस्वस्थता जाणवत असेल ती दुर होईल.

त्याचे कपडे गँस सिलेंडरच्या संपर्कात आले असतील ते देखील त्वरीत बदलायला हवे.आणि त्याचे डोळे गँस सिलेंडरच्या संपर्कात आल्याने जळजळ करत असतील तर त्याच्या डोळयांवर थंड पाण्याचा शिडकाव करावा आणि आवश्यकता पडल्यास डाँक्टरांना देखील दाखवून बघावे.