मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२३ विषयी माहिती – CM Fellowship Programme Information In Marathi

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२३ विषयी माहिती – CM Fellowship Programme Information In Marathi

Table of Contents

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम कधी राबविण्यात आला होता?

मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम सर्वप्रथम २०१५-२०१६ ते २०१९-२०२० या कालावधी दरम्यान राबविण्यात आला होता.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम का राबविण्यात आला होता?

राज्यांमधील विकासाची प्रक्रिया त्यांमधील टप्पे जाणुन घेता यावेत व हे सर्व समजुन घेत असताना शासकीय यंत्रणा मधील कामकाज कसे असते?

यातील घटकांचा ताळमेळ निर्णयप्रक्रियेचा अनुभव हा तरूणांना प्राप्त व्हावा.अणि यामधून समर्पित वृत्तीने समाजाची सेवा करण्यासाठी,ध्येयवादी प्रामाणिक अणि सुजाण नागरीकांची निर्मिती व्हावी याकरीता हा मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम राबविण्यात आला होता.

मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम मुळे झालेला फायदा –

या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील जेवढेही तरूण आहेत त्यांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव अणि संधी प्राप्त झाली होती.

हया फेलोशिप प्रोग्राममुळे तरूणांच्या ज्ञान अणि अनुभवाच्या कक्षा देखील रूंदावल्या होत्या.

तरूणांमध्ये असलेली कल्पकता अणि वेगळ्या पद्धतीने विचार मांडण्याची पद्धत अणि क्षमता याचा उपयोग प्रशासनास प्राप्त झाला होता.

तरूणांमध्ये असलेला उत्साह,तंत्रज्ञानाविषयी असलेली ओढ अणि आवड या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांना गती प्राप्त झाली होती.

२०२३ मध्ये शासनाने घेतलेला नवीन निर्णय –

नंतर ३० जानेवारी २०२० रोजी शासनाकडुन हा फेलोशिप कार्यक्रम बंद करण्यात आला होता पण आता हा बंद करण्यात आलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम नवीन सरकारच्या वतीने ह्या प्रोग्रामच्या वाढत्या मागणीनुसार पुन्हा सुरू केला जात आहे.

हा कार्यक्रम फेलोंना आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी उपयुक्त ठरावा या हेतुने या कार्यक्रमाला शैक्षणिक जोड प्राप्त करुन देण्याकरिता अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांना यात समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाने केला आहे.

See also  ह्या शहरांमध्ये आज गुड फ्रायडे निमित्त सुट्टी असणार आहे- Good Friday holiday today in this cities in Marathi

२० जानेवारी २०२३ रोजी शासनाने एक निर्णय घेतला ज्यात मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती.

फेलोंच्या निवड संदर्भातील काही महत्वाचे निकष-

● अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

● अर्जदार महाराष्ट्राचा अधिवासी नागरीक असायला हवा तसेच त्याला महाराष्ट्र राज्याविषयी नाॅलेज असायला हवे.

शैक्षणिक पात्रता –

● अर्जदाराने कुठल्याही एका शाखेतुन ६० टक्के गुणांसह पदवी प्राप्त केलेली असावी.तरी उच्च शिक्षण असणारया उमेदवारांना अधिक प्राधान्य.

अनुभव:

● किमान एक वर्ष पुर्णवेळ काम करण्याचा अनुभव असायला हवे.तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकरीता त्यांच्या अभ्यासक्रमाचा घटक म्हणून पुर्णवेळ इंटर्नशिप/अप्ररेंटिसशिप/ आर्टिकल शिपसोबत एक वर्ष कामाचा अनुभव असायला हवा.

● पुर्णवेळ स्वयंरोजगाराचा स्वयंउद्योजक असण्याचा अनुभव देखील ह्यात ग्राह्य धरला जाणार आहे.फक्त यासाठी अर्जदाराला स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.

● अर्जदारास मराठी हिंदी इंग्रजी भाषेचे अणि संगणकाचे देखील उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.त्याला मराठीत लिहिता वाचता बोलता यायला हवे.

CM फेलोशिपसाठी वयोमर्यादा काय ठेवण्यात आली आहे?

फेलोशिपसाठी अर्ज सादर करणारया उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम तारखेस २१ वर्षे ते कमाल २६ वर्षे असणे आवश्यक आहे.

CM फेलोशिपसाठी अर्ज करण्याची पद्धत –

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या मार्फत विहित करण्यात आलेल्या आॅनलाईन अ्ॅपलीकेशन सिस्टम द्वारे उमेदवारांना आपला अर्ज सादर करावयाचा आहे.

CM फेलोशिपसाठी अर्ज करण्याची पद्धत -
CM फेलोशिपसाठी अर्ज करण्याची पद्धत –

CM फेलोशिप  अर्ज शुल्क अणि फी किती असणार आहे?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ५०० रूपये इतके अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

CM फेलोंची संख्या किती ठेवण्यात आली आहे?

मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम करीता फेलोंची एकुण संख्या ६० इतकी निश्चित केली गेली आहे.यात महिला फेलो संख्या संपूर्ण फेलोंच्या एकुण संख्येच्या एक तृतीयांश असणार आहे.एक तृतीयांश महिला उपलब्ध नसल्यास प्रसंगी पुरूष फेलोंची निवड केली जाऊ शकते.

फेलोंचा दर्जा यात शासकीय सेवेमधील कार्यरत असलेल्या गट अ अधिकारी वर्गाच्या समकक्ष असणार आहे.

CM फेलोंच्या नियुक्ती संदर्भातील केली जाणार असलेली कार्यवाही –

खालील सर्व कार्यवाही मुंबई येथील अर्थ व संचालनालयाकडुन केली जाणार आहे-

● फेलोंची निवड करण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध करणे,निवडीसाठी अर्ज मागविणे,अर्जाची छाननी करणे,उमेदवारांची परीक्षा घेणे,योग्य उमेदवाराला निवडणे मग त्याची नियुक्ती केली जाणे.

● सदर कार्यक्रम राबविण्यासाठी कंत्राटी तत्वावर मनुष्यबळाची नियुक्ती करणे, कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आवश्यक असलेल्या संस्थांची नेमणुक करणे.

CM फेलो निवडीची पदधत कशी असणार आहे?

  • फेलोशिपकरीता अर्ज करण्यासाठी आपणास आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे.अणि अर्ज शुल्क देखील आॅनलाईन पद्धतीनेच भरावे लागणार आहे.
  • फेलोशिपसाठी आॅनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी आपले ओळखपत्र आधार कार्ड मतदान कार्ड इत्यादी जवळ बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
  • आॅनलाईन शुल्क भरणारया उमेदवारांची वस्तुनिष्ठ म्हणजे Object Type Test घेतली जाणार आहे.उमेदवारांची आॅनलाईन परीक्षा ही वेबसाईट अंतर्गत देशातील सर्व प्रमुख शहर राज्य अणि राज्यातील जिल्हे येथे घेतली जाणार आहे.
  • या परीक्षेत एकुण २१० उमेदवारांना निवडले जाणार आहे.जे २१० उमेदवार वस्तुनिष्ठ परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करतील त्यांना विशिष्ट कालावधीत दिलेल्या विषयावर तीन आँनलाईन निबंध सादर करायचे आहे.निबंधाचे तिन्ही विषय ईमेलने कळविले जातील.निबंध मराठी हिंदी इंग्रजी अशा कुठल्याही भाषेत असु शकतो.
  • ज्या २१० उमेदवारांना वस्तुनिष्ठ परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त होतील त्यांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येणार आहे.या २१० विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यासाठी काही कमिटी नेमण्यात आल्या आहेत.
  • उमेदवारांची अंतिम निवड करत असताना वस्तुनिष्ठ चाचणी १५ गुण निबंध ३० गुण मुलाखत ५० गुण उमेदवारांना अशा प्रकारे गुण देण्यात येणार आहे.
  • ज्यांच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त केलेली पदव्युत्तर पदवी असेल त्यांना पाच गुण जास्त दिले जाणार आहे.
  • फेलोशिप प्रोग्राम करीता शेवटी एकुण साठ उमेदवार निवडले जाणार आहे.आॅनलाईन परीक्षा देण्याबाबतची सर्व कार्यपद्धती संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळ Mahades.Maharashtra.Gov.In यावर जाहीर करण्यात येणार आहे.यात दिलेल्या सर्व अटींचे नियमांचे उमेदवारांना काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.
  • तसेच प्राप्त अर्जांची अर्जांची संख्या विचारात घेऊन उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणारया परीक्षा केंद्राबाबद अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचा निर्णय शेवटचा असणार आहे.
See also  आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सची Status कसा ट्रॅक करावा | How to track Status of Your ICICI Prudential Life Insurance In Marathi

कोणते उमेदवार फेलोशिप निवडीसाठी पात्र ठरणार नाहीत?

ज्या उमेदवारांनी मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत याआधी काम केले आहे.त्यांचे अर्ज निवडीसाठी पात्र ठरणार नाही.

उमेदवाराने याआधी मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत काम केले आहे का हे फेलोशिपसाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी तसे मेंशन करणे देखील आवश्यक आहे.

फेलोशिप कार्यक्रम नियुक्ती कालावधी –

फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत उमेदवारांना एकुण बारा महिन्यांसाठी नियुक्त केले जाणार आहे.या कालावधीत कुठलीही वाढ होणार नाही.

सर्व उमेदवारांना हे कळविण्यात येते की हा कुठलाही सरकारी जाॅब नाहीये हे एक काॅनट्रक्ट बेस फेलोशिप आहे.

फेलोंना किती विद्यावेतन देण्यात येईल?

मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत निवड करण्यात आलेल्या पात्र उमेदवारांना दरमहा ७० हजार एवढे मानधन दिले जाणार आहे.अणि प्रवासखर्च प्रवास भत्ता म्हणून उमेदवारांना ५ हजार रूपये सुदधा दिले जाणार आहे.

अशी एकुण ७५ हजार एवढी फेलोशिप उमेदवारांना मिळणार आहे.

फेलोंसाठी काही महत्वाची सूचना –

● सर्व फेलोंचा रूजु होण्याचा दिवस एकच असेल त्याचदिवशी सर्वांनी फेलोशिप साठी रूजू व्हायचे आहे.

● निवड करण्यात आलेल्या फेलोंची शासनाच्या विशिष्ट प्राधीकरणावर निवड केली जाईल.या प्राधिकरणात जिल्हा अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,आयुक्त, तसेच वरीष्ठ शासकीय अधिकारींचा समावेश असणार आहे.

● फेलोंचा प्राधीकरण नेमणुकीचा हक्क अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडे असणार आहे.फेलोंना आपले प्राधिकरण निवडण्याचा कुठलाही विशिष्ट अधिकार नसणार.

● नेमणुक करण्यात आलेल्या मुख्य कार्यालयाच्या मार्गदर्शनात संबंधित प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावी होण्यासाठी फेलोंना काम करायचे असेल.

● फिल्ड वर्क सोबत मुंबई आय आय एम, नागपुर तसेच आययायटी यांनी तयार केलेला विशेष अभ्यासक्रम हा पुर्ण करणे हे फेलोकरींता बंधनकारक असेल.अणि सर्व फेलोंसाठी शैक्षणिक संस्था निवडण्याचा अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडे असणार आहे.

● जे उमेदवार आपणास दिलेले फिल्ड वर्क अणि अभ्यासक्रम पूर्ण करतील फक्त त्यांनाच फेलोशिप सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.

See also  विद ड्रा़ँ म्हणजे काय? Withdraw Meaning In Marathi

● आँनलाईन परीक्षा मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणारया ज्या 210 उमेदवारांची शाॅर्टलिस्ट काढण्यात येईल.मग ह्या शाॅटलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना एक आँनलाईन निबंध सादर करायचा आहे.जे उमेदवार शाॅर्ट लिस्ट करण्यात आले आहे तसेच ज्यांनी आँनलाईन निबंध सादर केला आहे त्यांचीच अंतिम मुलाखत घेतली जाणार आहे.मुलाखतीनंतर निवडण्यात आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.

● परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील.परीक्षेचे माध्यम इंग्रजी असणार आहे.व जेथे व्यवहार्य असेल प्रश्न व पर्यायी उत्तराचे मराठीत केलेले भाषांतर पुरवले जाईल.

● परीक्षा एकूण शंभर गुणांची असेल प्रत्येक प्रश्नाला एक गुण दिला जाणार आहे.परीक्षेचा कालावधी साठ मिनिटे असणार आहे.

● शेवटी निवड करण्यात आलेल्या साठ उमेदवारांची अणि 15 उमेदवारांची नावे वेटिंग लिस्ट मध्ये प्रसिद्ध केली जातील.

● निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दिलेल्या मुदतीमध्ये आॅफर लेटर स्वीकारले नाही तर निर्माण होणारे रिक्त पद वेटींग लिस्ट मधील उमेदवारांना निवडुन भरण्यात येणार आहे.

● फेलोशिप कालावधीत उमेदवारांना कार्यालयीन वापर करण्यासाठी आयडेंटीटी कार्ड अणि ईमेल देण्यात येणार आहे.

● फेलोशिपच्या कार्यकाळात फक्त दहा दिवसांची रजा दिली जाईल.अणि फेलोशिपच्या कार्यकाळात अॅक्सीडेंटल विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे.

● फेलोशिपच्या काळात फेलोना कोणत्याही राजकीय चळवळीमध्ये सहभागी होता येणार नाही.

● जो फेलो आॅफर लेटर मिळुनही सांगितलेल्या ठिकाणी नियुक्ती करीता वेळेत हजर राहणार नाही त्याला फेलोशिपसाठी रिजेक्ट केले जाऊ शकते.

● सर्व फेलोंना आपल्या राहण्याची व्यवस्था स्वता करावी लागणार आहे.फेलोशिप काळात जिथे नेमणुक केली जाईल फेलोंना तिथेच वास्तव्यास राहावे लागेल.

● मुलाखतीच्या वेळी शैक्षणिक अहर्रतेची तसेच इतर महत्वाची कागदपत्रे तपासली जातील.मुलाखती दरम्यान फेलोंना मेडिकल सर्टिफिकेट पण सादर करायचे आहे.

● मुलाखती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे पोलिस व्हेरीफिकेशन केले जाणार आहे.

● आवश्यकता असल्यास फेलोंना जास्त तास काम अणि प्रवास करावा लागु शकतो.अणि ज्या प्राधिकरणात फेलो काम करणार आहे त्या प्राधीकरणाची कामाची वेळ फेलोला सुदधा लागु होईल.

● जो फेलो बारा महिन्यांसाठी दिलेले फिल्डवर्क अणि आयाआयटी मुंबई आय आय एम नागपुर यांच्याकडुन राबविला जात असलेला अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करेल त्याला शासनाकडुन अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे एक सर्टिफिकेट दिले जाणार आहे.