परीक्षा पे चर्चा 2023 विषयी माहिती pariksha pe charcha 2023 information in Marathi

परीक्षा पे चर्चा 2023 विषयी माहिती pariksha pe charcha 2023 information in Marathi

भारत सरकारच्या वतीने आज 27 जानेवारी 2023 रोजी अकरा वाजता परीक्षा पर चर्चा ह्या कार्यक्रमाचे आज लाईव्ह आयोजन करण्यात आले आहे.

आपण घरबसल्या टिव्ही तसेच युटयुबवरून‌ लाईव्ह ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ‌ शकणार आहे.

ह्या कार्यक्रमामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्ली येथील तालकटोरा इंडोर स्टेडियमवर विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना परीक्षा विषयी असलेल्या अडीअडचणी़ंवर समस्यांवर मार्गदर्शन करणार आहेत.

विद्यार्थी शिक्षक पालक यांच्या मनात परीक्षा संदर्भात असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ह्या कार्यक्रमामध्ये करणार आहेत.

परीक्षा पे चर्चा काय आहे?

परीक्षा पे चर्चा हे एक चर्चा सत्र आहे ज्यात विद्यार्थी शिक्षक पालक आपल्या शैक्षणिक अडचणी पंतप्रधान यांच्यासमोर मांडु शकतात.त्यावर कुठलाही प्रश्न विचारू शकतात.

परीक्षा पे चर्चा ह्या सत्राचे आयोजन का करण्यात येते?

परीक्षा पे चर्चा ह्या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी शिक्षक पालक यांना त्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देशाच्या पंतप्रधानांकडुन प्राप्त व्हावी याकरीता केले जाते.

या चर्चा सत्रामध्ये देशाचे पंतप्रधान विद्यार्थी शिक्षक अणि पालक यांना त्यांच्या शैक्षणिक विषयावर आधारित विविध प्रश्नांची उत्तरे देतात अणि त्यांच्या समस्यांवर योग्य ते मार्गदर्शन करीत असतात.

परीक्षा पे चर्चा ह्या कार्यक्रमाचा प्रमुख फायदा काय होत असतो?

● सर्व विद्यार्थ्यांना अणि शिक्षकांना देशाच्या पंतप्रधानांकडुन योग्य ते शैक्षणिक मार्गदर्शन प्राप्त होते.

See also  Top 10 Toughest Exams in India - सर्वात कठीण 10 परीक्षा भारतात कोणत्या आहेत ?

● शिक्षणाविषयी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक शंका कुशंका दुर होण्यास मदत होते.

● विद्यार्थ्यांना आपल्या मनात दडलेल्या अनेक शैक्षणिक प्रश्नांची उत्तरे प्राप्त होतात.अनेक शैक्षणिक समस्यांवर समाधान प्राप्त होत असते.

मागील वर्षी २०२२ मध्ये देखील हे परीक्षा पे चर्चा नावाचे चर्चा सत्र ठेवण्यात आले होते.ज्यात अनेक विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडले होते.

अणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर देत मार्गदर्शन केले जाते.

२०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा पे चर्चा ह्या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदी यांना कोणते प्रश्न विचारले होते?

१) विद्यार्थ्यांचा प्रश्न -विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे गांभीर्याने बघावे की नाही? विद्यार्थ्यांनी कुटुंब अणि शिक्षक यांची भीती बाळगावी की नये?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले उत्तर –

आपल्या आईवडीलांना त्यांच्या बालपणात उत्तम शिक्षण घेऊन मोठा डाॅक्टर इंजिनिअर सरकारी अधिकारी बनण्याचे

आपले जे काही स्वप्न पुर्ण करता आले नाही ज्या सुख सुविधा त्यांना प्राप्त झाल्या नाहीत त्या आपल्याला प्राप्त व्हाव्यात त्यांचे ते राहीलेले अपुर्ण स्वप्न आपण पुर्ण करावे अशी त्यांची इच्छा असते.

पण हे करत असताना पालक आपल्या मुलांची आवड क्षमता मर्यादा महत्वकांक्षा काहीच बघत नसतात.अणि आपल्याला आवडते अशा क्षेत्रात आपल्या मुलाला बळजबरी ढकलत असतात.

पालकांनी असे अजिबात करू नये आपल्या अपेक्षांचे ओझे आपल्या मुलांवर अजिबात लादु नये.त्यांची क्षमता आवड महत्वकांक्षा लक्षात घेऊनच त्यांना कुठल्याही क्षेत्रात टाकावे.

सर्व विद्यार्थ्यांनी आपले पालक शिक्षक आपल्याला जे काही चांगले सांगत असतात ते ऐकायला हवे.कारण आपल्या अनुभवाच्या बळावरच आपणास कुठलीही गोष्ट सांगत असतात.म्हणुन‌ त्यांच्या सल्ल्याकडे विद्यार्थ्यांनी पुर्णपणे दुर्लक्ष करता कामा नये.अणि सोबत आपण ज्या कार्यात सक्षम आहे त्याकडे देखील लक्ष केंद्रित करावे.

२०२३ परीक्षा पे चर्चा लाईव्ह अपडेट –

आज २७ जानेवारी रोजी अकरा वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आलेल्या आजच्या परीक्षा पे चर्चा सत्रामध्ये अनेक पालक शिक्षक अणि विद्यार्थी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपापले प्रश्न मांडलेत.

See also  भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मार्फत विविध पदांकरीता भरती सुरू - BEL recruitment 2023 in Marathi

अणि ह्या सर्व प्रश्नांवर उत्तर देत नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी शिक्षक पालक यांना योग्य ते मार्गदर्शन देखील केले.

आजच्या ह्या चर्चासत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल ४० लाख विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताणतणाव दुर करण्यासाठी गुरूमंत्र देखील दिला.