भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मार्फत विविध पदांकरीता भरती सुरू – BEL recruitment 2023 in Marathi

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मार्फत विविध पदांकरीता भरती सुरू BEL recruitment 2023 in Marathi

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मार्फत ट्रेनी तसेच प्रोजेक्ट इंजिनिअर पदाच्या २७ जागांसाठी भरती केली जात आहे.
या भरतीसाठी अर्ज मागविणे देखील सुरू झाले आहे.

ऑफलाईन अर्ज पाठवायचा पत्ता-

सर्व पात्र अणि इच्छुक उमेदवारांनी २३ फेब्रुवारी २०२३ च्या आत ऑफलाईनपद्धतीने डी वाय महाव्यवस्थापक (HR&A), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पंचकुला हरियाणा 134113 ह्या पत्त्यावर आपला अर्ज सादर करायचा आहे.

ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल त्यांना संपूर्ण भारतात कुठेही नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

सर्व पात्र अणि योग्य उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा अणि मुलाखतीच्या द्वारे केली जाणार आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडची आॅफिशिअल वेबसाईट-

https://bel-india.indefault.aspx/

भरती केल्या जात असलेल्या पदाचे नाव

भरती केली जात असलेली एकुण पदसंख्या -२७

१) ट्रेनी इंजिनिअर

एकुण जागा -२०

२) प्रोजेक्ट इंजिनिअर

एकुण जागा -७

शैक्षणिक पात्रतेची अट –

ट्रेनी इंजिनिअर पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे मान्यताप्राप्त बोर्डातुन तसेच विद्यापीठामधून बीई बीटेक बीएससी इंजिनिअरींग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे एम बी ए/एम एस डबल्यु/पीजी एच आरएम/ मान्यताप्राप्त बोर्डातुन विद्यापीठातून समतुल्य पास असणे आवश्यक आहे.

वेतन-

ज्या उमेदवारांची ट्रेनी इंजिनिअर पदासाठी निवड केली जाईल त्यांना ३०००० ते ४०००० इतके वेतन प्राप्त होणार आहे.

See also  कमर्शियल पायलट कसे बनावे?How to become commercial pilot

ज्या उमेदवारांची प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी निवड केली जाईल त्यांना ४०००० ते ५५००० इतके वेतन दिले जाणार आहे.

अर्ज फी –

ट्रेनी इंजिनिअर पदासाठी अर्ज करणारया ओपन तसेच ईडबलयुएस कॅटॅगरी मधील उमेदवारांना १७७ रूपये इतकी फी भरावी लागणार आहे.

प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी अर्ज करणारया ओपन तसेच ईडबलयुएस कॅटॅगरी मधील उमेदवारांना ४७२ रूपये इतकी फी भरावी लागणार आहे.

जे उमेदवार एस सी एस टी कॅटॅगरी मधील आहेत त्यांना कुठलीही फी भरण्याची आवश्यकता नाहीये.

किमान वयोमर्यादा अट –

ट्रेनी इंजिनिअर पदासाठी किमान वयोमर्यादा अट २८ वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.

प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी किमान वयोमर्यादा अट ३२ वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.

अर्ज करण्याची सुरूवात –

सदर भरतीसाठी अर्ज करायला ९ फेब्रुवारी २०२३ पासुन सुरूवात झाली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –

सदर भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ फेब्रुवारी २०२३ असणार आहे.

Download –Advertisement-for-Website-9-2-23 (1) (1)

Download – APPLICATION-FORMAT-TRAINEE-ENGINEER-I-ELECTRONICS-9-2-23