१० वी उत्तीर्णांसाठी पोस्टऑफीस मध्ये ४०,८८९ जागांची मेगा भरती – Post office recruitment 2023 in Marathi

१० वी उत्तीर्णांसाठी पोस्टऑफीस मध्ये ४०,८८९ जागांची मेगा भरती Post office recruitment 2023 in Marathi

  1. महाराष्ट्र राज्यातील १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्र पोस्ट आॅफिसच्या वतीने संपूर्ण भारतात बीपीएम,एबीपीएम अणि ग्रामीण डाक सेवक अशा तीन पदाच्या एकुण ४० हजार ८८९ जागांसाठी भरती करण्यात येत आहे.
  2. यात महाराष्ट्र राज्यातील २५०८ जागा भरल्या जाणार आहेत.जे उमेदवार पदांनुसार पात्र आहेत त्यांच्याकडुन भरतीसाठी अर्ज मागविण्यास सुरू देखील झाली आहे.
  3. अणि महत्वाची बाब म्हणजे ह्या तिन्ही जागेवर भरतीसाठी १० वी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहे.फक्त विषयांमध्ये गणित इंग्रजी असणे आवश्यक आहे.अणि लोकल भाषेत मराठी समाविष्ट असणे आवश्यक आहे.
  4. उमेदवाराला याव्यतीरीक्त कंप्युटरचे अणि सायकलिंगचे नाॅलेज आवश्यक आहे.अणि नसले तरी काही हरकत नाही.
  5. बीपी एम एबीपीएम तसेच ग्रामीण डाक सेवक पदाच्या भरतीसाठी अर्ज करणारया उमेदवाराचे वय किमान १८ असणे अणि ४० च्या आत असणे आवश्यक असणार आहे.
  6. ज्या उमेदवारांची ह्या भरती प्रक्रियेत निवड केली जाईल त्यांना वरीष्ठ डाक अधिकारी वर्गाकडुन ठरवण्यात आलेल्या जाॅब प्लेसमेंट नुसार भारतात कुठेही नोकरी करावी लागु शकते.
  7. इतर संवर्गातील उमेदवारांना अर्जदरांना ह्या भरतीसाठी अर्ज करण्याची फी किमान १०० रूपये इतकी आकारण्यात येणार आहे.
  8. महिला,ट्रान्सजेंडर एससी एसटी कॅटॅगरी मधील महिला पुरुष पीडबलयुडी अपंग यांना अर्ज करण्यासाठी कुठलीही फी भरण्यासाठी आवश्यकता नसेल.
  9. सर्व उमेदवारांना भरतीसाठी आँनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा असणार आहे.

महाराष्ट्र पोस्ट आॅफिसच्या अंतर्गत भरण्यात येत असलेल्या ह्या बीपीएम एबीपीएम अणि ग्रामीण डाक सेवक पदाच्या ४० हजार ८८९ जागांच्या भरतीसाठी आॅनलाईन फाॅम फिल करणे २७ जानेवारी २०२३ पासुन सुरु देखील देखील झाले आहे.

  • सर्व पात्र उमेदवारांनी आपला फाॅम हा फाॅम भरण्याची ठरविण्यात आलेली शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आॅनलाईन पदधतीने सबमिट करायचा आहे.
  • करेक्शन करायचे असेल तर ते आपण ते १७/२/२०२३ पासुन १९/२/२०२३ पर्यंत करू शकणार आहे.
  • ज्या उमेदवारांची ग्रामीण डाक सेवक ह्या भरती प्रक्रियेत अंतिम निवड करण्यात येईल त्यांना १० ते १२ हजार प्रतीमाह वेतन प्राप्त होणार आहे.
  • भारतीय पोस्ट विभागाची अधिकृत वेबसाईट indiapost.gov.in ही आहे.
See also  ऑफिसअसिस्टंटचे काम काय असते?- how to become office assistant - office assistant JOB

सर्व उमेदवारांना भरतीसाठी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी indiapostgdsonline.cept.gov.in ह्या वेबसाईटवर जायचे आहे.

फक्त भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी सर्व उमेदवारांनी पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन भरतीचे सर्व अटी नियम व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे.भरतीची अधिसुचना देखील एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे.

फाॅम भरण्यासाठी देण्यात आलेल्या अधिसूचना वाचण्यासाठी सर्व उमेदवारांना indiapostgdsonline.gov.in ला व्हिझिट करायचे आहे.

बीपी एम एबीपीएम ग्रामीण डाक सेवक पदासाठी सर्व पात्र उमेदवारांची भरती दहावीच्या गुणांच्या मेरिटच्या आधारावर केली जाणार आहे.म्हणजेच ज्या उमेदवारांना दहावी मध्ये सर्वाधिक गुण असतील त्यांची इथे टक्केवारी नुसार तिघे पदांसाठी निवड केली जाणार आहे.

उमेदवारांना कुठलीही परीक्षा देण्याची आवश्यकता असणार नाहीये.

ग्रामीण डाक सेवक पदाच्या व्यतीरीक्त भरती केल्या जात असलेल्या इतर पदांचे नाव –

  • Branch post master बीपी एम – १२००० ते २९००० इतके वेतन असणार आहे.
  • Assistant branch post master
  • abpm- १० हजार ते २४ हजार वेतन असणार आहे.

वयाची सवलत -age relaxation

● एस सी एसटी करीता ५ वर्ष सुट
● ओबीसी ३ वर्ष
● ईडबलुएस साठी कुठलीही वय सवलत नसेल.
● पीडबलयू डी साठी १० वर्ष सुट
● पीडबलयु डी+ ओबीसी १३ वर्ष सुट
● पीडबलयुडी +एस सी एस टी १५ वर्ष सुट

भरतीसाठी अर्ज करणारया उमेदवारांसाठी महत्वाची सूचना –

● जे उमेदवार अर्जाची फी शुल्क भरणार नाही त्यांचा अर्ज भरतीसाठी गृहित धरला जाणार नाही.

● या भरती करीता अर्जदार फक्त एक जिल्हयासाठी अर्ज करू शकणार आहे.

● भरतीसाठी आॅनलाईन फाॅम भरताना उमेदवारांना कुठलेही कागदपत्रे अपलोड करायची आवश्यकता नसेल फक्त आपले सिग्नेचर अणि फोटो अपलोड करावा लागणार आहे.जेव्हा उमेदवाराची निवड केली जाईल तेव्हा त्याला मुखाखतीसाठी बोलावले जाईल तेव्हा त्याला मुलाखतीच्या वेळी जाताना आपले डाॅक्युमेंट घेऊन जायचे आहे.यानंतर आपले डाॅक्यूमेंट व्हेरीफिकेशन देखील केले जाईल.

● जे उमेदवार ईडबलयुएस अणि ओबीसी कॅटॅगरी मध्ये येतात त्यांच्याकडे डाॅक्युमेंट व्हेरीफिकेशन प्रक्रिया दरम्यान आपले सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे.नाहीतर उमेदवाराचे सिलेक्शन केले जाणार नाही.

● एकाच उमेदवाराने दोन वेळा फाॅम भरू नये दोन्ही फाॅम कॅन्सल करण्यात येऊ शकतात.फाॅम मध्ये माहीती भरताना काही चुक झाली तरी सुदधा दोन वेळा फाॅम भरू नये.

● उमेदवार सध्या कुठेही जाॅब करत असेल तर त्याला एन ओसी सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे.

● उमेदवाराला मराठी भाषेत बोलता अणि लिहिता येणे आवश्यक आहे.

बीपीएम,एबीपीएम अणि ग्रामीण डाक सेवक पदासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची संपुर्ण प्रक्रिया –

Post office recruitment 2023 in Marathi - Post office recruitment 2023 in Marathi
बीपीएम,एबीपीएम अणि ग्रामीण डाक सेवक पदासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची संपुर्ण प्रक्रिया –

● सर्व उमेदवारांना भरतीसाठी आॅनलाईन अर
फाॅम भरण्यासाठी indiapostgdsonline.cept.gov.in ह्या वेबसाईटवर जायचे आहे.

See also  निकॉन स्कॉलरशिप विषयी माहिती - Nikon scholarship information in Marathi

● ह्या वेबसाईटवर गेल्यावर कोणत्या राज्यात कोणत्या पदासाठी किती जागा भरण्यात येणार आहेत हे देखील आपण बघु शकतो.फक्त आपले सर्कल अणि डिव्हीझन आपणास इथे सिलेक्ट करायचे आहे.मग व्युव्ह पोस्ट मध्ये जाऊन कुठे किती जागा निघाल्या आहेत हे आपणास बघता येणार आहे.

● आॅनलाईन फाॅम भरण्यासाठी सर्वप्रथम आपणास साईन अॅण्ड रेजिस्ट्रेशन वर जाऊन रेजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.

● रेजिस्ट्रेशन बटणावर क्लिक केल्यावर आपणास आपला मोबाईल नंबर ईमेल आयडी सर्व प्रथम टाकायचा आहे.अणि सेंड ओटीपी वर क्लिक करायचे आहे मग आपल्या मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी वर वर जो ओटीपी येईल तो स्क्रीनवर इंटर करायचा आहे.

● यानंतर उमेदवाराने जसे त्याच्या मार्कशीटवर दिलेले असेल तसेच आपले नाव टाकायचे आहे.

● यानंतर आपली जन्मतारीख अणि जेंडर टाकायचे आहे.आपली कॅटॅगरी देखील सिलेक्ट करून घ्यायची आहे.

● नंतर आपले सर्कल सिलेक्ट करून घ्यायचे आहे.

● आपण दहावी कोणत्या वर्षी पास झालो हे टाकायचे आहे.

● नंतर खाली दिलेला कॅपच्या कोड जसाच्या तसा तिथे भरून सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.यानंतर आपले फस्ट स्टेज रेजिस्ट्रेशन यशस्वी रित्या पुर्ण होऊन जाईन.

● यानंतर सेकंड स्टेप मध्ये उमेदवाराने आपला आधार नंबर टाकायचा आहे.आपण अपंग आहे किंवा नाही हे होय किंवा नाही करुन सांगायचे आहे.अपंग असल्यास कुठल्या कॅटगरी मधील आहोत हे टाकायचे आहे.

● यानंतर आपण कोणकोणत्या भाषेत दहावीचा अभ्यास क्रम पूर्ण केला होता मराठी हिंदी इंग्रजी ती भाषा टाकायची आहे.दहावीच्या मार्कशीटवर आपणास ज्या भाषा दिलेल्या असतील त्या इथे इंटर करायच्या आहेत.

● आपण सध्या कुठे जाॅब करतो आहे का हे होय किंवा नाही करून सांगायचे आहे.अणि सध्या कुठे जाॅब करत असाल आपण सध्या जिथे जाॅब करतो तिथले एनोसी आपल्या जवळ आहे किंवा नाही हे होय किंवा नाही करून सांगायचे आहे.

● यानंतर आपणास आपला पासपोर्ट साईज जेपीजी आकाराचा ५० केबी असलेला फोटो अपलोड करायचा आहे.

● अणि मग फाईल मध्ये जाऊन आपली सही अपलोड करायची आहे.सिग्नेचर साईज २० केबी असणे आवश्यक आहे.शेवटी खाली दिलेल्या सबमीट बटणावर क्लिक करायचे आहे.

● यानंतर आपण भरलेली सर्व माहीती आपल्या समोर येते ती बरोबर दिलेली असेल तर खाली दिलेले सर्व अटी नियम यांना टिक करुन आपली सहमती द्यायची आहे.अणि सबमीट बटणावर क्लिक करायचे आहे.

See also  PM-KMY - PM-KISAN योजनांची वैशिष्ट्ये-माहिती

● यानंतर आपले रेजिस्ट्रेशन यशस्वी रित्या पुर्ण झाले आहे असे सांगितले जाईल.स्क्रीनवर आपणास एक नोंदणी क्रमांक दिला जाईल हा आपणास लिहुन घ्यायचा आहे.

● यानंतर कंटिन्यु टु अॅपलाय वर क्लिक करायचे आहे.यानंतर आपणास अ्ॅपलीकेशन फाॅम भरायचा आहे.

● अ्ॅपलीकेशन फाॅम भरायला आपणास व्हेरिफिकेशन डिटेल मध्ये रेजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे अणि सर्कल महाराष्ट्र निवडायचे आहे.अणि सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.

● यानंतर आपणास एक ओटीपी पाठविला जातो तो इंटर ओटीपी मध्ये टाकायचा आहे.खाली दिलेला कॅपच्या कोड जसाच्या तसा भरायचा आहे.

● यानंतर आपणास आपली अॅड्रेस डिटेल टाकायची आहे.

● कम्युनिकेशन अॅड्रेस मध्ये सध्या आपण जिथे राहतो आहे तो पत्ता टाकायचा आहे.आपले राज्य शहर तेथील पिनकोड टाकायचा आहे.

● जर आपला सध्याचा पत्ता अणि कायमस्वरूपी पत्ता सारखा असेल तर वर दिलेल्या सेम अॅज कम्युनिकेशन अॅड्रेस वर क्लिक करायचे आहे अणि दोघे वेगवेगळे असतील तर दोघे अॅड्रेस सेपरेट टाकायचे आहे.

● खाली दिलेल्या काॅलाॅफिकेशन डिटेल मध्ये दहावीला आपले जे बोर्ड होते ते सर्कल मध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे.

● रिझल्ट टाईप मध्ये उमेदवाराने आपले मार्क्स सिलेक्ट करायचे आहे.तसेच खाली माकशीट मध्ये दिली आहे त्याप्रमाणे पहिली भाषा मराठी निवडायची आहे अणि दुसरी तिसरी भाषा हिंदी इंग्रजी निवडायची आहे.

● यानंतर आपणास सायन्स विषयात मराठी हिंदी इंग्रजी अणि गणिताला शंभर तसेच दीडशे पैकी किती गुण होते ते टाकायचे आहे.

● अणि आपण टाकलेले गुण बरोबर आहे का चेक करून सेव्ह अणि कंटिन्यु बटणवर क्लीक करायचे आहे.

● यानंतर शेवटी आपणास जाॅब प्रिफरनस द्यायचा आहे म्हणजे जिथे नोकरी करीता आपणास अॅपलाय करायचा आहे जिथे ज्या शहरात राज्यात आपणास नोकरी हवी आहे आपला नंबर तिथेच लागावा अशी ईच्छा आहे ते डिव्हीझन सिलेक्ट करून घ्यायचे आहे.

● डिव्हीझन सिलेक्ट केल्यावर आपणास जागा पोस्ट दिसुन येईल सोबत कोणत्या जागेवर कोणत्या आॅफिसात डिव्हीझन मध्ये किती पोस्ट आहे ही सर्व माहिती दिसुन येते.

● यानंतर खाली दिलेल्या सर्व अटी नियम मान्य करून सेव्ह अणि सबमिट करायचे आहे.

यानंतर शेवटी पेमेंट करायचे आहे.म्हणजे आपली फाॅम फी भरायची आहे.ज्यांची कॅटॅगरी महिला,ट्रान्सजेंडर एससी एसटी कॅटॅगरी मधील महिला पुरुष पीडबलयुडी अपंग इत्यादी असेल त्यांना पेमेंटचे आॅप्शन दिले जाणार नाही.हया कॅटगरी व्यतीरीक्त इतर कॅटॅगरी मधील उमेदवारांना फक्त पेमेंटचे आॅप्शन दिसुन येईल.

पेमेंट हे आपण मेक पेमेंट वर क्लिक करून युपी आय क्रेडिट कार्ड क्युआर कोड इत्यादी दवारे करू शकतो.

सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर खाली दिलेल्या प्रिंट आॅप्शनवर क्लिक करून उमेदवारांनी फाॅमची प्रिंट काढुन घ्यायची आहे.