एल आयसी मध्ये ९४०० पदांसाठी भरती सुरू – LIC ADO Recruitment 2023 In Marathi

एल आयसी मध्ये ९४०० पदांसाठी भरती सुरू – LIC ADO Recruitment 2023 In Marathi

एल आयसी विभागाकडुन प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी ADO पदाच्या तब्बल ९४०० जागा भरल्या जात आहेत.

आज आपण हे जाणुन घेणार आहोत एडीओ पदाच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेच्या अटी काय ठेवण्यात आल्या आहेत? तसेच ह्या भरतीचे स्वरूप कसे असणार आहे कुठल्या क्षेत्रात किती पदांची भरती करण्यात येणार आहे.

नोकरीचे ठिकाण –

● एल आयसी भरती प्रक्रिया मध्ये ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल त्यांना संपूर्ण भारतात कुठेही जाॅब मिळु शकतो.

शैक्षणिक पात्रता –

● आर्ट्स कॉमर्स सायन्स इत्यादी कोणत्याही एका शाखेतील पदवी प्राप्त केलेला उमेदवार तसेच भारतीय विमा संस्थानाकडुन फेलोशिप मिळवलेला उमेदवार ह्या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

वयोमर्यादेची अट –

अर्ज करणारया उमेदवाराचे १ जानेवारी रोजी किमान २१ किंवा कमाल ३० इतके वय पुर्ण झालेले असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा मधील देण्यात आलेली सुट –

● जे उमेदवार एस एसटी कॅटॅगरी मधील आहेत त्यांना पाच वर्षांची सुट देण्यात आली आहे.

● अणि ओबीसी कॅटॅगरी मधील उमेदवारांना तीन वर्षे इतकी सुट देण्यात आली आहे.

LIC ADO भरतीसाठी अर्ज भरण्यासाठी फी –

भरतीसाठी अर्ज करणारया उमेदवारांमध्ये जे उमेदवार ओबीसी किंवा इतर जनरल कॅटॅगरी मध्ये येतात त्यांना ७५० रूपये इतकी अर्ज फी भरावी लागेल अणि जे उमेदवार एस सी एस टी कॅटॅगरी मधील आहेत अशा उमेदवारांकडून १०० रूपये अर्ज फी घेतली जाणार आहे.

See also  पवित्र पोर्टल वर आपली नावनोंदणी कशी करायची? पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती साठी अर्ज कसा भरायचा - How to register on Pavitra portal in Marathi

LIC ADO भरतीसाठी अर्ज करण्याची सुरूवात होण्याची तारीख-

● एडीओ पदाच्या भरतीसाठी अर्ज करायला २१/१/२०२३ पासुन सुरूवात देखील झाली आहे.

भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख –

एडीओ पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२३ असणार आहे.

LIC ADO आॅनलाईन परीक्षेची तारीख –

● एडी ओ पदाच्या भरतीसाठी आँनलाईन घेण्यात येणारया प्रिलिमन्री परीक्षेची तारीख १२/३/२०२३ ही असणार आहे.

● एडी ओ पदाच्या भरतीसाठी आँनलाईन घेण्यात येणारया मुख्य परीक्षेची तारीख ८/४/२०२३ ही असणार आहे.

LIC ADO आँनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र –

आॅनलाईन परीक्षेसाठी तात्पुरता काॅल लेटर डाऊनलोड करण्याची तारीख ४/३/२०२३ असणार आहे.

एकुण जागा -९४००

प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदाच्या एकुण ९ हजार ४०० जागांसाठी ही भरती होत आहे.

आता आपण हे जाणुन घेऊया कुठल्या क्षेत्रात किती जागांसाठी ही भरती होत आहे.

● पुर्व मध्य क्षेत्र -६६९ जागा

● उत्तर -१२१६ जागा

● उत्तर मध्य -१०३३ जागा

● वेस्टर्न क्षेत्र -१९४२ जागा

● मध्यवर्ती क्षेत्र -५६१ जागा

● पुर्व -१०४९ जागा

● दक्षिण मध्य -१४०८ जागा

● दक्षिण -१५१६ जागा

वेतन –

भरती प्रक्रियेत निवडण्यात आलेल्या उमेदवारांना ५१,५०० इतके वेतन प्राप्त होईल.

LIC ADO भरतीची आॅफिशिअल वेबसाईट –

एल आयसी भरतीची आॅफिशिअल वेबसाईट ही आहे.इथे जाऊन सर्व उमेदवारांनी आॅनलाईन आपला अर्ज सादर करायचा आहे.

भरतीसाठी अर्ज करणारया उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना –

● भरतीसाठी अर्ज करणारया अगोदर सर्व उमेदवारांनी जाहीरातीच्या पीडीएफ मध्ये दिलेली सर्व माहीती एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे.

● भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी भरतीसाठी ठेवण्यात आलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या अटी व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत मग भरतीसाठी आॅनलाईन फाॅम भरायचा आहे.