पवित्र पोर्टल वर आपली नावनोंदणी कशी करायची? पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती साठी अर्ज कसा भरायचा – How to register on Pavitra portal in Marathi

पवित्र पोर्टल वर आपली नावनोंदणी कशी करायची? पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती साठी अर्ज कसा भरायचा how to register on Pavitra portal in Marathi

पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती प्रक्रियासाठी आपली आॅनलाईन नावनोंदणी करण्यासाठी आपणास सर्वप्रथम https://edustaff.maharashtra.gov.in/ ह्या वेबसाईटवर जायचे आहे.

ह्या वेबसाईटवर गेल्यावर आपणास डाव्या बाजूला application मध्ये पवित्र पोर्टलची एक लिंक दिसुन येईल.त्या पवित्र पोर्टल नावासमोर असलेल्या+ ह्या आयकाॅनवर आपण क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर login details अणि registration असे दोन आॅप्शन येतात यात ज्यांनी अजुनही नावनोंदणी केली नाहीये त्यांनी registration वर क्लिक करायचे आहे अणि ज्यांची नावनोंदणी झाली आहे त्यांनी डायरेक्ट log in वर क्लिक करायचे आहे.

how to register on Pavitra portal in Marathi
how to register on Pavitra portal in Marathi

सर्वप्रथम नावनोंदणी करण्यासाठी आपणास registration पर्यायावर आपणास क्लिक करायचे आहे.यानंतर आपणास select role ह्या आॅप्शनवर जाऊन applicant वर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर एक रेजिस्ट्रेशन फाॅम ओपन होईल.यात आपणास आपला युझर आयडी मध्ये आपला एक युझर आयडी बनवायचा आहे.किंवा (युझर आयडी म्हणून आपला परीक्षेतील बैठक क्रमांक टाकायचा असतो)

मग खाली पासवर्ड मध्ये पासवर्ड तयार करून टाकायचा आहे.अणि खाली दिलेल्या कन्फर्म पासवर्ड मध्ये तोच पासवर्ड पुन्हा इंटर करायचा आहे.

यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करीता एक ओटीपी पाठविला जाईल तो ओटीपी देखील तिथे टाकायचा आहे.

यानंतर दिलेला कॅपच्या जसाच्या तसा बाॅक्स मध्ये इंटर कॅपच्या मध्ये भरायचा आहे.

अणि खाली दिलेल्या register पर्यायावर ओके करायचे आहे.यानंतर आपण आपोआप लाॅग आऊट होत असतो.

पुन्हा लाॅग इन करताना करायची प्रक्रिया –

नावनोंदणी करून झाल्यावर पुन्हा लाॅग लाॅग इन करण्यासाठी आपणास login details वर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपणास select role मध्ये applicant हा पर्याय निवडायचा आहे.

यानंतर आपणास आपली log in detail भरायची आहे.यात युझर आयडी मध्ये आपला परीक्षेतील बैठक क्रमांक टाकायचा आहे.

यानंतर आपण नोंदणी करताना जो पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड टाकायचा आहे.

दिलेला कॅपच्या जसाच्या तसा बाॅक्स मध्ये enter captcha मध्ये भरायचा आहे.अणि खाली दिलेल्या login बटणावर ओके करायचे आहे.

Log in बटणावर क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल ज्यात application details ह्या पर्यायावर आपणास क्लिक करायचे आहे.

Applicant details वर क्लिक केल्यावर आपल्यासमोर चार पर्याय दिले जाजातात

1) Personal details

2) Address for correspondence

3) TET exam details

4) Qualification details

First’step –

1)Personal details मध्ये आपणास application id, applicant name,gender,date of birth,marks, mobile number, applicant category, physical disability, medium as per Tait data ही सर्व विचारलेली माहीती भरायची आहे.

आपला application id, applicant is, applicant name,gender,date of birth,tet marks, mobile number applicant category इत्यादी माहीती स्क्रीनवर आपोआप भरलेली आपणास दिसेल.कारण टेट नोंदणी करताना आपण जी माहिती भरली होती तीच इथे फेच केली जात असते.

बाकी physical disability, medium as per Tait data ही माहिती आपणास भरावी लागेल.

Medium as per tait data मध्ये आपणास टेट परीक्षा मध्ये आपण निवडलेले मेडियम सिलेक्ट करून घ्यायचे आहे.physical disability मध्ये शारीरिक अपंगत्व असल्यास ती माहीती सिलेक्ट करायचे आहे

यानंतर Other details मध्ये खाली विचारलेली आधार नंबर वैवाहिक स्थिती इत्यादी इतर माहीती देखील भरायची आहे.

आपली हाॅरीजोंटल कॅटॅगरी सिलेक्ट करायची आहे.आपल्याला किती अपत्य आहे ते सिलेक्ट करायचे आहे.दोन पेक्षा अधिक अपत्य असलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अपात्र ठरविण्यात येते.पण जुळी मुलं असलेल्या उमेदवारांना हा नियम लागू होत नाही.

Domicile of maharashtra मध्ये होय किंवा नाही करायचे आहे.

इतर विचारलेली माहीती देखील होय किंवा नाही म्हणुन भरून घ्यायची आहे.यानंतर आपण सर्व भरलेली माहीती अपडेट करण्यासाठी वर दिलेल्या अपडेट बटणावर क्लिक करायचे आहे.

याने आपण जी माहिती भरू ती सिस्टम वर अपडेट अणि सेव्ह होईल.

Second step

2) यानंतर आपणास पुन्हा application details मध्ये जायचे आहे.अणि address for correspondence वर क्लिक करायचे आहे.

Address for correspondence मध्ये आपणास email,state, district, taluka,village,address,pin ही सर्व माहिती भरायची आहे.अणि वर दिलेल्या अपडेट बटणावर ओके करायचे आहे.

यानंतर data uploaded successfully असा मॅसेज आपणास दिसून येईल.

Third step –

3)यानंतर आपणास पुन्हा application details मध्ये जायचे आहे अणि TET exam details ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर दोन पर्याय येतील state TET अणि centre TET.यात आपणास state TET वर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपणास असे विचारले जाईल appeared for Tet इथे आपणास yes करायचे आहे.

पेपर वन पेपर दोन या दोघे पेपरची माहीती आपण इथे भरू शकतो.जर आपला एकच पेपर असेल प्रथम किंवा दितीय तर आपण त्याप्रमाणे देखील एकच पेपरची माहीती भरू शकतो.

दोघांपैकी कुठल्याही पेपर वर आपण यस केले तर आपणास खाली विचारलेली काही माहिती भरायची असते.

TET number

Year of passing

Name

Percentage

Eligible yes/no

वरील सर्व माहिती भरून झाल्यावर आपणास वर दिलेल्या सेव्ह बटणावर ओके करायचे आहे.

दुसरया पेपरची माहीती भरायची असलेल्या उमेदवारांनी appeared for Tet yes करायचे अणि वरील सर्व माहिती दुसऱ्या पेपर मध्ये देखील भरायची असते.

TET number

Year of passing

Name

Percentage

Eligible yes/no

Optional subject

दुसरया पेपरची माहीती भरून झाल्यावर वर दिलेल्या सेव्ह बटणावर ओके करायचे आहे.

टीईटी परीक्षा मध्ये उमेदवारांनी जी माहिती भरली होती ती माहीती इथे मॅच होणे गरजेचे आहे.जर आपण भरलेली माहीती मिसमॅच होत असेल तर जिथे आपली माहीती मिसमॅच होत आहे तिथे सेव्ह बटणावर ओके केल्यावर सांगितले जाते.

हे मिस मॅच दुरूस्ती केल्याशिवाय आपणास पुढे जाता येत नाही म्हणून हे दुरूस्ती करण्यासाठी आपणास शिक्षण अधिकारी कार्यालयात जाणे गरजेचे असते.अणि मिसमॅच दुरूस्ती करण्यासाठी आपणास तिथे कोणत्या जिल्ह्यात जाता येईल तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे.

म्हणुन उमेदवारांनी टीईटी परीक्षा मध्ये भरलेली माहीती अणि ह्या फाॅममधील माहीती मिसमॅच होणार नाही सारखीच येईल याची काळजी घ्यायला हवी.

State Tet अणि central tet मध्ये सारखीच माहीती भरायची असते फक्त central Tet मध्ये आपणास optional subject maths science/social science इत्यादी देखील निवडायचा असतो एवढाच फरक दोघांमध्ये आहे.

Step 4

4)यानंतर आपणास qualification details भरायची आहे.यासाठी आपणास application details मध्ये qualification details वर क्लिक करायचे आहे.

ज्यात आपणास शैक्षणिक पात्रता academic qualification अणि व्यावसायिक पात्रता professional qualification असे दोन पर्याय दिलेले असतात आपणास हे दोघे भरायचे असतात.

Academic qualification मध्ये आपणास

Select your highest degree of qualification मध्ये आपणास secondary higher secondary, graduate postgraduate यापैकी एक सिलेक्ट करायचे आहे.

आपण कोणती डिग्री प्राप्त केलेली आहे ते सांगायचे आहे.

आपण जे मेडियम निवडले आहे ते सिलेक्ट करायचे आहे.

आपण घेतलेली डिग्री महाराष्ट्र राज्यातुन घेतली आहे किंवा नाही हे विचारले जाते तिथे यस/नो करायचे आहे.नो असेल तर जिथून डिग्री घेतली आहे ते राज्य सांगायचे आहे.अणि आपले उत्तर यस असल्यास महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापिठाच्या नाव आपल्या समोर येतील त्यातील आपले विद्यापीठ निवडायचे आहे.

उत्तीर्ण वर्ष Year of passing तसेच कोणत्या महिन्यात उत्तीर्ण झाले month of passing देखील टाकायचे आहे.

किती गुण मिळाले Marks obtain, किती टक्के मिळाले percentage हे पण टाकायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर आपली भरलेली माहीती एका लहान विंडोच्या स्वरुपात दिसुन येईल ती भरलेली सर्व माहिती बरोबर असेल तर अपडेट करायचे आहे चुक असल्यास त्यात edit करायचे चुकलेली माहीती दुरूस्त करून ती पुन्हा अपडेट करावयाची आहे.

यानंतर आपणास professional qualification details भरायची आहे.

  • Qualification type
  • Exam/degree
  • Board
  • Month of passing
  • Medium
  • State
  • year of passing
  • Main subject
  • Out of marks
  • Grade

ही सर्व माहिती भरून झाल्यावर सेव्ह अणि अपडेट करायची आहे.

यानंतर आपणास applicant details च्या बाजुला असलेल्या self certification वर क्लिक करायचे आहे.

उमेदवारांनी सर्व माहीती भरून झाल्यावर सेल्फ सरटिफिकेशन करणे आवश्यक आहे जोपर्यंत आपण सेलफ सरटिफिकेशन करत नाही तोपर्यंत आपण भरलेली माहीती शिक्षक पदासाठी अंतिम झाली आहे असे मानले जात नाही.

आपली भरलेली माहीती अचुक आहे याची खात्री करून उमेदवारांनी हे सेल्फ सरटिफिकेशन करावे

सेलफ सरटिफिकेशन वर क्लिक केल्यावर आपणास आपली भरलेली सर्व माहिती स्क्रीनवर दिसुन येईल

Personal details

Address details

Other details

TET exam details

CTET exam details

Academic qualification details

Professional qualification details

वर आपणास certify असे एक बटण दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे सर्टिफाई करण्यासाठी.

सर्व तपशील भरून झाल्यावर दिलेल्या certify बटणावर क्लिक करायचे आहे आणि प्रिंट आउट घ्यायची आहे ही प्रिंट आपणास भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवायची आहे.

अशा प्रकारे पवित्र पोर्टलवर आपली नोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होईल.

आपण जास्तीत जास्त २० शाळांमध्ये शिक्षक पदासाठी अर्ज करू शकतात.

पवित्र पोर्टलवर फाॅम भरण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

  1. शैक्षणिक प्रमाणपत्र १०/१२ वी
  2. पदवीचे प्रमाणपत्र/पदव्युत्तर प्रमाणपत्र
  3. व्यवसायिक प्रमाणपत्र डीएड बीएड
  4. जात प्रमाणपत्र
  5. जात वैधता प्रमाणपत्र
  6. शाळा सोडल्याचा दाखला
  7. शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका
  8. अपंगांसाठी आवश्यक ते प्रमाणपत्र
  9. एम एस सी आयटी ट्रिपल सी प्रमाणपत्र
  10. महिला वर्गाला आरक्षण प्राप्त करण्यासाठी non creamy layer certificate
  11. वैद्यकीय प्रमाणपत्र
  12. एससी एसटी ओपन ईबलयुएस वगळता सर्वांना नाॅन क्रिमिलिअर कागदपत्रे आवश्यक
  13. दोन फोटो
  14. जन्म दाखला
  15. भुकंपग्रस्त प्रकल्प ग्रस्त अंशकालीन माजी सैनिक
  16. विवाह नोंदणी प्रमाणपत्र –
  17. नावात बसत असल्यास शंभर रुपये बाॅन्ड

वरील सर्व कागदपत्रे उमेदवारांनी सेल्फ अटेसटेड,स्कॅन करून ठेवावी सर्व ओरिजनल डाॅक्युमेंट निवड झालेल्या उमेदवारांना पडताळणीसाठी लागतील.

1 thought on “पवित्र पोर्टल वर आपली नावनोंदणी कशी करायची? पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती साठी अर्ज कसा भरायचा – How to register on Pavitra portal in Marathi”

Comments are closed.