महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2023 भरती Mpsc Combine Bharti 2023 In Marathi
मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे एक भरती काढण्यात आली आहे.या भरतीची अधिसुचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या टविटर पेजवर देखील देण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२३ मध्ये गट ब गट क संयुक्त पुर्व परीक्षा घेऊन एकुण ८ हजार १६९ जागांसाठी भरती केली जात आहे.
सर्व जागांसाठी पहिली परीक्षा ही ३० एप्रिल २०२३ रोजी घेतली जाणार आहे.एकुण ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.
परीक्षेसाठी अर्ज हा आॅनलाईन पद्धतीने भरायचा आहे.नोकरीचे महाराष्ट्र राज्य असणार आहे.
सर्व पदांसाठी अर्ज करायला सुरुवात २५ जानेवारी २०२३ पासुन होणार आहे अणि अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०२३ असणार आहे.
गट ब पदासाठी संयुक्त मुख्य परीक्षा २ सप्टेंबर रोजी होईल अणि गट क साठी ९ सप्टेंबर रोजी परीक्षा होणार आहे
विभागानुसार कुठल्या पदासाठी किती जागा भरण्यात येणार आहे कोणाला किती वेतन प्राप्त होणार आहे हे खाली सविस्तर दिलेले आहे-
१)सहाय्यक कक्ष अधिकारी -७० जागा
सहायक कक्ष अधिकारी -८ जागा
२) वित्त विभागात राज्य कर निरीक्षकांच्या -१५९ जागा
३) गृहविभागामध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठी ३७४ जागा
४) महसूल व वन विभाग मध्ये दुय्यम निबंधक श्रेणी १ मुद्रांक निरीक्षक पदाच्या एकुण ४९ जागा
वरील सर्व पदांसाठी वेतन:S14 ३८६००-१२२८०० अधिक महागाई भत्ता अणि नियमानुसार इतर देय भत्ते
५) गृह विभागामध्ये दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पदासाठी-६ जागा
दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पदासाठी वेतन:S12 ३२०००-१०१६०० अधिक महागाई भत्ता अणि नियमानुसार इतर देय भत्ते
६) वित्त विभागात तांत्रिक सहाय्यक पदासाठी १ जागा
तांत्रिक सहाय्यक पदासाठी वेतन:
S10 २९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता अणि नियमानुसार इतर देय भत्ते
७) वित्त विभागात कर साहाय्यक पदासाठी -४६८ जागा
कर सहाय्यक पदासाठी वेतन:S8 २५५०० ते ८११०० अधिक महागाई भत्ता अणि नियमानुसार इतर देय भत्ते
कर साहाय्यक पदासाठी मराठी टंकलेखन वेग ३० शब्द प्रति मिनिट अणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० शब्द प्रति मिनिट असावा.
८) महाराष्ट्रातील राज्य शासनाच्या विविध शासकीय कार्यालयात तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागात लिपिक टंकलेखक पदासाठी ७०३४ जागा
टंकलेखक पदासाठी वेतन: S6 रू १९९०० ते ६३२०० अधिक महागाई भत्ता अणि नियमानुसार इतर देय भत्ते
लिपिक टंकलेखक पदासाठी मराठी टंकलेखन वेग ३० शब्द प्रति मिनिट अणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० शब्द प्रति मिनिट असावा.
पात्रतेच्या अटी –
भारतीय नागरीक असणे आवश्यक
वयोमर्यादा गणण्याचा दिनांक १ मे २०२३ असणार आहे.
अर्ज कुठे अणि कसा करायचा?
ज्या उमेदवारांना वरील पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
कुठल्या वर्गातील उमेदवारांना किती राखीव आरक्षण असणार आहे? पोलिस उपनिरीक्षक अणि दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन पदासाठी महिला अणि पुरुष वर्गासाठी शैक्षणिक अणि शारीरिक पात्रतेची अट काय ठेवण्यात आली आहे?
इत्यादी भरती अणि परीक्षा विषयी अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या पीडीएफ वर जाऊन सर्व माहीती व्यवस्थीत वाचु शकतात.
https://drive.google.com/file/d/1vguEo9WgWs3tJKrbmHoodA_uHx7jUmc7/view?usp=share_link