CISF recruitment 2023 – दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी (चालकपद ) सरकारी नोकरी – Government job for 10th pass in 2023

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरी Government job for 10th pass in 2023

सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स मध्ये काॅंन्स्टेबल ड्राइव्हर पदासाठी एकुण ४५० जागांसाठी कायमस्वरूपी भरती करण्यात येत आहे.

इथे संपूर्ण भारतातील कुठलाही फ्रेशर उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहे.या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा २१ ते २७ वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.

नोकरीसाठी उमेदवारांनी अर्ज हा आॅनलाईन पद्धतीने करायचा आहे.अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भरतीचे स्वरूप हे कायमस्वरूपी असणार आहे.

नोकरीसाठी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी शंभर रुपये इतकी फी आकारण्यात येईल.निवड प्रक्रिया ही ट्रेंड टेस्ट अणि लेखी परीक्षा ह्या बेसवर केली जाणार आहे.

या भरती प्रक्रिया मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना २१ हजार सातशे ते ६९१०० रूपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.अणि नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात कुठेही असु शकते.

भरतीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२३ असणार आहे.

पदाचे नाव –

१)काॅनस्टेबल ड्राइव्हर पदासाठी

एकुण जागा -१८३

  • कॅटॅगरी नुसार जागा:
  • एससी -२७ जागा
  • एसटी -१३ जागा
  • ओबीसी -४९ जागा
  • ईडब्लुएस -१८ जागा
  • यु आर -७६ जागा
  • ई एस एम -१८

शैक्षणिक पात्रता -दहावी उत्तीर्ण+जवळ ड्रायव्हिंग लायसन् असणे आवश्यक आहे अणि ड्राईव्हर पदावर काम करण्याचा किमान तीन वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे.

२)काॅन्सटेबल ड्राइव्हर कम पंप आॅपरेटर –

  • एकुण जागा -२६८
  • यु आर -१११ जागा
  • एससी -४० जागा
  • एसटी -१९ जागा
  • ओबीसी -७२ जागा
  • ईडबलुएस -२६ जागा
  • ई एस एम -२७
See also  रानभाज्या महोत्सव महाराष्ट्र कृषि विभाग -2020

दहावी उत्तीर्ण+जवळ ड्रायव्हिंग लायसन् असणे आवश्यक आहे अणि काॅन्सटेबल ड्राईव्हर कम पंप आॅपरेटर पदावर काम करण्याचा किमान तीन वर्षे इतका अनुभव उमेदवारास असणे आवश्यक आहे.

सी आय एस एफ ड्राइव्हर २०२३ पदासाठी निवड प्रक्रिया मध्ये पुढील चरण समाविष्ट असणार आहे-

  • ● लेखी परीक्षा
  • ● मेडिकल परीक्षा
  • ● पी ई टी पी एसटी डाॅक्युमेटेशन ट्रेंड टेस्ट

Cisf driver recruitment 2023 साठी अर्ज कसा करायचा?

सर्वप्रथम सी आय एस एफ ड्राइव्हर पदासाठी पात्रता काय आवश्यक आहे हे cisfrectt.in वर चेक करायचे.

नंतर खाली दिलेल्या apply online ह्या लिंकवर क्लिक करायचे आहे.

आपला अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहे.नंतर अर्ज फी भरून भरलेल्या अर्जाची प्रिंट काढुन घ्यायची आहे

सी आय एस एफ ड्राइव्हर भरती २०२३ चे पंॅटर्न कसे असणार आहे तसेच या भरती विषयी अधिक सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी आपण याच्या आॅफिशिअल वेबसाईट www.cisfrectt.in वर व्हिझिट देखील करू शकतो.