अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कर्ज योजना २०२३ विषयी माहिती
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कर्ज योजना काय आहे?
आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा अनेक जाती जमाती आहेत ज्या दारिद्र्य रेषेखाली आपले जीवन यापन करीत आहे.
अणि स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल म्हणून पुरेसा पैसा जवळ उपलब्ध नसल्यामुळे असे व्यक्ती स्वताचा रोजगार उद्योग व्यवसाय देखील सुरू करू शकत नाही.
म्हणुन अशा गरीब तसेच मातंग समाजातील एकूण बारा पोटजाती असलेल्या व्यक्तींना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ ह्या योजनेच्या मार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
जेणेकरून त्यांना देखील स्वताचा हक्काचा रोजगार प्राप्त होईल अणि ते आर्थिक दृष्ट्या प्रगती करतील.ह्या योजनेसाठी पात्र ठरत असलेल्या प्रवर्गाकडुन अर्ज मागविण्यास देखील प्रारंभ झालेला आहे.
अणि जास्तीत जास्त पात्र तरूणांनी ह्या योजनेसाठी अर्ज करून ह्या योजनेचा लाभ प्राप्त करावा असे आवाहन सुदधा करण्यात आले आहे.
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या कर्ज योजना राबविल्या जातात.
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेअंतर्गत किती कर्ज दिले जाते?
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेअंतर्गत प्रारंभी ह्या २५ हजार रुपये इतके कर्ज दिले जात होते पण ह्या कर्जाच्या रक्कमेत वाढ करून एक लाखापर्यंत हे कर्ज करण्यात आले आहे.
यात ८५ टक्के रक्कम ही आपणास अनुदान म्हणून प्रदान केली जाते तर उरलेली २५ टक्के रक्कम ही आपणास भरावी लागते.अशी एकूण एक लाख रूपये इतकी रक्कम आपणास ह्या योजनेअंतर्गत प्राप्त होत असते.
कर्जाची परतफेड करण्याचा एकुण कालावधी किती आहे?
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेअंतर्गत प्राप्त होत असलेले कर्ज फेडण्यासाठी आपणास ३६ महिने इतका कालावधी प्राप्त होत असतो.अणि यात आपण जे कर्ज घेतो त्यावर तीन ते चार टक्के इतके व्याजदर आकारण्यात येत असते.
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेच्या अटी तसेच नियम काय काय आहेत?
● अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
● अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेअंतर्गत मातंग तसेच बारा पोटजाती मधील अर्जदार तरुणांना आपला रोजगार सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाईल.
● योजनेमध्ये जे तरूण ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत तसेच ज्यांनी राज्यपातळीवर क्रिडा पुरस्कार प्राप्त केलेला आहे त्यांना विशेष अणि प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
● जे सैनिक सैन्यदलात वीरमरण पावलेले आहेत त्यांच्या वारसांना म्हणजेच घरातील एका सभासदाला सुदधा ह्या योजनेत विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
● ह्या योजनेअंतर्गत महिलांकरीता ५० टक्के अणि पुरूषांकरीता ५० टक्के आरक्षण राखीव ठेवले जाईल.
● ह्या योजनेमध्ये वयाची अट किमान वय मर्यादा अठरा ते पन्नास वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे.
● अर्जदाराचे उत्पन्न तीन लाखापेक्षा अधिक नसावे.
● एका परिवारातील एकच व्यक्ती ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेचा लाभ कोणत्या जातीमधील तरूणांना मिळणार आहे?
● मातंग
● मांग
● गारूडी
● मदारी
● मांग गोराडी
● मांग महाशी
● मादगी मादीगा
● मिनी मादीग
● दानखणी मांग
● राधे मांग
इत्यादी अशा एकुण बारा पोटजाती मधील तरुणांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणती आहेत?
● अर्जदाराचे आधार कार्ड
● अर्जदाराचे बॅक खाते पासबुक
● अर्जदार तरुणाचे जात प्रमाण
● उत्पन्नाचे प्रमाण
● अर्जदार या आधी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीये याचा पुरावा
● दोन पासपोर्ट साईज फोटो
● अर्जदार व्यक्तीचा शाळेचा दाखला
● उद्योग व्यवसाय सुरू करत असलेल्या जागेचा पुरावा म्हणून करारपत्र किंवा भाडेपावती
● शाॅप अॅक्ट लायसन
● गरामसेवकाकडून मिळालेले व्यवसाय करणयासंबंधीचे ना हरकत सर्टिफिकेट
● व्यवसाय संदर्भातील साहित्य तसेच माल खरेदीचे कोटेशन तसेच दरपत्रक
याचसोबत अर्जदाराचा सिबिल स्कोअर पाचशे पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.अणि ज्या व्यवसायाकरीता तो अर्ज करतो आहे त्याचे त्याला नाॅलेज असायला हवे.
अण्णाभाऊ साठे महामंडळ योजना
NICE INFORMATION
FOR MATANG SOCIETY IN SMALL BUSINESS STARTING SUPPORT.
अधीक माहिती कुटे मिळेल ……महामंडळाचा पत्ता, फोन नंबर मिळेल का
Thank you very much