2023 मध्ये ग्राफीक डिझाईनर करीता उत्तम इंटर्नशिप कार्यक्रम – Best internship programme offer in 2023 for graphic designer in Marathi

2023 मध्ये ग्राफीक डिझाईनर करीता उत्तम इंटर्नशिप कार्यक्रम – Best internship programme offer in 2023 for graphic designer in Marathi

मित्रांनो ग्राफीक डिझाईनिंग ही आज एक अशी क्रिएटिव्ह फिल्ड आहे जी खास क्रिएटिव्ह म्हणजेच निर्मितीक्षम व्यक्तींसाठी करिअरचा उत्तम पर्याय आहे.

ज्यात शिक्षण करून आपण आपले एक चांगले करिअर करू शकतो.

डिजीटल मार्केटिंगसाठी,बिझनेस प्रमोशनसाठी आज मार्केटमध्ये प्रत्येक ठिकाणी ग्राफीक डिझायनर्सची खुप अधिक मागणी वाढताना आपणास दिसुन येते आहे.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे ह्या क्षेत्रात वेतन देखील चांगले प्राप्त होते.पण ज्यांना ह्या क्षेत्रात आपले लाईफ टाईम करिअर करायचे आहे त्यांना आधी ह्या फिल्डचा यातील कामाचा सर्वात पहिले अनुभव घ्यावा लागणार आहे.

अणि हा अनुभव प्राप्त करण्यासाठी त्यांना ग्राफिक डिझायनिंग मध्ये एखाद्या कंपनीत संस्थेत इंटरनशिप करावी लागणार आहे.

ज्यांना इंटर्नशिप म्हणजे काय असते?त्याचे महत्त्व काय असते?इंटर्नशिप कशी मिळवायची हे माहीती नसेल ते अधिक माहितीसाठी आपल्या ब्लाॅगवर प्रकाशित करण्यात आलेले इंटर्नशिप विषयी माहिती हे आर्टिकल वाचु शकतात

Internship विषयी माहीती – Internship Marathi Information

आजच्या लेखात आपण काही अशा कंपनीची नावे जाणुन घेणार आहोत ज्या आपणास २०२३ मध्ये ग्राफीक डिझायनिंग मध्ये इंटर्नशिप आॅफर करीत आहे.

१) फॅशन टिव्ही इंडिया,पुणे इन ग्राफिक डिझायनिंग इंटर्नशिप –

  • फॅशन टिव्ही इंडिया,पुणे ह्या कंपनीमध्ये ग्राफिक डिझायनर्सला सहा ते सात महिन्यांची इंटर्नशिप प्रदान केली जात आहे.
  • इथे इंटर्नशिप साठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा किमान दोन हजार इतकी इंटर्नशिप सॅलरी सुदधा देण्यात येणार आहे.
  • सर्व इच्छुक उमेदवारांनी ३ फेब्रुवारी च्या आत इंटर्नशाला ह्या आॅनलाईन पोर्टलवरून ह्या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्ज करायचा आहे.
  • ह्या इंटर्नशिप प्रोग्रामला जाॅईन केल्यानंतर आपणास फोटो एडिटिंग करणे तसेच इतर प्रोफेशनल ग्राफीक डिझायनरच्या अंडर काम करणे त्यांना कामात मदत करणे ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
See also  केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात मेडिकल ऑफिसर पदाच्या २९७ जागांसाठी भरती सुरू - CAPF recruitment 2023 in Marathi

२) बजाज कॅपिटल,गुरगाव ग्राफिक डिझायनिंग इंटर्नशिप –

  • बजाज कॅपिटल गुरगाव येथे ग्राफीक डिझायनरला तीन वर्षांची दिर्घकालीन इंटर्नशिप प्रदान केली जात आहे.
  • ज्या उमेदवारांना ह्या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी निवडण्यात येईल त्यांना दरमहा किमान दहा ते बारा हजार इतकी इंटर्नशिप सॅलरी मिळणार आहे.
  • ह्या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ फेब्रुवारी २०२३ आहे.
  • इच्छुक उमेदवार ह्या इंटर्नशिप प्रोग्रामला जाॅईन करण्यासाठी इंटर्नशाला वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज दाखल करू शकतात.
  • ह्या इंटर्नशिप प्रोग्रामला जाॅईन केल्यानंतर उमेदवारांना टीम वर्क करावे लागणार आहे ज्यात बिझनेसची आॅनलाईन मार्केटिंग करणे सोशल मिडियासाठी वेबसाईट करीता वेगवेगळ्या ग्राफिक्स तयार करणे हे काम इंटर्नसला करावे लागणार आहे.

३) ई काॅमर्स ब्युटी कंपनी नायका,बंगलोर ग्राफीक डिझायनिंग इंटर्नशिप –

  • नायका कंपनीमध्ये ग्राफीक डिझायनरला तीन ते चार महिन्यांची इंटर्नशिप आॅफर केली जात आहे.
  • ज्या उमेदवारांना ह्या इंटर्नशिप प्रोग्राम मध्ये निवडले जाईल त्यांना चार ते पाच हजार इतकी इंटर्नशिप सॅलरी दिली जाणार आहे.
  • ज्यांना ही इंटर्नशिप करायची आहे त्यांनी ३ फेब्रुवारीच्या आत इंटर्नशाला वर जाऊन आपला अर्ज सादर करायचा आहे.
  • ह्या इंटर्नशिप प्रोग्रामला जाॅईन केल्यानंतर उमेदवारांना ग्राफीक डिझायनिंग पोस्टर बॅनर तयार करायचे काम करावे लागणार आहे.