कडबा कुटटी मशिन घेण्यासाठी शासनाकडुन शेतकरींना प्राप्त होणार ७५ टक्के अनुदान – kadba kutti machine subsidy in Marathi

कडबा कुटटी मशिन घेण्यासाठी शासनाकडुन शेतकरींना प्राप्त होणार ७५ टक्के अनुदान – kadba kutti machine subsidy in Marathi

मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना शासनाच्या वतीने कडबा कुटटी मशिन घेण्यासाठी अनुदान मिळवायचे त्यांच्या साठी एक महत्वाची बातमी आहे.

शेतकरींना आता कडबा कुटटी मशिन घेण्यासाठी शासन 75 टक्के इतके अनुदान देणार आहे.

आज आपण शासनाकडुन हे 75 टक्के अनुदान प्राप्त करण्यासाठी कुठे अणि कशापदधीने आपणास अर्ज करायचा आहे याविषयी थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

कडबा कुटटी योजना काय आहे?याचे महत्त्व काय आहे?

कडबा कुटटी हे एक मशिन आहे जे पशुपालन व्यवसाय करणारया शेतकरींसाठी खुपच गरजेचे आहे.

कारण शेतकरी आपल्या जनावरांकरीता जे काही चारा खाद्य आणत असतात ते जसेच्या तसे त्यांच्यासमोर टाकल्यावर जनावरांना खाता येत नसते.

म्हणुन ह्या समस्येवर मात करण्यासाठी शेतीतज्ञांनी कडबा कुटटी हे मशिन निर्माण केले.हया मशिनचा वापर करून शेतकरी आपल्या जनावरांना चरण्यासाठी आणलेल्या खाद्याचे लहान लहान तुकडे करुन त्यांना व्यवस्थित खाऊ घालु शकतात.

पण सर्वच शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती हे मशिन विकत घेण्याची अजिबात नसते.म्हणुन यावर तोडगा म्हणून सरकार कडबा कुटटी मशिन घेण्यासाठी शेतकरींना ७५ टक्के अनुदान प्रदान करीत आहे.

साधारणत पंचायत समिती तसेच राष्ट्रीय पशुधन विकास योजना दवारे कडबा कुटटी योजनेसाठी ७५ टक्के इतके अनुदान दिले जाते.

See also  साऊथ इंडियन बॅकेत प्रोबेशनरी क्लार्क पदासाठी भरती सुरू - South Indian bank recruitment in Marathi

पण ह्या योजनेअंतर्गत खुपच तुरळक शेतकरी बांधवांना अनुदानाचा लाभ प्राप्त होत असतो.यावर तोडगा म्हणून सर्व शेतकरींना अनुदान प्राप्त करून देण्यासाठी महाडिबीटी फार्मर्स,कृषी यांत्रिकीकरण तसेच राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजना तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना मार्फत शेतकरयांना कडबा कुटटी मशिन घेण्यासाठी का अनुदान दिले जाते.

ह्या योजनेच्या अंतर्गत दिले जात असलेली अनुदानाची रक्कम किमान पन्नास टक्के इतकी दिली जात असते.म्हणजे यंत्राची किंमत जर सोळा हजार आहे तर शेतकरींना अनुदान म्हणून ८ हजार रुपये यात दिले जातात.अणि यंत्राची किंमत वीस हजार असल्यास त्यावर अधिकतम दहा हजार इतके अनुदान प्राप्त होत असते.

कडबा कुटटी मशिन अनुदान ह्या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

कडबा कुटटी ह्या योजनेचा लाभ ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या तेथील रहिवासी असलेल्या आर्थिक दृष्ट्या कमजोर शेतकरी वर्गाला मिळणार आहे.


आपल्या महाराष्ट्र सरकार कडून महाराष्ट्र राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत असतात या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन राज्यातील सर्व गरजू नागरिकांसाठी तसेच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि समाजातील विविध घटकांचा विचार करुन अनेक प्रकारच्या योजना राबवत असते ,या अनेक अश्या योजनांची माहिती वेळीच आपल्याला मिळावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

https://chat.whatsapp.com/Fth8x1djP0682v6fjJjHT2


महा सरकारी योजना- वेबशोध

 

कडबा कुटटी मशिन योजनेचा लाभ घेण्यासाठी साठी पात्रतेच्या अटी काय आहेत?

● लाभार्थी शेतकऱ्याचे बँकेत सेव्हिंग अकाऊंट असायला हवे.

● लाभार्थी शेतकऱ्याच्या सेव्हिंग अकाऊंटशी त्याचे आधार कार्ड सुदधा लिंक असायला हवे.

● योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारया शेतकरीकडे दहा एकर पेक्षा जास्त जमीन नसावी.

कडबा कुटटी मशिन योजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –

● अर्जदार शेतकरीचे आधार कार्ड

● अर्जदार शेतकरीच्या जमिनीचा सातबारा अणि आठ अ उतारा

● बँक खाते पासबुक

● घरातील लाईट बील

कडबा कुटटी मशिन अनुदान प्राप्त करण्यासाठी आॅनलाईन अर्ज कसा करायचा?

 • महा डिबीटी पोर्टल द्वारे एकुण तीन प्रकारच्या कडबा कुटटी साठी अनुदान प्रदान केले जाते.
 • यात तीन एस बीच्या कडबा कुटटी तीन एसबी पेक्षा अधिक क्षमता असलेल्या कडबा कुटटी अणि तीन एस बी पेक्षा कमी क्षमता असलेल्या कडबा कुटटी मशिन टॅक्टर चलित कडबा कुटटीचा समावेश होतो.
 • आज आपण मनुष्य चलित अवजाराच्या माध्यमातून दिल्या जात असलेल्या तीन एस बी पेक्षा अधिक किंवा जास्त कडबा कुटटी मशिन साठी अर्ज कसा करायचा हे बघुया.
 • सर्वप्रथम आपण महाडिबीटी फार्मर्सच्या पोर्टलवर जाऊन आपणास शेतकरी योजना हा पर्याय निवडायचा आहे.
 • बाजुला आपणास तीन आॅप्शन दिसुन येईल जे अर्जदार नवीन आहेत त्यांनी नवीन अर्जदार नोंदणी हा पर्याय निवडायचा आहे.अणि आपला यूझर आयडी पासवर्ड टाकायचा आहे.
 • तिथे दिलेला कॅपच्या कोड जसाच्या तसा फिल करायचा आहे.अणि लाॅग इन करून घ्यायचे आहे.
 • लाॅग इन करण्यासाठी आपण आपला आधार कार्ड अणि ओटीपी इंटर करून सुदधा लाॅग इन करू शकतो.
 • लाॅग इन केल्यावर आपल्याला आपली प्रोफाईल स्थिती दिसुन येते.ज्यांचे प्रोफाईल अपूर्ण दिसुन येत असेल त्यांनी आपले प्रोफाईल स्थिती सर्व वैयक्तीक शेतीविषयक बँक विषयक विचारलेली माहीती व्यवस्थीत भरून शंभर टक्के करून घ्यायची.
 • खाली आपल्याला अर्ज करा असे एक आॉप्शन दिलेले असेल अर्ज करण्यासाठी त्यावर क्लिक करायचे आहे.
 • अर्ज करा वर क्लिक केल्यावर आपणास विविध योजनांची नावे दिसुन येतील त्यात आपण कृषी यांत्रिकीकरण हे आॅप्शन निवडायचे आहे.अणि त्यासमोरील बाबी निवडा हे आॅप्शन निवडायचे आहे.
 • यानंतर कृषी यांत्रिकीकरणचा एक फाॅम ओपन होतो आपणास तो व्यवस्थित भरायचा आहे.
 • ज्यांचे एका तालुक्यात शेती आहे त्यांना तालुक्याचे नाव टाकायचे आहे.ज्यांची वेगवेगळ्या तालुक्यात शेती असेल त्यांनी दिलेल्या गावाच्या नावांमधून आपले शेती असलेले गाव निवडायचे आहे.
 • मुख्य घटक निवडा मध्ये आपणास कृषी यंत्र अवजारासाठी अर्थसाहाय्य हा पर्याय निवडायचा आहे.
 • तपशिल निवडा मध्ये मनुष्य चलित अवजारे सिलेक्ट करून घ्यायचे.
 • यानंतर फोरेस्ट ग्रास अॅण्ड स्ट्राॅ रिसीव्हड मॅनेजमेंट कटर सेलर हे यंत्रसामग्री अवजारे उपकरणे मध्ये निवडायचे आहे
 • यानंतर मशिनचा प्रकार निवडायचा आहे.ज्यांना तीन एच पी पर्यंतचे मशिन घ्यायचे आहे त्यांनी चाॅप कटर अप टु ३ एचपी निवडायचे आहे.
 • अणि तीन एच पी च्या पुढील मशिन घ्यायला अबोव्ह तीन एच पी निवडायचे आहे.
 • यांच्यानंतर मी पुर्वसंमतीविना कृषी य्ंत्र अवजारे खरेदी करणार नाही अणि केल्यास मी अनुदानास पात्र राहणार नाही यावर टीक करायचे आहे.
 • यानंतर जतन करावर क्लिक करायचे आहे.जतन करावर क्लिक केल्यावर आपणास सांगतात की आपला घटक तपशिल जतन केला गेला आहे अणि विचारले जाईल की आपणास अजुन तपशिल म्हणजे अजुन एखादे अवजार यात समाविष्ट करून तपशिलात जोडायचे आहे का?
 • हो असेल तर हो करायचे नाहीतर नो करायचे आहे.
 • यानंतर कृषी यांत्रिकीकरण आॅप्शनच्या वर दिलेल्या अर्ज सादर करा वर क्लिक करायचे आहे.त्यानंतर पाहा हे आॅप्शन निवडायचे आहे
 • यानंतर आपणास प्राधान्य क्रमांक निवडुन घ्यायचा आहे.अणि अर्ज सादर करावर क्लिक करायचे आहे.
 • यानंतर शेवटी आपणास २३ रूपये साठ पैसे पेमेंट करायचे आहे.
 • ज्यांनी याआधी हे पेमेंट केले आहे त्यांना पुन्हा पेमेंट करायची आवश्यकता नाही.अर्ज केल्यानंतर आपला अर्ज अर्ज केलेल्या बाबी मध्ये दाखवला जातो.
See also  तलाठी भरती ४१२२जागांसाठी अर्ज करणे सुरू- Talathi bharti 2023 in Marathi

योजनेची लाॅटरी लागली की आपण पात्र असल्यास आपले नाव विजेता म्हणून दाखवण्यात येईल.यानंतर आपणास यासाठी कडबा कुटटी कोटेशन तसेच काही आवश्यक डाॅक्युमेंट अपलोड करावे लागणार असतात.

 

 


आपल्या महाराष्ट्र सरकार कडून महाराष्ट्र राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत असतात या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन राज्यातील सर्व गरजू नागरिकांसाठी तसेच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि समाजातील विविध घटकांचा विचार करुन अनेक प्रकारच्या योजना राबवत असते ,या अनेक अश्या योजनांची माहिती वेळीच आपल्याला मिळावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

https://chat.whatsapp.com/Fth8x1djP0682v6fjJjHT2

महा सरकारी योजना- वेबशोध