Internship काय असते – Internship Marathi Information
जे विदयार्थी नुकतेच महाविद्यालयातील आपले शिक्षण पुर्ण करून नोकरीच्या शोधात असतात असे फ्रेशर्स कँडीडेट Internship साठी अँप्लाय करताना आपणास नेहमी दिसुन येत असतात.
पण Internship चा खुप मोजकेच फ्रेशर्स विदयार्थी लाभ घेत असतात.
याला कारण हे आहे की बहुतेक विदयार्थ्यांना अद्याप
Internship म्हणजे नेमके काय असते?Intership का घेतली जाते?Internship चा कोणता फायदा नवीनच Recently Pass Out होऊन जाँबच्या शोधात फिरत असलेल्या फ्रेशर्सला होत असतो?हे आपल्यापैकी खुप जणांना अजुनही माहीत नाहीये.
म्हणुन आजच्या लेखात आपण Internship विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.जेणेकरून फ्रेशर्स विदयार्थ्यांच्या मनात याविषयी कुठलीही शंका तसेच प्रश्न राहुन जाणार नाही.
Internship म्हणजे काय?
Internship चा अर्थ प्रशिक्षण तसेच ट्रेनिंग असा होत असतो.
जेव्हा आपण कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण पुर्ण करून त्या शिक्षणाच्या आधारावर जाँबसाठी कुठेही अँप्लाय करत असतो.
तेव्हा आपल्या शिक्षणाचे प्रमाण म्हणुन Education Certificate बघण्याबरोबरच कुठलीही कंपनी आपल्या अंगी कोणते असे Soft Skills,Hard Skills आहेत जे कंपनीला आपल्या Growth आणि Profit साठी फायदेशीर ठरू शकतात हे देखील जाँब इंटरव्युत कुठलीही कंपनी बघत असते.
- फक्त डिग्री आणि सर्टिफिकिटच्या बेसवर कुठेही आपल्याला जाँब दिला जात नसतो.आपल्याला त्या क्षेत्रातील कामाचा किती वर्षाचा अनुभव प्राप्त आहे? तसेच आपण त्या क्षेत्रात किती Expert आहोत?आपण त्या कामात किती पारंगत आहोत? हे देखील आपल्याला जाँब देण्याच्या अगोदर कुठलीही कंपनी बघत असते.
- म्हणुन आपल्याला आपल्या Field मध्ये काम करण्याचा अनुभव प्राप्त व्हावा तसेच आपले नाँलेज देखील वाढावे म्हणुन काँलेज मधून नवीनच पास आऊट होऊन निघालेले Freshers हे Internship साठी अँप्लाय करत असतात.
- Internship मध्ये कधीकधी आपल्याला थोडी फार सँलरी देखील कामासाठी दिली जात असते.म्हणजेच कामाचा अनुभव आणि नाँलेज प्राप्त करण्याबरोबर आपल्याला दोन पैसे कमविण्याची संधी देखील यात मिळत असते.
- म्हणुन बहुतेक Freshers चा कल हा Internship कडे अधिक जास्त असलेला आपणास पाहायला मिळतो.
- Research Internship साठी इंजिनिअरींग,एम बीए तसेच एम बी बीएस सारख्या क्षेत्रातील शेवटच्या वर्षातील विदयार्थी अधिक अँप्लाय करत असतात.
- आणि मग आपली इंटर्नशिप पुर्ण करून झाल्यावर त्याचा रिपोर्ट आणि सर्टिफिकिट आपण शिकत असलेल्या महाविद्यालयात जमा करतात ज्याचे महाविद्यालयाकडून मार्क्स देखील दिले जात असतात.
- फक्त ह्या इंटर्नशिप रिपोर्टमध्ये इंटर्नशिप केलेल्या विदयार्थ्यानी कोणत्या कंपनीत तसेच संस्थेत इंटर्नशिप पुर्ण केली आहे हे दिलेले असणे गरजेचे असते.
सोबतच तिथे त्यांनी कोणती जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आणि त्यातुन त्या विदयार्थीला कोणते ज्ञान प्राप्त झाले तिथे तो काय काय शिकला हे देखील त्या रिपोर्टमध्ये दिलेले असणे गरजेचे असते.
जेणेकरून पुढे जाऊन आपले फायनल ईयर पुर्ण केल्यावर त्या विदयार्थीला आपल्या फिल्डमधील कामाच्या अनुभव आणि नाँलेजमुळे एखाद्या मोठया कंपनीत चांगल्या पदावर तसेच चांगल्या पगाराची नोकरी प्राप्त होत असते.
Job Interview: उत्तरं कसे द्यावे – आपले सामर्थ्य आणि दुर्बलता काय आहेत वाचण्या करता इथे क्लिक करा
Internship ही Freshers ला कोणाकडुन दिली जात असते?
Internship हे एक प्रशिक्षण असते जे कुठल्याही क्षेत्रातील कामाचा अनुभव तसेच त्याचे उत्तम नाँलेज प्राप्त करण्यासाठी Freshers साठी एखाद्या कंपनी तसेच संस्थेकडुन आयोजित केले जात असते.
Internship ह्या कोणकोणत्या प्रकारच्या असतात?
इंटर्नशिपचा कुठलाही एक प्रकार नसुन त्याचे देखील विविध प्रकार पडत असतात जे पुढीलप्रमाणे आहेत :
1)Paid Internship :
2) Unpaid Internship :
3) Virtual Internship :
4) Summer Internship :
5) Work Research Internship :
1)Paid Internship :
हा इंटर्नशिपचा असा प्रकार आहे ज्यात कामाच्या अनुभवाच्या आणि नाँलेजच्या सोबत आपल्याला Freshers म्हणजेच शिकाऊ म्हणून थोडेफार (Stipend) पैसे दिले जात असतात ज्यात आपला रोजचा खर्च वहया पुस्तकांचा किरकोळ खर्च आपण धकवू शकतो.
2) Unpaid Internship :
हा इंटर्नशिपचा एक असा प्रकार आहे ज्यात आपल्याला कामाचा अनुभव आणि नाँलेज तर मिळत असते पण त्याचे आपल्याला कुठलेही मानधन दिले जात नाही.
असे इंटर्नशिप हे आपल्याला एखादी एनजीओ संस्था,तसेच हाँस्पिटल किंवा विदयापीठाकडुन प्राप्त होत असते.
3) Virtual Internship :
व्हर्चूअल इंटर्नशिपला आपण रिमोट इंटर्नशिप असे देखील म्हणत असतो.ही इंटर्नशिप आपण आँफिसमध्ये तसेच कंपनीत नोकरीला रोज न जाता घरबसल्या तसेच जगातील कुठल्याही ठिकाणी बसुन इंटरनेटचा वापर करून करू शकतो.
4) Summer Internship :
समर इंटर्नशिपच्या नावातच याचा अर्थ दडलेला आपणास दिसुन येतो.
उन्हाळयात सुटटीच्या कालावधीत रिकाम्या वेळेत विदयार्थी ह्या इंटर्नशिपसाठी अँप्लाय करत असतात.
ही इंटर्नशिप आपण रिकाम्या वेळात कामाचा अनुभव आणि नाँलेज प्राप्त व्हावा यासाठी पार्ट टाईम एक दोन महिन्यांसाठी करू शकतो किंवा आपल्याला वाटले तर आपण फुलटाईम देखील करू शकतो.
5) Work Research Internship :
यात शेवटच्या वर्षात शिकत असलेले विदयार्थी हे इंटर्नशिप करून एखाद्या प्रोजेक्टवर रिसर्च करत असतात.
आणि मग रिसर्च पुर्ण झाल्यावर त्याचे सर्टिफिकिट आणि रिपोर्ट महाविद्यालयात जमा करत असतात.ज्याचे त्यांना महाविदयालयाकडुन गुण देखील दिले जात असतात.
Internship आपण कशा पदधतीने करू शकतो?
खुप विदयार्थी हा प्रश्न विचारत असतात की इंटर्नशिपसाठी अँप्लाय कसे करावे?इंटर्नशिपसाठी आपण कोणकोणत्या पदधतीने अँप्लाय करू शकतो
इंटर्नशिपसाठी आपण पुढील पदधतीने अँप्लाय करू शकतो:
1)आपल्या काँलेज आणि युनिव्हर्सिटी द्वारे :
2) स्वता इंटर्नशिपसाठी एखाद्या कंपनीत अँप्लाय करणे:
3) आँनलाईन पदधतीने अँप्लाय करून :
1)आपल्या काँलेज आणि युनिव्हर्सिटी द्वारे :
आपण ज्या काँलेजात शिकत आहात ते काँलेज तसेच विदयापीठ हे जर मोठे नावाजलेले विद्यापीठ असेल तर मोठमोठया कंपन्या अशा ठिकाणी आपल्या कंपनीत इम्पलाँईची भरती करण्यासाठी इंटर्नशिपची आँफर घेऊन येत असतात.
यासाठी आपली लिखित तसेच तोंडी परीक्षा तसेच मुलाखत त्या कंपनीकडुन घेतली जात असते ज्यात उत्तीर्ण झाल्यास आपल्याला कंपनीत इंटर्नशिप करायची संधी मिळत असते.
किंवा आपण आपल्या काँलेजात असलेल्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल डिपार्मेंटशी संपर्क करून एखाद्या कंपनीत इंटर्नशीपसाठी प्रयत्न करू शकतो.
2) स्वता इंटर्नशिपसाठी एखाद्या कंपनीत अँप्लाय करणे:
याचसोबत आपण स्वता एखाद्या कंपनीत इंटर्नशिपसाठी अँप्लाय करू शकतो.फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या फिल्डशी रिलेटेड इंटर्नशिप आँफर करणारी कंपनी तसेच संस्था शोधावी लागते.जिथे आपल्याला इंटर्नर्शिप करायला मिळु शकते.
नाहीतर आपण आपल्या आजुबाजुचा मित्र मैत्रीण नातलग जर एखाद्या कंपनीत इंटर्नशिप करत असेल तर तिथे देखील अँप्लाय करू शकतो.
3) आँनलाईन पदधतीने अँप्लाय करून :
आज सर्व जगाचे आर्थिक व्यवहार तसेच शिक्षण,नोकरी देखील आँनलाईन होत आहे यात आपल्याला एक चांगली संधी आहे डिजिटली म्हणजेच आँनलाईन इंटर्नशिपसाठी अँप्लाय करण्याची.
यात आपण व्हर्चुअल इंटर्शिपसाठी आँनलाईन अँप्लाय करू शकतो कारण त्यात आपल्याला कुठेही असुन मोबाईल,इंटरनेटदवारे आँनलाईन काम करता येत असते.
आँनलाईन इंटर्नर्शिप आँफर करत असलेल्या काही प्रसिदध वेबसाईटची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
- इंटर्नशाला
- नीती आयोगा भारत
- लिंक्ड इन
- ग्लास डोअर
- लेटस इंटर्न
- अमेझोन
इंटर्नशाला भारतातील सर्वात पहिल्या क्रमांकाची आँनलाईन इंटर्नशिप वेबसाईट तसेच प्लँटफाँर्म म्हणुन ओळखली जाते.
Internship करायचे फायदे कोणकोणते असतात?
फ्रेशर्सने इंटर्नशिप करण्याचे पुढीलप्रमाणे अनेक फायदे असतात :
1)आपल्या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव प्राप्त होतो :
इंटर्नशिपमुळे आपल्याला आपल्या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव प्राप्त होत असतो.ज्याने आपल्याला आपल्या अनुभवाच्या बळावर कुठल्याही कंपनीत सहज नोकरी प्राप्त होत असते.
2) आपल्या क्षेत्राचे नाँलेज प्राप्त होते :
इंटर्नशिपमुळे आपल्याला आपल्या क्षेत्रात काम करून त्याचे अधिक नाँलेज प्राप्त करता येते.आणि आपल्या फिल्डमधील Expert बनता येत असते.आणि मग आपल्या फिल्डचा एक्सपर्ट बनल्यावर कुठल्याही कंपनीत आपल्याला लगेच नोकरी मिळत असते.
3) करीअर बाबत Clearity प्राप्त होते:
जेव्हा आपण आपल्या निवडलेल्या फिल्डमध्ये इंटर्नशिपमध्ये काम करत असतो तेव्हा आपल्याला आपल्या फिल्डमध्ये काय काम करावे लागते? कोणती जबाबदारीची पदे सांभाळावी लागत असतात?
याने आपण आपल्या निवडलेल्या फिल्डसाठी किती योग्य आहोत आपल्याला ते काम पुढे जाऊन किती झेपेल हे आपणास कळत असते.
म्हणजेच खरच आपण ह्याच क्षेत्रासाठी बनलो आहे का याची एक क्लीअँरीटी आपल्याला प्राप्त होते.
4) नवनवीन Skills शिकायला मिळतात :
इंटर्नशिप मध्ये काम केल्यावर आपल्याला आपल्या फिल्डशी रिलेटेड नवनवीन स्कील शिकायला मिळतात.आपल्यापेक्षा अनुभवी लोकांचे मार्गदर्शन प्राप्त होते.
आपल्यात अजुन काय Improvement करणे गरजेचे आहे.आपले Weak Point काय आहे आणि Strength काय आहे हे सुपरवायझरकडुन कळत असते.
ज्याने आपण त्यात पुढे जाऊन सुधारणा करू शकतो.
5) दोन पैसे कमवायची संधी प्राप्त होते :
काही ठिकाणी आपल्याला इंटर्नशिपचे थोडेफार पैसे देखील दिले जातात.ज्याने आपल्याला दोन पैसे कमविण्याचे समाधान मिळते.आणि त्यात आपण आपला किरकोळ वरचा खर्च सहज भागवू शकतो.
6) लवकरात लवकर चांगली नोकरी मिळते :
इंटर्नशिपमध्ये काम करून आपल्याला आपल्या क्षेत्राचे चांगले नाँलेज आलेले असते अनुभव प्राप्त झालेला असतो.आपण त्यात पारंगत झालेलो असतो.यामुळे कुठल्याही कंपनीत आपली चटकन निवड होत असते.
7) आपल्या क्षेत्राचे Practical Knowledge मिळते :
इंटर्नशिपमध्ये काम करून आपल्याला आपल्या क्षेत्राचे काँलेजातील थेरी नाँलेज सोबत चांगले प्रँक्टीकल नाँलेज देखील प्राप्त होत असते.ज्याचा फायदा आपल्याला पुढे कंपनीत काम करताना होत असतो.
कारण आपल्याकडे प्रँक्टीकल नाँलेज असल्यामुळे आपण आपल्या क्षेत्रातील कोणतेही काम आत्मविश्वासाने करू शकतो.
Internship.च्या दरम्यान आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात?
कुठल्याही कंपनीत Internship करताना इंटर्नशिप च्या दरम्यान आपण पुढील गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात?
1)काम करताना प्रोफेशनल वागणुक ठेवायली हवी :
इंटर्नशिप हे आपण कामाच्या अनुभवासाठी करत असतो म्हणुन इंटर्नशिप दरम्यान आपण प्रोफेशनल वागणुक ठेवणे तसेच व्यावहारीक वागणुक ठेवणे फार गरजेचे आहे.
उदा.आँफिसच्या ठरलेल्या वेळातच कामावर जाणे,प्रोफेशनल पदधतीनेच इतरांशी संवाद साधणे,शिस्तीचे पालन करणे आँफिसात मोबाईलवर बोलणे चँटिंग करणे टाळावे आपल्या सर्व महत्वाच्या फाईल आपल्या आँफिस लाँकरमध्ये जपुन ठेवणे इत्यादी.
2) कंपनीतील Work Environment कसे आहे हे जाणुन घ्यावे:
आपण ज्या कंपनीत इंटर्नशिप करतो आहे त्या कंपनीचे Work Environment कसे आहे हे आधी आपण जाणुन घ्यायला हवे.
तेथील लोकांची काम करण्याची पदधत शैली आपण नीट समजुन घ्यायला हवी.आणि त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न करायला हवा याने आपण कंपनीच्या Working Environment मध्ये लवकरात लवकर मिसळु.
3) कंपनीत आपली काय जबाबदारी आहे हे आधी समजुन घ्यावे
आपण ज्या कंपनीत इंटनर्शिप करतो आहे तिथे आपल्यावर काही महत्वाच्या प्रोजेक्टच्या जबाबदारी सोपविल्या जात असतात.ज्या आपण नीट समजुन घेणे खुप गरजेचे असते.कारण कुठलीही जबाबदारी पार पाडण्यासाठी आधी ती समजुन घेणे खुप आवश्यक असते.
उदा.आपल्याला कंपनीत काय काम करायचे राहील?किती वेळात ते काम करावा लागेल?काम करताना कोणती काळजी घ्यावी लागेल इत्यादी.
4)प्रश्न विचारले पाहिजे फिडबँक घेणे :
आपण ज्या कंपनीत इंटनर्शिप करतो आहे तिथल्या कामांबाबद आपल्याला काही शंका असेल तर त्या दुर करण्यासाठी आपण तेथील इतर वरिष्ठांना मँनेजरला प्रश्न विचारायला हवे.
त्यांच्याकडुन आपल्या कामाबाबद फिडबँक घ्यायला हवा.जेणेकरून आपल्याला आपल्या कामात अजुन काय सुधारणा करणे गरजेचे आहे हे आपणास कळेल.
5) कंपनीतील इतर कर्मचारींसोबत मैत्री करणे :
आपण ज्या कंपनीत इंटनर्शिप करतो आहे तेथील कर्मचारींसोबत आपण मैत्रीपुर्ण संबंध बनवायला हवे.त्यांना नेहमी आदर आणि सन्मान द्यायला हवा.
जेणेकरून जरी आपल्याला इंटर्नशिप संपल्यावर ती कंपनी सोडावी लागली तरी देखील आपले तेथील लोकांशी मैत्रीपुर्ण संबंध असल्याने तेच लोक त्यांच्या ओळखीच्या ठिकाणी आपल्याला जाँब मिळण्यासाठी प्रयत्न करतील.
6) सँलरी म्हणजेच Stipend चा जास्त विचार करू नये
आपण ज्या कंपनीत इंटनर्शिप करतो आहे तिथे काही दिवस काम करून त्या क्षेत्राचा उत्तम अनुभव आणि नाँलेज प्राप्त केल्यानंतर आपल्याला चांगल्या सँलरीचा जाँब कुठल्याही कंपनीत मिळणारच असतो.
म्हणुन इंटर्नशिप दरम्यान Stipend चा अधिक विचार आपण करूच नये.फक्त काम शिकण्यावर आणि नाँलेज प्राप्त करण्यावर विशेष भर द्यायला हवा.
Okk thank you so much😊
Welcome !! We are happy that you liked this article ,,,Thank you very much ,,
Thank you so much for this information😊🙏