चालू घडामोडी – जानेवारी 2022 – Current Affairs Marathi Weekly -17-23 January

चालू घडामोडी – जानेवारी – 2022Current affairs 20222 – Updated – 21  जानेवारी -.3.50pm

तेलंगाना सरकारने आरंभ केला माना ऊरू माना बडी कार्यक्रमास :

  • तेलंगाना सरकारकडुन माना उरू माना बडी ह्या कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली आहे.ह्या कार्यक्रमादवारे राज्यातील शाळांमध्ये पायाभुत सुविधांची निर्मिती होणार आहे.
  • हा कार्यक्रम सुरू करण्यासाठी 7,289 करोड रूपये इतका खर्च केला जाणार आहे.19.84 लाखापेक्षा अधिक मुलांना याचा लाभ उठवता येणार आहे.
  • पहिल्या टप्पयामध्ये 9,123 स्थानिक संस्था,शाळा तसेच सरकारी शाळेत हा कार्यक्रम सुरू केला जाणार आहे.ह्या कार्यक्रमा अंतर्गत पायाभुत सुविधांच्या निर्मितीची परवानगी जिल्हाधिकारींतर्फे प्रदान केली जाणार आहे.
  • ह्या कार्यक्रमाचे संचालन संबंधित शाळांमध्ये स्थापित केलेल्या समितीकडुन केले जाणार आहे.

सर्वश्रेष्ठ फिफा पुरस्कार 2021 ची करण्यात आली घोषणा :

  •  पोलंडचा स्टार स्ट्राईकर राँबर्ट लँव्होडस्की याला पुन्हा एकदा 2021 मधील फिफाचा सर्वश्रेष्ठ फुटबाँलपट्टु बनण्याचा मान प्राप्त केला आहे.
  • राँबर्ट लँव्होडस्की याने बायर्न म्युनिक साठी खेळत असलेल्या लेव्होडस्की नेलियोनेलला पिछाडीवर टाकत आले ज्याने काही दिवसांपुर्वीच सातवा बैलन डी ओर जिंकला होता.
  • याचसोबत स्पेनच्या अँलेक्सिया पुतेलास हिने देखील फिफाची सर्वश्रेष्ठ महिला खेळाडु बनण्याचा मान प्राप्त केला आहे.
  • पोर्तुगालचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो याने देखील आंतरराष्टीय फुटबाँलमध्ये सगळयात जास्त गोल करण्याचा सम्मान प्राप्त केला आहे.
See also  चिंताजनक : भारतातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले, मार्च महिन्यात हा दर ७.८% वर

 

फिफा पुरस्कार 2021 च्या विजेत्यांची यादी –

1)राँबर्ट लेव्होनडस्की(सर्वश्रेष्ठ फिफा पुरुष वर्गातील खेळाडु)

2) अँलेक्सिया पुतेलास (सर्वश्रेष्ठ फिफा महिला वर्गातील खेळाडु)

3) एडवर्ड मेंडी(सर्वश्रेष्ठ फिफा पुरुष वर्गातील गोलकीपर)

4) ख्रिस्टीयन अँडलर(सर्वश्रेष्ठ महिला वर्गातील गोलकीपर)

5) एमा हेस(सर्वश्रेष्ठ फिफा महिला वर्गातील प्रशिक्षक)

6) थाँमस टुचेल(सर्वश्रेष्ठ फिफा पुरूष वर्गातील प्रशिक्षक)

7) डेन्मार्कचा नँशनल फुटबाँल संघ(फीफा फेयर प्ले पुरस्कार)

याचसोबत एक उत्कृष्ठ करिअर उपलब्धी प्राप्त करण्यासाठी फिफाचा एक विशेष पुरस्कार महिला वर्गातील क्रिस्टीन सिंक्लेअर आणि पुरूष वर्गातील क्रिस्टीयानो रोनाल्डोला प्राप्त झाला आहे.

एन डी आर एफने साजरा केला आपला सतरावा स्थापणा दिवस :

  • एनडी आर एफ म्हणजेच (national disaster response force) कडुन प्रत्येक वर्षाला 19 जानेवारी रोजीच आपला स्थापणा दिवस साजरा केला जात असतो.ह्या वर्षी देखील 2022 मध्ये एनडी आर एफने 19 जानेवारी रोजीच आपला स्थापणा दिवस साजरा केला आहे.
  • एनडीआर एफची स्थापणा ही 2006 साली 19 जानेवारी ह्या तारखेलाच करण्यात आली होती.एनडी आर एफचे काम आपत्तीच्या काळात सदैव सेवा देणे हे असते.

 

कँबिनेटकडुन राष्टीय स्वच्छता कर्मचारीं आयोगाच्या कार्यकाळात तीन वर्षे वाढ करण्यासाठी देण्यात आली परवानगी :

 

  • 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रिय मंत्रिमंडळाने राष्टीय स्वच्छता कर्मचारी आयोगाच्या कार्यकाळात तीन वर्षे वाढ करण्यास परवानगी दिली आहे.
  • राष्टीय स्वच्छता कर्मचारी आयोगाच्या कार्यकाळात 31 मार्च 2022 च्या पुढे म्हणजेच एकूण तीन वर्षे वाढ करण्यात आली आहे.आणि तीन वर्षे अधिक विस्ताराचा एकुण खर्च 43.66 करोड इतका होणार आहे.
  • राष्टीय स्वच्छता कर्मचारी आयोगाच्या कार्यकाळात वाढ झाल्याचा विशेष फायदा हा स्वच्छता कर्मचारी आणि कचरा साफ करण्याचे काम करत असलेल्यांना होणार आहे.

 

जम्मु काश्मीरमध्ये सुगंधित वृक्षांची शेती करण्यासाठी राबवण्यात आले आहे जागरूकता अभियान :

  • जम्मु काश्मीर मध्ये नुकतेच एक जागरूकता अभियान सुरू करण्यात आले आहे ज्याचे मुख्य उददिष्ट जम्मु काश्मीरमधील युवा वर्गाला रोजगाराची संधी प्राप्त करून देणे हा आहे.
  • या अभियानाची सुरूवात ही सीएस आर फ्लेगशिप कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आली जेणेकरून उत्पादन कर्त्यांना मोठया प्रमाणात सुगंधित वृक्षांची शेती करण्यासाठी हातभार प्राप्त होईल.
  • आय आय आय एमने हे जागरूकता अभियान राबवले आहे.आणि कृषी विभागाने यास आरंभ देखील केला आहे.याने नवीन उद्योजकांना स्वताचा एक उद्योग सुरू करता येणार आहे तसेच बेरोजगारांना यात रोजगाराची संधी देखील प्राप्त होणार आहे.
See also  दिनविशेष 8 मे 2033- Dinvishesh 8 May 2023

 

इंडोनेशियाच्या संसदेने आपली राजधानी स्थलांतरीत करण्यास दिली मंजुरी :

  • नुकतीच इंडोनेशियाच्या संसदेने आपली राजधानीचे स्थलांतर करण्यात मंजूरी दिली आहे.
  • आपल्या राजधानीला जकार्तामध्ये डुबण्यापासुन वाचवण्यासाठी जकार्ता पासुन दोन हजार किमी दुर जगंल युक्त बोरनियो द्वीप मध्ये स्थलांतरीत करण्यास मंजुरी दिली आहे.ह्या जागेचे नामकरण नुसंतारा असे करण्यात आले आहे.

 

जिओ आँटो पे सुरू करणारी पहिली टेलिकम्युनिकेशन कंपनी बनली :

  • रिलायन्स जिओने आपली युपीआय आँटो पे सर्विसचा आरंभ केला आहे.
  • नुकतेच रिलायन्स जिओ तसेच एनपीसीआयने(national payment corporation of india) टेलिकाँ इंडस्ट्रीजसाठी युपीआय आँटो पे  सर्विसचा आरंभ करण्याची घोषणा केली आहे.
  • रिलायन्स कंपनीच्या ह्या युपीआय आँटो पे सर्विसमुळे पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याची तसदी घ्यावी लागणार नाहीये.

टविटरने सुरू केले जागरूक मतदार अभियान :

  • आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात मायक्रो ब्लाँगिंग प्लँटफाँर्म म्हणुन ओळखल्या जात असलेल्या टविटरने जागरूक वोटर अभियान सुरू केले आहे.
  • याचे मुख्य उददिष्ट नागरीकांना मतदान करण्यासंबंधी ज्ञान देऊन अधिक सशक्त आणि प्रबळ बनविणे आहे.

नरेंद्र कुमार गोईंका बनले (AEPC) चे नवीन चेअरमन :

  • टेक्सपोर्ट इंडस्टीजचे संस्थापक आणि व्यवस्थापन निर्देशक नरेंद्र कुमार गोईंका परिधान निर्यात संवर्धन परिषदेच्या चेअरमन पदाचा कार्यकारभार आपल्या हाती घेतला आहे.
  • ए शक्तीवेल यांच्या जागी त्यांना हा पदभार सोपविण्यात आला आहे.

वेस्ट इंडिजचा पुर्व क्रिकेटर क्लाईड लाँईडला देण्यात आला नाईटवुडचा सम्मान :

  • 12 जानेवारी 2022 रोजी वेस्ट इंडिज टीमचा माजी कर्णधार क्लाईव्ह लाँईड याला क्रिकेटच्या खेळात दिलेल्या त्याच्या सेवा आणि योगदानासाठी विंडसर कँसेल येथील डयुक आँफ कँम्ब्रिज विल्यम मध्ये नाईटवुडच्या सम्मानाने गौरविण्यात आले आहे.
  • नाईटवुड ही एक उपाधी आहे जी एखाद्या ब्रिटीश राजा तसेच राणीदवारे एखाद्या व्यक्तीला आपल्या देशाच्या सेवा केल्याबददल दिली जात असते.

 

पदमश्री किताबाने सम्मानित सामाजिक कार्यकत्या शांती देवी यांचे निधन :

See also  राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची यादी २०२३ । List of Chief Ministers of Rajasthan In Marathi

 

  • गरीबांसाठी काम करत असलेल्या ओडिसाच्या सामाजिक कार्यकत्या शांती देवी ज्यांना पदमश्री ह्या किताबाने सम्मानित करण्यात आले होते त्यांचे नुकतेच 16 जानेवारी रोजी निधन झाले आहे.
  •  
  • शांती देवी यांनी गरीब तसेच आदीवासी मुलींसाठी शिक्षणाच्या माध्यमातुन आपले खुप काही योगदान दिले आहे.

 

दिल्लीत पहिली डीटीसी इलेक्ट्रीक बसची करण्यात आली सुरूवात :

 

  • 17 जानेवारी 2022 रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली वाहतुक महामंडळाच्या पहिल्या इलेक्ट्रीक बसला हिरवा कंदील दाखवला आहे.
  • ह्या ईलेक्ट्राँनिक बस सत्तावीस किलोमीटर एवढया लांब अंतरापर्यत चालणार आहे.ह्या बसेसची निर्मिती जेबी एम आँटो लिमिटेड द्वारा करण्यात आली आहे.

 

छत्तीसगढ सरकार स्थापित करणार रोजगार अभियान :

 

  • छत्तीसगढ सरकारने पुढील पाच वर्षात पंधरा ते वीस लाखापेक्षा अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी भुपेश बघल यांच्या अध्यक्षतेत रोजगार अभियान स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे
  • ह्या अभियानाच्या राज्य सरकार राज्यामध्ये बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आय आयटी,आय आय एम तसेच राष्टीय औद्योगिक संस्थान या सारख्या संस्थानांचा लाभ देखील उठवणार आहे.
  • ह्या अभियाना अंतर्गत पुढील पाच वर्षात पंधरा लाख रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

हिमाचल प्रदेशात नवव्या महिला राष्टीय आईस हाँकी चँम्पियनशिपची झाली सुरूवात :

  • 16 जानेवारी 2022 रोजी हिमाचल प्रदेश येथे नवव्या महिला राष्टीय आईस हाँकी चँम्पियनशिपचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांच्या हस्ते लाहोल स्पीती जिल्हयाच्या आईस केटिंग रिंग काजा येथे करण्यात आले आहे.
  • हिमाचल प्रदेशात पहिल्यांदाच राष्टीय पातळीवर एवढया मोठया आईस हाँकी चँम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे.
  • ह्या मेगा कार्यक्रमात लडाख,तेलंगाना,दिल्ली,चंदीगढ इत्यादी ठिकाणच्या टिम्स भाग घेताना आपणास दिसुन येतील.