इटलीमध्ये चॅट जीपीटीवर बंदी -असे करणारा पहिला पाश्चात्य देश – Italy banned chat gpt in Marathi

इटलीमध्ये चॅट जीपीटीवर बंदी घालण्यात आली आहे असे करणारा पहिला पाश्चात्य देश बनला इटली Italy banned chat gpt in Marathi

इटली ह्या देशामध्ये नुकतीच चॅट जीपीटीवर बंदी घालण्यात आली आहे म्हणजेच सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या चॅट जीपीटीला इटली ह्या देशामध्ये कायमचे बॅन करण्यात आले आहे.

असे करत इटली ह्या देशाने चॅट जीपीटीला बॅन करणारा पहिला पाश्चात्य देश म्हणून देखील मान पटकावला आहे.

माॅडेलशी संबंधित काही गोपनीयतेच्या समस्या अडचणी निर्माण होत असल्याने आम्हाला हे गंभीर पाऊल उचलावे लागले आहे असे असे इटलीच्या डेटा सुरक्षा प्राधिकरणाने सांगितले आहे.

इटालियन डेटा सुरक्षा अधिकारी वर्गाकडुन अधिक स्पष्टीकरण देताना असे सांगितले जाते आहे की चॅट जीपीटीची निर्मिती करणारे ओपन एआय चॅट जीपीटी मार्फत बेकायदेशीरपणे युझरचा वैयक्तिक डेटा संकलित करत आहे असे आम्हाला निर्दशनास आले.

म्हणून आम्ही येथील युझरच्या प्रायव्हेसी हेतुसाठी चॅट जीपीटीवर तातडीने कायमची बंदी घातली आहे.

See also  दिनविशेष 12 मे 2033- Dinvishesh 12 May 2023