ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय? – Graphics designing career opportunities

Table of Contents

ग्राफिक डिझायनिंग- Graphics designing

आपल्या प्रत्येकाच्या अंगी काहीतरी अंगभूत कला कौशल्य हे असतेच.कोणाला लिखाण आवडते तर कोणाला नृत्य करणे,चित्र काढणे,वेगवेगळया ग्राफीक्सच्या डिझाईन तयार करणे अशी आपल्या प्रत्येकाची एक आवड तसेच एक छंद असतो.

आणि आज सर्व जगच कंप्युटर आणि ग्राफिक्स वर चालताना आपणास दिसुन येते आहे.याचमुळे आज प्रत्येक क्षेत्रात ग्राफिक्स डिझायनरची मागणी वाढत चालली आहे.आणि भविष्यात ह्या क्षेत्राचा स्कोप अजुन जास्त प्रमाणात वाढणार आहे.

म्हणुनच आपल्याला देखील ह्या क्षेत्रात उत्तम करिअर करता यावे यासाठी आपण ग्राफिक डिझाइनिंग विषयी संपुर्ण माहीती आजच्या Graphics designing career opportunities या लेखातुन जाणुन घेणार आहोत. सर्वात आधी आपण समजू घेवू

Graphics designing career opportunities

 

ग्राफिक्स म्हणजे काय

Graphics म्हणजे  अश्या  डिझाईन्स व दृश्य चित्र जे विविध ठिकाणी मांडले जातात,प्रदर्शित केले जातात जसे की पेपरवर, भिंतीवर ,जाहिरात बोर्ड वर ,कॉम्प्युटर वर. असे ग्राफिक्स तयार करण्याचा उद्देश हा मनोरंजन , ब्रँडिंग किंवा ग्राहकांना पर्यन्त आपल्या सेवा व उत्पादनं बाबत माहिती पुरविणे  हा असतो.

फक्त लिखाण द्वारे मंडण्यात आलेल्या माहिती पेक्षा ग्राफिक्स द्वारे मांडलेली माहिती ही कल्पक व आकर्षित असल्याने सहजिकच  वाचक, ग्राहक अश्या ग्राफिक्स कडे जास्त आकर्षित होतात म्हणूनच  आता मार्केटींग मध्ये ग्राफिक्स भर देण्यात येत असतो.

 

ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय असते(what is graphic designing

 

ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय असते?(what is graphic designing?)

ग्राफिक डिझायनिंग म्हणजे आपल्या कडे असणाऱ्या कल्पना आणि अनुभव दृश्य चित्रां द्वारे  मांडण्याला, नियोजन करून प्रस्तुत करण्याची कला.

 • किंवा सोप्या भाषेत ग्राफिक डिझाइनिंग ही एक कला तसेच कौशल्य आहे.जी मुख्यकरून आपण व्यवसाय व्यवहारासाठी वापरत असतो.यात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातुन आपल्या भावना,विचार,मत इतरांसमोर मांडत असतो.
 • ग्राफिक्सच्या माध्यमातुन इतरांपर्यत काहीतरी संदेश पोहचवत असतो.आणि इतरांचे लक्ष आपण आपल्याकडे वेधून घेत असतो.आणि अशा प्रकारच्या ग्राफिक्सच्या भाषेत आपल्या उद्योग व्यवसायाच्या प्रचार तसेच प्रसारासाठी,मार्केटिंगसाठी ग्राफ्स तयार करत असलेली व्यक्तीलाच आपण ग्राफिक डिझाइनर असे म्हणत असतो.

ग्राफिक डिझाइनर कोण असतात?(who is graphic designers?)

 

 

ग्राफिक डिझाईनरची गरज कुठे कुठे असते(where is big need of graphic desighners

ग्राफिक डिझायनर्स हे असे व्यावसायिक(professional) डिझायनर्स असतात जे वेगवेगळया सोशल मिडिया प्लँटफाँर्मसाठी,कंपनींमध्ये प्रेझेंटेशनसाठी ग्राफिक्स तयार करत असतात.

एवढेच नाही तर ग्राफिक डिझायनर्स आपल्या विविध उद्योग व्यवसायाच्या प्रचार तसेच प्रसारासाठी,डिजीटल मार्केटिंगसाठी मार्केटिंग ग्राफ्स तयार करत असतात.जेणेकरून कस्टमर आपल्याकडे आकर्षित होत असतात.आपली सर्विस आपले प्रोडक्ट विकत घेत असतात.

ग्राफिक डिझायनरचे प्रकार किती व कोणकोणते आहेत? how many types of graphic designers?

आज ग्राफिक डिझायनरची प्रत्येक क्षेत्रात गरज आहे त्यामुळे त्यांच्या गरजेनुसार त्याचे काही विविध प्रकार देखील पडतात.

See also  आयुष काय आहे ? Ayush Treatment information in Marathi

ग्राफिक डिझायनरचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :

1)मार्केटिंग आणि अँडव्हरटाईजिंग ग्राफिक डिझायनर

2) युझर इंटरफेस ग्राफिक डिझायनर

3) पब्लिकेशन ग्राफिक डिझायनर

4) पँकेजिंग ग्राफिक डिझायनर

5) मोशन ग्राफिक डिझायनर

6) इन्व्हरमेंटल ग्राफिक डिझायनर

7) आर्ट अँण्ड इलुस्ट्रेशन ग्राफिक डिझायनर

8) व्हिडिओ गेम आर्ट ग्राफिक डिझायनर

9) साइनेज ग्राफिक डिझायनर इत्यादी.

 

एक उत्तम दर्जाचा ग्राफिक डिझायनर बनण्यासाठी आपल्या अंगी कोणते कला गुण असणे गरजेचे आहे?(which important skill required for become graphic designer?

एक उत्तम दर्जाचा ग्राफिक डिझायनर बनण्यासाठी आपल्या अंगी अनेक कला गुण असणे गरजेचे आहे.

ज्यात पुढील गुणांचा प्रामुख्याने समावेश होत असतो:

1) सर्जनशीलता (creativity)

2) नवनवीन विचार करण्याची कला(creative thinking skill)

3) उत्तम लेखण कौशल्य (excellent writing skill) -Content writing skill

4) इंटरनेट आणि टेक्निकल साँपटवेअर्सची माहीती असणे(IT knowledge)

5)याचसोबत चांगली टायपिंग देखील करता यायला हवी.(good typing skill)

6) कोणत्याही विषयावर घटना प्रसंगावर सखोल विचार करण्याची क्षमता (deep thinking skill)

7) वेळेचे व्यवस्थापण तसेच नियोजन करता आले पाहिजे(time management skill)

8) ग्राफिक डिझायनिंगसाठी उपयोगात येत असलेल्या विविध ग्राफिक डिझायनिंग साँपटवेअर्सची माहीती असणे गरजेचे आहे.(graphic designing software knowledge)

ग्राफिक डिझाईनरची गरज कुठे कुठे असते?(where is big need of graphic designers?)

आज ग्राफिक्स डिझायनर्सची विविध क्षेत्रात मागणी वाढताना आपणास दिसुन येत आहे.

ग्राफिक डिझायनरची गरज खालील ठिकाणी अधिक जास्त प्रमाणात असते :

1) डिझाइनिंग प्रोडक्शन हाऊस

2) अँडव्हरटाईजिंग कंपनी

3) पँकेज डिझाइनिंग सेक्टर

4) विविध प्रकाशन संस्था

5) इनव्हरमेंटल डिझाइनिंग साठी

6) काँर्पोरेट डिझाइनिंग

7) मार्केटिंग एजंसी ,इत्यादी.

ग्राफिक डिझायनर बनण्यासाठी आपण कोणकोणते कोर्सेस करू शकतो?(courses for graphic designing) – Graphics designing career opportunities

ग्राफिक डिझायनर बनण्यासाठी आपण खालील दिलेले कोर्सेस करू शकतो:

ग्राफिक डिझायनर बनण्यासाठी करावयाचे महत्वाचे कोर्सेस :

1) ग्राफिक डिझायनर बनण्यासाठी आपण ग्राफिक डिझायनिंगचा एखादा अँडव्हान्स डिप्लोमा करू शकतो.(advanced diploma course in graphic desighning)

2) ग्राफिक डिझायनिंगची एखादी पदवी प्राप्त करू शकतो.(degree course in graphic desighning)

3) ग्राफिक डिझाइनिंगचा पदवी डिप्लोमा प्राप्त करू शकतो.(graduation diploma programme in graphic desighning)

4) ग्राफिक डिझाइनिंगचा एखादा पोस्ट ग्रँज्युएट डिप्लोमा करू शकतो.(post graduate diploma course in graphic desighning)

5) ग्राफिक डिझायनिंगमध्ये मास्टरची पदवी घेऊ शकतो(master of art in graphic desighning)

(Master of desigh course in graphic desighning)

6) ग्राफिक डिझायनिंमध्ये आपण डाँक्टरेट पदवी देखील घेऊ शकतो.(doctor of graphic desighning)

ग्राफिक डिझाइनिंगच्या क्षेत्रात करिअर करण्यात स्कोप आहे का?आणि आहे तर किती स्कोप आहे?(future scope in graphic designing field)

 • ग्राफिक्स डिझाइनिंग हे एकमेव असे क्षेत्र आहे ज्याला वर्तमान काळातच नव्हे तर भविष्यात देखील खुप स्कोप असणार आहे.कारण आजचे युग डिजीटल आहे.त्यामुळे सर्व उद्योग व्यवसाय आज आँफलाईन कडुन आँनलाईनकडे वळताना आपणास दिसुन येत आहे.
 • त्यामुळे आपल्या उद्योग व्यवसायाची डिजीटल मार्केटिंग करण्यासाठी आज आपल्या प्रत्येकाला ग्राफिक्स डिझायनर्सची आवश्यकता असते जे ग्राफिक्सच्या माध्यमातुन आपल्या प्रोडक्ट सर्विसकडे कस्टमरला आकर्षित करत असतात.आणि त्यांना विकत घेण्यास भाग पाडत असतात.
 • एवढेच नव्हे तर जवळपास आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशनसाठी तसेच ग्राफिक्सच्या स्वरुपात एखाद्या प्रोडक्ट सर्विसची मार्केटिंग करण्यासाठी ग्राफिक डिझायनर्सची आवश्यकता आहे.मग ते प्रकाशन क्षेत्र असो,जाहीरात क्षेत्र असो किंवा मार्केटिंग एजंसी किंवा विविध PR फर्म असो.प्रत्येक ठिकाणी आज ग्राफिक डिझायनर्सची आवश्यकता असलेली आपणास दिसुन येते.
 • यामुळे वर्तमानात तसेच भविष्यात देखील ग्राफिक्स डिझायनर्सची मागणी राहणार आहे आणि ही मागणी अधिक वाढतच जाणार आहे.आणि ह्या क्षेत्राचा स्कोप देखील भविष्यात सर्वाधिक राहील.त्यामुळे ह्या क्षेत्रात करिअर करण्यात स्कोप आहे का नाही असा प्रश्न देखील आपल्याला पडायला नको.
See also  इकोसिस्टम म्हणजे काय? What is an Ecosystem Marathi

आपण ग्राफिक डिझाइनर कसे बनु शकतो?(how to learn and become graphic designer?) – Graphics designing career opportunities

आज आपण ग्राफिक डिझायतिंग शिकण्यासाठी विविध पर्यायांचा वापर करू शकतो.

1) कँनव्हा वर सेल्फ लर्निग करून

2) आँनलाईन क्लास जाँईन करून

3) युटयुबवरील व्हिडिओ बघुन

4) ग्राफिक डिझाइनिंगचा आँनलाईन कोर्स करून

5) प्रसिदध तसेच नामांकित ग्राफिक्स डिझायनिंग संस्थेतुन प्रशिक्षण घेऊन

6) विविध ब्लाँग वेबसाईटवरील माहीती तसेच पुस्तके वाचुन

1)कँनव्हा वर सेल्फ लर्निग करून :

आज आपण घरबसल्या कँनव्हा सारख्या वेबसाईट तसेच अँपचा वापर करून ग्राफिक डिझायनिंग शिकु शकतो.इथे आपल्याला फ्री मध्ये ईमेजेस देखील उपलब्ध करून दिलेल्या असतात.ज्यांचा वापर करून वेगवेगळया सोशल मिडियासाठी,मार्केटिंगसाठी ग्राफ्स तयार करणे शिकु शकतो.

2)आँनलाईन क्लास जाँईन करून :

ग्राफिक्स डिझाइनिंग शिकण्यासाठी आपण आँनलाईन क्लासेस देखील जाँईन करू शकतो.ज्यात आपण पाहिजे त्या वेळात रोज आँनलाईन क्लास अटेंड करून ग्राफिक डिझाइनिंग शिकु शकतो.

3) युटयुबवरील व्हिडिओ बघुन :

आज युटयुबवर माहीतीचे घबाड आहे जिथे आपण आपल्याला पाहिजे ती माहीती प्राप्त करू शकतो.पाहिजे त्या प्रश्नांची उत्तरे प्राप्त करू शकतो.पाहिजे ते स्कील शिकु शकतो.

ग्राफिक्स डिझाइनिंग शिकण्यासाठी आपण युटयुबवरचे प्रोफेशनल आणि एक्सपर्ट ग्राफिक डिझायनर्सचे ग्राफिक डिझाइनिंग विषयीचे व्हिडिओ बघु तसेच ऐकु शकतो.ते सेव्ह करून पुन्हा पुन्हा ऐकुन समजुन घेऊन ग्राफिक्स डिझाईनिंग शिकु शकतो.

4)ग्राफिक डिझाइनिंगचा आँनलाईन कोर्स करून

ग्राफिक डिझायनिंग शिकण्यासाठी आपण ग्राफिक डिझाइनिंगचा एखादा आँनलाईन तसेच आँफलाईन कोर्स करू शकतो.ज्यात आपल्याला ग्राफिक डिझाइनिंगचे सुरूवातीपासुन ते प्रोफेशनल लेव्हलपर्यतचे ग्राफिक डिझाइनिंग शिकायला मिळते.कारण यात तज्ञ लोकांनी आपले अनुभव सांगितलेले असतात.

5) प्रसिदध तसेच नामांकित ग्राफिक्स डिझायनिंग संस्थेतुन प्रशिक्षण घेऊन

ग्राफिक्स डिझाइनिंग शिकण्यासाठी आपण एखाद्या नामांकित संस्थेत ग्राफिक डिझाइनिंगचे प्रशिक्षण घेऊ शकतो.याने आपण एक प्रोफेशनल ग्राफिक्स डिझायनर म्हणुन आपली ओळख निर्माण करू शकतो.

6)विविध ब्लाँग वेबसाईटवरील माहीती तसेच पुस्तके वाचुन

आज आपण विविध ब्लाँग वेबसाईटवर भेट देऊन देखील ग्राफिक्स डिझायनिंगविषयी माहीती प्राप्त करू शकतो.याचसोबत ग्राफिक्स डिझाइनिंगविषयीची पुस्तके देखील वाचु शकतो.

ग्राफिक डिझायनर बनण्यासाठी आपले शिक्षण किती असावे लागते?

ग्राफिक डिझायनर बनण्यासाठी आपल्याला फक्त औपचारीक शिक्षणाची आवश्यकता असते.सोबतच ग्राफिक्सचे डिझाइनिंगचे प्राँपर नाँलेज,आणि कंप्युटरचे आणि साँपटवेअरचे नाँलेज असले पाहिजे आणि कंप्युटर आणि साँपटवेअर टुल्स नीट व्यवस्थित हाताळता म्हणजेच आँपरेट करता आला पाहिजे.

ग्राफिक डिझायनरला वेतन (salary) किती मिळते ?

 • ग्राफिक डिझायनिंगमध्ये पदवी प्राप्त केलेल्या व्यक्तीला साधारणत पाच ते आठ लाख इतका वार्षिक पगार दिला जात असतो.
 • ग्राफिक डिझायनिंग हे आत्ताचे एक ट्रेडिंग क्षेत्र असल्यामुळे याची मागणी आज खुपच जास्त प्रमाणात आहे.आणि भविष्यात देखील याची मागणी वाढणारच आहे.आपण साधारणपणे पाहायला गेले तर आपणास असे दिसुन येते की आज फ्रिलान्स ग्राफिक डिझायनर सुदधा घरबसल्या लाखो रूपये महिन्याला कमविता आहे.
 • ग्राफिक डिझायनरचा पगार किती असेल हे त्याच्या कामातील अनुभव आणि पारंगततेवरून ठरवले जात असते.तसेच तो कोणता प्रकल्प हाताळतो आहे यावर देखील त्याचे वेतन अवलंबुन असते.

ग्राफिक डिझायनिंगच्या क्षेत्रात आपण कोणत्या लेव्हवलवर सध्या आहे यावरून आपला पगार ठरत असतो.

1)प्राथमिक लेव्हल :वर्षाला (1,45000)

2) माध्यमिक लेव्हल: वर्षाला (3,99000)

3) वरिष्ठ तसेच अनुभवी लेव्हल:वर्षाला (8,98000)

भारतामध्ये ग्राफीक डिझायनिंगचे प्रशिक्षण देत असलेल्या संस्था कोणकोणत्या आहेत?

1) मुंबई येथील पर्ल अकँडमी

2) क्वांटम युनिव्हरसिटी (रूरकी)

3) पुण्याचे एम आयटी इंस्टिटयुट आँफ डिझाईन

4) पुणे येथील इंटरनँशनल स्कुल आँफ डिझाईन

5) पुण्याचे विश्वकर्मा विद्यापीठ

6) बंगलोर येथील कोशिश अँनिमेशन अँण्ड मिडिया

7) पुण्याचे अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ

8) जयपुर येथील एलेन स्कुल आँफ आर्ट अँण्ड  डिझाईन इत्यादी.

ग्राफिक डिझायनर बनण्यासाठी आपल्याला कोणते कोर्स करणे खुप महत्वाचे आहे?

ग्राफिक डिझायनर बनण्यासाठी आपण पदवी कोर्स, पदवी डिप्लोमा कोर्सेस पोस्ट ग्रँज्युएशन डिप्लोमा तसेच डिग्री देखील करू शकतो.

See also  लोकमान्य टिळक निबंध अणि भाषण - Lokmanya Tilak essay and speech in Marathi

ग्राफिक डिझायनर बनण्यासाठी करावयाचे महत्वाचे कोर्स :

1) बी एस सी इन ग्राफिक डिझायनिंग

2) बी ए इन ग्राफिक डिझाईन

3) सर्टिफिकिट कोर्स इन ग्राफिक डिझाईनिंग

4) डिप्लोमा इन ग्राफिक डिझाईनिंग

5) बी डी इ एस इन ग्राफिक डिझाईनिंग

6) एम डी ई एस इन ग्राफिक डिझाईनिंग

ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स पुर्ण झाल्यावर आपण ग्राफिक डिझायनर म्हणुन कुठे आणि कोणत्या पदावर नोकरी प्राप्त करू शकतो?

ग्राफीक डिझायनरचा कोर्स पुर्ण करून झाल्यावर आपण ग्राफिक डिझाईनर म्हणुन विविध उद्योग प्रकाशन तसेच व्यवसायिक क्षेत्रात मोठमोठया पदावर नोकरी प्राप्त करू शकतो.

1) काँर्पोरेट बिझनेस

2) टेलिव्हिजन सेक्टर

3) टिव्ही आणि फिल्म इंडस्ट्री

4) अँड एजंसी

5) प्रिंटिग अँण्ड पब्लिकेशन

6) मल्टीमीडीया कंपनी तसेच एजंसी

7) कोचिंग सेंटर

8) मार्केटिंग एजंसी -इत्यादी.

 

ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय असते(what is graphic designing (2)

ग्राफिक डिझायनर्सची भरती करत असलेल्या अव्वल क्रमांकाच्या कंपनी कोणकोणत्या आहेत? – Graphics designing career opportunities

आज मार्केटमध्ये अशा अनेक दिग्दज कंपन्या उपलब्ध आहेत.ज्या आपल्या कंपनीमध्ये ग्राफिक डिझायनर्सची भरती दर वर्षी भरती करत असतात.

ग्राफिक डिझायनर्सची भरती करत असलेल्या अव्वल क्रमांकाच्या पाच कंपनी पुढीलप्रमाणे आहेत:

1) नवी दिल्ली येथील एज स्टुडिओ

2) हैदराबाद येथील थिंक डिझाईन

3) काँगव्हील स्टुडिओ

4) विप्रो टेक्नाँलाँजी इन प्रायव्हेट लिमिटेड

5) जनरल मोटर डिझाइनिंग इन प्रायव्हेट लिमिटेड

6) ईस्टर्न सिल्क इंडस्ट्री इन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी

5) सँप लँब्ज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

आपण घरबसल्या फ्रिलान्स ग्राफिक डिझाईनिंगचे काम कसे करू शकतो?

 • आजचे युग हे डिजीटल युग आहे त्यामुळे पहिले जसे आपल्याला सकाळी आँफिस मग आँफिसमधून संध्याकाळी घरी जायचे असे करावे लागायचे आता तसे करायची अजिबात गरज राहिलेली नाहीये.
 • आज आपण फ्रिलान्सिंग करून कुठल्याही कंपनीच्या आँफिसमध्ये न जाता काम करू शकतो.हे काम आपण आँफलाईन तसेच आँनलाईन देखील करू शकतो.
 • आँफलाईन फ्रिलान्सिंगचे काम करायचे म्हटले तर त्यासाठी फ्रिलान्सरला काम देत असलेल्या आणि फ्रिलान्सरची आवश्यकता भासत असलेल्या कंपनींशी आपले चांगले नेटवर्क असणे गरजेचे आहे तरच आपण आँफलाईन पदधतीने कस्टमरच्या मागणीनुसार सर्विस देऊन आपल्याला पाहिजे ती फी चार्ज करू शकतो.आणि फ्रिलान्सिंग करून घरबसल्या पैसे कमवू शकतो.
 • आणि जर आपल्याला आँनलाईन फ्रिलान्सिंग करायची असेल तर मग आपण फ्रिलान्सिंगची कामे उपलब्ध करून दिल्या जात असलेल्या आँनलाईन जाँब वेबसाईट तसेच फ्रिलान्सिंग वेबसाईटवर जाऊन आपली नाव नोंदणी करून आपल्याला हवे त्या कंपनीचे क्लाईंटचे काम करून आँनलाईन फ्रिलान्सिंग करून घरबसल्या पैसे कमवू शकतो.

फ्रिलान्सिंगच्या कामासाठी बेस्ट फ्रिलान्स वेबसाईट कोणकोणत्या आहेत?

आज अशा अनेक वेबसाईट इंटरनेटवर उपलब्ध आहे जिथुन आपण फ्रिलान्सिंगची कामे मिळवू शकतो.

फ्रिलान्सिंगच्या कामासाठी प्रसिदध असलेल्या काही महत्वाच्या वेबसाईटस :

1)अपवर्क डाँट काँम

2) फिवर डाँट काँम

3) पीपर पर हवर

4) फ्रिलान्सर डाँट काँम

5) तोपताल डाँट काँम

6) गुरू डाँट काँम इत्यादी.

याव्यतीरीक्त आपण फेसबुक,व्हाँटस अँप,टेलिग्राम,क्वोरा,लिंक्ड इन अशा सोशल मिडिया माध्यमांद्वारे तेथील फ्रिलान्सरचे गृप तसेच पेजमध्ये समाविष्ट होऊन देखील फ्रिलान्सिंगचे काम मिळवु शकतो.

ग्राफिक डिझाइनिंग करून आपण कोणकोणत्या मार्गाने पैसे कमवु शकतो?- Graphics designing career opportunities

ग्राफिक डिझायनिंग करून आपण विविध मार्गाने आज पैसे कमवू शकतो.आणि ते मार्ग पुढीलप्रमाणे आहेत:

1) फ्रिलान्स ग्राफिक डिझायनिंग करून

2) ग्राफिक डिझाइनर म्हणुन एखाद्या कंपनीत एजंसीत जाँब करून

3) स्वताचा ग्राफिक डिझाइनिंगचा बिझनेस सुरू करून

ग्राफिक डिझायनिंगचे 2021 मधील बेस्ट साँपटवेअर्स टूल्स कोणकोणते आहेत?

ग्राफिक डिझायनिंगचे बेस्ट साँपटवेअर्स टूल्स पुढीलप्रमाणे आहेत :

 • कँनव्हा
 • अँडोब इलुस्ट्रेटर
 • अँडोब फोटोशाँप
 • अँफिनिटी डिझाइनर
 • प्रोक्रिएट
 • अँफिनीटी फोटो
 • ग्रँव्हिट डिझायनर
 • अँडोब इन डिझाईन

ग्राफिक डिझायनिंग शिकण्यासाठी उत्तम पुस्तके कोणकोणती आहेत?

 1. टायपोग्राफी बुक -जस्ट माय टाईप-लेखक सिमन गारफिल्ड
 2. ग्राफिक डिझायनिंग फंडामेंटल -लेखक- मायकेल बेरूट
 3. ग्राफिक डिझाइनिंग बुक अबाऊट कलर
 4. इंटरँक्शन आँफ कलर =लेखक-जोसेफ अल्बर
 5. डिझाइनिंग ब्ँण्ड आयडेंटीटी -लेखक-आलीना विलर
 6. ग्राफिक डिझायनर व्हिझनरी-लेखक-केरोलिन रोबर्ट

ग्राफिक डिझाइनरचे काम काय असते?

आपल्या कस्टमरची मुख्य मागणी जाणुन घेऊन त्याच्याशी चर्चा मसलत करून त्यानुसार आपल्या रचनात्मक बुदधी कौशल्याचा वापर करून कस्टरचे मुख्य उददिष्ट साध्य होण्यासाठी ग्राफिक्स तयार करणे.हे ग्राफिक डिझायनरचे मुख्य काम असते.

ग्राफिक डिझाइनिंगविषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न – FAQ

1)कोणतीही संस्था काँलेज जाँईन न करता आपण ग्राफिक डिझाईनिंग शिकु शकतो का?

हो नक्कीच आपण कोणतीही संस्था तसेच काँलेज जाँईन न करता देखील ग्राफिक डिझाईनिंग शिकु शकतो.आपण कँनव्हा सारख्या अँपचा वापर करून घरबसल्या स्वता ग्राफिक डिझाइनिंगची रोज प्रँक्टिस करून ग्राफिक्स तयार करायला शिकु शकतो.

2) ग्राफीक डिझाइनिंगमध्ये आपल्याला काय काय शिकवले जात असते?

ग्राफिक डिझाइनिंगमध्ये आपल्याला टार्गेट कस्टमरची मागणी समजुन त्याचे मुख्य उददिष्ट साध्य होण्यासाठी आपल्या निर्मितीशीलता,सखोल विचार,मार्केट रिसर्च डीप थिंकिंगचा वापर करून ग्राफ्स तयार करायला आपल्याला शिकवले जात असते.

ग्राफिक्स डिझाइनिंग बद्दल आपल्याला नकीच बेसिक माहिती मिळाली असेल , कृपया ही माहिती नक्की शेअर करा.

नक्की वाचा -मुलांकरता रोबोटिक्स करियर संधी