नवीन बँक लाँकर नियम -New Bank Locker Rules in Marathi
2022 साठी आरबी-आयचे नवीन बँक लाँकर नियम
आज आपण सर्वच जण आपल्या बँक खात्यात आपले पैसे दागदागिने तसेच इतर अमुल्य वस्तु सुरक्षित राहण्यासाठी ठेवत असतो.पण आता आरबीआयने जे नवीन बँक लाँकर नियम काढले आहेत.
त्याचा आपल्या जीवणावर खुप मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.खासकरून त्यांच्यावर जे नियमित आपले पैसे तसेच दागदागिने तसेच इतर अमुल्य वस्तु आपल्या बँकेच्या लाँकरमध्ये ठेवत असतात.
- 2022 मध्ये आता आरबीआय नवीन नियम लागु करणार आहे.ज्यात जर आपल्या बँक खात्यातुन पैसे चोरीला गेले तर त्याची भरपाई स्वता बँकेकडुन केली जाईल असे स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे.
- आणि हे सर्व नियम १जानेवारी पासुन 2022 मध्ये नवीन वर्षात लागु देखील केले जाणार आहे.
आजच्या लेखात आपण ह्याच आरबीआयच्या नवीन बँक लाँकर (New Bank Locker Rules in Marathi) नियमांविषयी जाणुन घेणार आहोत.
आरबी आयचे 2022 मधील नवीन बँक लाँकर नियम कोणकोणते आहेत?
आरबी आयचे नवीन बँक लाँकर नियम : New Bank Locker Rules in Marathi
1) पहिला नियम –
बँकेची जबाबदारी सुनिश्चित केली जाणार :
आरबी आयतर्फे नवीनच मार्गदर्शन सुचना देण्यात आल्या आहेत ज्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की
बँकेला आता आपले असे काही नियम तसेच अटी तयार कराव्या लागणार आहे ज्यामध्ये बँक खातेधारकाचे पैसे तसेच इतर अमुल्य वस्तु जर बँकेतील कर्मचारींच्या हलगर्जीपणामुळे चोरीस गेल्या तर बँकेला त्याची भरपाई करावी लागणार आहे.
पण यात असे देखील नमुद केले आहे की अचानक एखादा भुकंप आला किंवा पुर सुनामी येणे,वीज पडणे असा काही नैसर्गिक प्रसंग घडला तर यात झालेल्या बँक खातेधारकाच्या नुकसानाला बँक जबाबदार राहणार नाही.
2) दुसरा नियम –
बँक खात्यातुन पैशांची चोरी तसेच आर्थिक फसवणुकीसाठी बँकेकडुन भरपाई दिली जाणार :
जरी कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक संकटात झालेल्या बँक खातेधारकाच्या नुकसानाची जबाबदारी बँक घेत नसेल याचा अर्थ असा अजिबात होत नाही की बँक खातेधारकाच्या नुकसानाची जबाबदारीच घेणार नाही.
ज्या ठिकाणी बँक खातेधारकांचे लाँकर आहे त्याजागेच्या पुर्णता सुरक्षेची जबाबदारी ही बँकेची असणार आहे.समजा बँक खातेधारकाच्या लाँकरमधुन पैसे चोरीला गेले तर त्याचे दंड स्वरूप बँकेला खातेधारकाला पैसे द्यावे लागणार आहे.
एवढेच नहीतर बँकेत अचानक आग लागली चोरी झाली किंवा बँकेच्या कर्मचारींनी पैशाच्या बाबतीत काही घोळ केला तर याची भरपाई देखील बँकेलाच खातेधारकास करावी लागणार आहे.बँकेचे यात वार्षिक भाडयाच्या १०० पट इतके दायित्व असणार आहे.
3) तिसरा नियम –
लाँकरच्या भाडयाचे पैसे वेळेवर जमा केले नाही तर आपले लाँकर बँकेकडुन खोलले जाणार
समजा बँक खातेधारकाने आपल्या बँकेतील लाँकरचे भाडे तीन वर्षाच्या कालावधीत वेळेवर जमा केले नाही तर बँक अशा खातेधारकाच्या विरूदध कारवाई करू शकते.आणि अशा परिस्थितीत त्याचे बँक लाँकर देखील उघडण्याचा हक्क बँकेला असणार आहे.
4) चौथा नियम –
अवैध्य मालमत्ता बँकेच्या लाँकरमध्ये ठेवण्यास सक्त मनाई असणार आहे
काहीवेळा बँक खाते धारक आपल्या बँक लाँकरमध्ये काही चुकीच्या तसेच अवैध्य वस्तु देखील ठेवत असतात.यालाच आळा घालता यावा यासाठी आरबीआयने लाँकर संदर्भातील करारात एक महत्वाच्या कलमाचा देखील समावेश केला आहे.
ज्यात असे स्पष्ट नमुद केले आहे की बँक खातेधारकाला आपल्या बँक लाँकरमध्ये कुठल्याही प्रकारची बेकायदेशीर धोकादायक तसेच अवैध्य वस्तु किंवा पदार्थ आपल्या लाँकरमध्ये ठेवता येणार नाही.
आणि समजा बँकेला कोणत्याही बँक खातेधारकाच्या लाँकरमध्ये असा अनुचित प्रकार घडताना आढळुन आला तसेच बँकेला बँक खातेधारकाच्या खात्यात काही धोकादायक चुकीच्या तसेच अवैध्य वस्तु
आढळुन आल्या तर बँकेला त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा पुर्ण अधिकार राहणार आहे.
5)पाचवा नियम –
वेटिंग लिस्टचे क्रमांक लागु केले जाणार
रिझर्व बँकेने तयार केलेल्या आपल्या नवीन नियमांमध्ये असे देखील नमुद केले आहे की बँकेला लाँकर आँपरेशनचे संदेश तसेच ईमेल लाँकर खातेधारकाला नियमितपणे पाठविणे देखील अनिवार्य असणार आहे.
तसेच बँकेला आपल्या प्रत्येक लाँकर धारकाला लाँकरसाठी अर्ज केल्याची पावती द्यावी लागणार आहे.आणि समजा तत्काळ बँकेत लाँकर उपलब्ध नसेल तर लाँकरसाठी अर्ज केलेल्या अर्जदाराला एक वेटिंग लिस्ट क्रमांक देणे बँकेसाठी खुप गरजेचे राहणार आहे.
आणि प्रत्येक बँकेच्या शाखेनुसार लाँकरच्या अलाँटमेंटबददलची माहीती आणि वेटिंग लिस्ट क्रमांकाची यादी बँकेकडुन कोर बँक सिस्टम म्हणजेच सीबीएस सोबत देखील जोडले जाणार आहे.किंवा हीच लाँकरच्या अलाँटमेंटबददलची माहीती आणि वेटिंग लिस्ट क्रमांकाची यादी सायबर सिक्युरीटी असलेल्या इतर कँप्युटराईज्ड सिस्टममध्ये बँकेला स्टोअर करून ठेवावी लागणार आहे.
6) सहावा नियम –
ग्राहक योग्य परिश्रम
बँकेच्या नवीन दिशा निर्देशनात असे देखील नमुद केले आहे की बँकेतील असे ग्राहक जे बँकेचे सध्याचे खातेधारक आहेत आणि त्यांनी लाँकर सुविधेसाठी देखील अर्ज केलेला आहे.आणि ते ग्राहक योग्य परिश्रम म्हणजेच कस्टमर ड्यु डिलिजंसचे देखील व्यवस्थित काटेकोरपणे पालन करीत आहेत.
अशा बँक खाते धारकांना बँकेकडून सेफ डिपाँझिट लाँकर तसेच सेफ कस्टडी आर्टिकलची सुविधा बँकेच्या नवीन नियमानुसार उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पण ही सुविधा नवीन नियमानुसार अशाच बँक खाते धारकांना उपभोगता येईल ज्यांचे बँकेशी इतर कुठलेही बँकिंग संबंध असलेले आढळुन येणार नाही.
7) सातवा नियम –
बँक लाँकरची शिफ्टींग
बँकेला बँक लाँकर धारकाच्या अनुमतीशिवाय त्याचे लाँकर एका ठिकाणाहुन दुसरे ठिकाणी शिफ्ट करता येणार नाही असे देखील आरबीआयच्या नवीन दिशा निर्देशनात नमुद करण्यात आले आहे.
तसेच यात असे देखील सांगितले आहे की लाँकरच्या भाडयाच्या स्वरूपात टर्म डिपाँझिटचा वापर केला जाणार आहे.स्ट्राँग रुम तसेच वाँल्टची सुरक्षा व्हावी यासाठी बँकेकडुन काही महत्वपुर्ण पाऊले देखील उचलली जावीत.
आणि बँक लाँकरजवळ कोण आले?कोण गेले? याची नोंद ठेवण्यासाठी बँकेत काही अनुचित प्रकार घडला तर तो लगेच बँकेच्या लक्षात यावा यासाठी कमीत कमी 180 दिवस बँकेतील सीसीटीव्ही फुटेज बँकेला जपुन ठेवावे लागणार आहे.
8) नियम आठवा :
लाँकर बंद करणे
जर बँक खाते धारकाला आपले लाँकर बंद करायचे असेल तर यासाठी त्याला आपले लाँकर सरेंडर करण्यासाठी सर्वप्रथम एक अर्ज करावा लागेल.आणि मग अर्ज मंजुर झाल्यावर आपल्या लाँकरमध्ये ठेवलेली सर्व रक्कम मुल्यवान वस्तु काढुन घ्यायची आणि लाँकरची चावी बँकेच्या ताब्यात द्यावी लागेल.
आणि मग जेव्हा सर्व करार संपुष्टात येईल तेव्हा शेवटी वितरण करताना आपण जमा केलेले बँक लाँकरचे आगाऊ वितरणाचे भाडे आपल्याला बँकेकडुन वापस देखील करण्यात येईल.
9)नववा नियम –
नवीन लाँकर करारावर सही
सर्व बँक लाँकर धारकांना जानेवारी 2022 च्या नवीन लाँकर करारावर 1जानेवारी रोजी आपली स्वताची सही करावी लागणार आहे.आणि नवीन बँक लाँकर करारावर सही करण्याअगोदर नवीन कराराचे नियम त्यात दिलेले असतील ते एकदा वाचुन घ्यावे लागतील जेणेकरून त्यांना बँकेचे नवीन लाँकर नियम समजण्यास मदत होईल.आणि त्या नवीन नियमांचे पालन देखील काटेकोरपणे करता येईल.
आणि ह्या झालेल्या कराराची एक प्रत आपल्याकडे म्हणजेच बँक लाँकर धारकाकडे राहील आणि एक प्रत लाँकरच्या शाखेकडे जमा केली जाईल.
बँक लाँकर नियमांविषयी बँक लाँकर धारकाकडुन वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न :
New Bank Locker Rules in Marathi – Frequently Asked Questions
1)बँक आमचे लाँकर उघडु शकते का?
हो नक्कीच पण तेव्हाच जेव्हा आपले बँक लाँकरचे भाडे न भरण्यास तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला असेल.
आपले बँक लाँकर सात महिन्यांपासुन आँपरेट करण्यात येत नसेल,करारात नमुद केलेल्या अटी आणि नियमांचे आपण पालन नही केले किंवा आपल्या लाँकरची चावी आपल्याकडुन अकस्मातपणे हरवली आणि आपण बँकेला लाँकर उघडण्यासाठी विनंती केली तेव्हा अशा परिस्थितीत आर बी आयच्या नियमानुसार बँक आपले लाँकर उघडु शकते.पण त्यासाठी देखील काही नियम तसेच अटी ठेवण्यात आल्या आहेत.
बँकेचे लाँकर उघडताना बँकेचा अधिकारी आणि दोन तीन साक्षीदार सोबत असले पाहिजे.आणि सर्व घडलेल्या प्रकाराचा पुरावा म्हणुन व्हिडिओ रेकाँर्डिग देखील केली जात असते.
2) आपल्या बँकेच्या लाँकरची चावी आपल्याकडून हरवली तर आपण काय करायला हवे?
बँक लाँकरची एक चावी जशी आपल्याकडे असते तशी बँकेकडे देखील आपल्या लाँकरची एक डुप्लीकेट चावी असते.
आणीबाणीच्या परिस्थिति , इमरजन्सीसाठी आपण त्या चावीचा उपयोग करून आपले लाँकर उघडु शकतो.
त्यासाठी देखील आरबीआयने आपले काही नियम बनवलेले आहेत त्या नियमांचे पालन करून.पण जुनी हरवलेली चावी भविष्यात आपल्याला सापडली तर ती आपल्याला बँकेत तातडीने जमा देखील करावी लागत असते.
3)आपण जाँईण्ट बँक खाते जसे उघडत असतो तसे जाँईण्ट बँक लाँकर आपल्याला उघडता येऊ शकते का?
हो नक्कीच आपण बँक खाते जसे जाँईण्ट पदधतीने उघडत असतो तसेच बँक लाँकर देखील आपण जाँईण्ट पदधतीने सुरू करू शकतो.यात एका लाँकर धारकाचा अकस्मात मृत्यु झाला तर दुसरा जाँईण्ट बँक लाँकर धारक ह्या लाँकरला आँपरेट करू शकतो.
आणि समजा दोघे बँक लाँकर धारक अकस्मातपणे वारले तर त्यांच्या वारसदाराला बँकेची कागदी कारवाई पुर्ण करून ते बँक लाँकर आँपरेट करता येते.यात मग तो त्या लाँकरमधील मालमत्ता काढु देखील शकतो.किंवा त्याची ईच्छा असेल तर ती तशीच ठेवू देखील शकतो.आणि ते लाँकर तो वारसदार व्यक्ती आँपरेट करू शकतो.
4)बँक लाँकर आपल्यासाठी किती सुरक्षित आहे? आणि का सुरक्षित आहे?
बँक लाँकरमध्ये पैसे तसेच अनमोल मालमत्ता ठेवणे
हे आपल्यासाठी पुर्णपणे सुरक्षित आहे अस आपण म्हणु नही शकत.कारण अचानक बँकेत काही दुर्घटना घडली तर आपली मालमत्ता धोक्यात येऊ शकते पण त्यावर उपाय म्हणुन आरबीआयने एक नवीन नियम लागु केला आहे.
आरबी आयच्या ह्या नवीन नियमानुसार बँकेतील कर्मचारीने केलेल्या हलगर्जी तसेच निष्काळजीपणामुळे जर बँक लाँकर धारकाचे पैसे चोरीला गेले किंवा काही फ्राँड झाला बँकेतील कर्मचारींच्यामुळे बँक लाँकरला आग लागली त्यात ठेवलेल्या मालमत्तेचे काही नुकसान झाले तर त्याची भरपाई बँकेकडुन केली जाणार आहे.