मराठी विचार –Good thoughts in Marathi
- मित्रानो ,मदत नक्की करा, पण स्वतःचा कुणी गैरफायदा घेणार नाही ह्याची काळजी घ्या . प्रेम करा , पण कुणी तुमच हृदय तोडणार नाही ह्याची काळजी घ्या,विश्वास ठेवा , पण भोळ नका राहू. ऐका,, पण स्वतःच आवाज दाबून नका ठेवू.
- अर्थपूर्ण जीवन-अर्थपूर्ण जीवन म्हणजे श्रीमंती, प्रसिद्धी किंवा मोठी डिग्री किंवा अगदीपरफेकट असणं न्हवे तर सत्य , नम्र,विनयशील असणे, कुणाच्या तरी जीवनात आपला सहभा आणि हातभार लावणे होय.
- वाटत की ,काही लोकं जीवनात थोडं लवकर आली असती बर झालं असत, काही उशिरा आली असती आणि काही जीवनात नसतीच आली तरी चाललं असत.
- जीवन खूप शॉर्ट आहे-जीवनात एकही दिवस गृहीत धरू नका,क्षणात सगळं जीवन उलथापालथ झालेल पाहिलंय.देवाचे आभार माना जे तुमाला मिळालंय आणि जे काही तुमी आज आहात.
- जे तुमच्या करता जीवनात महत्वाचे आहेत त्याना कायम आठवणीत ठेवा. मिळालेलं जीवन एक दैवी भेट आहे आणि ज्यांना मिळालं ते सुदैवी आहेत.
- मला तुमच्या पैश्यांनी, संपत्तीने, सोशल स्टेटस न मोठया नोकरीने फरख नाही पडत,, मला फरक पडतो तुमी समोरच्या माणसाशी कस वागताय, एक माणूस म्हणून तुमी त्याला किती किंमत देताय.
- फक्त ती व्यक्ती नात्यात आहे म्हणून त्याच खोट वागणं,नाटक, लबाडी, गोंधळ,,अवमान,अनादर कश्या करता सहन करताय?
- माझ्या नसण्याने तुझ्या जीवनात काहीही फरक पडत नसेल तर मग तुझ्या जीवनात माझ्या असण्याला कितीसा अर्थ असणार आहे?
- ती बदललीय,, तिच्या डोळ्यात बघ, तिचा स्पर्श बघ,तिचा बदलेला आवाज ऐक, ती पूर्वी सारखी राहिलेली नाही , वाटत नाही ती पुन्हा तुझ्या जीवनात परतेल.
- लोकांना तुमच्या वागणुकीतला बदल लगेच कळेल, पण स्वतःच चुकीचं वागणं ज्यांमुळे तुमी अस वागताय ते लक्ष्यात नाही येणार.
- 11 गोष्ठी संपत्तीने विकत नाही घेता येणार-रितभात नैतिकता, आदर,चरित्र, सुबुद्धी,विश्वास, शिस्त, सबुरी,दर्जा,सचोटी आणि प्रेम
- तिला Judge नको करुस!!-ती कुठल्या वादळातंन बाहेर आलीय त्याच तुला थोडी सुद्दा कल्पना नाहीये –
- लोक रडतात म्हणजे ती कमजोर,दुबळे असतात म्हणुन न्हवे,, ती ही माणसच रे मित्रा,, शेवटी कोसळून पडतात परिस्थिती पुढं,,, हतबल होतात !
- जीवनाचे-व्रण म्हणजे दुःख कमी झालंय आणी जखम आता सुधारत आलीय.
- म्हणजे तुमी दुःखावर संकटावर मात केली,जीवनाने दिलेला धडा शिकलात,, अजून हिमतीन उभं राहिलात आणि पून्हा पुढं जायला तयार आहात. हे व्रण म्हणजे तुमी संकटावर मिळवलेल्या विजयाच प्रतीक च !!!!ह्या व्रणा मूळ,, घाबरून जाऊ नका,,भीती त जीवन जगू नका.दुःखाचे हे व्रण जीवनातून कदाचित सहजा सहजी जाणार नाहीत पण त्यांच्या कडे पाहण्याचा दृष्टीकोन तर नक्की बादलावता येईल.ह्या व्रणा ना, दुःखद आठवणी ना तुमचं सामर्थ्य,तुमी त्यावर कशी मात केली ते आठवा,, दुःख म्हणून पाहू नका ..
- जीवन मना सारख नसत !जीवनात तुमच्या मार्गात काही अडचणी येऊ द्या, ते किती ही अन्यायकारक असू द्या,, स्वतःचा बळी नाही द्यायचा. भीती, निराशा ,नकारात्मकता ला मनावर राज्य नाही करू द्यायचं.कारण ह्या अधर्म,,अन्यायकारक जीवनातून तुमाला विजय मिळवायचाय. तुमी विचार करता त्यापेक्षा तुमी कणखर आहात, मजबुत आहात. खूणगाठ बांधा तुमी विचार करता त्यापेक्षा कैक पटीने तुमी जीवनात यशस्वी होण्यास सक्षम आहात.
- जीवनात सर्वात मोठया वादळाला तोंड देत असताना, ,, आयुष्याच्या सर्वात कठीण काळातुन जात असताना !!!! मी आहे ना सोबत म्हणाऱ्याचें खरे रंग दिसतात. अश्या काळात कुणी तुमाला सोबत दिली,, हाथ दिला ,, त्यांच्या प्रती कृतज्ञाता व्यक्त करा ,, आणि जे सोडून गेले त्यांचे ही आभार माना,, नाहक तुमच्या मनातली ,हृदयतली जागा अडवून बसले होते,,
- तुमच्या शब्दांना किंमत न देणाऱ्याना शांत आणि अबोल राहण्यासारखं उत्तम उत्तर नाही
- प्रगल्भता-म्हणजे अश्या लोकांपासून आणि परिस्थिती पासून दूर जाणे जी तुमच्या मनःशांती ला ,स्वाभिमान, जीवनमूल्य आणि नैतिकतेला हानिकारक असतील
- ती पाण्यासारखी आहे! इतकी ताकदवान की तुला डुबवू शकते.स्वच्छ इतकी की तुला निर्मळ बनवू शकत –
- लोकांन तुमची आठवण त्यांच्या कठीण काळात,अडचणी च्या वेळेस च येते ह्यात दुःखा वाटण्या सारख काय आहे?? उलट हे तर अभिमानास्पदच की अश्या वेळी तुमचीच एक वाट, मार्ग आणि दिवा म्हणून त्यांना ह्या काळोखात आठवण आली
- कधी कधी आयुष्यात एकाद् वादळ ही आवश्यक असते,, झळमट सारून,,,आपण ह्यातुन तावून सुलाखून,, पुन्हा नव्या उमेदीने नव्या ताकदीने उभं राहू शकतो
- लोक बोलतात खूप,म्हणून मी पाहत असतो ते नेमकं करतात काय?
- लोक स्वतः न कमावलेला पैसा खर्च करतात . गरज नसलेल्या वस्तू खरेदी करतात आणि ते कश्या करता, त्यांना जी लोक आवडत नाहीत त्यांना इम्प्रेशन करायला !!
- 80% टक्के कोट्याधीश असलेल्याला लोकं कडे कॉलेज ची पदवी सुद्दा नाही..
- एकटा चालतोय म्हणून मी हरलोय अस समजू नका.
- अरे शेवटी सगळं ठीक होईल ,, अन होत नसेल तर मग शेवट नाही,, प्रयत्न सुरू ठेवा .
- तुमी हे जे वाचताय ,ते चुकून नाही
- अजून ही तुमच्या मनात ते असेल तर घ्या रिस्क आणि करा प्रयत्न
- चुकीच्या व्यक्ती किंवा वस्तू मागे कश्या करता धावताय? जे योग्य आणि सत्य असेल ते तुमच्या पासून दूर जाणार नाही !
- माझं वागणं तू माझ्या शी कसा वागतोय त्यावर अवलंबून आहे
- गोंधळू नकोस रे मित्रा,, ,, माझं व्यक्तीमत्व म्हणजे माझं वागणं न्हवे. माझं व्यक्तीत्त्व म्हणजे मी माणूस म्हणून कोण आहे आणि वागणं ते समोरच्या वर depend !!
- समोरच्या च खोटं बोलणं मी बऱ्याच दा मन लावून ऐकत असतो कारण मला खर काय ते आधीच माहीत झालेलं असत.
- तुमी किती ही स्मार्ट असू दया,, लोकांशी काम कशी करावीत हे माहीत नसेल तर तुमची स्वप्न कायम स्वप्न च राहतील.
- यश म्हणजे – मेहनत,, सातत्य, जगवलेल्या रात्री,, नकार, शिस्त, टीका, शंका,, हार , धोके
- आपण जुन्या शाळेत शिकलेलो आहोत मित्रा,, ,,अजून ही समोरच्याला आदर देण्यात आपला तितकाच विश्वास .
- कुणी इतकं बिझी नसते,, फक्त समोरच्याची किंमत किती ह्यावरून ठरत.,,,,,,की ,,,
- कश्याकरता सगळ्यांना तुमच्या संकट ,अडचणी सांगत फिरताय?? 80% लोकांना त्याच्या शी काही घेण देणे नसते, 19% तर उलट आनंदी होतात,, मग 1 % जी तुमची असणार आहेत त्यांना शोधा आयुष्यात!!
Optimum Nutrition Amino Energy – Pre Workout with Green Tea, BCAA, Amino Acids, Keto Friendly, Green Coffee Extract, Energy Powder – Fruit Fusion, 30 Servings
Alacer Emergen-C Raspberry – 30-Count
अभिवृद्धी म्हणजे काय