दारिद्रय म्हणजे काय? -Meaning of Poverty , Concept Definition And Cause Of Poverty

दारिद्रय म्हणजे काय?त्याची कारणे कोणकोणती? -Meaning of Poverty , Concept Definition And Cause Of Poverty

जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनातील रोजच्या अन्न वस्त्र निवारा,गरजा पुर्ण करू शकतो एवढे धन तसेच सुख सुविधा तसेच उत्पन्नाची साधने जर आपल्याकडे नसतील तर अशा वेळी आपण एक गरीब तसेच दारिद्री म्हटलो जात असतो.

दारिद्रय ही एक अशी गोष्ट आहे जी आपणा सर्वानाच माहीत आहे कारण भारतातील आज निम्मे लोक अजुनही दारिद्रयातच आपले जीवन जगत आहे तसेच व्यतित करत आहे.

आजच्या लेखात आपण ह्याच महत्वाच्या विषयावर सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

ज्यात आपण दारिद्रय म्हणजे काय?त्याचा अर्थ काय होतो?त्याची व्याख्या,दारिद्रयाची संकल्पणा कशी मांडतात?आणि दारिद्रयाची मुख्य कारणे कोणकोणती असतात हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

दारिद्रय म्हणजे काय? Poverty Meaning In Marathi)

दारिद्रय म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनातील रोजच्या अन्न वस्त्र निवारा ह्या मुलभुत आणि महत्वपुर्ण गरजा देखील पुर्ण करू शकत नसते.

कारण तेवढे धन तसेच सुख सुविधा तसेच उत्पन्नाची साधने तिच्याकडे नसतात अशा वेळी ती व्यक्ती एक गरीब तसेच दारिद्री म्हटली जात असते.

थोडक्यात आपल्या दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक असलेल्या किमान मुलभुत गरजा पुर्ण करता न येण्याची कमकुवत आर्थिक परिस्थिती म्हणजेच दारिद्रय होय.

दारिद्रयाची व्याख्या-(Definition Of Poverty In Marathi)

दारिद्रयाची व्याख्या ही कोणत्याही एका पदधतीने न मांडता अनेक पदधतीने मांडली जाऊ शकते.

दारिद्रयाची व्याख्या :

(दारिद्रय ही एक अशी आर्थिक अवस्था आहे.ज्यात एखादी व्यक्ती अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण आरोग्य ह्या आपल्या मुलभुत गरजा पुर्ण करण्यास आर्थिकदृष्टया सक्षम नसते).

दारिद्रयाविषयी पुढीलप्रमाणे अनेक जणांनी आपल्या निरनिराळया व्याख्या मांडलेल्या आहेत.

1)अमत्य सेन यांनी मांडलेली दारिद्रयाची व्याख्या –

जेव्हा एखादी आपल्या जोपासलेल्या मुल्यांनुसार जीवन जगु शकत नाही तेव्हा त्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीस दारिद्रय असे म्हणावे.

2) गोगार्ड यांनी मांडलेली दारिद्रयाची व्याख्या-

गोगार्ड यांनी मांडलेली दारिद्रयाची व्याख्या-
Poverty, Its Genesis and Exodus, an Inquiry Into Causes and the Methods of Their Removal Paperback – Import, 5 January 2010 by John George Godard (Author)

निरोगी आणि उत्साहीत जीवन जगण्यासाठी लागत असलेल्या जीवनावश्यक वस्तु सामग्रीचा अपुर्ण पुरवठा तसेच साठा म्हणजेच दारिद्रय.

3) डाँ ओझा यांनी मांडलेली दारिद्रयाची व्याख्या –

मनुष्याने आपल्या रोजच्या आहारातुन शरीरास आवश्यक असलेल्या कँलरीज घेणे फार गरजेचे असते.ह्या कँलरीजचे प्रमाण 2240 इतके असावे लागते.

पण आपणास आपल्या आहारातुन 2240 पेक्षा कमी कँलरीज प्राप्त होत असतील तर आपण दारिद्रयात आहे असे समजावे.

दारिद्रयाची संकल्पणा (Poverty Concept In Marathi)

दारिद्रयाची संकल्पणा आपण पुढील प्रकारे मांडु शकतो-

  • जगातील अनेक देश आजही दारिद्रयात जीवन जगत आहे.मित्रांनो आपण दारिद्रय हे डोळयांनी बघु शकतो पण त्याची व्याख्या मांडु शकत नसतो.
  • कारण दारिद्रयाची व्याख्या ही प्रत्येक देशाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार,विकास दरानुसार निर्धारीत केली जात असते.म्हणुन कुठल्याही देशातील दारिद्रयाची निश्चित व्याख्या आपण मांडु शकत नसतो.
  • मानव हा एक असा प्राणी आहे ज्याच्या गरजा ह्या दिवसेंदिवस वाढतच असतात.
  • म्हणजेच ह्या गरजांना कोणतीही मर्यादा असलेली आपणास दिसून येत नाही.पण खरे पाहायला गेले तर मानवाच्या जीवन जगण्यासाठी असलेल्या अत्यावश्यक मुलभुत गरजा ह्या खुपच कमी असतात.जसे की अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण.
  • खाण्यासाठी तीन वेळचे अन्न,परिधान करण्यासाठी स्वच्छ वस्त्र,राहण्यासाठी एक निवारा म्हणजेच छोटेसे का होईना एक घर आणि चांगल्या दर्जाचे उत्तम शिक्षण कारण ह्या आपल्या अशा मुलभुत गरजा आहे ज्याशिवाय आपण म्हणजेच एक सर्वसामान्य व्यक्ती सुखी आणि आनंदी जीवन जगुच शकत नाही.
  • पण जगात असेही काही लोक असतात ज्यांची आर्थिक कुवत आपल्या ह्या जीवनावश्यक मुलभुत गरजा पुर्ण करण्याइतपत देखील नसते.असे लोक दारिद्रय ह्या संकल्पणेच्या अंतर्गत येत असतात.
See also  वि.दा सावरकर यांच्याविषयी माहीती - V D Savarkar Information In Marathi

दारिद्रयाची संकल्पणा कोणत्या दोन पदधतीने मांडली जाते?दारिद्रयाचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?

दारिद्रयाची संकल्पणा आपण पुढील दोन पदधतीने मांडु शकतो-

1)सापेक्ष दारिद्रय :

2) निरपेक्ष दारिद्रय :

1)सापेक्ष दारिद्रय :

जेव्हा आपण देशातील उच्चतम अशा पाच ते दहा टक्के लोकसंख्येच्या संपत्ती,उत्पन्न तसेच उपभोगाच्या तुलनेत देशातील कनिष्ठ म्हणजेच न्युनतम अशा पाच ते दहा टक्के लोकसंख्येच्या संपत्तीची,उत्पन्नाची तसेच उपभोगाची मोजणी करत असतो त्याला सापेक्ष दारिद्रय असे म्हणतात.

2) निरपेक्ष दारिद्रय :

जेव्हा आपण एखाद्या देशातील दारिद्रयाच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करत असतो.तेव्हा देशातील लोकांची जीवनशैली राहणीमान यांचा देखील आपण विचार करत असतो.

आणि त्या देशातील दारिद्रयाच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करत असतो.तेव्हा त्या देशातील लोकांची जीवनशैली राहणीमान यांचा आधार घेऊन आपण एक न्युनतम उपभोग स्तर निर्धारीत करीत असतो.

आणि निर्धारीत केलेल्या स्तराच्या खाली उपभोग घेत असलेल्या लोकसंख्येत ज्या व्यक्तींचा समावेश होत असतो.ती व्यक्ती दारिद्रय रेषेखालील असल्याचे मानले जाते.

दारिद्रयाची संकल्पणा सर्वप्रथम कोणी मांडली?तसेच भारतात सर्वप्रथम दारिद्र्याची संकल्पना कोणी मांडली?

दारिद्रयाच्या संकल्पणेची शिफारस सर्वप्रथम नीलकंठ आणि दांडेकरांनी 1971 साली केलेली आपणास दिसून येते.जिचे नाव दारिद्रय टोपली असे होते.ज्यात अन्न हा घटक समाविष्ट केला गेला होता.

दारिद्रय रेषा म्हणजे काय?(Meaning Of Poverty Line In Marathi)

ही एक संकल्पणा आहे जी देशातील दारिद्रयाचे प्रमाण मोजण्याकरीता नेहमी वापरली जात असते.ज्यात कोण दारिद्रय रेषेखाली येत आहे आणि कोण नाही हे बघण्यासाठी काही निकष वापरले जात असतात.

दारिद्रयाची कारणे किती आणि कोणकोणती आहेत?(Cause Of Poverty In Marathi)

दारिद्रयाची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत-

1)जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या वस्तुंची कमी उपलब्धी :

2) निरक्षरता :

3) शेतीमधुन निघणारे कमी उत्पादन :

4) चलनात सातत्याने होत असलेली वाढ :

5) देशातील आर्थिक विषमतेची परिस्थिती :

6) कमी प्रमाणात प्राप्त होत असलेले दरडोई उत्पन्न :

7) देशाचा पुर्णपणे न झालेला विकास :

8) लोकसंख्येचा वाढता विस्फोट :

9) बेरोजगारी :

10) प्रादेशिक असंतुलन :

1) जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या वस्तुंची कमी उपलब्धी :

See also  गूगल क्लासरुम विषयी संपूर्ण माहीती - Google classroom Information in Marathi

आज पाहायला गेले तर आपणास असे दिसून येते की देशात असे देखील काही लोक आहेत ज्यांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या वस्तु तसेच मुलभुत सुविधा देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत.

आणि हे देशातील दारिद्रयतेचे एक मुख्य कारण आहे.

2) निरक्षरता :

2001 मधील जनगणनेचा आढावा घेतला तर आपणास असे दिसून येते की आजही 35 ते 36 जनता ही अजुनही अशिक्षित आणि निराक्षर आहे.

आणि निराक्षर लोकांना शिक्षित लोकांच्या तुलनेत खुप अधिक काम करून देखील फार कमी पगार तसेच कामाचा मोबदला दिला जातो.ज्यामुळे त्यांना आपल्या जीवनावश्यक गरजा देखील पुर्ण करता येत नसतात.ज्याने त्यांना दारिद्रयात गरीबीत जीवन काढावे लागते.

3) शेतीमधुन निघणारे कमी उत्पादन :

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे पण इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतातील शेतीमधून निघणारया उत्पादनाचे प्रमाण फार कमी आहे.

याला कारण येथे असणारी भांडवलाची कमी,उत्पादनाच्या नवीन तंत्राचा अभाव,जलसिंचनाच्या नसलेल्या सोय सुविधा ह्या आहेत.

आणि जर शेतीतुन चांगले उत्पादन नही निघाले तर शेतकरींना पाहिजे तसे उत्पन्न प्राप्त होत नसते.ज्याने त्यांच्या दारिद्रयात वाढ होत असते.

4) चलनात सातत्याने होत असलेली वाढ :

जेव्हा एखाद्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक अशा एखाद्या महत्वाच्या वस्तुची पायाभुत सोयी सुविधेच्या वस्तुच्या किंमत अचानक वाढत असतात.

तेव्हा सर्वसामान्य माणसाला ती वस्तु खरेदी करणे महागाईशी झुंज देणे फार कठिन होत असते.ज्याने त्याची ती जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी आर्थिक कुवत नसल्यामुळे त्याला त्या सोय सुविधेपासुन वंचित राहुन गरीबीत जीवन काढावे लागते.

5) देशातील आर्थिक विषमतेची परिस्थिती :

संपत्ती आणि उत्पन्नाची विभाजनी लोकसंख्येत समान पदधतीने केली गेली नाही.म्हणजेच आर्थिक संपत्तीचे विभाजन सम प्रमाणात न केले गेल्याने गरीब अजुन गरीब होत आहे आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे.

6) कमी प्रमाणात प्राप्त होत असलेले दरडोई उत्पन्न:

जागतिक विकास अहवालानुसार जर भारताच्या दरडोई उत्पन्नाची इतर विकसित देशांसोबत तुलना केली तर भारताचे दरडोई उत्पन्न इतर देशांच्या तुलनेत फार कमी असलेले आपणास दिसुन येते.हे देखील देशातील दारिद्रयाचे एक प्रमुख कारण मानले जाते.

7) देशाचा पुर्णपणे न झालेला विकास :

भारत हा विकसित नव्हे तर एक विकसनशील देश म्हणुन ओळखला जातो.कारण अजुनही इथे पाहिजे तेवढा विकास झालेला आपणास दिसुन नाही.म्हणजेच देशाचा अल्प प्रमाणातच झालेला विकास हे देखील दारिद्रयाचे एक प्रमुख कारण आहे.

उदा,देशाला कमी प्रमाणात प्राप्त होत असणारे राष्टीय उत्पन्न,कमी उपभोगाची पातळी इत्यादी.

8) लोकसंख्येचा वाढता विस्फोट :

ज्या प्रमाणात देशाचे उत्पन्न वाढते आहे त्यापेक्षा अधिक वेगाने लोकसंख्येत वाढ होत असेल आणि लोकांच्या गरजा दिवसेंदिवस वाढत असतील अशा परिस्थितीत देखील दारिद्रयाची परिस्थिती निर्माण होत असते.

9) बेरोजगारी तसेच अर्धबेरोजगारी :

काम करण्याची ईच्छा पात्रता योग्यता असुन देखील गरजुंना काम न मिळणे म्हणजे बेरोजगारी

तसेच काम करण्याची ईच्छा पात्रता योग्यता असुन देखील गरजुंना आपल्या क्षमता योग्यता पात्रतेनुसार योग्य काम न मिळणे हे दारिद्रयाचे एक मुख्य कारण आहे.

10) प्रादेशिक असंतुलन :

जो देश आर्थिक विकासात मागासलेला असतो त्या देशाचे दारिद्रयाचे गुणोत्तर अधिक असते.म्हणजे देशाचा आर्थिक विकासात मागासलेपणा हे देखील दारिद्रयाचे कारण ठरू शकते.

See also  बांधकाम कामगार योजना 2022 माहीती , पात्रता, नोंदणी व लाभ - Bandhkam Kamgar Yojana 2022

11) दारिद्याचे दुष्टचक्र :

दारिद्रयाचे दुष्टचक्र ही संकल्पणा कोणी मांडली आहे?

दारिद्रयाचे दुष्टचक्र ही संकल्पणा प्रा,रँग्नर नर्क्स यांनी मांडली आहे.

ही संकल्पणा आपणास सांगते की देशाचे राष्टीय उत्पन्न कमी असल्यास दरडोई उत्पन्न कमी निघते.ज्याचे परिणामस्वरूप आपणास फार कमी बचत करता येत असते.

आणि बचत कमी असल्याने भांडवल निर्मिती कमी होते.आणि भांडवल कमी असल्याने आपण कमी गुंतवणुक करतो.

गुंतवणुक न केल्याने आपणास नवनवीन उद्योग व्यवसाय कारखाने सुरू करता येत नाही ज्याने आपणास कमी उत्पादन प्राप्त होते.

आणि उद्योग व्यवसायातील उत्पादकतेत घट झाली तर रोजगाराच्या संधी कमी उपलब्ध होतात.आणि रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध होतात याचे कारण देशाचे कमी राष्टीय उत्पन्न हे असते.

अशा पदधतीने ह्या दारिद्रयाच्या दुष्टचक्राची संकल्पणा मांडण्यात आली आहे.

दारिद्रय मोजत असलेल्या समित्या-

दारिद्रय मोजत असलेल्या काही प्रमुख समित्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

टीडी लकडावाला समिती :

● सुरेश तेंडुलकर समिती :

● दांडेकर व रथ समिती :

● अलघ समिती :

● पीडी ओझा समिती :

● रंगराजन समिती :

● पुनगरिया कार्यगट :

दारिद्रय कसे मोजतात?

● जर दारिद्रय ठरवायचे असेल तर आपणास एका व्यक्तीमागे होत असलेला महिन्याचा उपभोग खर्चाचा न्युन स्तर आधी निश्चित करणे गरजेचे आहे.

● जी व्यक्ती एम पीसी ई च्या न्युन स्तरापेक्षा फार कमी उपभोग खर्च करत असते.त्यास बीपीएल म्हणजेच दारिद्रय रेषेखालील (Below Poverty Line) असे म्हणतात.

● जी व्यक्ती एम पीसी ई च्या न्युन स्तरापेक्षा फार अधिक उपभोग खर्च करत असते.त्यास एपीएल म्हणजेच दारिद्रय रेषेवरील व्यक्ती(Above Poverty Line) असे म्हणतात.

आंतरिक दारिद्रय म्हणजे काय?

आंतरिक दारिद्रय म्हणजे बाहेरचे दारिद्रय नव्हे तर आपल्या मनात अंतकरणात असलेले दारिद्रय.

दारिद्रय निर्मुलनाचे उपाय किती आणि कोणकोणते आहेत?

दारिद्रय निर्मुलनाचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत-

1) देशातील बेरोजगारी आणि अर्धबेरोजगारी दुर करणे :

काम करण्याची ईच्छा आणि पात्रता योग्यता असलेल्या गरजुंना काम मिळवून देणे.

तसेच काम करण्याची ईच्छा पात्रता योग्यता असुन देखील गरजुंना आपल्या क्षमता योग्यता पात्रतेनुसार योग्य काम मिळत नाहीये त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार काम मिळवून देणे.

2) निरक्षरता दुर करणे :

ज्या निराक्षर लोकांना शिक्षित लोकांच्या तुलनेत खुप अधिक काम करून देखील फार कमी पगार तसेच कामाचा मोबदला दिला जातो.ज्यामुळे त्यांना आपल्या जीवनावश्यक गरजा देखील पुर्ण करता येत नसतात.त्यांना शिक्षित करणे आणि देशातील निरक्षरतेचे प्रमाण कमी करणे.

3) जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या वस्तुंना गरजूंसाठी उपलब्ध करून देणे:

ज्यांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या वस्तु तसेच मुलभुत सुविधा देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत.त्यांना त्या उपलब्ध करून देणे.

4) शेतीमधुन निघणारया उत्पादनात वाढ करणे:

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे पण इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतातील शेतीमधून निघणारया उत्पादनाचे प्रमाण फार कमी आहे.

याला कारण येथे असणारी भांडवलाची कमी,उत्पादनाच्या नवीन तंत्राचा अभाव,जलसिंचनाच्या नसलेल्या सोय सुविधा ह्या आहेत.

म्हणुन आपण शेतीसाठी भांडवल जमवायला हवे,शेतीत उत्पादनाच्या नवीन तंत्राचा वापर करायला हवा.शेतकरींना जलसिंचनाच्या सोय सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात.

5) वस्तुंच्या किंमती कमी करणे :

सर्वसामान्य माणसाला जी वस्तु खरेदी करणे तसेच महागाईशी झुंज देणे फार कठिन होत असते.जी जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी आर्थिक कुवत नसल्यामुळे त्याला त्या सोय सुविधेपासुन वंचित राहुन गरीबीत जीवन काढावे लागते.त्या जीवनावश्यक वस्तुंची किंमती सरकारने कमी करायला हव्यात.

6) देशातील आर्थिक विषमता दुर करणे :

देशातील आर्थिक संपत्तीचे विभाजन गरीब आणि श्रीमंत या दोघांत सम प्रमाणात करायला हवे.

7) दरडोई उत्पन्नात वाढ करणे :

देशाच्या दरडोई उत्पन्नात वाढ करणे.

8) देशाचा पुर्णपणे विकास करणे :

देशाला प्राप्त होत असणारे राष्टीय उत्पन्नात वाढ करणे उपभोगाची पातळी वाढवणे.