बेरोजगारीचे प्रकार-Types Of Unemployment In Marathi

बेरोजगारीचे प्रकार कोणते आहेत -Types Of Unemployment In Marathi

बेरोजगारी ही आपल्या देशातील किती मोठी आणि गंभीर समस्या हे आपणा सर्वानाच चांगले माहीत आहे.याबाबत आपल्याला कोणालाही काहीही सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही.

कारण बेरोजगारीच्या ह्या अवस्थेतुन आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी जावेच लागत असते.कारण ही एक देशव्यापक समस्या आहे.

पण बेरोजगारी ही फक्त एक प्रकारचे नसते हिचे देखील आज वेगवेगळे प्रकार असलेले आपणास दिसून येतात.पण ह्या विविध क्षेत्रातील बेरोजगारीच्या प्रकारांविषयी आपल्यातील बहुतेक जण अनभिज्ञ असतात.

म्हणुन आजच्या लेखात आपण बेरोजगारीचे प्रकार किती आहेत?आणि ते कोणकोणते आहेत हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

जेणेकरून बेरोजगारीचे प्रकार किती आहेत?आणि कोणकोणते आहेत?अशा प्रश्न कधी आपणास कधी उदभवणार नाही.

चला तर मग क्षणाचाही विलंब न करता आपण आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळुया.

बेरोजगारीचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?- Types Of Unemployment In Marathi

बेरोजगारीचे काही सामान्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत-

अनैच्छिक बेरोजगारी :

  • अनैच्छिक बेरोजगारी हा बेरोजगारीचा एक असा विशिष्ट प्रकार तसेच अवस्था आहे.
  • ज्यात एखाद्या व्यक्तीची काम करण्याची पात्रता तसेच योग्यता असते.आणि ही व्यक्ती त्याला दिलेले कोणतेही काम करण्यास तयार असते.
  • परंतु ह्या व्यक्तीस कोणीच काम देत नसते.अशा बेरोजगारीच्या अवस्थेस आपण अनैच्छिक बेरोजगारी असे संबोधित असतो.

ऐच्छिक बेरोजगारी :

ऐच्छिक बेरोजगारी हा बेरोजगारीचा एक असा विशिष्ट प्रकार तसेच अवस्था आहे.

  • ज्यात एखाद्या व्यक्तीची ते काम करण्याची पात्रता तसेच योग्यता देखील असते.पण ही व्यक्ती त्याला दिलेले कोणतेही काम करण्यास तयार नसते.
  • म्हणजेच ह्या व्यक्तीची काम करण्याची ईच्छाच नसते.ह्या व्यक्तीने स्वता आपल्या ईच्छेने बेरोजगारी स्वीकारलेली असते.
See also  नाम म्हणजे काय आणि नामाचे प्रकार किती? Definition And Types Of Nouns In Marathi

अशा बेरोजगारीच्या अवस्थेस आपण ऐच्छिक बेरोजगारी असे संबोधित असतो.

अर्ध बेरोजगारी :

अर्ध बेरोजगारी हा बेरोजगारीचा एक असा विशिष्ट प्रकार तसेच अवस्था आहे.

  • ज्यात एखाद्या व्यक्तीच्या काम करण्याच्या क्षमता,पात्रतेचा तसेच योग्यतेचा पुरेपुर वापर केला जात नसतो.
  • ह्या बेरोजगारीच्या प्रकारात त्या व्यक्तीस त्याच्या क्षमता,पात्रता,योग्यतेला अनुसरून योग्य त्या पातळीवर काम दिले जात नाही.
  • त्याच्यात उच्च पातळीचे उच्च पदावर काम करण्याची क्षमता,योग्यता,पात्रता असून देखील त्याला कनिष्ठ पातळीवर राहुन काम करावे लागत असते.
  • अशा बेरोजगारीच्या अवस्थेस आपण अर्धबेरोजगारी असे संबोधित असतो.

बेरोजगारीच्या विविध क्षेत्रातील .प्रकारांनुसार वर्गीकरण

1) ग्रामीण बेरोजगारी :

जी बेरोजगारी आपणास ग्रामीण भागामध्ये विशेषकरून आढळुन येत असते.अशा बेरोजगारीच्या प्रकारास ग्रामीण बेरोजगारी असे म्हणतात.

ग्रामीण बेरोजगारीचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत-

ग्रामीण बेरोजगारीचे प्रकार :

हंगामी बेरोजगारी :

एक गोष्ट आपल्या सर्वानाच चांगली माहीत आहे की ग्रामीण भागातील उत्पन्नाचे आणि रोजगाराचे प्रमुख साधन तसेच माध्यम शेती हेच आहे.

  • आणि आपल्या भारत देशात कोरडवाहु शेती खुप विपुल प्रमाणात केली जाताना आपणास दिसुन येते.
  • आणि हा शेतीचा असा प्रकार असतो ज्यात मजुरांना/कामगारांना वर्षभर काम मिळत नसते.
  • फक्त अखेरीस जेव्हा हंगामाचा कालावधी येत असतो तेव्हाच ग्रामीण भागातील मजुर/कामगारांना काम मिळत असते.
  • म्हणजेच जोपर्यत शेतीचे सिजन सुरू होत नसते तोपर्यत ग्रामीण भागातील अनेक कामगार,मजदुर यांना बेरोजगार राहावा लागत असते.

याचप्रमाणे इतर हंगामी क्षेत्रांमध्ये देखील बेरोजगारीचे प्रमाण विपुल प्रमाणात असते-

● पर्यटन क्षेत्र

● लग्नातील बँड बाजा पथक

● शुगर फँक्टरी

● बर्फाचा कारखाना

इत्यादी.

प्रच्छन्न बेरोजगारी/ छुपी बेरोजगारी :

प्रच्छन्न बेरोजगारी हा ग्रामीण बेरोजगारीचा दुसरा प्रकार तसेच बेरोजगारीची अवस्था आहे.

छुपी बेरोजगारी कोणत्या क्षेत्रात आढळते?

● ज्या ठिकाणी खुप अधिक लोकसंख्या आहे.अशा विकसित तसेच अविकसित देशात असलेल्या ग्रामीण क्षेत्रात प्रछन्न/छुपी बेरोजगारी अधिक प्रमाणात आढळुन येत असते.

See also  बौदध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश तसेच कोटस - Happy Buddha Purnima Wishes , Messages

● कारण ग्रामीण भागात औद्योगिक क्षेत्रांचा विकास फार अधिक झालेला नसतो.आणि ग्रामीण क्षेत्रात शेती हेच एक रोजगाराचे एकमेव साधन तसेच माध्यम आहे.त्यामुळे सर्व ग्रामीण भागातील व्यक्ती शेती मध्येच रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतात.म्हणुन ग्रामीण भागातील अधिकांश कामगार/मजदुर शेती व्यवसायात काम करत असताना आपणास दिसुन येत असतात.म्हणजेच शेती व्यवसायात काम करत असलेल्या मजदुरांची संख्या ग्रामीण भागातील लोकांमध्ये अधिक असते.

शहरी बेरोजगारी :

जी बेरोजगारी आपणास शहरी भागामध्ये विशेषकरून आढळुन येत असते.अशा बेरोजगारीच्या प्रकारास शहरी बेरोजगारी असे म्हणतात.

शहरी बेरोजगारीचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत-

सुशिक्षित बेरोजगारी :

ह्या बेरोजगारीच्या प्रकारात अशा व्यक्तींचा समावेश होतो ज्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता तसेच योग्यता असते.

म्हणजेच त्यांचे उच्च शिक्षण झालेले असते.त्यांच्याकडे डिग्री असते सर्टिफिकिट असते.सोबत अंगात स्कील देखील असते तरी देखील त्यांना रोजगार प्राप्त होत नसतो.अशा बेरोजगार व्यक्तीस आपण सुशिक्षित बेरोजगार म्हणुन संबोधित असतो.

सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण सध्या शहरी भागात साक्षर व्यक्तींच्या बाबतीत अधिक प्रमाणात वाढताना आपणास दिसुन येत आहे.

औद्योगिक बेरोजगारी :

आज लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे काम करत असलेल्या कामगार/मजदुरांची संख्या अधिक प्रमाणात वाढते आहे.

  • त्यातच ग्रामीण भागात रोजगार प्राप्त होत नसल्याने ग्रामीण भागातील लाखो बेरोजगार शहरात रोजगार प्राप्त करण्यासाठी येत असतात.याने औद्योगिक क्षेत्रात काम करत असलेल्या मजदुर तसेच कामगारांची संख्या अधिक वाढते.
  • पण अचानक औद्योगिक क्षेत्राचा विकासाचा दर कमी झाल्यामुळे काम करायची ईच्छा असुन देखील अनेक बेरोजगारांना काम दिले जात नाही.
  • अशा वेळेला उद्योग क्षेत्रात जी बेरोजगारीची अवस्था निर्माण होत असते त्या अवस्थेस औद्योगिक बेरोजगारी असे संबोधिले जात असते.

औद्योगिक बेरोजगारीचे प्रकार देखील काही प्रमुख प्रकार पडताना आपणास दिसुन येतात.

औद्योगिक बेरोजगारीचे प्रकार :

1)तांत्रिक बेरोजगारी :

2)संघर्षजन्य बेरोजगारी :

3)चक्रिय बेरोजगारी :

4)संरचनात्मक बेरोजगारी :

1)तांत्रिक बेरोजगारी :

आज माहीती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देश अधिक जास्त प्रगती करतो आहे.

See also  हर घर तिरंगा मराठी अणि हिंदी गाणे लिरिक्स ,कविता Har Ghar Tiranga Marathi,Hindi Song Lyrics And Poem

माणुस करू शकतो अशी अनेक कामे आज कमी मनुष्यबळ वापरून यंत्रादवारे केली जातात.

त्यातच आर्टिफिशल इंटलिजन्स आल्यामुळे मानव करतो अशी अनेक क्षेत्रातील कामे आज रोबोट करू शकतात ज्यामुळे आज मानवाची जागा यंत्राने घेतली असल्याने तांत्रिक बेरोजगारीचे प्रमाण देखील अधिक वाढत आहे.

2) संघर्षजन्य/घर्षणात्मक बेरोजगारी :

एखाद्या उद्योग क्षेत्रात कामगारांनी अचानक संपावर जाणे,मालाची टंचाई निर्माण होणे,कमी भांडवल,वीजेची कमी अशा विविध संघर्षमय परिस्थिती निर्माण झाल्यावर जी बेरोजगारीची परिस्थिती तसेच अवस्था निर्माण होते त्या परिस्थितीस संघर्षजन्य/घर्षणात्मक बेरोजगारी असे संबोधिले जाते.

3) चक्रिय बेरोजगारी :

जी बेरोजगारी व्यापार चक्रामुळे निर्माण होत असते अशा बेरोजगारीच्या प्रकारास तसेच अवस्थेस चक्रिय बेरोजगारी असे म्हटले जाते.

व्यापारात जेव्हा आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होत असते तेव्हा अनेक उद्योग धंदे अचानक बंद देखील पडताना आपणास दिसुन येत असतात.

वस्तु तसेच उत्पादनीच्या मागणीत घट होत असते ज्याचा खुप मोठा परिणाम रोजगारावर देखील होत असतो आणि याने चक्रिय बेरोजगारीचे प्रमाण वाढत असते.

4) संरचनात्मक बेरोजगारी :

अर्थव्यवस्थेत झालेले तसेच होत असलेले संरचनात्मक बदल हे ह्या प्रकारच्या बेरोजगारीस कारणीभुत ठरत असतात.

संरचनात्मक बेरोजगारी ही औद्योगिक क्षेत्रात खुप जास्त प्रमाणात आढळुन येते.जेव्हा उद्योग क्षेत्रात यंत्र सामग्रीचा अधिक प्रमाणात उपयोग केला जात असतो.

तेव्हा औद्योगिक क्षेत्रात काम करणारया मनुष्यबळाची आवश्यकता फार कमी पडत असते.ज्याने औद्योगिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी कमी कमी होत जातात.

अशा प्रकारच्या बेरोजगारीस संरचनात्मक बेरोजगारी असे संबोधिले जात असते.

1 thought on “बेरोजगारीचे प्रकार-Types Of Unemployment In Marathi”

Comments are closed.