चालु आणि ताज्या घडामोडी – 1 ते 10 मे 2022 – Current affairs in Marathi

चालु आणि ताज्या घडामोडी – 1 ते 10 मे 2022 – Current affairs in Marathi

1)गोपाळ कृष्ण गोखले यांची जयंती नुकतीच कधी साजरा करण्यात आली होती?

– नुकत्याच 9 मे 2022 रोजी सोमवारी गोपाळ कृष्ण गोखले यांची जयंती साजरा करण्यात आली होती.

● गोपाल कृष्ण गोखले हे एक थोर भारतीय स्वातंत्रता सेनानी आहेत.भारतीय स्वातंत्र्य चळवळी मध्ये भाग घेणारे एक क्रांतीकारक तसेच भारतीय राजकीय नेते,समाजसुधारक देखील होते.

● गोपाळ कृष्ण गोखले हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते.याचसोबत ते सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे संस्थापक देखील होते.

2)कोणते राज्य सरकार लोकांमध्ये असलेल्या जीवनशैली संबंधी आजारांचे निदान करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी शैली अँप लाँच करत आहे?

-केरळ सरकार कडुन लोकांमध्ये असलेल्या जीवनशैली संबंधी आजारांचे निदान करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी शैली अँप लाँच करण्यात येणार आहे.

3) नुकताच साजरा करण्यात आलेला जागतिक हात स्वच्छता दिवस किती तारखेला साजरा करण्यात आला होता?

-नुकताच साजरा करण्यात आलेला हात स्वच्छता दिवस 5 मे रोजी साजरा करण्यात आला होता.आणि दर वर्षी हा जागतिक हात स्वच्छता दिवस जगभरात 5 मे रोजीच साजरा केला जात असतो.

● 2022 मध्ये साजरा केल्या गेलेल्या हात स्वच्छता दिनाची मेन थीम सुरक्षेसाठी सगळयांनी एकत्र यावे आणि आपापले हात स्वच्छ करावे ही ठेवण्यात आली होती.

4) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडुन जागतिक व्यापार शिखर परिषद जितो कनेक्टचे उदघाटन कोठे करण्यात आले होते?

-भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडुन जागतिक व्यापार शिखर जितो कनेक्टचे उदघाटन महाराष्ट राज्यामध्येच करण्यात आले होते.

5) कोणत्या देशाकडुन 20 दशलक्ष घनफुट एवढ्या गँस निर्मितीची क्षमता असलेल्या नवीन वायु क्षेत्राला उघडण्यात आले आहे?

-बांग्लादेश ह्या देशाकडुन 20 दशलक्ष घनफुट एवढया गंस निर्मितीची क्षमता असलेल्या नवीन वायुक्षेत्राला उघडण्यात आले आहे.

● बांग्लादेश ह्या देशाच्या पंतप्रधान शेख हसीना ह्या आहेत.बांग्लादेश ह्या देशाची राजधानी ढाका आहे.आणि येथील चलन हे टका हे आहे.

6) नुकत्याच प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार भारतातील असे कोणते राज्य आहे जिथे सर्वात जास्त लिंग गुणोत्तर नोंदवण्यात आले आहे?

-नुकत्याच प्रकाशित केलेल्या एका अहवालाप्रमाणे भारतातील लडाख येथे सर्वात जास्त लिंग गुणोत्तराची नोंदणी करण्यात आली आहे.

● लडाख येथे सर्वात जास्त लिंग गुणोत्तराची जी नोंद घेण्यात आली आहे ही नोंद 2020 च्या अहवालानुसार करण्यात आली आहे.

● 2020 मध्ये भारत देशात जन्माच्या वेळेस 1104 इतक्या लिंग गुणोत्तराची नोंद केली गेली होती.

● लडाख हा जम्मु आणि काश्मीर येथील एक महत्वपुर्ण भाग आहे.आँगस्ट 2019 मध्ये भारतीय संसदेकडुन एक कायदा पास करण्यात आला ज्यानुसार 31 आँक्टोंबर रोजी लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणुन घोषित करण्यात आले.

7) नुकत्याच प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार भारतातील असे कोणते राज्य आहे जिथे सर्वात कमी लिंग गुणोत्तराची नोंदणी करण्यात आली आहे?

नुकताच जो अहवाल प्रकाशित करण्यात आला होता त्यानूसार भारतातील मणिपुर ह्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तराची नोंदणी केली गेली आहे.

● मणिपुर येथे सर्वात जास्त लिंग गुणोत्तराची जी नोंद घेण्यात आली आहे ही नोंद 2020 च्या अहवालानुसारच केली गेली आहे.

8) डिफेंडर युरोप 2022 तसेच स्वीप्ट रिस्पाँन्स 2022 ह्या युदध सरावाचे आयोजन कुठल्या देशांमध्ये केले गेले होते?

-डिफेंडर युरोप 2022 तसेच स्वीप्ट रिस्पाँन्स 2022 ह्या युदध सरावाचे आयोजन नाटो देशांमध्ये केले गेले होते.

● नाटोचा फुल फाँर्म (north atlantic treaty organization) उत्तर अटलांटिक करार संघटना असा होतो.

● नाटोचे मुख्य कार्यालय बेल्जिअम येथे आहे.

● नाटोची मेंबरशीप एकुण तीस देशांकडे आहे.

9) व्हाईट व्हाऊसचा प्रथम कृष्णवर्णीय,गौरवर्णीय प्रेस सचिव म्हणुन कोणाची नियुक्ती केली जाणार आहे?

व्हाईट व्हाऊसचा प्रथम कृष्ण वर्णीय प्रेस सचिव म्हणुन करीन जिन पीयर यांची नियुक्ती केली जाणार आहे.

See also  दहावी बारावी निकालाची संभाव्य तारीख घोषित - SSC and HSC exam result date latest update in Marathi

10) जागतिक अन्न पुरस्कार 2022 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले होते?

जागतिक अन्न पुरस्कार 2022 देऊन सिंथिया रोझेन्विग यांना सन्मानित करण्यात आले होते.

11) एचपी सीएलचे(हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन) नवीन अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक कोण बनणार आहेत?

एचपी सीएलचे(हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन) नवीन अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक पदी पुष्प कुमार जोशी यांची नियुक्ती केली जाणार आहे.

मुकेश सुराना यांच्या ठिकाणी पुष्प कुमार जोशी यांची नियुक्ती केली जाणार आहे.

12) जागतिक अस्थमा दिवस प्रत्येक वर्षी कधी साजरा केला जात असतो?

दर वर्षी मे महिन्यात येत असलेल्या पहिल्या मंगळवारी जागतिक अस्थमा दिवस साजरा केला जातो.

● ह्या वर्षी 2022 मधील मे महिन्यातील पहिल्या मंगळवारी 3 तारीख रोजी जागतिक अस्थमा दिवस होता.ज्याची थीम ही closing gaps in asthma care ही होती.

13) भारत देशातील 28 वे लष्कर प्रमुख पद मिळविण्याचा मान कोणाला प्राप्त झाला आहे?

भारत देशातील 28 वे लष्कर प्रमुख पद मिळविण्याचा मान मनोज पांडे यांना मिळाला आहे.

● याआधी भारताचे 27 वे लष्कर प्रमुख मनोज नरवणे हे होते.

● 26 वे लष्कर प्रमुख बिपीन रावत होते.

● आणि 25 वे लष्कर प्रमुख दलबीर सिंग हे होते.

14) टी टवेंटी क्रमवारीमध्ये जगातील पहिल्या क्रमांकाची टीम कोणती बनली आहे?

टी टवेंटी क्रमवारीमध्ये जगातील पहिल्या क्रमांकाची टीम बनण्याचा मान भारत ह्या देशाला मिळाला आहे.

15) जिव्हाळा नावाच्या कर्जयोजनेचा आरंभ कोणत्या राज्य सरकारकडुन करण्यात आला आहे?

महाराष्ट सरकारकडुन जिव्हाळा ह्या कर्जयोजनेची सुरूवात करण्यात आली आहे.

● जिव्हाळा ही एक विशेष कर्ज योजना आहे आणि ह्या योजनेअंतर्गत महाराष्टातील सर्व तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैदयांना कर्ज दिले जाणार आहे.

● ह्या योजनेचा लाभ तेच कैदी घेऊ शकतात जे तीन वर्षापेक्षा अधिक काळापासुन तुरूंगात शिक्षा भोगत आहे.

● ह्या योजनेअंतर्गत कैदींना पहिले ५० हजाराचे कर्ज दिले जाणार आहे.ज्यावर सात टक्के इतके व्याज आकारले जाणार आहे.

● हे कर्ज घ्यायला कोणत्याही गँरेंटरची आवश्यकता नसते तसेच तारण ठेवण्याची देखील गरज नसते.

16) स्पँनिश फुटबाँल लिगमध्ये लीगा 2022 चे विजेतेपद कोणत्या संघाला प्राप्त झाले आहे?

स्पँनिश फुटबाँल लिगमध्ये लीगा 2022 चे विजेतेपद जिंकण्यात रिअल माद्रिद या संघाला यश प्राप्त झाले आहे.

17) कोणत्या देशामधल्या दोन विदयाथ्यांनी नासा रोव्हर चँलेज जिंकण्यात यश प्राप्त केले आहे?

भारत देशामधल्या दोन विदयाथ्यांनी नासा रोव्हर चँलेज जिंकण्यात यश प्राप्त केले आहे.

आणि हे दोन विदयार्थी तामिळनाडु आणि पंजाब येथील आहेत ज्यांनी हे नासा 2022 human exploration रोव्हर चँलेंज जिंकले आहे.

● नासा हे एक संशोधन केंद्र आहे.ज्याची 1आँक्टोंबर 1958 मध्ये करण्यात आली होती.याचे मुख्य कार्यालय युनायटेड स्टेट वाँशिंग्टन येथे स्थापित केले गेले आहे.

18) कोणत्या कंपनीकडुन पेट्रोलबरोबर 15 टक्के मिथेनाँल मिश्रित असलेले एम 15 पेट्रोल लाँच करण्यात आले आहे?

आय ओ सी एल(indian oil corporation limited) ह्या कंपनीकडुन पेट्रोलबरोबर 15 टक्के मिथेनाँल मिश्रित असलेले (m15) पेट्रोल लाँच करण्यात आले आहे.

19) मेडिमिक्स ह्या आयुर्वैदिक पर्सनल केअर ब्रँण्डकडुन ब्रँण्ड अँम्बेसेडर म्हणुन कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?

मेडिमिक्स ह्या आयुर्वैदिक पर्सनल केअर ब्रँण्ड यांनी आपला ब्रँण्ड अँम्बेसेडर म्हणुन बाँलिवुड अभिनेत्री कँटरीना कैफ यांना नियुक्त केले आहे.

20) कोणत्या देशाकडुन थाँमस कप फायनलमधील 32 व्या टप्प्यातुन माघार घेण्यात आली आहे?

न्युझीलँड ह्या देशाकडुन थाँमस कप फायनलमधील 32 व्या टप्प्यातुन माघार घेण्यात आली आहे.कारण न्युझीलँड टीममधील काही खेळाडु कोरोना पाँझिटिव्ह आढळले आहेत.

● थाँमस कप हा बँटमिंटन ह्या खेळाशी संबंधित चषक आहे.

21) गुगलच्या सार्वजनिक धोरणाच्या प्रमुख पदाकरीता कोणाची निवड करण्यात आली आहे?

See also  दिनविशेष 8 मे 2033- Dinvishesh 8 May 2023

गुगलच्या सार्वजनिक धोरणाच्या प्रमुख पदाकरीता अर्चना गुलाटी यांची निवड करण्यात आली आहे.

● गुगल ही एक युएस ए मधील स्थित साँफ्टवेअर कंपनी आहे.

● गुगल ह्या कंपनीचे संस्थापक लँरी पेज आणि उपसंस्थापक सर्जे ब्रीन हे आहेत,गुगलचे सीईओ सुंदर पिचाई हे आहेत.

22) आंतरराष्टीय आहार प्रतिबंध दिवस दर वर्षी कधी साजरा केला जातो?

आंतरराष्टीय आहार प्रतिबंध दिवस दर वर्षी 6 मे रोजी साजरा केला जातो.

23) असे कोणते राज्य आहे ज्याने पुरवठा साखळी आँपरेटर्सचा एक पुल तयार करायला फ्लीपकार्टसोबत अँग्रीमेंट केले आहे?

पश्चिम बंगाल राज्याने पुरवठा साखळी आँपरेटर्सचा(supplier chain opearators) एक पुल तयार करायला फ्लीपकार्टसोबत अँग्रीमेंट केले आहे.

24) सातवे जागतिक स्नुकुर हे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

राँनी आँस्सुलिव्हन यांनी सातवे जागतिक स्नुकुर हे विजेतेपद पटकावले आहे.

25) टेस्ला कंपनीचा फाऊंडर इलाँन मस्कने किती बिलियनमध्ये टविटर विकत घेतले?

टेस्ला कंपनीचा फाऊंडर इलाँन मस्कने 44 बिलियनमध्ये टविटर विकत घेतले.

26) टाटा डिजीटलचे नवीन चेअरमन कोण आहे?

टाटा डिजीटलच्या नवीन चेअरमनपदी एन चंद्रशेखरन यांना नियुक्त केले आहे.

27) भारतातील पहिली कंपनी कोणती आहे जिने 19 लाख कोटी इतके एम कँप गाठण्यात यश प्राप्त केले आहे?

रिलायन्स ही भारतातील पहिली कंपनी आहे जिने 19 लाख कोटी इतके एम कँप गाठण्यात यश प्राप्त केले आहे.

28) आंतराराष्टीय कामगार दिन कधी साजरा केला जातो?

दर वर्षी आंतरराष्टीय कामगार दिन 1 मे रोजी साजरा केला जातो.

● ह्या वर्षी 1 मे रविवार रोजी कामगार दिवस साजरा केला गेला होता.

29) 2022-2023 मधील नास्काँमच्या अध्यक्षपदासाठी कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?

2022-2023 मधील नास्काँमच्या अध्यक्षपदासाठी कृष्णन रामानुजन यांना नियुक्त करण्यात आले आहे.

30) जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहे?

जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा बहुमान गौतम अदानी यांनी मिळवला आहे.

31) व्हँक्युम आधारीत गटार असणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे?

व्हँक्युम आधारीत गटार असणारे भारतातील पहिले शहर आग्रा हे आहे.

32) डेअरी सामुहिक रेडिओ स्टेशन दुधवानीची स्थापणा कोठे करण्यात आली आहे?

डेअरी सामुहिक रेडिओ स्टेशन दुधवानीची स्थापणा गुजरात या राज्यामध्ये करण्यात आली आहे.

33) 2022 मधील बँटमिंटन आशिया चँम्पियनशीप ही कुठे होती?

2022 मधील बँटमिंटन आशिया चँम्पियनशीप ही फिलिपिन्स येथे होती.

34) भारतीय सेनेच्या नवीन उपाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

भारतीय सेनेच्या नवीन उपाध्यक्षपदी बी एस राजु यांची निवड करण्यात आली आहे.

बी एस राजु यांची भारतीय सेनेच्या 44 व्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

35) भारतीय सेनेच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

भारतीय सेनेच्या नवीन अध्यक्षपदी मनोज पांडे यांची निवड करण्यात आली आहे.

36) कोणता दिवस उज्वला दिन म्हणुन साजरा करण्यात येतो?

1 मे हा दिवस उज्वला दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.

37) नुकत्याच प्रकाशित केलेल्या जागतिक आनंद अहवालात भारताचा एकूण कितवा क्रमांक लागतो?

नुकत्याच प्रकाशित केलेल्या जागतिक आनंद अहवालात भारताचा एकूण 136 वा क्रमांक लागतो.आणि यात प्रथम क्रमांकावर फिनलँड हा देश आहे.

38) प्रेस फ्रीडम डे कधी साजरा केला जात असतो?

प्रेस फ्रीडम डे हा दरवर्षी 3 मे रोजी साजरा केला जात असतो.

39) अमित शहा आणि भाजपा यांची वाटचाल ह्या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?

अमित शहा आणि भाजपा यांची वाटचाल ह्या पुस्तकाचे लेखन ज्योत्सना कोल्हटकर ह्या लेखिकेने केले आहे.

40) राष्टीय अनुसुचित जातीच्या आयोगाच्या अध्यक्षपदासाठी कोणाला नियुक्त केले गेले आहे?

राष्टीय अनुसुचित जातीच्या आयोगाच्या अध्यक्षपदासाठी विजय सापला यांची नियुक्ती केली गेली आहे.

41) जगातील सर्वात उंच अशा इलेक्ट्रिक कार चार्जिग स्टेशनचे उदघाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे?

जगातील सर्वात उंच अशा इलेक्ट्रिक कार चार्जिग स्टेशनचे उदघाटन हिमाचल प्रदेश येथे करण्यात आले आहे.

See also  नॅनो DAP , नॅनो Urea - TSP- दर्जेदार खतां करता सरकारची एक मोठी योजना -NanoUrea a step towards Sustainable farming to achieve 'Sahakar Se Samriddhi

42) नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते कँन्सर केअर सेंटरचे उदघाटन कोठे करण्यात आले?

नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते कँन्सर केअर सेंटरचे उदघाटन आसाम या राज्यात करण्यात आले आहे.

43) कोळसा खाण कामगार दिन कधी साजरा करण्यात येतो?

कोळसा खाण कामगार दिन दर वर्षी 4 मे रोजी साजरा करण्यात येतो.

44) आशिया बँटमिंटन चँम्पिअयनशीप 2022 मध्ये पीव्ही सिंधु हिने कोणते पदक जिंकण्यात यश प्राप्त केले आहे?

आशिया बँटमिंटन चँम्पिअयनशीप 2022 मध्ये पीव्ही सिंधु हिने कांस्य पदक जिंकण्यात यश प्राप्त केले आहे.

45) भारतातील प्रथम इथेनाँल प्रकल्पाचे उदघाटन कोठे करण्यात आले?

भारतातील प्रथम इथेनाँल प्रकल्पाचे उदघाटन बिहार ह्या राज्यामध्ये करण्यात आले आहे.

46) सीडीबीटीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

सीडीबीटीच्या नवीन अध्यक्षपदी संगीता सिंग यांची निवड करण्यात आली आहे.

47) भारताच्या परराष्टीय सचिव पदाचे पद आता कोणी सांभाळले आहे?

भारताच्या परराष्टीय सचिव पदाचे पद आता विनय मोहन क्वात्रा यांनी सांभाळले आहे.

विनय मोहन क्वात्रा हे भारताचे 44 वे परराष्टीय सचिव पद भुषवणार आहेत.

48) राजस्थान येथील मिया बाँ वाडा ह्या रेल्वे स्थानकाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे?

राजस्थान येथील मिया बाँ वाडा ह्या रेल्वे स्थानकाचे नवीन नाव महेश नगर हाँल्ट असे ठेवण्यात आले आहे.

49) प्रथम केरळ आँलम्पिक गेम्सची सुरूवात कोठे झाली आहे?

प्रथम केरळ आँलम्पिक गेम्सची सुरूवात केरळ,तिरूवनंतमपुरम येथे झाली आहे.

50) लेट मी सी इट माऊ ह्या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?

लेट मी सी इट माऊ ह्या पुस्तकाचे लेखन राकेश।मारिया ह्या लेखकाने केले आहे.

51) कोणत्या राज्यात आजारी आणि जखमी गायींकरीता रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे?

आसाम राज्यात आजारी आणि जखमी गायींकरीता अँम्बुलन्स सर्विस सुरू करण्यात आली आहे.

52) आंतरराष्टीय अग्नीशमन दिवस कधी साजरा केला जात असतो?

आंतरराष्टीय अग्नीशमन दिवस 4 मे रोजी साजरा केला जात असतो.

53) काँर्बेट व्याघ्र प्रकल्पाच्या नवीन संचालकपदी कोणाची नेमणुक करण्यात आली आहे?

काँर्बेट व्याघ्र प्रकल्पाच्या नवीन संचालकपदी नरेशकुमार यांची नेमणुक करण्यात आली आहे.

54) पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवीन सल्लागार कोण आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवीन सल्लागार तरुण कपुर हे आहे.

55) खेलो इंडिया युनिव्हसिटी गेम 2021 चे विजेतेपद कोणी प्राप्त केले आहे?

खेलो इंडिया युनिव्हसिटी गेम 2021 चे विजेतेपद जैन युनिव्हर्सिटीने प्राप्त केले आहे.

56) जगातील पहिले असे विमानतळ जे टँक्सी उडविण्याचे काम करत आहे?

एअर बर्न व्हँटीपोर्ट (इंग्लंड) हे जगातील पहिले असे विमानतळ आहे जे टँक्सी उडविण्याचे काम करत आहे.

57) लीडर पाँलिटिशियन आणि सीटीजन ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

लीडर पाँलिटिशियन आणि सीटीजन ह्या पुस्तकाचे लेखक रशीद किडवाई आहे.

58) 2022 मधील संतोष ट्राँफी कोणी जिंकली आहे?

2022 मधील संतोष ट्राँफी केरळ ह्या राज्याने जिंकली आहे.

59) कोणत्या राज्यात मुख्यमंत्री मितान योजनेचा आरंभ करण्यात आला आहे?

कोणत्या राज्यात मुख्यमंत्री मितान योजनेचा आरंभ छत्तीसगढ ह्या राज्यात करण्यात आला आहे.

60) अँमेझाँनचे नवीन सीईओ कोण बनणार आहे?

अँमेझाँनचे नवीन सीईओ अँडी जँस्सी बनणार आहेत.

61) जागतिक अँथँलेटिक्स दिवस कधी साजरा केला जातो?

जागतिक अँथँलेटिक्स दिवस 7 मे रोजी साजरा केला जातो.

62) वल्ड बँकेकडुन श्रीलंका ह्या देशाला किती रुपयांची मदत केली आहे?

वल्ड बँकेकडुन श्रीलंका ह्या देशाला 600 करोड रुपयांची मदत केली आहे.

63) सामाजिक जागरुकता मोहीम साँस कोठे सुरू करण्यात आली?

सामाजिक जागरुकता मोहीम साँस कनार्टक येथे सुरू करण्यात आली.

64) प्रथम लता दिनानाथ मंगेश पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले आहे?

प्रथम लता दिनानाथ मंगेश पुरस्काराने नरेंद्र मोदी ह्यांना गौरविण्यात आले आहे.