केवायसी म्हणजे काय? – KYC meaning in Marathi

केवायसी म्हणजे काय? – KYC meaning in Marathi

मित्रांनो जेव्हा आपण बँक तसेच कुठल्याही इतर वित्तीय क्षेत्रात सहभागी होत असतो तेव्हा आपणास केवायसी प्रक्रियेची गरज भासत असते.

केवायसी हा शब्द नेहमी अनेकदा आपणास बँकेत वित्तीय क्षेत्रात तसेच एखाद्याच्या तोंडुन बोलताना ऐकायला मिळत असतो.

पण केवायसी म्हणजे नेमकी काय असते?हे आपल्यातील बहुतेक जणांना माहीत नसते.

याचकरीता आजच्या लेखात आपण केवायसी म्हणजे काय?केवायसी प्रक्रिया काय असते?ही प्रक्रिया का केली जाते?ह्या प्रक्रियेचे महत्व काय आहे इत्यादी सर्व महत्वपूर्ण बाबींविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

केवायसीचा फुलफाँर्म काय होतो?KYC full form in Marathi

केवायसीचा फुलफाँर्म know your customer असा होत असतो.याचा मराठीत अर्थ आपल्या ग्राहकास जाणुन घेणे असा होत असतो.

केवायसी म्हणजे काय?KyC meaning in Marathi

केवायसी ही एक विशिष्ट अशी प्रक्रिया आहे जिच्याअंतर्गत एखादी बँक तसेच वित्तीय संस्था कंपनी केवायसी डाँक्युमेंटदवारे फाँर्म भरून घेऊन आपल्या कस्टमरची ओळख अणि पत्ता प्राप्त करून घेत असते.कस्टमरविषयी माहीती जाणुन घेत असते.

केवायसी प्रक्रिया हे सुनिश्चित करण्याचे काम करते की कस्टमरकडुन बँकेच्या कंपनीच्या सदर वित्तीय संस्थेच्या सर्विसचा दुरूपयोग केला जाणार नाही.

म्हणूनच बँकेने खातेधारकांना कस्टमरला केवायसी कंडिशननुसार कालांतराने अपडेट करणे गरजेचे असते.

केवायसी का महत्वाचे असते?importance of kyc in Marathi

केवायसी प्रक्रिया ही कस्टरची ओळख पडताळणी करून घेण्यासाठी केली जाते.

केवायसी प्रक्रियेच्या अंतर्गत बँक तसेच वित्तीय संस्था कंपनी तिच्या कस्टमरचा अँड्रेस अणि इतर आवश्यक माहीती जाणुन घेत असते.

याचा बँकेला,कंपनीला,वित्तीय संस्थेला हा फायदा होतो की समजा एखाद्या व्यक्तीने बँकेची संस्था कंपनीची फसवणुक करण्याच्या हेतुने त्याची चुकीची ओळख जर दिली तर बँक,कंपनी,वित्तीय संस्था यांना हे लगेच लक्षात येऊन जाते.याने पुढचा होणारा धोका फसवणुक टळत असते.

See also  पुदिना (Mint) चे फायदे -Pudina information in Marathi

म्हणुनच बँक वित्तीय संस्था कंपनी यांच्यासाठी केवायसी करणे खुप महत्वपूर्ण असते.

केवायसीची गरज कुठे कुठे असते?

केवायसीची आवश्यकता बँकेत,वित्तीय संस्थेत,कंपनीत आँनलाईन शाँपिंग करताना,डिमँट अकाऊंट ओपनिंगमध्ये भासत असते.

आँनलाईन पदधतीने गुगल पे फोन पे सारख्या अँप्सवर रजिस्टर करण्यासाठी केवायसीची आवश्यकता असते.

जेव्हा आपण मोबाइलच्या दुकानातुन एखादे नवीन सिम कार्ड विकत घेत असतो.तेव्हा आपण कोण आहोत आपला पत्ता काय आहे ही आपली खरी ओळख पटवून देण्यासाठी तिथे आपले आधार कार्ड मागितले जाते ही प्रक्रिया देखील केवायसी प्रक्रियाच असते.जेणेकरून कुठलीही अनोळखी व्यक्ती आपल्या नावाने सिम कार्ड काढुन आपल्या नावाचा फ्राँड गुन्हेगारी प्रक्रियेसाठी वापर करू शकणार नाही.

जेव्हा बँकेतील आपले खाते अचानक बंद पडते तेव्हा ती खाते पुन्हा चालु करण्यासाठी बँक आपल्याकडे केवायसी डाँक्युमेंट मागते जेणेकरून ते खाते आपलेच आहे का हे बँकेला जाणुन घेता येते.हा सुदधा केवायसीचाच प्रकार असतो.

लोन अँप वरून आँनलाईन लोनसाठी अँप्लाय करताना देखील केवायसी प्रक्रिया केली जात असते.

आता आपण कोणत्याही बँकेत आपले खाते ओपन करायला गेलो तर तिथे देखील केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.आरबीआयकडुन तशी सर्व बँकांना सुचना देण्यात आली आहे.

केवायसी प्रक्रियेसाठी आपणास कोणकोणते महत्वाचे डाँक्युमेंट लागत असतात?

● आधार कार्ड

● मतदान कार्ड

● पासपोर्ट साईज दोन फोटो

● पँन कार्ड

● ड्राईव्हिंग लायसन्

सर्व केवायसी डाँक्युमेंटवर आपला पत्ता असणे गरजेचे असते.जर एखाद्या डाँक्युमेंटमध्ये आपला पत्ता दिलेला नसेल तर आपण त्याजागी दुसरे डाँक्यूमेंट ज्यात आपला पत्ता दिला आहे ते जोडायला हवे.

केवायसी प्रक्रिया कधी सुरू करण्यात आली होती?

२००२ साली भारत सरकार कडून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.अणि २००४ मध्ये सर्व बँकेकडुन ह्या प्रक्रियेचा अवलंब करण्याची घोषणा करण्यात आली होती.

केवायसी प्रक्रिया आँफलाईन पदधतीने करता येते की आ़ँनलाईन?

See also  MPSC आणि UPSC या दोघांमध्ये काय फरक आहे? -DIFFERENCE BETWEEN MPSC AND UPSC

केवायसी प्रोसेस आपण आँफलाईन अणि आँनलाईन या दोघांपैकी कुठल्याही एका पदधतीचा वापर करून पार पाडु शकतो.यावरून केवायसीचे दोन प्रकार पडतात.ई केवायसी अणि सी केवायसी.

1) Ekyc –

ई केवायसीचा फुलफाँर्म काय होतो?E kyc full form in Marathi

ई केवायसीचा फुलफाँर्म electronic know your customer असा होत असतो.ही प्रक्रिया आँनलाईन म्हणजेच डिजीटल पदधतीने पार पडत असते.

यात आपणास पेपरलेस पदधतीने आँनलाईन प्रोसेस करता येते.फिजिकल स्वरुपात प्रत्यक्ष डाँक्युमेंट देण्याची आवश्यकता नसते.

म्युच्अल फंडमध्ये पैसे गुंतवण्यासाठी डिमँट अकाउंट ओपन करण्यासाठी आपणास आँनलाईन पदधतीने केवायसी करावे लागते.यात आपणास आँनलाईन फाँर्म भरावा लागतो सोबत आवश्यक ती डाँक्युमेंट त्याला स्कँन करून अँटँच करावी लागतात अणि ती अपलोड करावी लागतात.

2)CKYC –

सी केवायसीचा फुलफाँर्म काय होत असतो?C kyc full form in Marathi

सी केवायसीचा फुलफाँर्म central know your customer असा होत असतो.ही प्रक्रिया सर्व बँकामध्ये वापरण्यात येते.यात आपणास आँफलाईन पदधतीने केवायसी प्रक्रिया करावी लागते यासाठी आपल्याला बँकेत प्रत्यक्ष जाऊन फाँर्म भरावा लागतो सोबत केवायसी डाँक्युमेंट देखील त्या फाँर्मला जोडावे लागतात.

आँफलाईन तसेच आँनलाईन पदधतीने केवायसी प्रक्रिया कशी केली जाते?

बँकेतील आँफलाईन केवायसी प्रक्रिया –

आँफलाईन केवायसी प्रोसेस पार पाडण्यासाठी आपणास आवश्यक ती केवायसी डाँक्युमेंट घेऊन सर्वप्रथम बँकेत जावे लागेल.

मग तिथे आपणास एक फाँर्म दिला जातो तो व्यवस्थित भरून घ्यावा.आवश्यक त्या कागदपत्रांची झेराँक्स काढुन घ्यावी अणि फाँर्मला सर्व महत्वपूर्ण कागदपत्रांच्या एक किंवा दोन झेराँक्स जोडुन घ्याव्यात.अणि शेवटी फाँर्म बँकेत जमा करायचा.

म्युच्अल फंड तसेच डिमँट अकाउंट ओपनिंगसाठी आँनलाईन लोनसाठी अँप्लाय करताना आँनलाईन केवायसी प्रक्रिया –

जेव्हा आपण आँनलाईन डिमँट अकाऊंट ओपन करत असतो तसेच म्युच्अल फंडमध्ये पैसे गुंतवत असतो एखाद्या लोन अँपवरून आँनलाईन लोनसाठी अँप्लाय करत असतो तेव्हा आपणास केवायसी व्हेरीफिकेशन प्रोसेस करावी लागत असते.

See also  RAM आणि ROM या दोघांमध्ये काय फरक आहे? -Difference Between Ram And Rom In Computers in Marathi

यात आपणास मोबाइल कँमेरा युझ करून काही महत्वाची डाँक्युमेंट स्कँन करावी लागतात अणि मग ती केवायसी प्रोसेससाठी अपलोड करावी लागतात.मग आपले केवायसी व्हेरीफिकेशन यशस्वीरीत्या पुर्ण होत असते.

केवायसीमुळे लोन देत असलेल्या बँक तसेघ वित्तीय संस्थेला आपली जुनी हिस्ट्री आपले फायनान्शिअल बँकग्राऊंड,खरी ओळख नाव पत्ता जाणुन घेण्यास मदत होते.

म्हणुन केवायसी व्हेरीफीकेशन सर्व ठिकाणी अनिवार्य अणि बंधनकारक करण्यात आले आहे.

केवायसीचे फायदे –

● केवायसीमुळे फसवणुकीला गुन्हेगारी प्रवृत्तीला गुन्हेगारी कृत्यांना आळा बसतो.ग्राहकाने खोटी माहीती दिली फसवणुक करण्याचा प्रयत्न केला तर तो त्वरीत पकडला जात असतो.

● बँक वित्तीय संस्था कंपनीला आपल्या कस्टमरविषयी सर्व आवश्यक वैयक्तिक माहीती नाव पत्ता जाणुन घेता येते.त्याचे जूने फायनान्शिअल रेकाँर्ड चेक करता येते.

● याने बँकिंग तसेच इतर आर्थिक सेवेचा सुविधांचा गैरवापर होत नाही.