Bhagavad Gita In Marathi
भगवतगीता-प्रास्तविक -Bhagavad Gita In Marathi
ज्ञान व कर्म यांचा संबंध काय आहे?( लाग). ज्ञान व कर्म यांचा भक्तिशी काय संबंध आहे? या रहस्याचा भगवतगीता उलगडा करते.युद्धक्षेत्रावर अर्जुन निप्र्कियतेचे समर्थन करतो. आपली भूमिका योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी धर्म सांगतो.
समाजात असे भाष्य बोलणे ब ऐकणे मनुष्याला नवखे नसते. अशा भाष्याला भगवतगीता प्रज्ञाबाद संबोधते. व ज्यामुळे मार्गातील संशय दुर होतो, ते ज्ञानाचे कार्य असते. या ज्ञानाला प्रकाश संबोधले आहे.
याचसाठी सॉक्रेटिस प्रसिद्ध आहे, ज्याच्या शहाणपणामुळेच ज्ञानविज्ञानाची बीजे युरोपात पेरल्या गेली.
ज्ञानविज्ञानाचा कार्यात वापर होतो. ज्ञानामुळे विश्वासाने मनुष्य कार्य करतो. याच ज्ञानविज्ञानाचा मुळ स्रोत ईश्वर आहे. म्हणुन कर्माद्वारे भक्ति साधल्यामुळे विकासाच्या मुख्य मार्गावर असतो.
सर्वकर्मअखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते।|(४-३३)
जगाचा इतिहास कर्तृत्वाचा इतिहास असतो. ज्ञान व कर्म या दोहोंचा मेळ बसवुन कर्तृत्व क्षमता साध्य होते. तर कर्तृत्वाला भक्तिची जोड दिली तर तो मार्ग नीतिचा होतो, विजयाचा होतो, समृद्धिचा होतो. या मार्गात उर्जा असते. हाच भगवतगीतेचा संदेश आहे.
य॒त्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:|
तत्र श्री विजयो भूतिः धृवा नीतिः मतिर्मम|॥(१८-७८)
भगवतगीता १. अर्जुनविषादयोग
“धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे” या महत्वाच्या शब्दांनी भगवतगीता सुरु होते. हे शब्द नीति व व्यवहार दर्शवितात. व्यवहारात पांडवांना न्याय मिळाला नाही म्हणुन न्यायनिवाड्यासाठी धर्मयुद्ध हा शेवटचा पर्याय ठरतो. अर्जुन भीष्माचार्य, द्रोणाचार्य यांना पाहन भावविवश होतो व सर्व स्वजन मरण्यासाठी येथे जमले आहेत या विचाराने गर्भगळित होतो. आपली व्यथा श्रीकृष्णाजबळ व्यक्त करतो.
त्याचे विचारचक्र सुरु होते. -कांहितरी वाईट घडणार आहे!म्हणुन… -कशासाठी येथे आपण आहोत याचा आढावा घेतो. स्वतःला सुखासाठी राज्य नको, विजयाचीही इच्छा नाही.
धर्मात स्वार्थ ब परमार्थ या शब्दांचा वापर होतो. दुर्योधन व अर्जुन यांचे दोन शब्दांचे दर्शन देते. दुर्योधन आचार्यांना दोन्ही सेनेचा परिचय करुन देतो, तेंव्हा हे सर्ब शुर योद्धा माझ्यासाठी प्राण देण्यास तयार आहेत (मदर्थ त्यक्त जिविता:) असा उल्लेख करतो. तर अर्जुन परमार्थ साधण्यासाठी म्हणतो,
ए्षां अर्थे कांक्षितं नो राज्यं भोग: सुखानि च|
त इमे अवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक््त्वा धनानि च|
ज्यांच्यासाठी राज्य मिळवायचे, ते सर्व येथे प्राण व धन दोन्हींचा त्याग करुन येथेच जमले आहेत. व त्यांनाच मारुन त्रिलोकाचे राज्य मिळाले तर ते अयोग्य होईल.
*धर्म परमार्थ सांगतो, ब आपण उलट चालत आहोत. यामुळे पापाचरण होईल. लोभाने, स्वार्थाने यांना(कौरवांना) हे पातक(कुलक्षय)दिसत नाही, पण आपण शहाणे आहोत, म्हणुन पापाचरणापासुन निवृत्त होणे आपले कर्तव्य आहे.
-कुलक्षयामुळे कुलधर्म नष्ट होईल, स्वैरता बाढेल. समाजात संकर होईल , पिंडदान नष्ट होतील. हा धर्म नष्ट होण्यास वर्णसंकर कारण होईल ब शाश्वत जातिधर्म, कुलधर्म नाहिसे होईल.
-धर्म नष्ट करण्यास कारणीभूत होणारे नरकात जातात हे आम्ही ऐकत आलेलो आहोत.
युद्धामुळे शोक होणार हे अर्जुन जाणतो. व शोककारक युद्ध करणे अयोग्य आहे, म्हणुन त्याला शोकापासुन निवृत्ति हबी होती. म्हणुन युद्ध करणे कसे चुकीचे आहे, हे दर्शवुन देतो. ब शेबटी आपली भूमिका धार्मिक, आदर्श आहे असा निष्कर्ष काढतो. व म्हणतो,अनवधानाने आम्ही लोभापायी स्वजनांची हत्या करण्यास निघालो होतो. म्हणुन मी निहत्य अवस्थेत शस्रधारी कौरवांकडुन मारल्या गेलो तेच माझ्यासाठी श्रेयस्कर आहे. असे बोलुन शोकग्रस्त अवस्थेत शसखहिन होतो.
चांगला व्यक्तिही सुखाची अपेक्षा करीत नसला तरी दुःख त्याला विचलित करते. तो दु:खापासुन सुटका पाहतो. भिक नको पण कुत्रा आवर अशी त्याची अवस्था होते. व या अवस्थेत आपल्या सोयीने सुटका करण्याचा प्रयत्न करतो, व आपली भूमिका योग्य कशी आहे हे सिद्ध करण्यात सुख शोधत असतो.
अर्जुन धर्माची भाषा बोलतो व आपल्या सोयीने धर्माचे अर्थ लावतो
मनुष्य ज्या धर्मात जन्माला आलेला आहे, त्याच्या धर्मविषयक संकल्पना कशा असतात हे येथे स्पष्ट होते.
परमार्थ! — कर्मकांड -जाती वर्ण –
स्वर्ग नरकवास हे अंतिम साध्य!
ग्रीता बोध अभ्यास
ग्रीतेतील अर्जुनाच्या बोलण्यातून जे प्रश्न उपस्थित झाले होते ते येथे दिले आहेत.
१ युद्धात स्वजनांना मारून कसे हित होईल?
२ परजनांना पारून कसे हित होईल?
३ कोणालाही मारून यश मिळवणे कसे योग्य होईल?
४ हे युद्ध विजयासाठी आहे कां कोणत्यातरी इतर उद्देशाने योजले आहे विधात्याने?
स्वप्रियजनांना सोडून हे सर्व शूर योद्धे युद्धात परण्यासाठी कां जपले आहेत?
६ हे सगळे माझे प्रियनन आम्हाला मारण्यासाठी कां एवढे उतावीळ झाले आहेत?
७ जरी हे आम्हाला पारण्यासाठी उतावीळ असले तरी प्री मात्र त्यांना मारण्यासाठी तयार नाही. केवळ
राज्य मिळवण्यासाठी अशी हिंसा करणे कितपत योग्य असेल?
ट कौरव जरी वाईट असले असले तरी त्यांना मारून आम्हाला पापच लागणार नाही का?
९ स्वजन कितीही वाईट असले तरी त्यांना मारणे व राज्य निळवणे हे कसे सुखप्रद होईल?
10 स्वजनांचा नाश केल्यामुळें कुळक्ष्य होणार हे स्पष्ट दिसत असतांना गी हे युद्ध कसे करू
११ कुळक्ष्यातून कुळधर्म (कुळाचे रितीरीवाज, परंपरा इत्यादी) डुडेल त्यामुळें अधर्माचा पगडा
समाजावर बसतो, त्यामुळें कुलिन स्त्रिया नष्ट होतात, ते पाप माझ्या पदरी पडेल, ते मी कां करावे?
१२ कुल्श्रिय ध्रष्ट झाल्या कीं, वर्णसंकर होईल, त्यामुळे कुळाचार (रद्ध, तर्यष इत्यादि विधी) लुप
होतील. तर्से झाले कीं, आमचे पितर अधोगतीला जातील ह्या सगळ्या गोष्टींना मी जबाबदार असणार,
तर हे करण्याने सला फ़क्त त्यात नुकसान दिसत आहे, तर अरे भगवंता, तू ज्ञानी आहेस म्हणून सला
योग्य सार्ग सण, माझी माती कृठीत झाली आहे, मला काही सुचत नाही.
केवळ राज्य मिळवण्यासाठी आम्ही हा केवढा मोठा प्रमाद करण्यास तयार झालो व तू त्यात आम्हाला
उत्तेजन देत आहेस, हे केवढे मोठे आश्चर्य
१४ असे महापातक करण्यापेक्षा मी नि शस्त्र राहून प्रतिकार न करताही जर कौरव सेनेकडून
मारला ग्रेलो तर ते पला कल्याण पद नाहीं कां ठरणार?
१५ हे भगवंता , तू सगळे जाणतोस, माझी गति कुंठीत झाली आहे, तरी धर्म व अधर्म ह्यातील फरक
जाणण्यास माझे सन असमर्थ झाले आहे, म्हणून मी तुला विचारतो की जे खरे व श्रेयस्कर असेल ते
मला सांग. दुसर्या शब्दात विचरायचे म्हणजे, ह्या युद्धासागील खरा उद्देश व त्या बद्दलचे ज्ञान तू पला
सांगावेश, म्हणजे माझ्या मनातील शंकांचे निरसन होईल. मी हे युद्ध करण्यास योग्य अशा मनस्थितीत राहीन असे करावे.
1 thought on “भगवद्गीता -Bhagavad Gita In Marathi -ज्ञान व कर्म यांचा भक्तिशी काय संबंध आहे”
Comments are closed.