नरेंद्र मोदी यांना ग्रीस ने ग्रैंड क्रॉस ऑफ द ऑर्डर ने केले सन्मानित – Greece awarded Grand Cross of the Order of Honour to PM

नरेंद्र मोदी यांना ग्रीस ने ग्रैंड क्रॉस ऑफ द ऑर्डर ने केले सन्मानित – Greece awarded Grand Cross of the Order of Honour to PM

भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच ग्रीस ह्या देशाच्या वतीने सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

ग्रीस सरकारकडुन हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त करणारे नरेंद्र मोदी हे पहिले विदेशी सरकार प्रमुख आहेत.

शुक्रवारी २५ आॅगस्ट २०२३ रोजी ग्रीस ह्या देशातील राष्ट्राध्यक्ष कॅटरीना एन साकेरोपोलो यांच्या हस्ते भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्राॅस आॅफ आॅडर आॅफ आॅनर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Grand Cross of the Order of Honour
Grand Cross of the Order of Honour

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या विशेष पुरस्कारासाठी ग्रीस सरकारचे आपल्या आॅफिशिअल टविटर अकाऊंट वर टविट करून आभार देखील व्यक्त केले आहेत.

ग्रीसकडुन देण्यात आलेल्या ह्या विशेष सम्मानासाठी आभार व्यक्त करताना नरेंद्र मोदी म्हणाले की त्यांना मिळालेला हा पुरस्कार ग्रीस सरकारच्या तसेच येथील नागरिकांच्या मनात भारताविषयी असलेल्या आदराची भावना दर्शवते.

नरेंद्र मोदी हे देखील म्हणाले की तब्बल ४० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर प्रथमतः भारताच्या पंतप्रधानांनी ग्रीसला भेट दिली.

म्हणजे नरेंद्र मोदी ४० वर्षांनंतर ग्रीसला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनले आहेत.याआधी इंदिरा गांधी यांनी भारत देशाचे पंतप्रधान पदावर विराजमान असताना १९८३ मध्ये ग्रीसला भेट दिली होती.

तरी देखील ह्या दोघे देशांच्या नात्यातील गोडी उबदारपणा आजही टिकुन आहे.

नरेंद्र मोदी यांचे ग्रीस सरकारच्या तसेच येथील नागरिकांच्या वतीने मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.

Greece awarded Grand Cross of the Order of Honour काय आहे?

ग्रँड क्राॅस आॅफ आॅडर आॅफ आॅनर ह्या पुरस्काराची स्थापणा १९७५ मध्ये करण्यात आली होती.

हा पुरस्कार ग्रीसच्या राष्ट्रपतींच्या हस्ते इतर देशांतील अशा पंतप्रधान तसेच प्रतिष्ठित व्यक्तींना प्रदान केला जातो ज्यांच्या विशिष्ट स्थानामुळे ग्रीस ह्या देशाचा दर्जा अधिक उंचावला आहे.

See also  यशस्वी लोक नेमक वेगळ‌ काय करतात? जगातील १० यशस्वी, असामान्य ,अतुलनीय लोकांची कथा - Things Successful People Do Differently

हा एक विशेष पुरस्कार आहे ज्यामुळे भारत अणि ग्रीस ह्या दोघे देशांमधील भागीदारीची ताकद संपूर्ण जगाला अनुभवायास मिळते.