UDID 2022 – युडी आयडी कार्ड म्हणजे काय?अर्ज प्रक्रिया नोंदणी व फायदे – Benefits of UDID card 2022 in Marathi

UDID 2022 – युडी आयडी कार्ड म्हणजे काय?अर्ज प्रक्रिया नोंदणी व फायदे – Benefits of udid card 2022 in Marathi

युडी आयडीचा फुलफाँर्म काय होतो?Udid full form in Marathi

युडी आयडीचा फुलफाँर्म unique disability identity card असा होत असतो.

युडी आयडी कार्ड म्हणजे काय?Udid card meaning in Marathi

भारतातील जे व्यक्ती दिव्यांग तसेच,अपंग आहेत त्या सर्वाना अपंग असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून देण्याकरीता भारत सरकारने एक योजना सुरू केली आहे.ह्या योजनेचे नाव आहे युडी आयडी कार्ड.

ह्या योजनेदवारे भारत सरकार संगणकीय प्रणालीचा वापर करून भारतातील विविध राज्यात वास्तव्यास असलेल्या सर्व अपंग दिव्यांग व्यक्तींचा डेटा प्राप्त करून भारतात एकुण किती अपंग अणि दिव्यांग आहेत हे जाणुन घेणार आहे.

अणि अशा गरजु अपंग दिव्यांग व्यक्तींना सोयसुविधा पुरविण्यासाठी भारत सरकार अशा व्यक्तींना आँनलाईन पदधतीने एक युनिक सर्टिफिकेट,आयडी कार्ड प्रदान करणार आहे.ज्याचे नाव युडी आयडी कार्ड असे आहे.

ह्या कार्डमुळे देशातील सर्व अपंग अणि दिव्यांगाना सरकारकडुन सरकारी योजनांमध्ये काही विशेष लाभ प्रदान केले जाणार आहे,

युडी आयडी कार्डचा वापर करून देशातील विविध राज्यांमधील सर्व दिव्यांग अणि अपंगांना काही विशेष लाभ प्राप्त होणार आहे.

See also  रोहित शर्मा यांच्या विषयी जाणून घ्यायची रोचक तथ्ये Amazing facts about rohit sharma in Marathi

युडी आयडी कार्डचे आपणास कुठे व कोणते लाभ प्राप्त होणार आहेत?

मित्रांनो आपणास वरील परिच्छेदातुन हे नक्की कळले असले की सरकारकडुन युडी आयडी कार्ड हे फक्त देशातील सर्व अपंग अणि दिव्यांग व्यक्तींसाठी बनविले जात आहे.जेणेकरून त्यांना सरकारकडुन काही विशेष सोय सुविधा प्राप्त होतील.

चला तर मग मित्रांनो आता जाणुन घेऊ युडी आयडी कार्डचे अपंग अणि दिव्यांग व्यक्तींना कोणकोणते लाभ प्राप्त होणार आहे.कोणकोणत्या विशेष सुविधा ह्या कार्डमुळे दिव्यांगांना अपंगांना मिळणार आहे.

युडी आयडी कार्डमुळे देशातील अपंग अणि दिव्यांगांना पुढील लाभ प्राप्त होणार आहे –

● युडी आयडी कार्डमुळे देशातील अपंग दिव्यांग व्यक्तींना मिळणारा सर्वात पहिला अणि महत्वाचा फायदा आहे स्काँलरशिप.जे विदयार्थी दिव्यांग तसेच अपंग आहेत.ज्यांनी आपले ग्रँज्युएशन पूर्ण केले आहे अणि पुढे त्यांना अजुन उच्चशिक्षण देखील करायचे आहे.पण त्यांची आपल्या उच्च शिक्षणासाठी पैसे खर्च करण्याची आर्थिक कुवत नाहीये

अशा विदयार्थींना युडी आयडी कार्डमुळे आपले उच्च शिक्षण करण्यासाठी स्काँलरशिपसाठी अँप्लाय करून स्काँलरशिपचा फायदा घेता येणार आहे.

● जे अपंग अणि दिव्यांग व्यक्ती नोकरी करत आहेत नोकरदार आहे अणि दरवर्षी सरकारला त्यांच्या सँलरी मधुन इन्कम टँक्स देखील भरत आहे.अशा व्यक्तींना युडी आयडी कार्डमुळे इन्कम टँक्समध्ये काही सवलती प्राप्त होणार आहे.

इन्कम टँक्स मधील काही कलमांतर्गत जसे 80 यु 80 डीडी अंतर्गत दिव्यांगांना इन्कम टँक्समध्ये सवलत दिली जाणार आहे.पण ही सवलत आपल्या अपंगत्वाच्या विकलांगतेच्या टक्केवारीवर अवलंबुन असते.म्हणजे समजा एखादा उमेदवार ज्याला 40 टक्के ते 19 टक्के इतके अपंगत्व दिव्यांगता आहे तर अशा उमेदवाराला इन्कम टँक्समध्ये इन्कम टँक्समध्ये 75 हजारापर्यत सवलत दिली जाते.अणि ज्या उमेदवारात पुर्णत 80 टक्के अपंगत्व दिव्यांगता आहे त्याला एक लाखापर्यत सुट दिली जात असते.ज्याच्यावर दिव्यांग व्यक्ती आपल्या पालनपोषणासाठी उदरनिर्वाहासाठी अवलंबुन आहे अशा व्यक्तीला देखील ही सूट प्रदान केली जात असते.

See also  रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी सरकारचा निर्णय ह्या लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द- Ration card new rules in Marathi

● यु डी आयडी कार्डचा तिसरा फायदा आहे सरकारी नोकरीसाठी राखीव जागा.आधी दिव्यांगांसाठी सरकारी नोकरीत तीन टक्के राखीव जागा होती.पण आता नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर ही मर्यादा एक टक्क्याने वाढवून चार पर्यत नेण्यात आली आहे.जेणेकरून जास्तीत जास्त दिव्यांग तसेच अपंगांना सरकारी प्राप्त करता येईल.अणि ते आत्मनिर्भर बनतील हा सरकारचा यामागील विशेष उददेश होता.

● युडी आयडी कार्डचा दिव्यांग अणि अपंग व्यक्तींना होणारा चौथा फायदा हा आहे की युडी आयडी कार्डमुळे ज्या अपंग अणि दिव्यांग व्यक्तींना स्वताचा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज हवे आहे अशा उमेदवारांना एन एच एफ डी सी ह्या बँकेकडुन आपला नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी बिझनेस लोन दिले जाणार आहे.

● युडी आयडी कार्डचा दिव्यांग अणि अपंग व्यक्तींना होणारा पाचवा फायदा आहे फ्री ट्रँव्हलिंग पास.युडी आयडी कार्डमुळे दिव्यांग तसेच अपंगांना फ्री ट्ँव्हलिंग पास तसेच ट्रँव्हलिंगमध्ये डिस्काउंट मिळणार आहे.म्हणजे ज्या प्रवासीकडे युडी आयडी कार्ड असेल अशा प्रवाशास फ्री मध्ये तसेच डिस्काउंट प्राप्त करून बसच्या रेल्वेच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.महाराष्ट तसेच अनेक राज्यांमध्ये आज दिव्यांग अपंगांना सरकारकडुन फ्री ट्ँव्हलिंग पास दिला जात आहे.

● युडी आयडी कार्डमुळे देशातील अपंग दिव्यांग असलेल्या सुशिक्षित बेरोजगार व्यक्तींना अन इम्पलाँईमेंटसाठी अलाऊन्ससाठी बेरोजगारी भत्तासाठी देखील ह्या कार्डचा फायदा प्राप्त होणार आहे.कारण ज्यांच्याकडे युडी आयडी कार्ड आहे असे अपंग दिव्यांग सुशिक्षित बेरोजगार व्यक्तींना नोकरीसाठी ह्या कार्डमुळे जवळच्या सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज करता येणार आहे.याचसोबत सरकारने ठरवलेली बेरोजगार रक्कम ठाराविक कालावधीने आपणास बेरोजगार भत्यात आपणास प्राप्त होत असते.

● जेव्हा आपण नवीन कार तसेच बाईक खरेदी करत असतो.तेव्हा देखील कार माँडिफिकेशन दरम्यान आपणास किमान 18 टक्के इतका डिस्काउंट प्राप्त होत असतो.

● परदेशात विमानाने जाणारया यात्रा प्रवास करणारया दिव्यांग तसेच अपंग प्रवासी व्यक्तींना एअर इंडियाच्या वतीने प्रवासखर्चात 50 टक्यापर्यत विशेष सुट दिली जात असते.

See also  रक्षाबंधन कोटस,शायरी,शुभेच्छा - Raksha Bandhan Quotes,Shayari,Wishes In Marathi And Hindi

● भारत सरकार कडुन सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत दिव्यांग तसेच अपंग व्यक्तींना राहण्यासाठी मोफत घराची सुविधा देखील युडी आयडी कार्ड असल्यास प्रदान केली जाते.

● याचसोबत सरकार चालवत असलेल्या विविध सामाजिक सुरक्षा कौशल्य प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,अटल पेंशन योजना,मनरेगा,लेबर कार्ड ईश्रम कार्ड इत्यादी योजनांचा डायरेक्ट लाभ देखील आपणास युडी आयडी कार्डमुळे मिळत असतो.

● दिव्यांगांना विवाह करण्यासाठी राज्यानूसार काही ठाराविक रक्कम देखील खर्चासाठी सरकारकडुन दिली जात असते.

● ज्यांच्याकडे युडी आयडी कार्ड आहे असे अपंग दिव्यांग व्यक्ती सरकारकडुन आपापल्या राज्यात ठरलेल्या रक्कमेनुसार एपेंशनची सुविधा देखील प्राप्त करू शकता.

● युडी आयडी कार्ड असलेल्या दिव्यांग तसेच अपंगांना राजीव गांधी फाऊंडेशन मार्फत फ्री मध्ये स्कुटी वितरीत केल्या जातात.ह्यासाठी आपणास अर्ज करावा लागत असतो.

● जेव्हा सरकार एखादा मोठा कार्यक्रम आयोजित करत असते तेव्हा त्या कार्यक्रमादरम्यान सरकार दिव्यांग तसेच अपंगाना चार चाकी अपंगसाठी खास बनविण्यात आलेली सायकल प्रदान करत असते.ज्यात बँटरी वर चालणारया सायकलीसाठी 75 टक्के चार्ज सरकार भरते बाकी 20 ते 25 टक्के चार्ज हा आपणास स्वता भरावा लागत असतो.

युडी आयडी कार्ड हे आपणास आँफलाईन सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज करून तसेच आँफलाईन पदधतीने अँप्लाय करून दोन्हीही पदधतीने देखील सहज प्राप्त होऊ शकते.

युडी आयडी कार्डसाठी आँनलाईन अर्ज कसा करायचा?how to apply for udid card online in Marathi

● सगळयात पहिले आपण ब्राऊझरमध्ये जाऊनwww.swavlambancard.gov.in ह्या भारत सरकारच्या आँफिशिअल वेबसाइटला व्हिझिट करायचे.

● आँफिशिअल वेबसाइटवर गेल्यावर आपणास वर उजव्या बाजुला काही आँप्शन दिसुन येतील यात आपण apply for disability certificate,udid card ह्या आँप्शनवर क्लिक करायचे.

● यानंतर आपल्यासमोर अजुन एक नवीन पेज ओपन होईल तिथे आपणास आपली वैयक्तिक माहीती,अपंगत्वाबाबतची दिव्यांगतेबददलची माहीती भरावी लागेल.सोबत आपणास आपली इम्पलाँयमेंट डिटेंल अणि आयडेंटीटी डिटेल सुदधा भरावी लागते.ज्याला अपंगत्वाचे दिव्यांगतेचे प्रमाणपत्र हवे आहे त्या उमेदवाराला ही सर्व माहीती भरणे गरजेचे असते.

● अणि मग सर्व माहीती भरल्यानंतर आवश्यक डाँक्युमेंट अपलोड केल्यावर फाँर्म शेवटी सबमीट करावा लागतो.

युडी आयडी कार्ड करीता फाँर्म भरण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील?

● आधार कार्ड

● उत्पन्नाचा दाखला

● निवासी दाखला

● दोन पासपोर्ट साईज फोटो

● कास्ट सर्टिफिकेट

● संपर्कासाठी मोबाइल नंबर

युडी आयडी कार्डकरीता अर्ज भरण्यासाठी पात्रतेच्या अटी –

अर्जदार भारत देशाचा नागरीक असावा तो येथील दिर्घकालीन रहिवासी असायला हवा.

उमेदवार अपंग तसेच दिव्यांग असणे गरजेचे आहे नाहीतर ह्या योजनेचा उमेदवाराला लाभ घेता येणार नही.