KFC म्हणजे काय ? KFC Information In Marathi

 KFC संपूर्ण माहिती KFC Information In Marathi

ज्या लोकांना चिकनयुक्त पदार्थ खायला खुप आवडते,जे चिकनयुक्त पदार्थ खाण्याचे शौकीन आहेत त्यांनी एक नाव नक्कीच आवर्जुन ऐकले असेल ते म्हणजे केएफसी.

पण खुप जण असे देखील असतील ज्यांनी हे नाव आज पहिल्यांदा ऐकले असेल म्हणून त्यांच्या मनात हा एक प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की हे केएफसी काय आहे?याचा अर्थ काय होत असतो?

वरील प्रस्तावनेत चिकनच्या शौकीनांचा उल्लेख केल्यामुळे ही एखादी नाँनवेज फुड कंपनी आहे का?असे देखील अनेक प्रश्नांचे कल्लोळ आपल्या मनात उठत असतील.

आजच्या लेखात ह्याच केएफसीविषयी सर्व माहीती जाणुन घेणार आहोत.

KFC चा फुल फाँर्म काय होतो?

KFC चा फुल फाँर्म Kentucky Fried Chicken असा होत असतो.

KFC काय आहे?

  • केंटकी फ्राईड चिकन(KFC) ही एक American Fast Food Restaurant Chain आहे.या रेस्टाँरंटमध्ये आपणास कोंबडीपासुन तयार केलेले चिकनयुक्त पदार्थ खायला मिळत असतात.
  • कारण ही एक चिकन स्पेशलिस्ट कंपनी आहे.जिचे विविध देशात नाँनवेज फुडचे रेस्टाँरंट आहेत.आणि ह्या कंपनीचे मुख्य कार्यालय लुईव्हेल केंटकी येथे आहे.
  • के एफसीला मँकडोनाल्डनंतरची जगातील दितीय क्रमांकाची restaurant chain म्हणजेच साखळी म्हणुन देखील ओळखले जाते.KFC संपूर्ण माहिती KFC Information In Marathi
  • संपुर्ण जगभरात आज केएफसीचे एकुण 19,450 रेस्टाँरंट आज उपलब्ध असलेले आपणास दिसुन येतात.आणि आज जगभरातील कित्येक ठिकाणी जगाच्या कानाकोपरयातील लोक ह्या रेस्टाँरंटसमध्ये जेवायला जाऊन स्वादिष्ठ व्यंजनांचा आनंद देखील लुटता आहे.
  • भारतामध्ये केएफसीचे पहिले रेस्टाँरंट हे 1995 मध्ये बंगलौर ह्या ठिकाणी उघडण्यात आले होते.त्यानंतर केएफसीचे रेस्टाँरंट संपुर्ण भारतात विस्तारतच गेले.
    के एफसी ही यामा कंपनीची सहाय्यक कंपनी देखील आहे.आज केएफसी ही एक 9 बिलियन डाँलरची कंपनी आहे.
See also  मिरा भाईंदर महानगरपालिका मध्ये नायब तहसिलदार पदासाठी अर्ज - Mira Bhayander Mahanagarpalika Recruitment 2023 In Marathi

केएफसीची स्थापणा कधी करण्यात आली?

केएफसीची स्थापणा ही 1930 मध्ये करण्यात आली होती.आणि ही स्थापणा कर्नल हार्लर सेंडर यांनी केली होती.

कर्नल हार्लर सेंडर कोण आहे?

  • कर्नल हार्लर सेंडर केएफसीचे संस्थापक आहे जे वारंवार अपयशाचा सामना करून यशस्वी झालेले एक संघर्षवादी व्यक्तीमत्व देखील आहे.
  • हार्लर हे फक्त पाच वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडीलांचा देहांत झाला होता.त्याच दरम्यान त्यांनी अत्यंत कमी वयात कुकिंग करणे शिकून घेतले होते.फक्त सतरा वर्षाचे असताना त्यांनी शिक्षण देखील अर्धवटच सोडुन दिले.
  • कित्येकदा त्यांना जिथे नोकरी करायचा प्रयत्न केला तिथुन नोकरीवरून काढुन टाकण्यात आले.
  • एकोणावीस वर्षाचे असताना त्यांचे लग्न झाले ज्यात त्यांना एक तीन अपत्य झाले पण त्यातील त्यांच्या एका मुलाचा मृत्यु होऊन जातो.त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगी देखील त्यांना सोडुन निघुन जातात.
  • त्यानंतर वयाच्या बाविसाव्या वर्षी ते कंस्ट्क्शनच्या कामात प्रवेश करतात पण तिथुन देखील त्यांना काढुन टाकण्यात येते.
  • आर्मी मध्ये भरती होतात पण तिथुन देखील त्यांना वय लपवण्याच्या दोषात हकलुन लावण्यात येते.मग लाँयर बनायचा प्रयत्न करतात पण त्यात देखील त्यांना यश मिळत नाही.कोर्टात भांडण केल्यामुळे त्यांना तिथुनही काढुन टाकले जाते.
  • मग वयाच्या 35 व्या वर्षी एक व्यवसाय सुरू केला पण त्यातही यश हाती आले नाही.मग 40 वय असताना ते पेट्रोल पंपवर त्यांचे बालपणापासुनचे आवडते काम कुकिंग करू लागले ज्यात ते चिकन बनवून विकायला लागले.आणि मग पुढे जाऊन लोकांचा प्रतिसाद बघुन त्यांनी स्वताचे एक छोटे रेस्टाँरंट सुरू केले त्याला देखील दुर्दैवाने आग लागली.
  • मग हार्लर सेंडर यांनी ठरवले की स्वताचे रेस्टाँरंट न टाकता वेगवेगळया रेस्टाँरंटमध्ये जाऊन कुकिंग करायची आणि तिथे फ्रेंचाइजी प्राप्त करायची.पण वेगवेगळया रेस्टाँरंट मध्ये जाऊन देखील त्यांना नकार आणि अपयशच हाती आले.
  • ज्यात त्यांना कित्येकदा स्वताच्या कारमध्येच झोपुन दिवस काढावे लागले होते.मग शेवटी एका रेस्टाँरंटने कर्नल हार्लर सेंडर यांची रेसिपी स्वीकार केली.मग त्याच रेस्टाँरंटची फ्रेंचाईजी कर्नल हार्लर सेंडर यांना मिळाली.हे बघुन बाकीचे रेस्टाँरंटवाले देखील त्यांच्याकडे फ्रेंचाईजीसाठी आँफर घेऊन येऊ लागले.
See also  नीरज चोप्रा कोण आहे? World Athletics championship 2023 winner Neeraj Chopra

मग शेवटी वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अजुन एक कंपनी सुरू केली जिचे नाव केएफसी असे होते.जी आज जगभरातील फेमस नाँन वेज फुड कंपनी म्हणुन ओळखली जाते.जी आज 9 बिलियन डाँलरची कंपनी आहे.

वारंवार अपयश आले,प्रत्येक ठिकाणाहुन कामावरून काढुन टाकण्यात आले अनेक सुरू केलेले उद्योग व्यवसाय फेल गेले,तरी देखील कर्नल हार्लर सेंडर यांनी जोपर्यत यश मिळत नाही तोपर्यत थांबले नाही.