नीरज चोप्रा कोण आहे? World Athletics championship 2023 winner Neeraj Chopra

नीरज चोप्रा कोण आहे? World athletics championship 2023 winner Neeraj Chopra

नीरज चोप्रा हा जागतिक अॅथेलेटीक्स चॅम्पियन शीप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकणारा आपल्या भारत देशातील एक प्रसिद्ध भालाफेक पटटु आहे.

भालाफेक ह्या खेळाला जेवलीन थ्रो असे देखील म्हटले जाते.नीरज चोप्रा ह्याला गोल्डन बाॅय ह्या नावाने देखील ओळखले जाते.

जागतिक अॅथेलेटीक्स चॅम्पियन शीप 2023 ही हंगेरी मधील बुडापेस्ट ह्या शहरात सुरू होती.

हया जागतिक अॅथेलेटीक्स चॅम्पियन शीप 2023 मधील अखेरच्या दिवशी भारताचा गोल्डन बाॅय नीरज चोप्रा ह्याने सुवर्णपदक पटकावले आहे.

जागतिक अॅथेलेटीक्स चॅम्पियन शीप 2023 मधील अखेरच्या दिनी नीरज चोप्रा ह्याने 88.17 मीटर इतक्या लांब अंतरावर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकुन एक नवीन इतिहासाची नोंद केली आहे.

2020 मध्ये आॅलम्पिक स्पर्धेत भालाफेक ह्या खेळात सुवर्णपदक पटकावलेल्या नीरज चोप्रा ह्याने वलड अॅथेलेटीक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये उत्तम कामगिरीचे प्रदर्शन करत पुन्हा एकदा क्रिडा क्षेत्रात आपल्या भारत देशाचे नाव मोठे केले आहे.

यापुर्वी नीरज चोप्रा ह्याने जागतिक अॅथेलेटीक्स चॅम्पियनशिप मध्ये रौप्यपदक पटकावण्यात यश प्राप्त केले होते.

पण जागतिक अॅथेलेटीक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये केलेल्या आपल्या ह्या दमदार कामगिरीमुळे नीरज चोप्रा ह्याने एक नवीन इतिहास रचण्यात यश प्राप्त केले आहे.

जागतिक अॅथेलेटीक्स चॅम्पियनशिप 2023 मधील रॅकिग –

जागतिक अॅथेलेटीक्स चॅम्पियनशिप 2023 ही हंगेरी मधील बुडापेस्ट येथे आयोजित करण्यात आली होती.

ह्या चॅम्पियनशिप मध्ये वेगवेगळ्या देशाच्या ज्या रॅकिग आल्या आहेत.त्यात अव्वल स्थानी अमेरिका हा देश आहे.अमेरिकेने एकुण 29 पदक जिंकले आहे.यात 12 सुवर्णपदक,8 रौप्यपदक,9 कांस्य पदक जिंकण्यात अमेरिकेने यश प्राप्त केले आहे.

See also  ॲमेझॉन प्राईम विषयी माहिती Amazon prime information in Marathi

यात दुसरया क्रमांकावर कॅनडा हा देश आहे.कॅनडाने एकुण सहा पदके जिंकली आहेत.ज्यात चार सुवर्णपदके,दोन रौप्य पदकांचा समावेश आहे.

यात तिसरया क्रमांकावर स्पेन हा देश आहे.स्पेनने देखील एकुण पाच पदके जिंकली आहे.ज्यात चार सुवर्णपदके अणि दोन रौप्य पदकांचा समावेश आहे.

जागतिक अॅथेलेटीक्स चॅम्पियनशिप रॅकिग मध्ये भारत देश अठराव्या क्रमांकावर आहे.अठराव्या क्रमांकावर एकूण सहा देश आहेत.

भारत,बहरीन,बुरकीना फासो,डोमोनियन रिपब्लिक,सेरबिया, व्हिनेझुएला इत्यादी देश अठराव्या क्रमांकावर आहेत.

वरील सर्व सहा देशांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकण्यात यश प्राप्त केले आहे.भारताकडून नीरज चोप्रा ह्याने एक सुवर्णपदक जिंकण्यात यश प्राप्त केले आहे.

नीरज चोप्रा ह्याने आतापर्यंत कोणकोणते पदक जिंकले आहेत?

नीरज चोप्रा ह्याला भारताचा गोल्डन बाॅय का म्हटले जाते?

  1. २०२० मधील झालेल्या टोकिओ आॅलम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा ह्याने सुवर्णपदक पटकावले होते.
  2. २०२३ मधील नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या वलड अॅथेलेटीक्स चॅम्पियनशिप मध्ये देखील त्याने भारताकडुन सुवर्णपदक पटकावले आहे.
  3. २०२२ मधील वलड अॅथेलेटीक्स चॅम्पियनशिप मध्ये देखील त्याने रौप्यपदक पटकावले होते.
  4. २०२२ मधील डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
  5. २०१८ मधील एशियन खेळात सुवर्णपदक पटकावले होते.
  6. २०१८ मधील काॅमन वेल्थ गेम्स मध्ये देखील सुवर्णपदक पटकावले होते.
  7. २०१७ मधील एशियन चॅम्पियन शीप मध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
  8. २०१६ मधील साऊथ एशियन गेम्स मध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
  9. २०१६ मधील वलड ज्युनिअर चॅम्पियन शीप मध्ये देखील सुवर्णपदक पटकावले होते.
  10. असे अनेक सुवर्णपदक नीरज चोप्रा ह्याने भारताकडुन भालाफेक हया खेळात जिंकलेले आहेत त्यामुळे त्याला भारताचा गोल्डन बाॅय असे म्हटले जाते.