ब्लुमुन तसेच सुपरमुन कशाला म्हणतात? ह्या दोघांची वैशिष्ट्ये काय आहेत?Blue moon,supermoon meaning in Marathi
ब्लु मुन यालाच मराठी भाषेमध्ये निळा चंद्र असे म्हटले जाते.
आज श्रावण महिन्यातील पौर्णिमा आज ३० आॅगस्ट २०२३ रोजी आहे.आज पौर्णिमेचा चंद्र आपणास एक वेगळ्याच रुपात पाहावयास मिळणार आहे.
खगोल तज्ञांनी असे सांगितले आहे की ३० आॅगस्ट २०२३ रोजी आपणा सर्वांना एक दुर्मिळ सुपर ब्लु मुन सुपर मुन आकाशामध्ये पाहावयास मिळणार आहे.ही घटना दशकातुन एकदाच घडुन येत असते
ब्लु मुन,सुपर मुन हा संपुर्ण वर्षातील सगळ्यात मोठा अणि तेजस्वी स्वरूपाचा चंद्र आहे.
ब्लुमुन तसेच सुपरमुन म्हणजे काय?supermoon meaning in Marathi
ब्लु मुन ही एक दुर्मिळ अशा स्वरुपाची खगोलीय घटना असते.
जेव्हा चंद्र हा पृथ्वीच्या अवतीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असतो.तेव्हा पृथ्वी अणि चंद्र या दोघांमध्ये असलेल्या अंतरात बदल होत असतो.
जेव्हा चंद्र हा पृथ्वीपासून अत्यंत लांब अंतरावर असतो तेव्हा त्या स्थितीला एपोजी असे म्हटले जाते अणि जेव्हा तो पृथ्वीच्या अत्यंत नजीक असतो तेव्हा त्यास पेरीजी असे म्हटले जाते.
ज्यावेळी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या अत्यंत नजीकच्या बिंदुजवळ पोहोचलेला असतो.तेव्हा चंद्राचा आकार आपणास नेहमीपेक्षा अधिक मोठा झालेला दिसुन येतो.हयाच स्थितीला सुपरमन असे म्हटले जाते.
सुपरमुन ह्या संज्ञेचा वापर सर्वप्रथम अॅसट्रोलाॅजर रिचर्ड नाॅल यांनी केला होता.
जेव्हा पौर्णिमा ही एका कॅलेंडर महिन्यामध्ये सलग दोन वेळा येते तेव्हा त्यास ब्लु मुन असे म्हटले जाते.
१ आॅगस्ट २०२३ रोजी पहिली पौर्णिमा होती अणि आता आज ३० आॅगस्ट रोजी दुसरी पौर्णिमा असणार आहे.
आज ३० आॅगस्ट २०२३ रोजी ब्लुमुन तसेच सुपरमुन तसेच पुर्ण चंद्र या तिन्ही गोष्टी एकाच वेळी घडणार आहेत त्यामुळे देखील ह्याला सुपर ब्लु मुन असे संबोधिले जात आहे.
सुपरब्लुमुन असल्यामुळे ३० आॅगस्ट रोजी चंद्र मोठा अणि उजळ अशा स्वरूपाचा दिसुन येणार आहे.
सुपर ब्लु मुन बघण्याची योग्य वेळ ही सुर्यास्त नंतरची मानली जाते.लंडन मधील लोकांना रात्री ८ वाजुन ८ मिनिटांनी दिसुन येईल अणि न्युयॉर्क अमेरिका मध्ये रात्री ८ वाजुन ३७ मिनिटांनी चंद्र सर्वात तेजस्वी झालेला आपणास पाहावयास मिळेल.
अनेक जणांना वाटेल की ब्लु मुन म्हणजे निळा चंद्र पण असे नाहीये ब्लु मुन याचा निळ्या रंगाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये.
साधारणतः ब्लुमुन हे दोन प्रकारचे असतात यात एक हंगामी ब्लुमुन असतो आणि दुसरा मासिक असतो.
आज ३० आॅगस्ट रोजी जो ब्लुमुन आपणास आकाशात दिसुन येईल तो हंगामी ब्लुमुन नसुन मासिक ब्लुमुन असणार आहे.
जगातील सर्वात मोठी अंतराळ संशोधन संस्था नासाने असे सांगितले आहे की ३० आॅगस्ट २०२३ नंतर थेट २०३७ मध्ये आपणास हा ब्लू मुन तसेच सुपर मुन पाहायला मिळणार आहे.
ब्लु मुन ही दुर्मिळ खगोलीय घटना घडत असताना महिन्यातुन दोन वेळेस पौर्णिमेचा चंद्र दिसु