आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मिळणार फक्त १ रूपयांत सर्वसमावेशक पीक विमा योजनेचा लाभ Pradhan Mantri pik vima yojana maharashtra 2023 in Marathi

आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार फक्त १ रूपयांत सर्वसमावेशक पीक विमा योजनेचा लाभ pradhan mantri pik vima yojana maharashtra 2023 in Marathi

सर्व शेतकऱ्यांना आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत फक्त एक रूपयात पिकाचा पीक विमा उतरवता येणार आहे.

याबाबत सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यास शासनाकडुन मंजुरी देखील देण्यात आली आहे.

२३ जुन २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जीआर मध्ये याची घोषणा करण्यात आली आहे.हा जीआर सविस्तर वाचण्यासाठी आपण maharashtra.gov.in ह्या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकतात.

ह्या जी आर मध्ये कोणकोणत्या महत्वाच्या बाबी सांगण्यात आल्या आहेत.हेच आपण आजच्या लेखात जाणुन घेणार आहोत.

शासन निर्णयात काय सांगितले आहे?

शासन निर्णयात असे सांगितले आहे की २०२३-२०२४ मधील अर्थसंकल्पीय भाषणात घोषित केल्यानुसार महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना आता फक्त १ रूपया भरून पीक विमा योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वसमावेशक पीक विमा योजना ही २०२३-२०२४ पासुन राबविण्यास मान्यता दिली गेली आहे.

त्या संदर्भात हा निर्णय आहे ज्यामध्ये खरीप अणि रब्बी हंगामाकरीता पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली गेली आहे.

सर्वसमावेशक पीक विमा योजने मध्ये खरीप अणि रब्बी हंगामाकरीता खालील काही जोखमीच्या बाबींचा समावेश देखील करण्यात आला आहे.

१) जोखमीच्या हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थिती मुळे पिकांची पेरणी अणि लावणी न झाल्याने होणारे नुकसान

२) पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थिती मुळे पिकांचे होणारे नुकसान

३) पीक पेरणीपासुन काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग,वीज कोसळणे, गारपीट, वादळ येणे,चक्रीवादळ,पुर क्षेत्र जलमय होणे,भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड कीड रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट

४) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान

५) नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान

इत्यादी‌ सर्व बाबींमध्ये शेतकरयांना पीक विमा प्राप्त होणार आहे.

अगोदर शेतकरयांना खरीप हंगामासाठी दोन टक्के हप्ता, रब्बी हंगामाकरीता दीड टक्के अणि रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के इतका हप्ता द्यावा लागत होता.पण आता कुठलाही हप्ता न भरता शेतकरयांना फक्त एक रूपयात पीक विमा मिळणार आहे.

See also  केंद्र सरकारने राज्यांना ओएम एसएस अंतर्गत केली जात असलेली तांदूळ गव्हाची विक्री केली बंद शासनाच्या हया निर्णयामुळे कर्नाटकची अन्न भाग्य योजना अडचणीत - Anna Bhagya Yojana Scheme - Karnataka

फक्त एक रूपया भरल्यानंतर शेतकरयांच्या पिकाचा विमा उतरविण्यात येणार आहे.ही सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप अणि रब्बी हंगामात चालेल.

२०२३-२०२४ पासुन २०२५-२०२६ ह्या तीन वर्षांच्या कालावधीपर्यंत ही योजना चालणार आहे.यात प्राॅफिट अणि लाॅस्ट माॅडेलचा तसेच कप अणि कॅप माॅडेलचा वापर केला जाईल.

सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिकांचे सरासरी नुकसान काढताना भात,गहु,सोयाबीन कापुस पिकांच्या ३० टक्के भारांकन तंत्रज्ञान उत्पादनाला देऊन पीक विमा प्रयोगांअंतर्गत प्राप्त होणारया उत्पन्नात मेळ घालून उत्पादन निश्चित केले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील राबविण्यात येत असलेल्या पीक विमा योजना मध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये फक्त यात शेतकरींना भरावा लागत असलेला खरीप रब्बी करीताचा हप्ता शेतकरींना आता भरावा लागणार नाही याची रक्कम राज्य सरकार कडुन दिली जाईल असे शासनाच्या जीआर मध्ये सांगितले आहे.

साधारणत १ जुलै २०२३ पासुन ह्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेसाठी अर्ज देखील सुरू करण्यात येणार आहे.अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यावर शेतकरी बांधवांना फक्त एक रूपयांची नोंद करून पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.