SOP चा फुल फॉर्म आहे Standard Operating Procedure म्हणजे मराठीत प्रमाणित संचालन प्रक्रिया
SOP म्हणजे सविस्तर मुद्देसूद सूचना ,दिशानिर्देश व मार्गदर्शिकेचा लिखित स्वरूपातील कागदोपत्री एक मसुदा. मोठ्या कंपनीनमध्ये, संस्थेत अश्या मार्गदर्शिका तयार केल्या जातात जेणेकरून तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या मार्गदर्शीका पाहून रोजची ठराविक कार्यालयीन काम करणं सोपं आणि सुलभ होत.
- ह्यात एकाद् ठराविक काम सोपविल्यनंतर कर्मचाऱ्यांनी कोणतं पाऊल आधी उचललं पाहिजे , काम कसे केले पाहिजे, स्टेप बाय स्टेप ते काम कसे पूर्णत्वास नेता येईल ह्या संबंधी सविस्तर माहिती दिलेली असते.
- आज SOP हे फक्त आवश्यक अश्या फक्त नियमावली नसून खर पाहता SOP तुन एकाद्या नवख्या कर्मचारील इत्यंभूत माहिती मिळत असते
SOP चे उदाहरण पाहुयात
समजा कंपनीत पर्चेस किंवा खरेदी विभागाला काही उपकरण ,साहित्य कंपनी करता विकत घेणे आहे . मग आपण घरी करतो तसे ह्या मोठया कंपन्या करत असतील का? कर्मचारी गेला आणि दुकानात किंवा मॉल किंवा एकाद्या फॅक्टरी जाऊन पैसे देऊन साहित्य घेऊन आला? नक्किच नाही.
मग अश्या ज्या नियमित टास्क असतात ,कार्य असतात ह्या करता कंपनी व्यवस्थपणा ने काही ठराविक लिखित नियमवाली ठरवून दिलेली असते व ती नियमावकी म्हणजेच SOP
ह्या ठिकाणी साहित्य खरेदी SOP साधारण खालील प्रमाणे असेल.
- खरेदी साहित्य नाव
- खरेदी करण्या मागचे कारण – कंपनी व्यस्थापणाकडून मान्यता घेणे
- खरेदीसाठी लागणारे बजेट तयार करून मान्यता घेणे
- खरेदी साहित्य चे कोटेशन गोळा करणे
- केलेल्या कोटेशन चे तुलनात्मक अभ्यास करणे.
- दिलेल्या किमतीची बाजारभावात पडताळणी करणे
- विक्रेता किंवा पुरवठादारांशी किंमती बद्दल वाटाघाटी , बोलणी व तडजोड करून खरेदी किमती ठरवणे
- ठरवलेल्या किमतीवर आधारित विक्रेता निवड करून व्यवस्थापना कडून मान्यता घेणे
- खरेदी ऑर्डर विक्रेत्यांला पाठवणे
- साहित्य ची ,मालाचा दर्जा वेळोवेळी तपासत राहणे
- मान्यता दिलेल्या दर्जेनुसार आलेल साहित्य घेणे
- ह्या विभाग करता साहित्य आलेले आहे त्या विभागाकडून पुन्हा एकदा साहित्य दर्जा तपासणे
- नियमानुसार व कोटेशन मधील अटी नुसार पैसे देणे.
- पेमेंट प्रक्रिया पूर्ण करणे.
- खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली असे जाहीर करून कार्य पूर्ण झाल्याच प्रमाणपत्र देणे.
SOP चे फायदे?
- SOP त सातत्य आणि समानता असल्यामुळं कामाच ठिकान कोणतेही असो , कार्य पूर्ण करणे सोपं होते.
- नियम ठरवून दिलेलं असल्यामुळे कर्मचाऱ्यांना एकमेकांनशी संवाद साधन सोपं होते, प्रक्रिया सोपी होते.
- विशेष म्हणजे नियम एक सारखे असल्याने ,समजा एक ठरावीक कार्य 10 कर्मचाऱ्यांना दिले तर SOP नुसार कुणी ते कार्य तत्परतेने व दर्जेदार केले ते ठरवता येते ,त्यानुसार कोणता कर्मचारी जास्त गुणवत्ताधारक ते समजते.
- काम जलद रित्या होत असल्याने कंपनीचा वेळ,पैसा व संसाधनांची बचत होते.
आता एक महत्त्वचा मुद्दा -SOP full form in Marathi
SOP ही फक्त कंपनी असते असे नसून, सर्व संस्था किंवा कार्यालय सरकारी व खाजगी तसेच विद्यालय शाळा किंवा मॉल्स , पार्क्स व मनोरंजनाची ठिकाणी कोणत्या न कोणत्या तरी कार्य करता ह्या SOP कार्यान्वित असतात.
- संरक्षणात्मक SOP -जसे काही संकट ,आपत्ति आल्यास काय पावलं घ्यावी
- चाचणी SOP – समजा आपण बियाणे मागवले तर त्यांची लागवड चाचणी घेणे
- पृथकरण SOP – पीक उगवून आल्यानंतर पिकांची उत्पादनच पृथकरण करणे
- नमुना घेण्यासाठी SOP – आलेलया उत्पादनाच्या लॉट मधून एकद्या लॅब मध्ये तापसणी साठि नमूना घेणे
1 thought on “SOP म्हणजे काय ? SOP full form in Marathi”
Comments are closed.