मैत्रीवर निबंध अणि भाषण – Friendship Essay And Speech In Marathi

मैत्रीवर निबंध अणि भाषण – Friendship Essay And Speech In Marathi

मित्रांनो मैत्री हा आपल्या प्रत्येकाच्याच जीवणातील एक खुप महत्वपूर्ण भाग आहे.मित्राविना आपले सर्वाचेंच जीवण अर्धवट असते.

कारण मित्र हा आपल्या जीवणातील एक असा हक्काचा व्यक्ती असतो ज्याच्याशी काही रक्ताचे नाते नसले तरी देखील रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक घटट नाते जोडले गेलेले असते.फ्रेंडशिप डे हा मैत्रीला समर्पित केला गेलेला दिवस आहे.

तसे पाहायला गेले तर मित्र तर आपल्या प्रत्येकाच्या जीवणात खुप असतात.

पण आपल्या जीवणात एक मित्र हा असा असतो जो आपल्या सर्वाच्या जीवणात एका आधारस्तंभाचे काम करत असतो.

आपल्या सुखदुखात आपल्यासाठी धावुन येत असतो.अडीअडचणीत आपल्याला मदत करायला नेहमी तयार असतो.

सर्व जग आपल्याला एकटे सोडुन जाते तेव्हा मित्रच हा एक असा व्यक्ती असतो जो आपली संकटामध्ये साथ देत असतो.

आपल्या जीवणातील अशा गोष्टी आपण मित्राजवळ बिनधास्त शेअर करू शकतो.ज्या आपल्या आईवडीलांशी भावंडांशी बोलायला शेअर करायला आपल्याला भीती वाटत असते.

प्रत्येकाच्या आयुष्यात दोन प्रकारचे मित्र असायला हवेत.एक श्रीकृष्णासारखा जो आपल्या मित्राला अर्जुनाला रणांगणात उतरून शस्त्र न उचलता देखील युदधात विजय मिळवून देतो.

तसेच खुप श्रीमंतीत असताना देखील गरीब मित्राने प्रेमाने आणलेले शिळे पोहे देखील पंचपंक्वानासारखे आवडीने खातो.

नाहीतर कर्णासारखा मित्र असावा जो आपल्या मित्राची चुक असुन देखील आपली मैत्री निभवण्यासाठी सर्व जगाशी भिडुन जातो.मित्रासाठी जीव द्यायला तयार असतो.

पण मित्र निवडताना आपण चांगले सकारात्मक विचार असलेले,कुठलेही वाईट व्यसन न करणारे,आपल्या सुखदुखात धावुन येतील असे जिवाभिवाचे मित्र निवडायला हवे.

कारण मित्राचा सहवास आपल्या प्रत्येकाच्या जीवणात फार महत्वाची भुमिका पार पाडत असतो.कारण आपण जर चांगला मित्र निवडला तर त्याच्या चांगल्या संगतीचा असर आपल्यावर देखील पडत असतो.

पण याचठिकाणी आपला मित्र जर मद्य प्राशन करणारा,सिगारेट ओढणारा,गुटखा तंबाखु खाणारा नकारात्मक विचार असलेला असेल तर त्याची वाईट सवय त्याच्यासोबत त्याच्यासंगतीत राहुन आपल्याला देखील जडत असते.

See also  जनहित याचिका म्हणजे काय ? PIL Marathi information

म्हणुन आपण नेहमी सकारात्मक विचार असलेल्या,कुठलेही वाईट व्यसन नसलेल्या,अणि आपल्या सुखदुखात धावून येणारया अशाच मित्रांच्या संगतीत राहायला हवे.

मैत्री हे एक असे पवित्र नाते आहे ज्यात ना कुठली जात धर्म बघितला जातो ना कुठला वर्ण बघितला जातो.मैत्रीला कुठलेच गरीबी तसेच श्रीमंतीचे बंधन नसते.

मैत्री ही आपण एखाद्या पाळीव प्राण्याशी देखील करू शकतो.कधी कधी आपल्याला असेही मित्र भेटतात जे आपल्याला फक्त मतलबासाठी विचारत असतात.अणि स्वताचे काम झाले की आपल्याला विसरून जात असतात.

पण आपण नेहमी अशा मित्रांपासुन दुर राहायला हवे जे आपल्याला फक्त स्वताच्या मतलबासाठी विचारत असतात.आपण असे मित्र जोडावे जे आपल्याशी निस्वार्थ भावनेने मैत्री करतील.

आपली श्रीमंती अणि पैसा बघुन नव्हे तर आपला स्वभाव बघुन आपल्याशी मैत्री करतील.अणि आपल्याशी केलेली मैत्री शेवटपर्यत निभावतील सुदधा.