रेपो रेट म्हणजे काय – RBI मॉनेटरी पॉलिसी ? Repo rate meaning in Marathi

रेपो रेट म्हणजे काय – ?Repo rate meaning in Marathi

आपण जेव्हा एखादा पेपर वाचत असतो किंवा टीव्हीवर न्युज बघत असतो तेव्हा आपल्याला अचानक अशी एक बातमी वाचायला तसेच ऐकायला मिळते की आरबीआयने रेपो रेट कमी केला ज्याने होम तसेच लोन घेणे स्वस्त होणार आहे.

किंवा आपण असे देखील ऐकत असतो की आरबी आयने रेपो रेटमध्ये वाढ केल्याने होम लोन तसेच कार लोन घेणे महाग होणार आहे.

अशा वेळी आपल्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे हे रेपो रेट नेमकी काय भानगड आहे आणि रेपो रेटमध्ये वाढ तसेच घट झाल्याचा कार लोन आणि होम लोन यांच्यावर का परिणाम होत असतो.

आजच्या लेखात आपण ह्याच विषयावर सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

रेपो रेट म्हणजे काय?rapo rate meaning in Marathi

रिझर्व बँकेकडुन कमर्शिअल बँकांना ज्या दरावर कर्ज प्रदान केले जाते त्या दरालाच रेपो रेट असे म्हटले जाते.

सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर जेव्हा आपण एखाद्या बँकेत लोन घेण्यासाठी जात असतो तेव्हा आपल्याला कर्जाच्या स्वरूपात ज्या बँकेकडुन पैसे दिले जातात ते पैसे त्या बँकेचे नसतात तर ते बँकेला रिझर्व बँकेकडुन दिले जात असतात आणि रिझर्व बँक हे पैसे देताना जो व्याजदर बँकांवर आकारत असते.त्या व्याजदरालाच रेपो रेट असे म्हटले जाते.

See also  पीआयबी फॅक्ट चेक काय आहे? | PIB Fact Check

रेपो रेटमध्ये वाढ तसेच घट झाल्याचा कार लोन आणि होम लोन यांच्यावर काय परिणाम होत असतो आणि तो का होतो?

रेपो रेट मध्ये घट झाली तर कुठल्याही बँकेला आरबीआयकडुन स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध होते.आणि बँकेला जर आरबीआयकडुन कर्ज स्वस्त दरात उपलब्ध होत असेल तर बँक आपल्याकडुन कर्ज घेत असलेल्या कस्टमरला देखील स्वस्त दरात कर्ज प्रदान करत असते.म्हणजेच होम लोन कार लोन याचा ईएम आय बँक आपल्या ग्राहकांकडुन कमी घेत असते.

पण याच ठिकाणी जर रेपो रेटमध्ये वाढ झाली तर कुठल्याही बँकेला आरबी

आयकडुन महाग दरामध्ये कर्ज उपलब्ध होते.आणि बँकेला जर आरबीआयकडुन कर्ज महाग दरात उपलब्ध होत असेल तर बँक आपल्याकडुन कर्ज घेत असलेल्या कस्टमरला देखील जास्त दराची आकारणी करून त्याला कर्ज प्रदान करत असते.म्हणजेच होम लोन,कार लोन याचा ईएम आय बँक आपल्या ग्राहकांकडुन जास्त घेत असते.

रिर्व्हस रेपो रेट म्हणजे काय?Reverse repo rate meaning in Marathi

रिझर्व बँकेकडुन कर्ज घेत असलेल्या कमर्शियल बँकेला डिपाँझिट म्हणुन रिझर्व बँकेकडे एक रक्कम ठेवावी लागत असते.आणि मग त्या जमा केलेल्या डिपाँझिटच्या रक्कमेवर रिझर्व बँक कमर्शियल बँकेला व्याज देत असते.

आणि रीझर्व बँक कमर्शियल बँकेला जो व्याजदर देणे लागत असतो त्यालाच रिव्हस रेपो रेट असे म्हणतात.

रिव्हस रेपो रेट अंतर्गत आरबीआय मार्केटमधील रोख रक्कमेची तरलता म्हणजेच कँश लिक्विडीटी आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू शकते.

जर मार्केटमध्ये रोख रक्कम उपलब्ध असेल तर आरबीआय रिव्हस रेपो रेटमध्ये वाढ करते.याने सर्व बँका आपणास अधिक व्याज प्राप्त व्हावे याकरीता आपल्याकडील अधिकाधिक कँश रिझर्व बँकेत जमा करतात.

सीआर आर चा फुलफाँर्म काय होतो?full form of crr in Marathi

सीआर आरचा फुलफाँर्म cash reserve ratio असा होत असतो.

कँश रिझर्व रेशो म्हणजे काय?Cash reserve ratio meaning in Marathi

आपल्या देशात जो नियम लागु केला गेला आहे त्या नियमाअंतर्गत प्रत्येक बँकेने आपल्याकडे असलेल्या रक्कमेमधुन काही ठाराविक रक्कम रिझर्व बँकेकडे जमा करणे अनिवार्य करण्यात आले आहे यालाच cash reserve ratio असे म्हटले जात असते.

See also  राष्ट्रीय CAD दिवस | National CAD Day Information In Marathi

एस एल आर चा फुलफाँर्म काय होतो?slr full form in Marathi

एस एल आरचा फुलफाँर्म statutory liquidity rare असा होतो.

स्टँटयुटरी लिक्विडीटी रेट म्हणजे काय?Statutory liquidity rate meaning in Marathi

स्टँटयुटरी लिक्विडीटी रेट हा तो दर असतो ज्या दरावर कुठलीही बँक आपली एक विशिष्ट रक्कम शासनाकडे ठेवते.जिचा उपयोग अडीअडचणीच्या काळात व्यवहार करायला करण्यात येतो.

माँनिटरी पाँलिसी म्हणजे काय?monetary policy meaning in Marathi

माँनिटरी पाँलिसी याला मराठीत पतविषयक धोरण असे म्हटले जाते.हे सेंट्रल बँक आँफ इंडियाकडुन मांडण्यात आलेले एक आर्थिक धोरण असते.या धोरणामध्ये पैसे पुरविणे तसेच इंटररेस्ट रेट मँनेज करणे या गोष्टींचा समावेश होत असतो.