एसआयपी SIP म्हणजे काय ? STP SWP and SIP Meaning in Marathi

SIP Meaning in Marathi

एसआईपी,एसटीपी आणि एसडब्ल्यूपी -आर्थिक नियोजनातील तीन महत्वाचे भाग

आर्थिक निर्भरता – फायनांशील फ्रीडम हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते, आज बरेच financial awareness तरुण पिढीत येत आहे , आणि प्रत्येक जण ते मिळवण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करत असतो.प्रत्येकाला हे स्वप्न पूर्ण करायचे असते,पण कमी ज्ञान , सखोल माहिती चा अभाव आणि परतावा न मिळतता  पैसे गुंतून पडण्याच्या भीतीने ते धाडस करत नाहीत.हीच पैसे बुडण्याची भीती गुंतवणूकधाराना ,मुदत ठेवी, ठेव किंवा  financial instruments मध्ये यात गुंतवणूक करण्यापासून दूर ठेवत असते.  .

गुंतवणुकदारांनी त्यांच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर आले पाहिजे आणि गुंतवणुकीचे बाबत मूलभूत माहिती घेतली पाहिजे , नवनवीन मार्ग शोधले पाहिजेत.अशीच एक एक उत्तम संधी म्हणजे म्युच्युअल फँड मध्ये गुंतवणूक करणे.

बरेच फंड हौसेस आणि कंपन्या म्युचल फंड मध्ये  गुंतवणूक करण्याचे पर्याय उपलब्ध करून देत आहेत म्हणजे डेबिट फँड पासून ते इक्विटी फँड .आपल्याला  म्युच्युअल फँड मध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यात गुंतवणुकीचे दोन पर्याय असतात,

  • पहिला म्हणजे लम्प सम -Lump sum amount आणि
  • दुसरा एस आई पी.- SIP systemic investment planning

आर्थिक नियोजनावर भर देताना निवृत्तीच्या आधीच ,निवृत्ती नंतरची प्लॅनिंग एसआईपी,एसटीपी आणि एसडब्ल्यूपी याद्वारे गुंतवणूक योजना आखल्या पाहिजेत आणि आपले निवृत्ती नंतरचे जीवन आनंदात व आर्थिकचिंते पासून   मुक्त ठेवतात.

See also  50 World's largest companies - कोणती कंपनी कोणत्या देशाची - company belongs to which country

आपण आज आपल्या तरुण वयातच निवृत्ती नंतरचे आर्थिक नियोजन –financial planning कसे कराल ?

आपण तरुण वयात निवृत्ती नंतरची योजना कशी आखायची हे एका गोष्टीवरून पाहू.

आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण साधारण 21-22 वय असताना चांगली नोकरी असेल तर आपण गुंतवणूक करण्याचा निर्णय घेवू शकता आणि 1500-1000 Rs दर महिन्याला न चुकता अगदी नियमितपणे  एकाद्या नामांकित mutual fund गुंतवणुकीला सुरवात करू शकता, पुढे पगार वाढत असेल आणि आपण काटकसर करून फक्त गरजेपुरता खर्च करत  गुंतवणुकीची रक्कम ही हळूहळू नंतरच्या 5 वर्षापर्यंत वाढवल नेवू शकता व पुढे किमान निवृत्तीपर्यंत  तशीच गुंतवणूक सुरू ठेवली पाहिजे हे साध्य होवू शकत एसआईपी ने SIP ने .वरील फक्त उदाहरण असून , SIP आपण कधी ही सुरू करू शकता , कोणत्या ही वयात मग 30 असो की 45 -50 आपण तात्काळ SIP द्वारे आर्थिक गुंतवणूक केली पाहिजे.

SIP, STP and SWP Meaning in Marathi

एस आई पी म्हणजे काय ? SIP systemic investment planning

एस आई पी SIP (SIP Meaning in Marathi) ह्या प्रकारची गुंतवणूक सहसा  म्युच्युअल फँड मध्ये करता येते आणि ते गुंतवणूकदाराना ह्यामध्ये एक विशिष्ट रक्कम एका विशिष्ट कालावधी मध्ये SIP नुसार भरायची असते.विशिष्ट कालावधी मग तो कधीकधी महिन्याचा असतो,तर कधी कधी एका आठवड्याचा किंवा तो  कालावधी एका दिवसाचाही असतो.

आपण सिप SIP  एस आई पी मध्ये कमीतकमी 500Rs/महिना एवढी गुंतवणूक करू शकता आणि त्या पटीत वाढवू शकता .जर आर्थिक स्थिती चांगली असेल तर तुम्ही महिन्याला तुमच्या नियोजना नुसार हवे तितकी रुपये भरू शकता.

लक्षात असू एस आई पी मध्ये आज केलेली छोटी सुरवात तुमचे निवृत्ती नंतरचे जीवन पूर्ण तणाव मुक्त करू शकते.आनंदी बनवू शकते

एस टी पी म्हणजे काय ? Symmetric Transfer Plan

एस टी पी चा अर्थ आहे सिमेट्रिक ट्रान्सफर प्लॅन.ह्यात एस आई पी प्रमाणेच म्हणजे विशिष्ट रक्कम विशिष्ट कालावधीत गुंतवणूक करायची असते.एस आई पी आणि एस टी पी मध्ये फरक फक्त इतकाच आहे की,एस टी पी मध्ये तुमची रक्कम एका म्युच्युअल फँड योजनेतून दुसऱ्या म्युच्युअल फँड योजनेत ट्रान्सफर करता येते.

See also  Phone pe मध्ये bank account कसे add करतात? - How to add bank account on PhonePe

समजा आपण जर अक्सिस ब्ल्यू चिप फँड या (Debt scheme)मध्ये पैसे गुंतवले असतील आणि ते पैसे तुम्हाला अक्सिस ब्ल्यू चिप फँड (Equity scheme)मध्ये टाकायचे असतील चे असतील तर तुम्ही STP एस टी पी च्या मदतीने करू शकता.

एस डब्लू पी म्हणजे काय ? -Systematic withdrawal Plan

एस डब्लू पी म्हणजे सिस्टेमेटिक विथड्रॉवल प्लॅन.ह्यामध्ये गुंतवणूकदार त्याची गुंतवलेली रक्कम महिन्याने किंवा आठवड्याने काढू शकतो.समजा जर तुम्हाला पैश्याची खूप आवश्यक्यता भासली,तर तुम्ही म्युच्युअल फँड मध्ये गुंतवलेल्या फँड मधून एस डब्लू पी च्या मदतीने पैसे काढू शकता

वरील गुंतवणुकीचे तिन्ही मुख्य भाग आपल्याला  हे दाखवतात की आपण जर नियोजन ,आर्थिक शिस्त ,संयम आणि योग्य दिशेत  गुंतवणूक केली असेल तर आपली आर्थिक स्वप्ने अगदी सहजरीत्या  पूर्ण करू शकता.

आपली ठराविक पगराची नोकरी तुमच्या कायमस्वरूपी पैश्याच्या गरजा भागवणार नाही, ना की तुमची मुलेबाळे तुमच्या म्हातारपणातल्या आर्थिक गरजा भागवणार.त्या करता तुमी आजच नियोजन कारण गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही तरुण वयापासूनच स्वतःची संपत्ती निर्माण करायला हवी., स्वता आर्थिकरीत्या स्वयंपूर्ण व्हायला हव . एक चांगली आर्थिक योजना आखुन तुमचे निवृत्ती नंतरचे जीवन सुरक्षित करायला हवे.म्हणजे तुम्हाला निवृत्ती नंतर सुखा समाधानाने जागता येईल.

ह्या लेखानुसार तुम्हाला हे समजले असेल की,एक छोटी बचत आयुष्यात खूप मोठा बदल आणू शकते.तुम्ही तुमचे पैसे बँकेत ठेऊन श्रीमंत नाही होणार आहात, तुम्हाला त्यासाठी कुठेतरी गुंतवणूक करायलाच हवी.

एक आर्थिक ध्येय – योजने शिवाय कधीच पूर्ण होत नाही.त्यामुळे योग्य नियोजन शिवाय पर्याय नाही

भारतातील प्रसिद्ध म्युचल फंड कंपनी ची यादी

  1. Aditya Birla Sun Life MF
  2. Axis Mutual Fund
  3. DSP Blackrock Mutual Fund
  4. Edelweiss Mutual Fund
  5. Franklin Templeton Mutual Fund
  6. HDFC Mutual Fund
  7. HSBC Mutual Fund
  8. ICICI Prudential Mutual Fund
  9. IDBI Mutual Fund
  10. IDFC Mutual Fund
  11. Kotak Mahindra Mutual Fund
  12. L&T Mutual Fund
  13. LIC Mutual Fund
  14. Mirae Asset Mutual Fund
  15. Reliance Mutual Fund
  16. SBI Mutual Fund
  17. Tata Mutual Fund
See also  एसबीआय ची अमृत कलश योजना काय आहे? SBI Amrut Kalash yojana in Marathi

लेखक : Post Author


SIP KNOWLEDGE