२०२३ मधील मणिपूर नीट परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे NEET exam date 2023 postponed in Marathi
२०२३ मध्ये ७ मे २०२३ ह्या तारखेला म्हणजे आजच्या दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
मेडिकल प्रवेशाकरीता घेण्यात येत असलेल्या नीट युजी परीक्षा २०२३ राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेची तारीख ७ मे २०२३ असणार असे जाहीर करण्यात आले होते.
पण मणिपुर राज्यातील हिंसक वातावरण अणि सध्याची परिस्थिती बघता मणिपुर राज्यात परीक्षा केंद्र असलेल्या उमेदवारांची परीक्षा पोसपोन करण्यात आली आहे म्हणजे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत एनटीए नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडुन अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे.
ज्यात असे दिले आहे की मणिपूर मध्ये सध्या सुरू असलेल्या हिंसक परिस्थितीचा विचार करता कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करत यावर ध्यान केंद्रित करत
मणिपुर केंद्रात ज्या उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार होती अशा उमेदवारांची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असुन त्यांची परीक्षा लवकरच दुसरया एखाद्या तारखेला आयोजित करण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की शिक्षण राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी एनटीएला एक पत्र लिहिले होते ज्यात असे दिले होते की मणिपूर मधील सध्याची परिस्थिती बघता नीटची परीक्षा दुसरया एखाद्या तारखेला ठेवता येऊ शकते का याची तपासणी करावी असे राजकुमार रंजन सिंह यांनी म्हटले होते.
म्हणजेच मणिपूर केंद्रात घेतल्या जात असलेल्या नीट परीक्षेला सध्याची परिस्थिती बघता रिशेडयुलड करता येईल का हे बघावे पुन्हा वेळापत्रकाची शक्यता तपासावी अशी विनंती करण्यात आली होती.
मणिपुर राज्यातील दोन परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी तब्बल ५ हजार ७५१ उमेदवार बसणार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्याची परिस्थिती बघता मणिपुर राज्यातील केंद्रात घेतल्या जात असलेल्या उमेदवारांच्या परीक्षेची तारीख ही पुढे ढकलण्यात आली असुन नवीन परीक्षेची तारीख लवकरच येथील परिस्थितीचा आढावा घेऊन निश्चित करण्यात येणार आहे.