नरेंद्र मोदी स्टेडियम विषयी काही रोचक तथ्ये – Amazing facts about Narendra Modi stadium in Marathi

नरेंद्र मोदी स्टेडियम – Amazing facts about Narendra Modi stadium in Marathi

Amazing facts about Narendra Modi stadium in Marathi
Amazing facts about Narendra Modi stadium in Marathi

नरेंद्र मोदी स्टेडियमचे मेक ओव्हर म्हणजे निर्माण करण्यासाठी भारत सरकारने त्याच टीमला समाविष्ट केले होते ज्या टीमने स्टॅचयु आॅफ युनिटीच्या निर्मितीसाठी काम केले होते.

टाइम्स नाऊ मध्ये सांगितलेल्या नुसार ह्या स्टेडियमची पुनर्बांधणी ८०० करोड मध्ये करण्यात आली होती.

नरेंद्र मोदी स्टेडियम हे फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान म्हणून ओळखले जाते.

ह्या स्टेडियमच्या पार्किंग मध्ये तीन हजार कार अणि दहा हजार टुव्हीलर पार्क केल्या जाऊ शकतात एवढे मोठे पार्किंग ह्या क्रिकेट स्टेडियमचे आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये सेलिब्रिटीं अणि खेळाडुंकरीता स्टेडियम मध्ये ७६ काॅर्पोरेट बाॅक्स आहेत.सर्व बाॅक्स एअर कंडिशन आहेत ज्यात एका बाॅक्स मध्ये किमान २५ खेळाडू सेलिब्रिटी यांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमचे अनेकदा बदलण्यात आले आहे सर्वप्रथम ह्या स्टेडियमचे नाव गुजरात स्टेडियम असे होते.यानंतर हे नाव बदलुन सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम तसेच मोटेरा स्टेडियम असे करण्यात आले होते यानंतर मग शेवटी ह्या स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असे ठेवण्यात आले होते.

नरेंद्र मोदी स्टेडियम हे साबरमती नदीच्या जवळ वसलेले आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियम सर्वप्रथम १९८२ मध्ये बांधण्यात आले होते अणि याची पुनर बांधणीचे काम २०२० मध्ये करण्यात आले होते.

ह्या स्टेडियम मध्ये १.३ लाख इतके प्रेक्षक सामावून घेण्याची क्षमता आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियम सुमारे 63 एकरमध्ये पसरले आहे आणि त्यात 4 प्रवेश बिंदू देखील आहेत.

येथील फिल्डचा आकार १८० yard *150 yard इतका आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये सहा इनडोअर सराव खेळपट्टी आहेत अणि तीन आऊट डोअर सराव खेळपट्टी देखील आहेत.

नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये एकुण चार संघासाठी ड्रेसिंग रूम बनवण्यात आले आहे.

See also  अँड्रॉइड आवृत्ती इतिहास - Android version information Marathi

नरेंद्र मोदी स्टेडियम वर सुनील गावसकर यांनी १९८६ १९८७ दरम्यान टेस्ट क्रिकेट मध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या.